Author: अनंत पांगारकर

महाराष्ट्र संवाद न्यूज – संगमनेर संगमनेर तालुक्यातील आगामी पाच वर्षांसाठी म्हणजेच सन २०२५ ते २०३० या कालावधीसाठीच्या ग्रामपंचायत सरपंचपदाच्या आरक्षणाची विशेष सोडत येत्या २३ एप्रिल २०२५ रोजी आयोजित करण्यात आली आहे. ही महत्त्वाची प्रक्रिया संगमनेरच्या नवीन नगर रस्त्यावरील यशवंतराव चव्हाण प्रशासकीय इमारतीच्या सभागृहात सकाळी ११ वाजता पार पडणार आहे. तर २३ एप्रिल २०२५ रोजी सकाळी ११ वाजता उपविभागीय अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली महिला सरपंच पदासाठीची आरक्षण सोडत होणार आहे. तहसिलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी, संगमनेर यांच्या कार्यालयाने याबाबत अधिकृत घोषणा केली आहे. या संबंधीचे प्रकटन माध्यमांना न देता समाज माध्यमात व्हायरल होताना दिसत आहे.  या महत्त्वपूर्ण सोडतीच्या वेळी जिल्ह्यातील सर्व संबंधित ग्रामपंचायत सदस्य,…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज दागिने चोरांनी मोठा उच्छाद मांडला असून या दागिने चोरांचा शोध घेण्यास पोलीस यंत्रणा सपशेल अपयशी ठरली आहे. पोलिसांना दागिने चोरांचा शोध लागत नाही की पोलीस चोरांचा शोध घेत नाहीत असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे. नाशिकच्या जेलरोड परिसरात एका वृद्ध महिलेची तोतया पोलिसांनी फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे. या भामट्यांनी महिलेला धमकावून तिच्याकडील सुमारे सव्वा दोन लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने हातचलाखीने काढून घेतले. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ७० वर्षीय तक्रारदार महिला नेहमीप्रमाणे सकाळी आठ वाजता शिवमंदिरातून दर्शन घेऊन घरी परतत होती. नारायणबापूरोडने पायी…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज – पुणे हडपसर येथे एका तरुणाने पत्नीचे अनैतिक संबंध आणि व्याजाच्या पैशांसाठी होणाऱ्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केली. या प्रकरणी पोलिसांनी पत्नी आणि सावकाराला अटक केली आहे. गुरुवारी (दि. १७) मध्यरात्री हडपसरमधील सिद्धिविनायक विहारातील एका इमारतीत ही घटना घडली. सचिन सतीश गिरी (वय ३७) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी त्याची पत्नी कोमल सचिन गिरी (वय ३०) आणि रवींद्र मारुती मेमाणे (वय ४५) यांना पोलिसांनी अटक केली आहे. सचिनची बहीण सविता संतोष भारती (वय ३९) यांनी या संदर्भात पोलिसात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सचिन आणि कोमल यांचा विवाह काही वर्षांपूर्वी झाला होता. कोमलचे…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज – मुंबई मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कृषी खात्यातील महत्त्वाच्या बदल्यांचे अधिकार कृषीमंत्र्यांकडून काढून स्वतःकडे घेतल्याने त्यांचा कल एकाधिकारशाहीकडे असल्याचे दिसून येत आहे, असा आरोप आमदार रोहित पवार यांनी केला आहे. मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यापासून फडणवीस यांनी ठळक असे काही केले नसले, तरी एकाधिकारशाही मात्र मजबूत केली आहे. मंत्र्यांचे, विशेषतः मित्रपक्षांच्या खात्यावर प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे नियंत्रण ठेवण्यासाठी शक्य त्या उपाययोजना मुख्यमंत्र्यांकडून केल्या जात आहेत. मित्रपक्षांना आपल्या एकाधिकारशाहीच्या धाकात ठेवण्याचे भाजपचे मनसुबे आता महाराष्ट्राला कळाले आहेत, असेही पवार म्हणाले. रोहित पवार यांनी ट्वीट करत कृषी खात्यातील बदल्यांच्या अधिकारांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. ते म्हणाले, “ज्याप्रमाणे बदल्यांचा अधिकार मुख्यमंत्र्यांनी स्वत:कडे घेतला, त्याचप्रमाणे राज्यभरातील…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज – मुंबई, १८ एप्रिल आता अपघातग्रस्त रुग्णांना तातडीने आणि विनाखर्चिक उपचार मिळणे अधिक सुलभ होणार आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून, यानुसार अपघातग्रस्तांना अंगीकृत आणि अन्य तातडीच्या रुग्णालयांमध्ये एक लाख रुपयांपर्यंतचे कॅशलेस उपचार उपलब्ध करून दिले जाणार आहेत. सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी याबाबत सक्त सूचना जारी केल्या आहेत. रुग्णालये, आरोग्य सोसायटीचे अधिकारी आणि योजनेची अंमलबजावणी करणाऱ्या संस्थांनी याबाबत कोणतीही हयगय करू नये, तसेच गैरप्रकार करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे. मंत्री प्रकाश आबिटकर यांनी आज (शुक्रवारी) मंत्रालयात राज्य आरोग्य हमी सोसायटीच्या मुख्यालयात कामकाजाचा आढावा घेतला.…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज – संगमनेर  जलसंपदा तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या माध्यमातून निळवंडे धरणाच्या डाव्या व उजव्या कालव्यातून २० एप्रिलपासून पाणी सोडले जाणार आहे. तालुक्यातील पाणीटंचाई लक्षात घेता, निळवंडे कालव्याच्या आवर्तनाच्या काळात वीज पुरवठा खंडित होऊ नये, असे स्पष्ट निर्देश आमदार अमोल खताळ यांनी महावितरण अधिकाऱ्यांना दिले. पाणीटंचाई आढावा बैठकीत शेतकऱ्यांनी वीज पुरवठ्याबाबत अनेक तक्रारी आमदार खताळ यांच्याकडे मांडल्या होत्या. या पार्श्वभूमीवर महावितरण कार्यालयात आमदार खताळ यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक झाली. या बैठकीस अधीक्षक अभियंता रमेश पवार, कार्यकारी अभियंता अनिल थोरात, उपअभियंता धनंजय खैरनार, प्रेमकुमार पाटील, सुनील अहिरे यांच्यासह तालुक्यातील वीज उपकेंद्रांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. आमदार खताळ म्हणाले…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज – संगमनेर  स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून संगमनेरमधील अविष्कार नरेश राणे याने मोठे यश मिळविले आहे. वयाच्या अवघ्या २४ व्या वर्षी त्याची युनियन बँक ऑफ इंडियामध्ये वर्ग १ या पदावर बँक अधिकारी म्हणून निवड झाली आहे. त्याच्या या यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे. जिद्द, चिकाटी आणि सातत्याने अभ्यासाच्या बळावर यश मिळविणाऱ्या अविष्कार याच्या वडिलांचा संगमनेरमध्ये प्रिंटिंग प्रेसचा छोटासा व्यवसाय असून आई गृहिणी आहे तर, संगमनेरमधील सराफ विद्यालयातील सेवानिवृत्त शिक्षक चंद्रकांत राणे व सुनील राणे यांचा आविष्कार हा पुतण्या आहे. एमएससी (मॅथ) करत असताना अविष्कार याने दुसरीकडे स्पर्धा परीक्षांची देखील तयारी सुरू केली होती. घरची आर्थिक परिस्थिती अत्यंत बेताची असतानाही…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज – अहिल्यानगर  जिल्हाधिकारी कार्यालयात आता महसूल विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या अपील प्रकरणांवर ई-सुनावणी प्रक्रियेला प्रारंभ झाला आहे. अपर जिल्हाधिकारी यांच्या दालनात झालेल्या या शुभारंभामुळे जमीन व मालमत्तेशी संबंधित वाद, हक्क नोंदणी, फेरफार, उताऱ्यावरील दुरुस्ती आणि मालकी हक्काच्या प्रकरणांची सुनावणी आता ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. या सुविधेमुळे महसूल विभागातील प्रलंबित प्रकरणांची संख्या कमी होण्यास मदत होणार आहे. शासनाकडून संपूर्ण महसूल व्यवस्था डिजिटल करण्याच्या प्रयत्नांचा भाग म्हणून ‘पेपरलेस व पारदर्शक प्रशासन’ देण्यावर भर दिला जात आहे. ई-सुनावणी ही संकल्पना सामान्य नागरिकांसाठी अत्यंत फायदेशीर ठरणार आहे. यामुळे महसूल प्रकरणांवरील निर्णय लवकर होतील आणि कामकाजात अधिक सुसूत्रता येईल. लवकरच तालुका कार्यालयांमध्येही ही…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज – संगमनेर | प्रतिनिधी संगमनेर शहरातील हनुमान जयंती मिरवणुकीतील हिंदुत्ववादी युवकांवरील खोटे गुन्हे त्वरित मागे घ्या, शहरात बोकाळलेले अवैध मटका, जुगार आणि दारूचे अड्डे तातडीने बंद करा, मारहाणीच्या बळी ठरलेल्या ललित परदेशी यांच्या तक्रारीची दखल घेऊन गुन्हेगारांना अटक करा अन्यथा, येत्या मंगळवारी (२२ एप्रिल) सायंकाळी ५ वाजता संगमनेरचे युवक रस्त्यावर उतरून महामोर्चा काढतील! असा थेट आणि कडक इशारा काल गुरुवारी शहरातील संतप्त नागरिक आणि युवकांनी पोलीस प्रशासनाला निवेदनाद्वारे दिला आहे. निवेदनात पुढे म्हटले आहे की, संगमनेरात सध्या कायद्याचे राज्य संपले आहे. खुलेआम गुटखा विक्री, मटका, लोटो गेम, पत्त्याचे क्लब आणि अवैध देशी-विदेशी दारू विक्री तसेच बेकायदेशीर वाळू…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज – पुणे धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप आणि खळबळजनक दावे करणारे बीडचे निलंबित पोलीस अधिकारी रणजित कासले अखेर पोलिसांच्या ताब्यात आले आहेत. बीड पोलिसांनी आज (शुक्रवार) पहाटे पुण्यातील स्वारगेट परिसरातून त्यांना अटक केली. कासले काल दिल्लीहून पुण्यात आले होते आणि स्वारगेटमधील एका हॉटेलमध्ये मुक्काम करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. काल सायंकाळी आपण पोलिसांना शरण येणार असल्याचा व्हिडीओ कासले यांनी सोशल मीडियावर पोस्ट केला होता. मात्र, त्यापूर्वीच बीड पोलिसांनी कारवाई करत त्यांना ताब्यात घेतले. रणजित कासले यांनी मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात अनेक गंभीर आरोप केले होते. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड याचे…

Read More