Author: अनंत पांगारकर
मेष (Aries)- आज तुमच्या कामात यश मिळेल आणि तुम्ही उत्साही असाल. आर्थिक बाबतीत लाभ होण्याची शक्यता आहे. आरोग्याची काळजी घ्या. वृषभ (Taurus)- आजचा दिवस तुमच्यासाठी थोडा आव्हानात्मक असू शकतो. महत्त्वाचे निर्णय घेण्याआधी विचार करा. तुमच्या प्रियजनांसोबत वेळ घालवा, यामुळे तुम्हाला मानसिक शांती मिळेल. मिथुन (Gemini)- तुमची कल्पनाशक्ती आणि संवाद कौशल्ये आज खूप प्रभावी असतील. तुम्ही नवीन लोकांशी संपर्क साधू शकता, ज्यामुळे भविष्यात फायदा होईल. कामाच्या ठिकाणी तुमचे कौतुक होईल. कर्क (Cancer)- आज तुम्ही भावनिक आणि संवेदनशील राहाल. जुन्या आठवणी तुम्हाला त्रास देऊ शकतात. कौटुंबिक बाबींवर लक्ष केंद्रित करा आणि वाद टाळा. सिंह (Leo)- तुमच्या नेतृत्व गुणांमुळे तुम्हाला यश मिळेल. समाजात…
अहिल्यानगर – गणेशोत्सव आणि ईद-ए-मिलादच्या पार्श्वभूमीवर अहिल्यानगर जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी महत्त्वाचा आदेश जारी केला आहे. भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ च्या कलम १६३ (१) नुसार मिळालेल्या अधिकारांचा वापर करून, त्यांनी जिल्ह्यात लेझर लाईट, प्रेशर हॉर्न (दबाव हॉर्न) आणि कार्बन डायऑक्साइड वायूच्या वापरावर ८ सप्टेंबरपर्यंत पूर्णपणे बंदी घातली आहे. हा आदेश बुधवारपासून (३ सप्टेंबर) लागू झाला आहे आणि तो ८ सप्टेंबर २०२५ पर्यंत अमलात राहणार आहे. मिरवणुकांमध्ये काही मंडळांकडून मोठ्या प्रमाणावर वापरल्या जाणाऱ्या या वस्तूंमुळे ज्येष्ठ नागरिक, लहान मुले आणि आजारी व्यक्तींच्या आरोग्याला गंभीर धोका निर्माण होऊ शकतो. या साधनांच्या वापरामुळे श्वसन संस्थेला हानी…
संगमनेर – संगमनेरच्या गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी पोलीस प्रशासनाने मोठा निर्णय घेतला आहे. विसर्जन मिरवणूक मार्गावरील गवंडीपुरा मशीद ते नगरपालिका चौकापर्यंत डीजे वाजविण्यावर पूर्णतः बंदी घालण्यात आली आहे. शहर पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांनी एका पत्रकाद्वारे ही माहिती दिली. श्रीरामपूरचे अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांच्या अधिपत्याखाली गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शांतता समितीचे बैठक घेण्यात आली होती. या बैठकीला गणेश मंडळाचे पदाधिकारी, प्रतिष्ठित नागरिक, सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी आणि शांतता समितीचे सदस्य उपस्थित होते. या बैठकीमध्ये लेझरवर बंदी घातल्यानंतर डीजेचा मुद्दा उपस्थित झाला होता. मिरवणुकीमध्ये डीजेच्या अतिवापरामुळे ध्वनी प्रदूषण होते, तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो, यावर बैठकीत चर्चा करण्यात आली. त्यानंतर गणेश…
संगमनेर – कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी येत्या शनिवारी (६ सप्टेंबर) संगमनेरचा आठवडे बाजार बंद ठेवण्याचे आदेश प्रांताधिकारी अरुण उंडे यांनी पारित केले आहे. या आदेशावरून शनिवारी भरणारा आठवडे बाजार बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती नगरपरिषदेचे मुख्याधिकारी रामदास कोकरे यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे. अनंत चतुर्दशीच्या निमित्ताने शहरात निघणाऱ्या गणेश विसर्जन मिरवणुकीमुळे हा आठवडे बाजार शनिवारी एका दिवसासाठी बंद राहणार आहे. मानाच्या काही गणेश मंडळांच्या मिरवणुकीचा मार्ग हा बाजार भरणाऱ्या नेहरू चौकातून जात असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. शनिवारी गणेशोत्सवाच्या सांगतेचा दिवस असल्याने अनंत चतुर्दशीला शहरात मोठ्या प्रमाणावर गणेश विसर्जन मिरवणूक निघणार आहे. या मिरवणुकीदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू…
अहिल्यानगर: जिल्ह्यातील ११ नगरपरिषदा आणि एका नगरपंचायतीच्या प्रारूप प्रभाग रचनेवर दाखल झालेल्या एकूण २७२ हरकतींवर सुनावणी प्रक्रिया सुरू झाली आहे. जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी या हरकतींवर सुनावणी घेण्यासाठी स्वतंत्र उपजिल्हाधिकाऱ्यांची प्राधिकृत अधिकारी म्हणून नेमणूक केली आहे. या अधिकाऱ्यांनी हरकतींवर सुनावणी सुरू केली असून, त्यांना ९ सप्टेंबरपर्यंत अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. हरकतींची संख्या आणि सुनावणीचे वेळापत्रक- नगर जिल्ह्यातील संगमनेर, कोपरगाव, श्रीरामपूर, राहाता, राहुरी, शिर्डी, देवळाली प्रवरा, श्रीगोंदे, शेवगाव, पाथर्डी, जामखेड या ११ नगरपरिषदा आणि नेवासे नगरपंचायत अशा एकूण १२ पालिकांमध्ये गेल्या साडेतीन वर्षांपासून रखडलेल्या निवडणुका लवकरच होण्याची शक्यता आहे. या निवडणुकांसाठी प्रारूप प्रभाग रचना १८ ऑगस्ट रोजी जाहीर…
मेष (Aries): आजचा दिवस तुमच्यासाठी अनुकूल आहे. आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी तुमचे महत्त्व वाढेल. आरोग्य चांगले राहील. वृषभ (Taurus): तुम्हाला काही महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागतील. कुटुंबातील सदस्यांसोबत वेळ घालवल्याने आनंद मिळेल. खर्च जपून करा. मिथुन (Gemini): आज तुमची ऊर्जा खूप चांगली असेल. रखडलेली कामे पूर्ण होतील. विद्यार्थ्यांना यश मिळेल. प्रवासाचे योग आहेत. कर्क (Cancer): तुम्ही थोडे भावनिक होऊ शकता. शांत राहण्याचा प्रयत्न करा. कामावर लक्ष केंद्रित करा. आर्थिक बाबींमध्ये काळजी घेणे आवश्यक आहे. सिंह (Leo): आजचा दिवस तुमच्यासाठी फलदायी ठरेल. मित्र आणि कुटुंबियांचे सहकार्य मिळेल. नवीन प्रकल्पांवर काम सुरू करू शकता. कन्या (Virgo): आज तुम्हाला कामात जास्त…
अकोले- अकोले तालुक्यातील राजूर येथे सुरू असलेल्या पेट्रोल आणि डिझेलच्या अवैध विक्री केंद्रावर अहिल्यानगरच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकत मोठी कारवाई केली आहे. या छाप्यात सुमारे ६ लाख ४१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यापैकी एक आरोपी फरार आहे. गुप्त माहितीच्या आधारे, अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेचे पथक अकोले तालुक्यातील वारंघुशी येथे पोहोचले. तिथे पांडुरंग लक्ष्मण सदगीर (वय ४०, रा. वारंघुशी) याच्या घरासमोर अवैधरित्या प्लास्टिकच्या ड्रममध्ये पेट्रोल आणि डिझेलचा साठा आढळून आला. हा साठा कोणताही परवाना नसताना, जीव धोक्यात घालून विक्रीसाठी ठेवला होता. पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या पांडुरंग सदगीरने दिलेल्या माहितीनुसार, तो हे…
संगमनेर- पु. ल. देशपांडे यांच्या २५ व्या स्मृतिदिनानिमित्त आणि सुनिताताई देशपांडे यांच्या १०० व्या जयंतीनिमित्त अमृत सांस्कृतिक मंडळाने ‘सुंदर मी होणार’चा हृदयस्पर्शी, हृदय हेलावून टाकणारा नाट्यप्रयोग सादर केला. या नाटकाने संगमनेरकरांना मंत्रमुग्ध केले. सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या अमृत सांस्कृतिक मंडळाने आयोजित केलेल्या गणेशोत्सवामध्ये सादर झालेल्या या नाटकासाठी राज्याचे माजी मंत्री बाळासाहेब थोरात, कारखान्याचे कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर, सेक्रेटरी किरण कानवडे, कार्याध्यक्ष रामदास तांबडे, सेक्रेटरी संदीप दिघे, सांस्कृतिक मंडळाचे संचालक भारत देशमुख, बबन सावंत, अनिल पाटोळे, संजय मांडे, विलास जोंधळे, अनिल मोकळ, अनिल वरपे, दिलीप तांबे, राजू बड, अशोक मुटकुळे, नवनाथ गडाख, विक्रम खबाले यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.…
संगमनेर – संगमनेरचे शिवसेना आमदार अमोल खताळ यांच्यावर झालेल्या हल्ला प्रकरणी शहर पोलिसांनी अधिकृत माहिती दिली आहे. अटक केलेल्या प्रसाद आप्पासाहेब गुंजाळ (२७, रा. खांडगाव, ता. संगमनेर) याला संगमनेर न्यायालयाने मंगळवारी पोलीस कोठडीतून न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. तर आरोपीला चिथावणी दिल्याच्या कारणावरून भास्कर लहानु खेमनर यांना सहआरोपी करण्यात आले आहे. खताळ यांच्यावरील हल्ल्याप्रकरणी संगमनेर शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा रजि. नं. ७९८/२०२५ अंतर्गत भारतीय न्याय संहिता कलम १०९ आणि ३५१(२) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्याच्या तपासात भास्कर लहानू खेमनर (रा. संगमनेर) याचे नाव निष्पन्न झाले आहे. त्यांनी अटक केलेल्या आरोपीला गुन्हा करण्यास चिथावणी दिल्याने त्यांना सह-आरोपी करण्यात आले…
अहिल्यानगर- गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर अहिल्यानगर पोलिसांनी मोठी कारवाई करत, गावठी कट्ट्यांची तस्करी करणाऱ्या एका टोळीचा पर्दाफाश केला आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने श्रीरामपूरमध्ये सापळा रचून तीन आरोपींना अटक केली असून, त्यांच्याकडून ५ गावठी कट्टे, ९ जिवंत काडतुसे आणि एक पल्सर मोटरसायकल जप्त करण्यात आली आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या सूचनेनुसार गुन्हे शाखेने ही विशेष मोहीम सुरू केली होती. गोपनीय माहिती मिळाली होती की काही तरुण मध्य प्रदेशमधून गावठी कट्टे आणून श्रीरामपूरमध्ये त्यांची विक्री करणार आहेत. या माहितीच्या आधारे गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांनी आपल्या पथकासह श्रीरामपूर शहरातील रेल्वे उड्डाणपुलाजवळ असलेल्या हरेगाव फाट्यावर सापळा रचला. या कारवाईत पोलिसांनी…
