Author: अनंत पांगारकर

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन वाळू, खडी आणि मुरुमाच्या वाहतुकीसाठी दरमहा २० हजार रुपयांची लाच (हप्ता) मागणाऱ्या पोलीस कॉन्स्टेबल अनिल रामनाथ गवांदे (वय ३५) याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) १५ हजार रुपये स्वीकारताना रंगेहाथ पकडले.  ही कारवाई राहाता पोलीस स्टेशन हद्दीत करण्यात आली असून, यामुळे पोलीस दलात खळबळ उडाली आहे. तक्रारदार यांचा खडी, मुरुम आणि वाळू वाहतुकीचा व्यवसाय आहे. त्यांच्या खडी भरलेल्या डंपरवर १८ सप्टेंबर २०२५ रोजी राहाता पोलिसांनी कारवाई करत तो जप्त केला होता. त्यानंतर २१ सप्टेंबर रोजी पोलीस कॉन्स्टेबल गवांदे यांनी तक्रारदारांना फोन करून भेटायला बोलावले. राहाता पोलीस ठाण्याच्या हद्दीत व्यवसाय सुरळीत चालू ठेवायचा असेल आणि डंपरवरील कारवाई टाळायची…

Read More

मेष (Aries) – आजचा दिवस अनुकूल आहे. कामांमध्ये यश आणि सन्मान मिळेल. आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. कामाची प्राथमिकता ठरवून पुढे जा.  वृषभ (Taurus) – मेहनतीने स्थिती मजबूत होईल. वेळ आणि कामाचे व्यवस्थापन महत्त्वाचे आहे. दीर्घकाळापासूनचे अडथळे दूर होतील. आर्थिक स्थिती सुधारेल. मिथुन (Gemini) – तुमच्या सूझबूझ आणि कल्पनाशक्तीमुळे मोठे लाभ मिळतील. साख (प्रतिष्ठा) आणि सन्मानात वाढ होईल. नवीन कामाची सुरुवात करण्यासाठी दिवस चांगला आहे.  कर्क (Cancer) – भावूकतेवर नियंत्रण ठेवा. आरोग्य थोडे मध्यम राहू शकते. कुटुंबात सौहार्द राखणे महत्त्वाचे आहे. कामाच्या ठिकाणी सहकार्य मिळेल. सिंह (Leo) – सकारात्मक परिस्थितीचा फायदा घ्या. आज धनलाभ होण्याची शक्यता आहे. सामाजिक कार्यांमध्ये सहभाग…

Read More

अहिल्यानगर – नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजित तांबे यांनी आपला वाढदिवस यावर्षी वेगळ्या पद्धतीने साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. वाढदिवसाच्या अनुषंगाने त्यांचा एक मेसेज समाज माध्यमातून मोठ्या प्रमाणात वायरल होताना दिसत आहे.  काय म्हटले आहे तांबे यांनी या मेसेजमध्ये… प्रिय मित्र-मैत्रिणींनो, खरंतर 27 सप्टेंबरला माझा वाढदिवस आहे… दरवर्षी आपण सर्वजण मला प्रत्यक्ष अथवा डिजिटल माध्यमातून शुभेच्छा देता. तुमचे प्रेम व आपला ऋणानुबंध साजरा करण्याचा तो दिवस असतो. त्यामुळेच अनेकदा मला आवडत नसतानाही मी हा दिवस साजरा करतो, कारण तो दिवस आपल्याला भेटण्याची एक संधी असते. राजकीय-सामाजिक जीवनात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या दृष्टीने हा एक अत्यंत महत्त्वाचा कार्यक्रम होऊन जातो. आणि स्पर्धेच्या…

Read More

संगमनेर – पुणे-नाशिक महामार्गावर चंदनापुरी गावाजवळ गुरुवारी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास एक भीषण अपघात झाला. संगमनेरकडून पुण्याकडे जाणाऱ्या कार आणि समोरून येणाऱ्या आयशर टेम्पो यांच्यात समोरासमोर जोरदार धडक झाली. या अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला असून, कारमधील चार जण गंभीर जखमी झाले आहेत. या अपघातात कारचा अक्षरशः चक्काचूर झाला आहे. एमएच १२ एफ १४२१ क्रमांकाची कार पुण्याकडे जात होती, तर एमएच १३ सीयू ९१५६ क्रमांकाचा आयशर टेम्पो संगमनेरच्या दिशेने येत होता. दोन्ही वाहनांची जोरदार धडक झाल्याने कारमधील प्रवासी गंभीर जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच डोळासणे महामार्ग केंद्राचे पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले आणि जखमींना संगमनेरमधील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल…

Read More

संगमनेर – आमदार सत्यजित तांबे यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या ‘आय लव्ह संगमनेर’ चळवळीच्यावतीने शहरात नवरात्रीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या ‘खेळ पैठणीचा’ या विशेष कार्यक्रमाला महिलांनी पहिल्याच दिवशी प्रचंड प्रतिसाद दिला. या कार्यक्रमामुळे महिलांना त्यांच्या कलागुणांना वाव देण्यासोबतच आनंददायी मनोरंजनाचा अनुभव मिळाला. संगमनेरमधील गणेश नगर, महाराणा प्रताप चौक, आदर्श कॉलनी, मालदाड रोड, ऑरेंज कॉर्नर आणि आझाद चौक या भागांमध्ये हा कार्यक्रम बुधवारी रात्री उत्साहात पार पडला. कार्यक्रमासाठी प्रत्येक ठिकाणी महिलांचा मोठ्या संख्येने सहभाग होता, यामुळे या कार्यक्रमाची लोकप्रियता पहिल्याच दिवशी दिसून आली.  या कार्यक्रमाला माजी नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे, डॉ. मैथिलीताई तांबे आणि डॉ. जयश्रीताई थोरात यांची विशेष उपस्थिती होती. त्यांच्यासोबत ‘आय लव्ह…

Read More

संगमनेर – माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर तालुक्याच्या विकासाला आणखी बळ मिळाले आहे. तालुक्यातील विविध रस्त्यांच्या मजबुतीकरण आणि रुंदीकरण कामांसाठी जिल्हा वार्षिक योजनेतून ८५ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती आमदार सत्यजित तांबे यांनी दिली. या निधीमुळे तालुक्याचे रस्त्यांचे जाळे अधिक मजबूत आणि सुलभ होणार आहे. आमदार सत्यजित तांबे यांनी या निधी मंजुरीबद्दल सांगितले की, माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या दूरदृष्टीमुळे एकेकाळी दुष्काळी असलेला संगमनेर तालुका आज ‘वैभवशाली तालुका’ म्हणून ओळखला जातो. त्यांनी नेहमीच सर्वसामान्य नागरिकांच्या विकासाला प्राधान्य दिले आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली, जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधारण २०२५-२६ अंतर्गत ३०५४, ३०६८ ग्रामीण रस्ते विकास व मजबुतीकरण योजनेतून जिल्हा…

Read More

संगमनेर – संगमनेर तालुक्यातील आश्वी जवळील खळी येथील कांगणवाडी येथे एका अत्यंत हृदयद्रावक घटनेत गरम पाणी अंगावर पडून भाजल्याने आजी आणि तिच्या पाच वर्षांच्या नातवाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली असून, सोसे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. ही दुर्दैवी घटना ८ सप्टेंबर २०२५ रोजी पहाटेच्या सुमारास घडली होती. खळी कांगणवाडी येथील रहिवासी श्रीमती सिंधुबाई नामदेव सोसे (वय ५२) आणि तिचा नातू राहुल प्रकाश सोसे (वय ५) अंघोळीसाठी गरम केलेले पाणी वापरत असताना, ते अनावधानाने त्यांच्या अंगावर सांडले. या अपघातात दोघेही गंभीररित्या भाजले. त्यांच्या शरीराचा सुमारे ६० टक्के भाग भाजला होता, विशेषतः पाठीचा मागील भाग आणि…

Read More

मेष: आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला राहील. नशिबाची पूर्ण साथ मिळेल आणि बऱ्याच दिवसांपासून अडकलेली कामं पूर्ण होतील. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांची प्रशंसा मिळेल आणि तुमचे मान-सन्मान वाढेल. वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यात संतुलन राखण्याचा प्रयत्न करा. वृषभ: आजचा दिवस तुमच्यासाठी महत्त्वाचा आहे. कामाच्या ठिकाणी एखादी मोठी जबाबदारी मिळू शकते. यश मिळवण्यासाठी तुम्हाला पूर्ण एकाग्रतेने काम करावे लागेल. कोणत्याही प्रकारची शंका किंवा गोंधळ टाळा. सरकारी कामे मार्गी लागतील. मिथुन: आज तुमच्या विचारांमध्ये सकारात्मक बदल होईल. कार्यक्षेत्रात सुसंवाद साधाल. भागीदारीमध्ये व्यवसायात फायदा होण्याची शक्यता आहे. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक फायदेशीर ठरू शकते. कर्क: तुमचा आत्मविश्वास वाढलेला असेल. आरोग्य चांगले राहील. कौटुंबिक जिव्हाळा आणि प्रेम वाढेल.…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन  अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांचे पथक आणि श्रीरामपूर शहर पोलिसांनी दमदार कामगिरी केली आहे. अग्नि शस्त्र विक्रीसाठी काही संशयित श्रीरामपूरमध्ये आल्याची माहिती मिळतात या संयुक्त पथकाने कारवाई करत दोघाजणांना पकडले. कारवाईदरम्यान आरोपींकडून ३ गावठी पिस्टल, १० जिवंत काडतूस, ६ मॅगझिन आणि इर्टिका कारसह तब्बल ७ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, एका इर्टिका कार मधून दोघेजण शस्त्र विक्रीसाठी घेऊन येत असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर पोलीस पथकाने संजयनगर रोडवरील मिल्लतनगर येथे पाटाच्या कडेला आरोपींना पकडण्यासाठी सापळा लावला होता. संशयित वाहन तेथून जात असताना पोलिसांनी ते…

Read More

संगमनेर – संगमनेर तालुक्यातील चंदनापुरी घाटाजवळ एका ६८ वर्षीय व्यक्तीची मंगळवारी फसवणूक झाल्याची घटना उघडकीस आली आहे. प्रसाद देण्याच्या बहाण्याने अनोळखी इसमांनी एका वृद्धाकडून दोन सोन्याच्या अंगठ्या हातचलाखीने काढून घेतल्या. या अंगठ्यांची अंदाजे किंमत ६०,००० रुपये आहे. याप्रकरणी संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिनकर विठोबा दिघे (वय ६८, रा. जोर्वे, ता. संगमनेर) हे २३ सप्टेंबर २०२५ रोजी दुपारी २:०० वाजता त्यांच्या मोटारसायकलवरून बाळेश्वरहून जोर्वे येथे परत येत होते. चंदनापुरी घाटाखालील ढगाडी मंदिराजवळ दोन अनोळखी तरुणांनी त्यांना थांबवले. या दोन्ही आरोपींनी दिघे यांचा विश्वास संपादन करून, हा प्रसाद देवाला द्या, असे सांगत त्यांच्याकडील सोन्याच्या…

Read More