Author: अनंत पांगारकर

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर, प्रतिनिधी:  शहरातील परदेशपुरा परिसरात एका १७ वर्षीय मुलाने दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याच्या रागातून जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण केंद्रातील तंत्रज्ञ सुहास रामचंद्र वाघमारे (वय ५३) यांच्या डोक्यात दगड घालून त्यांना गंभीर जखमी केले. ही धक्कादायक घटना ६ ऑगस्ट २०२५ रोजी मध्यरात्री घडली असून, या घटनेमुळे शहरात भीतीचे वातावरण पसरले आहे. दरम्यान या घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे. या घटनेनंतर संगमनेर शहरात अल्पवयीन मुलांच्या वाढत्या गुन्हेगारीमुळे कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. सुहास वाघमारे हे मूळचे सांगलीचे असून, कामामुळे ते संगमनेरमध्ये राहत होते. घटनेच्या रात्री ते परदेशपुरा येथील देशी दारूच्या दुकानासमोरून जात असताना एका १७…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन अहिल्यानगर, दि. ७ – शासनाने धर्मवीर आनंद दिघे महाराष्ट्र ऑटोरिक्षा व मीटर टॅक्सी चालक कल्याणकारी मंडळाची स्थापना केली आहे. या मंडळाच्या विविध योजनांचा लाभ मिळवण्यासाठी ऑटोरिक्षा व मीटर टॅक्सी चालकांनी ऑनलाइन नोंदणी करावी, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद सगरे यांनी केले आहे. या कल्याणकारी मंडळामार्फत चालकांसाठी जीवन विमा व अपंगत्व विमा योजना, आरोग्यविषयक सेवा, कर्तव्यावर असताना दुखापत झाल्यास ५० हजार रुपयांपर्यंत आर्थिक सहाय्य, पाल्यांच्या शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजना, तसेच कामगार कौशल्य वृद्धी योजना अशा विविध लाभकारी योजना उपलब्ध करून देण्यात येत आहेत. या योजनांचा लाभ घेण्यासाठी पात्र अर्जदारांनी प्रथम मंडळाचे सभासदत्व घेणे आवश्यक आहे. यासाठी https://ananddighekalyankarimandal.org…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन  संगमनेर, प्रतिनिधी:  संगमनेर तालुक्यातील एका सेवाभावी संस्थेची बदनामी करण्याची धमकी देऊन १० लाख रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी ‘न्यूज सह्याद्री एक्सप्रेस’ नावाच्या युट्यूब चॅनेलच्या चालकाविरोधात संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून साळवे नावाच्या व्यक्तीला ताब्यात घेण्यात आले आहे. संगमनेर तालुक्यातील वडगाव पान येथील ‘दत्त धाम सरकार, दत्त दिगंबर सेवाभावी संस्थे’चे कामकाज पाहणारे शिवम राजेंद्र गडगे (वय २१) यांनी यासंदर्भात तक्रार दाखल केली आहे. आरोपीचे नाव साळवे (पूर्ण नाव माहित नाही रा. अकोले) असे असून, तो ‘न्यूज सह्याद्री एक्सप्रेस’ नावाचा युट्यूब चॅनेल चालवतो. गडगे यांनी संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या तक्रारीनुसार, जुलै २०२४ पासून साळवे…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर, प्रतिनिधी: फक्त घोषणा करून नाही तर कृती आणि योजनांची अंमलबजावणी करून राज्यातील महीलांच्या पाठीशी केंद्र आणि राज्यातील महायुती सरकार खंबीरपणे उभे आहे. ग्रामीण भागातील प्रत्येक घरात एक महीला उद्योजिका निर्माण करून आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी विकासाची प्रक्रीया राबविणार असल्याचे प्रतिपादन माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी केले. ढोले पाटील लॉन्स येथे तालुका कृषी विभाग, पंचायत समिती, उमेद व महिला आर्थिक विकास महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित लाभार्थी प्रमाणपत्र वितरण, पापड व फूड प्रोसेसिंग युनिट, महिला बचत गट कर्ज आणि खेळते भांडवलाचे अनुदान वाटप डॉ. सुजय विखे पाटील यांच्या उपस्थितीत करण्यात आले. अध्यक्षस्थानी आमदार खताळ यांच्या…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर, प्रतिनिधी: दुष्काळग्रस्त भागाला सुजलाम सुफलाम करण्यासाठी पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन डॉ. सुजय विखे पाटील यांनी २५ कोटी रुपयांच्या विकास कामांचे नियोजन जाहीर केले आहे. मागील १८ वर्षांत केवळ ५ कोटी रुपये खर्च झाल्याचा उल्लेख करत, त्यांनी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि आमदार अमोल खताळ यांच्या नेतृत्वाखाली पुढील अडीच वर्षांत या कामांना गती देण्याची ग्वाही दिली. भोजापूर चारीच्या जलपूजन सोहळ्यात नान्नज दुमाला येथे डॉ. सुजय विखे पाटील यांनी हे प्रतिपादन केले. या कार्यक्रमाला आमदार अमोल खताळ यांच्या पत्नी नीलम, माजी तालुकाध्यक्ष भीमराव चतर, शिवसेना नेते विठ्ठलराव घोरपडे, संदीप देशमुख यांच्यासह…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन लाचखोरी करणाऱ्या एका माजी पोलीस उपनिरीक्षकास न्यायालयाने निवृत्तीनंतर दोन वर्षे सक्तमजुरी आणि १० हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावली आहे. भरत गोपाळराव होळकर असे या निवृत्त उपनिरीक्षकाचे नाव असून, तो कराड शहर पोलीस ठाण्यात कार्यरत होता. भरत गोपाळराव होळकर यांनी, कराड पोलीस ठाण्यात दाखल एका अहवालाची प्रत वरिष्ठांना पाठवण्यासाठी तक्रारदाराकडे सात हजार रुपयांची लाच मागितली होती. याप्रकरणी तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (ACB) तक्रार दाखल केली होती. त्यानंतर ACB च्या अधिकाऱ्यांनी लाच स्वीकारताना होळकर यांना २० जुलै २०१४ रोजी रंगेहाथ पकडले. या कारवाईसाठी कराड शहरातील पंचायत समितीजवळच्या एका रेस्टॉरंटसमोर सापळा रचण्यात आला होता. या प्रकरणाची सुनावणी झाल्यानंतर, कराडचे…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर, प्रतिनिधी:  संगमनेर तालुक्यातील गुंजाळवाडी, कसारा दुमाला, समनापूर आणि राजापूर येथील शेकडो कुटुंबांना गेल्या अनेक वर्षांपासून भेडसावणाऱ्या जमिनीच्या प्रश्नावर अखेर तोडगा निघणार असल्याची माहिती संगमनेरचे आमदार अमोल खताळ यांनी दिली. आमदार खताळ यांच्या कार्यालयाकडून देण्यात आलेल्या प्रसिद्धी पत्रकानुसार खताळ यांनी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे केलेल्या पाठपुराव्यानंतर, मंत्र्यांनी या प्रकरणी तातडीने बैठक घेण्याचे आदेश दिले असल्याचे म्हटले आहे. या भागातील अनेक जमिनींवर आणि घरांवर ‘पोकळीस्त’ किंवा ‘इतर हक्कांतील कब्जेदार’ अशा अनधिकृत नोंदी करण्यात आल्या होत्या. यामुळे नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. बँक कर्ज, शिक्षण प्रमाणपत्र आणि इतर सरकारी सुविधांपासून ते वंचित राहत होते. तसेच, कौटुंबिक…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन मुंबई, विशेष प्रतिनिधी:  विधानसभेचे अधिवेशन संपल्यानंतर राज्य शासनाने प्रशासकीय पातळीवर मोठे बदल केले आहेत. यात पाच अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी करण्यात आले आहेत. नाशिक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांची जालना जिल्हाधिकारीपदी बदली झाल्यानंतर त्यांच्या जागी ओंकार पवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर तुकाराम मुंढे यांची वीस वर्षाच्या कार्यकाळात 23व्यांदा बदली करण्यात आली आहे. बदली झालेल्या अधिकाऱ्यांची नावे आणि त्यांच्या नवीन नियुक्त्या: तुकाराम मुंडे – सचिव, दिव्यांग कल्याण विभाग, मुंबई. नितीन काशीनाथ पाटील – विशेष आयुक्त, राज्य कर, महाराष्ट्र, मुंबई. अभय महाजन – व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य कापूस उत्पादक पणन महासंघ, मुंबई. ओंकार…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन  मुंबई, प्रवीण पुरो:  महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका दिवाळीच्या सुट्ट्यांनंतर, म्हणजेच ऑक्टोबरच्या शेवटी सुरू होतील, अशी माहिती राज्याचे निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी दिली आहे. नाशिक विभागातील आगामी निवडणुकांचा आढावा घेण्यासाठी आयोजित बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. सर्वोच्च न्यायालयाने चार महिन्यांच्या आत निवडणुका घेण्याचे आदेश दिल्यानंतर, त्यानुसार महानगरपालिका, जिल्हा परिषद आणि नगरपालिका या सर्व निवडणुका टप्प्याटप्प्याने घेण्याचा कार्यक्रम आखला जात आहे. नाशिक विभागात एकूण ५० लाख ४५ हजार मतदार आहेत, ज्यासाठी ४,९८२ मतदान केंद्र आहेत. या निवडणुकीसाठी ८,७०५ कंट्रोल युनिट्स आणि १७,००० पेक्षा जास्त मतदान यंत्रांची गरज लागेल. सर्व निवडणुका एकाच वेळी घेतल्यास मनुष्यबळाची मोठी कमतरता…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर, प्रतिनिधी:  साळी समाजाचे आराध्य दैवत भगवान जिव्हेश्वर उत्सवा निमित्ताने साई निर्मल सेवाभावी संस्था आणि स्वकुळ साळी समाज (लक्ष्मी नारायण देवस्थान ट्रस्ट), संगमनेर यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.  एसएमबीटी हॉस्पिटल, घोटी यांच्या सहकार्याने हे शिबिर दिनांक ०७ ऑगस्टला सकाळी १०:०० ते दुपारी ४:०० या वेळेत लक्ष्मी नारायण मंदिर, कॅप्टन लक्ष्मी चौक, रंगारगल्ली, संगमनेर येथे होणार आहे. या शिबिरात रक्तदाब, शुगर, उंची, आणि वजन यांची तपासणी केली जाईल. तसेच, डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार ईसीजीची सुविधाही उपलब्ध असेल. तज्ज्ञ डॉक्टरांकडून मोफत सल्ला आणि उपचारही दिले जाणार आहेत. साई निर्मल सेवाभावी संस्थेचे…

Read More