Author: अनंत पांगारकर
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर, प्रतिनिधी: राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या नेतृत्वाखाली 9 ऑगस्ट क्रांती दिनी ‘चले जाओ’चे मोठे आंदोलन झाले. देश स्वातंत्र्यासाठी अनेक वीरांनी हौतात्मे पत्करले. त्यांच्या त्यागातून देशाला स्वातंत्र्य मिळाले. राज्यघटना आली. मात्र ज्या विचारांनी स्वातंत्र्य लढ्यामध्ये कोणतेही योगदान दिले नाही. इंग्रजांविरुद्ध कोणतीही लढाई केली नाही. ते लोक आज जातीभेदाच्या नावावर दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहे. गरज आहे देश, लोकशाही आणि राज्यघटना वाचवण्याची याकरता या लोकशाही विरुद्धच्या विघातक शक्तींविरोधात क्रांतीचा नारा देण्याची मोठी गरज निर्माण झाली असल्याचे प्रतिपादन काँग्रेसच्या राष्ट्रीय वर्किंग कमिटीचे सदस्य माजी प्रांताध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी केले आहे. नेहरू चौक येथील अशोक स्तंभास क्रांती दिनानिमित्त अभिवादन केल्यानंतर…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन पुणे: कुणीही उठतो आणि उपदेश करतो, सगळा मक्ता मीच घेतला आहे. कुठून पुण्याचा पालकमंत्री झालो असे वाटायला लागले आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केली. पिंपरी-चिंचवडमध्ये मुळा नदीच्या सुशोभीकरण प्रकल्पासाठी झाडे तोडण्यात येत असल्याच्या मुद्द्यावरून ते चिडले. पर्यावरणप्रेमींनी पालकमंत्री म्हणून अजित पवार यांनी ही वृक्षतोड थांबवावी अशी मागणी केली होती, त्यावर त्यांनी हे विधान केले. चिंचवडमध्ये अभिनेते सयाजी शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात अजित पवार बोलत होते. यावेळी त्यांनी भाषणाच्या शेवटी सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांनी वृक्षतोडीचा मुद्दा उपस्थित केला. भापकर यांनी पवना, इंद्रायणी, मुळा नद्यांच्या सुशोभीकरण प्रकल्पांत हजारो झाडे तोडण्यात येत असल्याकडे…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर, प्रतिनिधी: राजापूर ग्रामपंचायतीमध्ये अनेक वर्षांपासून काँग्रेसची सत्ता असूनही गावातील मूलभूत प्रश्न प्रलंबित असल्याचा आरोप करत गावाच्या विकासासाठी पुढाकार घेतल्यानंतर विरोधक निराधार आरोप करत आहेत. या बिनबुडाच्या आरोपांना मी भीक घालणार नाही, असा स्पष्ट इशारा संदेश देशमुख यांनी दिला आहे. देशमुख म्हणाले, गेल्या अनेक वर्षांपासून गावात काँग्रेसच्या नेतृत्वाखाली बेकायदेशीर कामे सुरू असल्याचा आरोप देशमुख यांनी केला आहे. या चुकीच्या कामांविरोधात आवाज उठवल्यामुळेच आपल्याला बदनाम करण्याचे प्रयत्न सुरू आहे. पण आपण कोणत्याही दबावाला बळी न पडता यापुढेही आमदार अमोल खताळ यांच्या मार्गदर्शनाखाली चुकीच्या कामांना विरोध करतच राहणार असल्याच सांगितलं. आमदार अमोल खताळ यांच्या प्रयत्नांमुळे गावातील शेतकऱ्यांना कोणतीही…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर, प्रतिनिधी: रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला आमदार अमोल खताळ यांनी ‘लव्ह जिहाद’ विरोधी कायदा लागू करण्यासाठी हिवाळी अधिवेशनात आवाज उठवणार असल्याचं आश्वासन आपल्या भगिनींना दिलं. डिसेंबरमध्ये नागपूर येथे होणाऱ्या अधिवेशनात हा प्रश्न उपस्थित करून, कायदा लागू होईपर्यंत त्याचा पाठपुरावा करणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. आमदार खताळ यांच्या जनसंपर्क कार्यालयात रक्षाबंधनानिमित्त संगमनेर शहर आणि तालुक्यातील अनेक भगिनींनी त्यांना राखी बांधली. यावेळी, प्रेमाच्या नावाखाली हिंदू युवतींना फसवून त्यांचं जबरदस्तीने धर्मांतर करणं, शारीरिक आणि मानसिक छळ, लैंगिक अत्याचार आणि आत्महत्यांसारख्या घटना वाढत असल्याबद्दल भगिनींनी चिंता व्यक्त केली. अशा घटनांना आळा घालण्यासाठी कठोर ‘लव्ह जिहाद’ विरोधी कायदा तातडीने लागू करावा, अशी मागणी…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन राजापूर: सोमवारी झालेल्या संगमनेर तालुक्यातील राजापूर गावच्या ग्रामसभेत महायुतीच्या एका पदाधिकाऱ्याकडून होत असलेल्या दडपशाहीची तक्रार समोर आली आहे. सरपंच कुसुमताई पानसरे यांनी, संदेश बाळासाहेब देशमुख हे गावातील विकासकामांमध्ये अडथळे निर्माण करत असल्याचा आरोप केला. या गंभीर आरोपांची दखल घेत, ग्रामपंचायत चुकीचे काम करत असेल तर वरिष्ठांकडे तक्रार करून चौकशीची मागणी करावी. विकास कामात अडथळे आणू नये, असा निर्णय घेण्यात आला. सरपंच पानसरे यांनी ग्रामसभेत सांगितले की, संदेश देशमुख हे नेहमीच गावाच्या प्रगतीपथावरील कामांमध्ये अडथळे आणण्याचा प्रयत्न करतात. केवळ प्रसिद्धीसाठी ते विकासकामांना विरोध करतात. तालुक्याच्या नेतृत्वाने विकासाचा अजेंडा राबवण्याचे निर्देश दिले असतानाही, देशमुख त्यांच्या भूमिकेच्या विरोधात काम…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर, प्रतिनिधी: संगमनेर तालुक्यात कुरण येथे अवैधपणे सुरू असलेल्या एका कत्तलखान्यावर पोलिसांनी मध्यरात्री छापा टाकून ४० हजार रुपये किमतीचे गोमांस जप्त केले आहे. याप्रकरणी चार आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे. त्यामुळे संगमनेरमधील कत्तलखाने बंद असल्याचा दावा फोल ठरला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांना संगमनेर तालुक्यातील कुरण येथील नादिर शेख याच्या घराजवळील मोकळ्या जागेत गोवंश प्राण्यांची कत्तल सुरू असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी गुरुवारी मध्यरात्री अचानक छापा टाकला. त्यावेळी, पोलिसांनी घटनास्थळी ३ ते ४ इसम गोवंश प्राण्यांची कत्तल करताना पाहिले. पोलिसांची चाहूल लागताच आरोपी अंधाराचा फायदा घेऊन पळून गेले.…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर, प्रतिनिधी: काही महिन्यांपूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत आपला पराभव झाला असला तरी कार्यकर्त्यांनी खचून जाऊ नये. पुढील काळात होणाऱ्या निवडणुकांमध्ये आपलाच विजय होणार आहे त्यामुळे, गोंधळलेल्या अवस्थेत न राहता रोखठोक भूमिका घ्यावी ऐनवेळी भूमिका बदलू नये, पराभवानंतरही अधिक जोमाने काम करण्याची गरज असल्याचं सांगत जनतेच्या प्रश्नांवर कठोर आणि ठाम भूमिका घेऊन पुढील काळात अधिक ताकदीने काम करण्याचे आवाहन माजी मंत्री, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी केले. विधानसभा निवडणुकीत अनपेक्षितपणे पराभवाला सामोरे जावे लागलेल्या माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी कार्यकर्त्यांना पराभवाने खचून न जाण्याचा सल्ला देतानाच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपल्या ‘सुदर्शन’ निवासस्थानी झालेल्या…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन अहिल्यानगर: जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी गुरुवारी जिल्हा पोलीस दलातील सहा पोलीस निरीक्षकांच्या व जवळपास ११४ पोलीस कर्मचाऱ्यांच्या जिल्हा अंतर्गत बदल्या केल्या आहेत. संगमनेर शहर पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकांवरील बदलीचे संकट टळले असले तरी संगमनेर तालुका पोलीस ठाण्याच्या निरीक्षकांची बदली करण्यात आली आहे. संगमनेर तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक देविदास ढुमणे यांची शिर्डीच्या साई मंदिरात मंदिर सुरक्षा अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तर त्यांच्या रिक्त जागेवर नियंत्रण कक्षातून पोलीस निरीक्षक प्रवीण साळुंखे यांची वर्णी लागली आहे. साळुंखे संगमनेर तालुका पोलीस ठाण्याचे आता नवे पोलीस निरीक्षक असतील. जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी पोलीस दलात फेरबदल…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन नागपूरमध्ये पोलिस अधिकाऱ्यावर हल्ला केल्याच्या आरोपाखाली भाजप नेते आणि माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचे जावई असलेले माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांना अतिरिक्त जिल्हा आणि सत्र न्यायाधीश आर.जे. राय यांनी एक वर्षाची शिक्षा सुनावली आहे. याव्यतिरिक्त, त्यांना १०,००० रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे. डिसेंबर २०१४ मध्ये शिवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे नागपूरमधील एका हॉटेलमध्ये बैठकीसाठी आले होते. त्यावेळी, हर्षवर्धन जाधव यांनी बैठकीच्या खोलीत प्रवेश करण्याचा प्रयत्न केला, परंतु विशेष सुरक्षा विभागाचे निरीक्षक पराग जाधव यांनी त्यांना अडवले. यामुळे संतापलेल्या हर्षवर्धन जाधव यांनी पराग जाधव यांच्यावर हात उचलला. या घटनेनंतर, सोनेगाव पोलिसांनी सरकारी कामात अडथळा आणि मारहाण केल्याप्रकरणी…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन दिल्ली: काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले आहेत. पत्रकार परिषद घेऊन त्यांनी महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत झालेल्या कथित मतचोरीचा पर्दाफाश केल्याचा दावा केला आहे. महाराष्ट्रातील ४० लाखांहून अधिक मतदारांच्या याद्यांमध्ये संशयास्पद बाबी असल्याचं सांगत, त्यांनी निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर आणि निवडणुकांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. महाराष्ट्रातील ४० लाख मतदारांचा घोटाळा? राहुल गांधींच्या म्हणण्यानुसार, महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीनंतर अवघ्या पाच महिन्यांत तब्बल ४० लाख मतदार वाढले, जे गेल्या पाच वर्षांतही वाढले नव्हते. निवडणुकीच्या काळात, विशेषतः संध्याकाळनंतर मतदानाच्या टक्क्यांमध्ये झालेली अचानक वाढही संशयास्पद असल्याचं त्यांनी सांगितलं. त्यांच्या मते, काँग्रेसला लोकसभा निवडणुकीत चांगलं…
