Author: अनंत पांगारकर

संगमनेर हादरले, सुभाष लोळगे यांच्या कान्हा ज्वेलर्सवर दरोडा  दुचाकीवरून आले पाच दरोडेखोर… सोमवार, ११ नोव्हेंबर  संगमनेर – संगमनेरच्या साकुरमधून खळबळ माजविणारी घटना समोर आली आहे. हवेत गोळीबार करत दरोडेखोरांनी ज्वेलर्स दुकानावर दरोडा टाकत दागिन्यांची लूट केली आहे. साकुर मधील सुभाष लोळगे यांच्या कान्हा ज्वेलर्स या दुकानात दुपारी पावणेदोन वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली असून परिसरात यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. साकुर बस स्थानकाजवळ गजबजलेल्या परिसरात निखिल सुभाष लोळगे यांचे ‘कान्हा ज्वेलर्स’ नावाने सोन्याचे दागिने विक्रीचे दुकान आहे. पावणे दोन वाजण्याच्या सुमारास दुकानातील कामगार जेवण करण्यासाठी गेले असता दुकानात एक कामगार असल्याचे संधी साधून पल्सर दुचाकीवरून आलेल्या पाच जणांनी दुकानासमोर हवेत…

Read More

सोमवार, ११ नोव्हेंबर  संगमनेर – मोहसीन शेख राज्यात विविध समाज त्यांच्या हक्कासाठी वाटत असताना मुस्लिम समाजाने देखील निवडणूक आपल्या स्वाभिमानाची असल्याची जाणीव ठेवत वंचित बहुजन आघाडीच्या मागे उभे राहण्याची आवश्यकता आहे. समाजाचे प्रश्न सोडविण्याचे ताकद वंचित चे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्यात आहे. त्यांची ताकद वाढविण्यासाठी संगमनेर मधून मुस्लिम समाजाने वंचितला मतदान करणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अब्दुल अजीज वोहरा यांनी केले. राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी प्रमुख उमेदवारांच्या प्रचाराने वेग पकडला आहे. संगमनेर विधानसभा मतदारसंघात प्रस्थापिताविरोधात वंचित बहुजन आघाडीने अब्दुल अजीज वोहरा यांना उमेदवारी दिली आहे. या मतदारसंघात सुरुवातीलाच वोहरा यांची उमेदवारी जाहीर झाल्याने त्यांना प्रचारासाठी मोठा अवधी मिळाला.…

Read More

सोमवार, ११ नोव्हेंबर  मुंबई – विधानसभा निवडणुकीत काँग्रेस उमेदवाराविरुद्ध बंडखोरी करणाऱ्या राज्यातील २१ जणांवर काँग्रेस पक्षाने ६ वर्षांसाठी निलंबनाची मोठी कारवाई केली आहे. निलंबनाची कारवाई करण्यात आलेल्यामध्ये अहमदनगर शहरमधून मंगल विलास भुजबळ यांचा देखील समावेश आहे. काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्या आदेशावरून प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या निर्देशाने ही कारवाई करण्यात आली असल्याची माहिती काँग्रेसचे उपाध्यक्ष संघटन व प्रशासन नाना गावंडे यांनी दिली आहे. विधानसभा निवडणुकीत १६ मतदार संघात महाविकास आघाडीचे उमेदवार तसेच काँग्रेसच्या अधिकृत उमेदवारांविरोधात बंडखोरी झाले आहे. त्यामुळे काँग्रेस पक्षाने या सर्व बंडखोरांवर सहा वर्षांसाठी निलंबनाची कारवाई केली. या बंडखोर उमेदवारांवर झाली निलंबनाची कारवाई… (कंसात मतदार संघ) आनंदराव गेडाम,…

Read More

रविवार, १० नोव्हेंबर संगमनेर – प्रतिनिधी  निंबाळे येथील घटने संदर्भात पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहे. सदरची घटनाही वाहनांचा कट लागल्याच्या कारणावरून घडली आहे. सद्यस्थितीत शांतता असून कोणीही कोणत्याही प्रकारची अफवा पसरवू नये, तसेच कोणत्याही व्यक्तीने कायदा व सुव्यवस्था बिघडविण्याचा प्रयत्न केल्यास अथवा घटनेबाबत कोणती अफवा पसरविल्यास त्याच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल. संगमनेरकरांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन संगमनेरचे पोलीस उपअधीक्षक कुणाल सोनवणे आणि पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांनी केले आहे. रविवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास विश्वनाथ सुखदेव शिंदे (रा. वाघापूर, ता. संगमनेर) हे एम.एच. १७ ए.ए. ८८५ या वाहनातून त्यांच्या मुलीस संगमनेर बस स्टैंडवर सोडण्यात…

Read More

रविवार, १० नोव्हेंबर  संगमनेर – संगमनेरलगत असलेल्या एका गावामध्ये तीस वर्षीय विवाहित महिलेवर बलात्कार झाल्याचा प्रकार समोर आला आहे. शहर पोलीस ठाण्यात पीडीत महिलेच्या सासूने दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती देण्यात आली. बलात्काराची ही घटना ६ नोव्हेंबर रोजी दुपारी तीन वाजता घडली असून या संदर्भात पीडित महिलेच्या सासूने ८ नोव्हेंबरला दिलेल्या फिर्यादीवरून संगमनेर शहर पोलिसांनी नामदेव मच्छिंद्र चव्हाण (रा. महादेव वस्ती, सुकेवाडी, संगमनेर) याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पीडित महिला शौचासाठी घराच्या पाठीमागे असलेल्या शेतामध्ये गेली असताना तेथे आलेल्या नामदेव चव्हाण यांनी या महिलेवर बलात्कार केला. तसेच झालेला प्रकार कोणाला सांगितला तर तुला जीवे…

Read More

रविवार, १० नोव्हेंबर  दुचाकीवर मुलीला घेऊन संगमनेरकडे येत असताना निंबाळे गावच्या शिवारात एका तरुणाने दुचाकीला कट मारला. त्यामुळे कट का मारला असे विचारण्यात आले असता दुचाकीला कट मारणाऱ्या तरुणाने बापलेकीला बेदम मारहाण करण्याची घटना घडली. या घटनेमुळे संतप्त झालेले ग्रामस्थ रस्त्यावर उतरले. आंदोलनकर्त्यांनी आरोपीला अटक करून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. अखेरीस पोलिसांनी संबंधित युवकाला ताब्यात घेतल्यानंतर तणाव शांत होण्यास मदत झाली. राज्यासह संगमनेर आणि लगतच्या शिर्डी विधानसभा मतदारसंघात सध्या निवडणुकीची धामधूम सुरू आहे. एकीकडे निवडणूक प्रचार शिगेला जात असताना दुसरीकडे हा प्रकार समोर आला. दोन धर्मीयात झालेल्या वादाचे परिणाम जातीय तणावात निर्माण होण्याची शक्यता असल्याने पोलीस यंत्रणा सतर्क…

Read More

रविवार, १० नोव्हेंबर  मुंबई – शेतकऱ्यांची कर्जमाफी, २५ लाख रोजगार, महिला आणि वृद्धांना दरमहा २१०० रुपयांसह आमची बरच काही असा जाहीरनामा भारतीय जनता पक्षाने प्रसिद्ध केला आहे. हा जाहीरनामा महाराष्ट्रातील जनतेच्या आकांक्षांचे प्रतिबिंब असल्याचे शहा यांनी म्हटले आहे. रविवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मुंबईतील हॉटेल सोफिटेलमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध केला. हा जाहीरनामा विकसित भारत आणि विकसित महाराष्ट्राचा रोडमॅप आहे. भाजप जे म्हणेल ते पूर्ण करते. हा महाराष्ट्राच्या पूर्व विकासाचा जाहीरनामा आहे. राज्याच्या विकासासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. २० नोव्हेंबरला राज्यातील २८८ विधानसभा जागांसाठी निवडणूक होत असून २३ नोव्हेंबरला मतमोजणी…

Read More

रविवार, १० नोव्हेंबर जीभ घसरलेल्या भाजप खासदार धनंजय महाडिक यांनी केलेल्या विधानामुळे आणि दमदाटीमुळे त्यांच्यावर जोरदार टीका होत आहे. खासदार महाडिक यांनी लाडकी बहीण योजनेअंतर्गत दीड हजार रुपये घेणाऱ्या महिला जर काँग्रेसच्या रॅलीत दिसल्या तर त्यांचे फोटो काढून घ्या, नाव लिहून घ्या आणि आम्हाला पाठवा. त्यांची व्यवस्था आम्ही करू, असं वक्तव्य केलं आहे. राज्यात विधानसभा निवडणुकीचे वातावरण तापले आहे. आपल्या उमेदवाराच्या प्रचारार्थ नेत्यांच्या, पुढाऱ्यांच्या सभा भाषणांनी वेग घेतला आहे. आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. या भाषणांमधून अनेक नेत्यांची जीभ घसरत असल्याचे समोर येत आहे. पैसे घेतले तर आम्हालाच मते द्यावी लागतील, अशी इशारा वजा धमकी सत्ताधारी गटाचे आमदार रवी राणा यांच्यासह अनेक…

Read More

रविवार, १० नोव्हेंबर  नाशिक – निवडणूक आचारसंहिता काळात नाशिक परिक्षेत्रामध्ये पोलिसांची २६४ भरारी पथके कार्यरत असून या पथकाच्या माध्यमातून आतापर्यंत ६ कोटी ५३ लाखांच्या रोकडसह एकूण ३४ कोटी रुपयांचे मौल्यवान दागिने व अन्य प्रलोभन वस्तू असा सुमारे ४९ कोटी ०७ लाखांचा एकूण मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे, अशी माहिती नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे यांनी त्यांच्या ‘दक्षता’ कार्यालयात शनिवारी आयोजित पत्रकार परिषदेत दिली. राज्यात विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरू आहे. या पार्श्वभूमीवर आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. आचारसंहिता कालावधीत नाशिक परिक्षेत्रातील अहिल्यानगर, जळगाव, धुळे, नंदुरबारसह नाशिक जिल्ह्यांची पोलीस यंत्रणा सतर्क झाली आहे. भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार, नाशिक परिक्षेत्रात विशेष…

Read More

राज्यात सुरू असलेल्या विधानसभेच्या निवडणुकीत भाजप प्रणित महायुतीचा पराभव झालाच तर त्याला युतीतील नेत्यांची विकृतीच कारणीभूत असेल, असं आता मानायला हरकत नाही. एकदा ठेच लागली की माणूस जागा होतो. पण भाजपचे नेते काही केल्या जागे होत नाहीत, याचं आश्‍चर्य वाटतं. लोकसभा निवडणुकीत सपाटून मार खाल्ल्यावरही ज्यांच्यामुळे आपण हरलो त्यांच्याच खांद्यावर विधानसभेच्या प्रचाराची जबाबदारी टाकून भाजपने स्वत:च्याच पायावर मारून घेतलं आहे. नेते किती वाह्यात असावेत याचं प्रत्यंतर राज्यातील प्रचारात होत असलेल्या टीका-टिपण्णीवरून येतं. निवडणुकीत जय-पराजय हा ठरलेलाच असतो. त्याला कोणी पारखं राहिलेलं नाही. पण म्हणून दुसर्‍यावर कशीही टीका करता येत नाही. दोनच दिवसांपूर्वी जपानमधील इदोगावा शहराचे तत्कालीन आमदार प्रशांत पुराणिक यांची…

Read More