Author: अनंत पांगारकर
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन नेवासा फाटा येथील एका फर्निचर दुकानाला भीषण आग लागल्याने एकाच कुटुंबातील पाच जणांचा गुदमरून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. रविवारी मध्यरात्री घडलेल्या या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे. नेवासा फाटा परिसरातील ‘कालिका फर्निचर’ या दुकानाला रविवारी रात्री उशिरा आग लागली. ही आग इतकी भीषण होती की, दुकानाच्या मागील बाजूला राहत असलेल्या कुटुंबाला बाहेर पडण्याची संधीच मिळाली नाही. आगीमुळे निर्माण झालेल्या धुरामुळे गुदमरून त्यांचा जागीच मृत्यू झाला. मृतांमध्ये मयूर अरुण रासने (वय ३६), त्यांची पत्नी पायल (वय ३०), मुले अंश (वय ११) आणि चैतन्य (वय ६) आणि आजी सिंधुताई चंद्रकांत रासने (वय ८५) यांचा समावेश आहे. सुदैवाने, मयूर…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर, प्रतिनिधी: अखिल भारतीय ग्राहक पंचायतीच्या संगमनेर तालुका कार्यकारिणीची नुकतीच घोषणा करण्यात आली. यामध्ये विनायक वाडेकर यांची तालुका अध्यक्षपदी, तर प्रज्ञा शिंदे यांची महिला अध्यक्षपदी निवड झाली आहे. जिल्हाध्यक्ष शाहूराव औटी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीत ही निवड करण्यात आली. या बैठकीत जिल्हा उपाध्यक्ष सुरेश राहाणे, जिल्हा सचिव दिनेश थोरात, जिल्हा कोषाध्यक्ष अप्पासाहेब नरोटे, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख भगवान गायकवाड आणि जिल्हा ग्राहक मार्गदर्शन आयाम प्रमुख हरिभाऊ चौधरी यांची प्रमुख उपस्थिती होती. नव्याने जाहीर करण्यात आलेली कार्यकारिणी अशी, विनायक वाडेकर (अध्यक्ष), प्रज्ञा शिंदे (महिला अध्यक्ष), रोशन कोथमिरे, प्रदीप रहाणे (उपाध्यक्ष), प्रशांत राऊत (सचिव), सर्जेराव वाघ, माधव वाळे…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन मेष: आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला राहील. तुमची कामे सहज पूर्ण होतील आणि तुम्हाला यश मिळेल. आर्थिक स्थिती मजबूत होईल. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांचे सहकार्य मिळेल. कुटुंबासोबत वेळ घालवल्याने आनंद मिळेल. आरोग्याची काळजी घ्या. वृषभ: आज तुम्हाला थोडे शांत राहावे लागेल. महत्त्वाचे निर्णय घेताना विचारपूर्वक घ्या. अनावश्यक खर्च टाळा. कुटुंबातील सदस्यांसोबत वाद होऊ शकतात, त्यामुळे संयम बाळगा. कामाच्या ठिकाणी लक्ष केंद्रित केल्यास यश मिळेल. मिथुन: आजचा दिवस तुमच्यासाठी लाभदायक ठरू शकतो. जुनी अडकलेली कामे पूर्ण होतील. आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. नोकरी करणाऱ्यांना प्रमोशन किंवा चांगल्या संधी मिळू शकतात. नातेसंबंधांमध्ये गोडवा येईल. कर्क: आज तुम्ही भावनिक राहाल, पण…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर, प्रतिनिधी: पद्मशाली महिला संघमच्या अध्यक्षपदी लक्ष्मी दत्तात्रय इटप यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. येथील मार्कंडेय मंदिरात आयोजित महिला मंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. यावेळी उपाध्यक्षपदी वनिता शांताराम आडेप, साईसुधा विलास वनम, सेक्रेटरीपदी गिता शंकर अन्नलदास, रोहिणी भारत शंकरपल्ली, तर खजिनदारपदी वैशाली अंबादास आडेप यांची निवड करण्यात आली. त्याचबरोबर शितल सुनिल मादास, तुळजा राजेंद्र श्रीराम, सुरेखा शंकर चन्ना, देविका लिंगमुर्ती चिंता, रेखा गणेश मादास, सुनिता सतिश आडेप, वनिता नारायण इटप, वैशाली काशिनाथ आडेप, मिनाक्षी अजय श्रीपतवाड, आशा विनय राम, इंदिरा विलास श्रीराम, पुनम सागर शिरसुल्ला, स्वाती संतोष अंकारम, स्मिता विनोद झुंजुर, वैशाली गणेश पगडाल,…
असंगाशी संग केल्यावर काय होतं याचं चांगलं उदाहरण निवडणूक आयोगाच्या रुपाने देशवासीयांसमोर उभं राहिलं आहे. आपलं स्वत्व भाजपला विकणार्या अधिकार्यांनी आयोगाला आरोपीच्या पिंजर्यात उभं केलं आहे. समृध्द लोकशाहीची वासलात लागली आहे. जे स्वत:च विकले गेले ते नामेनिराळे झाले. संजीवकुमार नावाचा अधिकारी देशाबाहेर मजा मारतो आहे. अशा असंख्य अधिकार्यांची सोय भाजपच्या सत्तेने विविध ठिकाणी करून ठेवली आणि त्यांना चोर्या करायला भाग पाडलं. मूळ संस्थेत चोर्या केल्यावर गेले तिथेही चोर्या करायचे मार्ग मोकळे झाले. अशी लबाडी अनंत काळ पचत नसते. ती कधी तरी बाहेर येणारच. विरोधी पक्षनेता निडर असेल तर कोणत्याही परिणामांची तमा तो ठेवत नाही. जे काम आज राहुल गांधी यांनी…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन मेष : आज तुम्हाला कामात यश मिळेल. आर्थिक स्थिती चांगली राहील. कुटुंबासोबत वेळ घालवल्याने मन आनंदी राहील. वृषभ : काही जुने वाद मिटतील. आरोग्याची काळजी घ्या. जास्त खर्च टाळण्याचा प्रयत्न करा. मिथुन : नवीन संधी मिळण्याची शक्यता आहे. महत्त्वाचे निर्णय विचारपूर्वक घ्या. मित्रांचे सहकार्य मिळेल. कर्क : आजचा दिवस तुमच्यासाठी फलदायी ठरेल. कामाच्या ठिकाणी तुमचे कौतुक होईल. जोडीदारासोबतचे संबंध मधुर राहतील. सिंह : पैशांची गुंतवणूक करण्यासाठी आजचा दिवस चांगला आहे. प्रवासाचे योग आहेत. आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. कन्या : काही आव्हानांना तोंड द्यावे लागेल, पण तुम्ही त्यावर सहज मात कराल. मेहनत केल्यास नक्कीच यश मिळेल.…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन शिर्डी: पत्नी माहेरी निघून गेल्याच्या कौटुंबिक वादातून एका बापाने आपल्या चार चिमुकल्यांसह आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना शिर्डीजवळ घडली आहे. राहाता तालुक्यातील कोऱ्हाळे शिवारात एका विहिरीत पाच मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अरुण काळे (वय ३०) याने आपल्या चार मुलांना विहिरीत ढकलून स्वतःही जीवन संपवलं. अरुण काळे हा अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातील चिखली कोरेगाव येथे राहत होता. त्याला तीन मुले आणि एक मुलगी होती. गेल्या काही दिवसांपासून घरात सुरू असलेल्या वादामुळे त्याची पत्नी आठ दिवसांपूर्वी त्याला सोडून माहेरी येवला तालुक्यात गेली होती. याच कारणातून अरुणने दारूच्या नशेत हे टोकाचे पाऊल उचलल्याची शक्यता…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर, प्रतिनिधी – स्वातंत्र्यसेनानी व सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांच्यासह मागील पिढीतील व्यक्तींनी तालुक्याच्या विकासाचा पाया रचला आहे. याच योगदानातून, संगमनेरच्या वैभवात भर टाकणारी थोरात कारखान्याची नवीन प्रशासकीय इमारत उभी राहिली असल्याचा गौरवोद्गार काँग्रेसच्या राष्ट्रीय वर्किंग कमिटीचे सदस्य तथा माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी काढले. सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या नवीन प्रशासकीय इमारतीच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. या इमारतीचे उद्घाटन लोकनेते बाळासाहेब थोरात, माजी चेअरमन बाळासाहेब पाटील गुंजाळ, बाजीराव पाटील खेमनर, माधवराव कानवडे, लक्ष्मणराव कुटे आणि बाबा ओहोळ यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार डॉ. सुधीर तांबे होते. कारखान्याने तालुक्याचे हृदय म्हणून काम केले- यावेळी…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन मेष : आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला आहे. तुम्ही घेतलेल्या प्रत्येक कामात तुम्हाला यश मिळेल आणि नवीन संधीही मिळतील. गुंतवणुकीतून चांगला फायदा होण्याची शक्यता आहे आणि नोकरी करणाऱ्यांना प्रमोशन किंवा पगारवाढ मिळू शकते. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतील. कोर्टातील जुन्या प्रकरणांचा निकाल तुमच्या बाजूने लागेल. वृषभ : आज तुम्हाला कामाच्या ठिकाणी सावध राहावं लागेल आणि कोणत्याही प्रकारचं नुकसान होणार नाही याची काळजी घ्या. कौटुंबिक संपत्तीच्या बाबतीत शहाणपणाने काम करा. आर्थिक लाभाची शक्यता आहे आणि नोकरीमध्ये शुभ बातम्या मिळू शकतात. आज तुम्ही सामाजिक कार्यक्रमात भाग घ्याल. मिथुन : आजचा दिवस तुमच्यासाठी थोडा तणावपूर्ण असू शकतो. कोणतेही महत्त्वाचे निर्णय…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन अहिल्यानगर/संगमनेर: संगमनेर तालुक्यातील ग्रामीण भागात दिवसा घरफोड्या करणाऱ्या एका सराईत आरोपीला आणि त्याच्या महिला साथीदाराला स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) ४८ तासांत जेरबंद केले आहे. पोलिसांनी आरोपींकडून चोरीला गेलेला ११,७९,१४० रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. कौठे कमळेश्वर येथील रहिवासी सोमनाथ शिवाजी भडांगे हे एका कार्यक्रमानिमित्त बाहेरगावी गेले असताना, अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. चोरट्यांनी घरातील ९,९२,२८० रुपये किमतीचे सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम चोरून नेली होती. या गंभीर गुन्ह्याचा तपास करण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या नेतृत्वाखाली दोन विशेष पथके तयार करण्यात आली. या पथकामध्ये पोलीस उपनिरीक्षक अनंत सालगुडे,…
