Author: अनंत पांगारकर

अहिल्यानगर –  स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ओडिशा राज्यातून तस्करी करून आणलेला तब्बल १२० किलो ९०५ ग्रॅम गांजा जप्त केला आहे. वडगाव गुप्ता परिसरात केलेल्या या कारवाईत पोलिसांनी गांजासह एकूण ८० लाख ८३ हजार ४६४ रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला असून दोघांना अटक केली आहे. पोलिसांना गुप्त माहितीदाराकडून मिळालेल्या माहितीनुसार, ओडिशा राज्यातून गांजाची मोठी खेप अहिल्यानगरमध्ये विक्रीसाठी आणली जात होती. त्यानुसार, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने सापळा रचला. शेंडी बायपास ते एम.आय.डी.सी. रोडवर वडगाव गुप्ता गावाजवळ हॉटेल किनाराजवळ पोलिसांनी एक संशयित ट्रक (एम.एच. १४ जी. यु. २१११) थांबवला. यावेळी ट्रकची तपासणी केली असता, त्यात नवनाथ अंबादास मेटे…

Read More

अहमदनगर जिल्ह्यात आकर्षणाचे केंद्र; संत ज्ञानेश्वर माऊलींचा संजीवन सोहळा आणि महादेवाचा देखावा ठरणार मुख्य आकर्षण संगमनेर –  गेल्या 11 वर्षांपासून खंडित झालेली परंपरा पुन्हा सुरु करत, यंदा मालपाणी उद्योग समूहाच्या श्री गणेश विसर्जन मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले आहे. ही मिरवणूक अधिक भव्य आणि शाही असणार असून त्यात विविध प्रकारच्या 22 पथकांचा समावेश करण्यात आला आहे. ही मिरवणूक मंगळवारी (२ सप्टेंबर) सकाळी साडेदहा वाजता मालपाणी लॉन्स येथून सुरु होणार आहे. मालपाणी उद्योग समूहाचे संचालक मनीष मालपाणी यांनी या संदर्भात माहिती दिली. ते म्हणाले, काही कारणांमुळे गेल्या एक दशकाहून अधिक काळ ही मिरवणूक काढली नव्हती. परंतु यंदा पुन्हा एकदा जुनी परंपरा सुरू…

Read More

आदर्श संगमनेर तालुक्याचा लौकिक देशात वाढवा – माजीमंत्री बाळासाहेब थोरात ‘आय लव संगमनेर’ ही चळवळ संगमनेरची संपन्नता वाढवणारी – आमदार सत्यजित तांबे महावादन सोहळ्यातून स्थानिक कलाकारांचा गौरव संगमनेर –  शुक्रवारी गणेशोत्सवाच्या उत्साहात संगमनेर शहर ढोल-ताशांच्या गजराने दुमदुमून गेले. ‘आय लव संगमनेर’ या चळवळीच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या महावादन सोहळ्यामध्ये तब्बल ४०० हून अधिक कलाकारांनी एकत्र येत अप्रतिम सादरीकरण केले. या कार्यक्रमाला शहरातील नागरिकांचा मोठा प्रतिसाद लाभला. या सोहळ्याला प्रमुख अतिथी म्हणून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, आमदार सत्यजित तांबे, डॉ. जयश्री थोरात, गिरीश मालपाणी, दिलीप पुंड, डॉ. मैथिली तांबे, नितीन अभंग यांच्यासह ‘आय लव…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन मेष (Aries): आज तुमच्यात भरपूर ऊर्जा असेल, जी तुम्ही कामात चांगल्या प्रकारे वापरू शकता. आर्थिक बाबींमध्ये अधिक लक्ष देण्याची गरज आहे. कुटुंबासोबत खास आणि मनोरंजक वेळ घालवण्याची संधी मिळेल. प्रेमसंबंधांमध्ये आनंद आणि गोडवा जाणवेल. वेळेवर समस्या सोडवल्यामुळे समाजात तुमचा आदर वाढेल. वृषभ (Taurus): आज तुम्हाला शांत आणि समाधानी वाटेल. कामाच्या ठिकाणी तुम्ही तुमच्या स्थिर गतीने जबाबदाऱ्या सहज पूर्ण कराल. प्रियजनांसोबतचे क्षण तुम्हाला मानसिक शांती देतील. पैशांच्या बाबतीत घेतलेले योग्य निर्णय आत्मविश्वास वाढवतील. आरोग्यासाठी आराम करणे आणि नियमित दिनचर्या पाळणे फायदेशीर ठरेल. मिथुन (Gemini): आज तुमच्या सभोवतालच्या वातावरणातील बदल तुमच्यात सर्जनशीलता निर्माण करेल. कामाच्या ठिकाणी नवीन कल्पना…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर –  बुधवारी रात्री शहरातील मालपाणी लॉन्स येथे आयोजित संगमनेर फेस्टिवल कार्यक्रमात शिवसेनेचे आमदार अमोल खताळ यांच्यावर हल्ला करण्यात आला. या प्रकरणी शुक्रवारी मध्यरात्री शहर पोलिसांनी गुन्हा दाखल करत आरोपी प्रसाद आप्पासाहेब गुंजाळ (रा. खांडगाव, ता. संगमनेर) याला अटक केल्याची माहिती पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांनी दिली आहे. तर पोलीस गुन्ह्याचा सर्व बाजूनी तपास करत असून आरोपीला कोणी चिथावणी दिली किंवा कसे? आरोपी कोणाच्या संपर्कात होता? अन्य कोणी साथीदार आहेत किंवा कसे? या सर्व बाबींचा तांत्रिक पुराव्यांवरून तपास करण्यात येत आहे. न्यायालयाने आरोपी गुंजाळ याला 2 सप्टेंबर पर्यंत (चार दिवस) पोलीस कोठडी दिल्याची माहिती श्रीरामपूरचे अप्पर…

Read More

संगमनेर –  एका हल्ल्याने तालुक्याचा आमदार बदलला आता संगमनेरचे आमदार अमोल खताळ यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा खरा निषेध करायचा असेल, तर येणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका निवडणुकीतही भगवा फडकला पाहिजे, असे म्हणत कार्यकर्त्यांना आवाहन करत आपणही मेलेल्या आईचे दूध प्यायलेलो नाही, खताळ यांच्यावर झालेली घटना अचानक घडलेली नाही. याचा सूत्रधार पोलिसांनी शोधावा. तसेच याप्रकरणी दुर्लक्ष करणाऱ्या पोलिसांवर देखील कारवाई करण्यात येईल, असा इशारा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिला. आमदार अमोल खताळ यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ महायुतीने आज, शुक्रवारी प्रांत अधिकारी कार्यालयावर मूकमोर्चा काढला. मोर्चात मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते. यावेळी बोलताना पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी माजी मंत्री…

Read More

संगमनेर –  गणेश चतुर्थीच्या पूर्वसंध्येला प्रवरा नदीत वाहून गेलेल्या विजय संभाजी कुटे (वय ४२, रा. रंगार गल्ली) यांचा मृतदेह आज, शुक्रवारी सकाळी तब्बल चौथ्या दिवशी संगमनेर तालुक्यातील खराडी गावाजवळ नदीपात्रात आढळून आला. या घटनेने रंगार गल्ली आणि चव्हाणपुरा परिसरात शोककळा पसरली आहे. गणेश चतुर्थीच्या पूर्वसंध्येला, मंगळवारी रात्री ९ ते १० च्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली होती. विजय कुटे हे नेहमीप्रमाणे सिद्धकला हॉस्पिटलमध्ये सुरक्षारक्षक म्हणून कामावर जात असताना, संगमनेर खुर्दकडे जाणाऱ्या प्रवरा नदीच्या छोट्या पुलावरून नदीत फुले टाकत होते. याच वेळी त्यांचा तोल जाऊन ते नदीच्या प्रवाहात वाहून गेले. कुटुंबीयांनी त्यांचा शोध घेतला, मात्र ते सापडले नाहीत. त्यानंतर प्रशासनाने आणि…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन मेष (Aries) आजचा दिवस तुमच्यासाठी शुभ राहील. कामाच्या ठिकाणी नवीन संधी मिळतील आणि तुमचे प्रयत्न यशस्वी होतील. आर्थिक स्थिती मजबूत होईल. कुटुंबासोबत वेळ घालवल्याने आनंद मिळेल. वृषभ (Taurus) आज तुम्हाला थोडे सावध राहण्याची गरज आहे. घाईत कोणताही निर्णय घेऊ नका. आरोग्याची काळजी घ्या. खर्चावर नियंत्रण ठेवणे महत्त्वाचे आहे. संध्याकाळी एखादी चांगली बातमी मिळू शकते. मिथुन (Gemini) आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला आहे. तुम्ही घेतलेल्या निर्णयामुळे फायदा होईल. नवीन लोकांशी संपर्क साधण्याची संधी मिळेल, जे भविष्यात फायदेशीर ठरू शकतात. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस उत्तम आहे. कर्क (Cancer) आज तुम्ही भावनिकरित्या थोडे संवेदनशील असाल. आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवणे महत्त्वाचे आहे.…

Read More

संगमनेर –  संगमनेरचे आमदार अमोल खताळ यांच्यावर संगमनेरमधील एका सार्वजनिक कार्यक्रमात हल्ला झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे. गणेशोत्सवाच्या धामधुमीत झालेल्या या घटनेमुळे शहरात पोलिसांनी बंदोबस्त वाढवला आहे. दरम्यान या घटनेचा समाजाच्या सर्व स्तरातून निषेध व्यक्त होत आहे. राजस्थान युवक मंडळाने आयोजित केलेल्या संगमनेर फेस्टिवलच्या उद्घाटन समारंभावेळी ही घटना घडली. मालपाणी लॉन्स येथे आयोजित या कार्यक्रमात आमदार खताळ उपस्थित होते. कार्यक्रम संपल्यानंतर ते प्रेक्षकांशी हस्तांदोलन करत असताना, खांडगाव येथील एका व्यक्तीने हात मिळवण्याच्या बहाण्याने त्यांच्यावर हल्ला केला असल्याची माहिती समजते. हा प्रकार अचानक घडल्याने एकच गोंधळ उडाला. आमदार खताळ यांच्या वैयक्तिक सुरक्षा रक्षकांनी तात्काळ प्रसंगावधान राखून हल्लेखोराला पकडले. त्याच वेळी मालपाणी…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर, प्रतिनिधी: नागरिकांच्या आरोग्याशी थेट संबंध असलेल्या गुळातील भेसळीवर अन्न व औषध प्रशासन (FDA) कोणतीही कारवाई करत नसल्याचा आरोप करत सामाजिक कार्यकर्ते शंकर रावसाहेब ढमाले यांनी गुरुवारपासून (२८ ऑगस्ट) संगमनेर येथील प्रांत कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे. गुळात भेसळ करून नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या आणि भेसळखोरांना क्लीनचीट देणाऱ्या अहिल्यानगरच्या अन्न व औषध प्रशासनाविरोधात हे उपोषण आहे. ढमाले यांनी ‘महाराष्ट्र संवाद न्यूज’शी बोलताना सांगितले की, शहरातील सिद्धी गुळ नैसर्गिक गुळ या नावाने विकला जाणारा गुळ खरेदी केल्यानंतर या गुळामुळे त्यांना आजारपणाचा सामना करावा लागला आणि त्यांना रुग्णालयात दाखल करावे लागले. या गुळात भेसळ असल्याचा संशय आल्याने त्यांनी…

Read More