Author: अनंत पांगारकर

संगमनेर – अहिल्यानगर जिल्हा परिषदेच्या संगमनेरमधील नऊ जागांसाठी व तालुका पंचायत समितीच्या अठरा जागांसाठी सोमवारी आरक्षण सोडत काढण्यात आली. जिल्हा परिषद जागांसाठी अहिल्यानगर मध्ये तर पंचायत समितीच्या जागांसाठी संगमनेरमध्ये ही आरक्षण सोडत काढण्यात आली. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे बहुतांशी गट आणि गण राखीव झाल्याने अनेक इच्छुकांचा हिरमोड झाला आहे तर राखीव जागांवर नव्या चेहऱ्यांना संधी मिळण्याची चिन्हे निर्माण झाली आहे. यामुळे अनेक प्रस्थापितांचे साम्राज्य धुळीस मिळाले आहे. तसेच पुन्हा निवडणूक लढविण्याच्या त्यांच्या आकांक्षावर पाणी फेरले गेले आहे. असे आहे संगमनेर तालुक्यातील जिल्हा परिषद गटांचे आरक्षण…. समनापूर – नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला तळेगाव – सर्वसाधारण महिला आश्वी बुद्रूक – नागरिकांचा…

Read More

अहिल्यानगर – आगामी जिल्हा परिषदेच्या निवडणुकांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची असणारी गट आणि गणांची आरक्षण सोडत आज (दि. १३ ऑक्टोबर) रोजी पार पडली. अहिल्यानगर जिल्हा परिषदेच्या एकूण ७५ गटांचे आरक्षण जाहीर करण्यात आले असून, यात विविध प्रवर्गानुसार जागांचे वाटप निश्चित झाले आहे. जिल्हा परिषदेसाठी झालेल्या या सोडतीनुसार २९ गट खुल्या प्रवर्गासाठी, २० गट इतर मागासवर्गीय (OBC) (यामध्ये नागरिकांचा मागास प्रवर्ग पुरुष व महिलांचा समावेश आहे), अनुसूचित जमातीसाठी (ST) ९ गट, अनुसूचित जातीसाठी (SC) ७ गट व उर्वरित गट महिला व सर्वसाधारण प्रवर्गासाठी नियमानुसार राखीव आहेत. जिल्हा परिषदेची ही आरक्षण सोडत जाहीर झाल्यामुळे आता जिल्ह्यातील इच्छुकांचे लक्ष निवडणुकीच्या पुढील घडामोडींकडे लागले आहे.…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – पुण्याजवळील पिंपरी-चिंचवड शहरातून प्रेमसंबंधातील त्रिकोणातून घडलेली एक अत्यंत हादरवून टाकणारी आणि क्रूर घटना समोर आली आहे. प्रेमसंबंधातून निर्माण झालेल्या संशयाने आणि संतापाने एका प्रियकराने आपल्याच प्रेयसीचा निघृण खून केला आहे. वाढदिवस एकत्र साजरा केल्यानंतर प्रियकराने केक कापण्यासाठी वापरलेल्या चाकूने प्रेयसीचा गळा चिरल्याची ही धक्कादायक घटना वाकड पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. या घटनेत मेरी मल्लेश तेलगू या तरुणीचा खून झाला असून, तिच्या प्रियकर दिलावर सिंग (वय २५) याला वाकड पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी दिलावर सिंग आणि मृत मेरी मल्लेश तेलगू हे दोघे २०१७ पासून प्रेमसंबंधात होते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून मेरीचे…

Read More

मेष (Aries): आजचा दिवस उत्साहाने भरलेला राहील. कामात नवीन सुरुवात करण्याची संधी मिळू शकते. जुनी कामे पुढे सरकतील. वृषभ (Taurus): पैशांचा वापर जपून करा. विनाकारण खर्च करणे टाळा. गुंतवणुकीतून लाभ होण्याची शक्यता. मिथुन (Gemini): वैयक्तिक संबंधात इतरांच्या भावनांमध्ये अडकू नका. संवाद साधण्यासाठी चांगला दिवस. आरोग्याची काळजी घ्या. कर्क (Cancer): नवीन कार्याची सुरुवात करण्यासाठी हा काळ चांगला आहे. आर्थिक बाबतीत लाभ होऊ शकतो. कुटुंबासोबत वेळ घालवाल. सिंह (Leo): कामाच्या ठिकाणी संयमी व्यक्तिमत्त्व ठेवणे गरजेचे आहे. तुम्हाला प्रमोशन किंवा भाग्याची साथ मिळण्याचे योग. कन्या (Virgo): जास्त भावनिक होऊन विचार करू नका. बुद्धिमत्ता आणि विश्लेषण क्षमता कामात स्थिरता आणेल. तूळ (Libra): कामाच्या निमित्ताने…

Read More

संगमनेर – संगमनेर तालुक्यातील मांडवे बुद्रुक येथील मुळा नदी किनारी असलेल्या शिवप्रभात ट्रस्ट देवस्थानच्या भक्तनिवासात रविवारी (दि. १२ ऑक्टोबर) सकाळी एका ३५ वर्षीय तरुणाचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात आढळून आल्याने संपूर्ण पठार भागात मोठी खळबळ उडाली आहे. भाऊराव विठ्ठल बाचकर (वय ३५, रा. करकवाडी वावरथ जांभळी, ता. राहुरी, जि. अहिल्यानगर) असे मयताचे नाव आहे. हा खून की घातपात, याचा कसून तपास घारगाव पोलीस करत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, मांडवे बुद्रुक येथील मुळा नदीकिनारी असलेल्या शिवमंदिरात रोज सकाळी भाविक दर्शनासाठी जातात. रविवारी सकाळी काही भाविक दर्शनासाठी गेले असता, त्यांना भक्तनिवासातील सभामंडपात भाऊराव बाचकर हे रक्ताच्या थारोळ्यात पडलेले दिसले. त्यांच्या डोक्याखाली मोठ्या प्रमाणात रक्त…

Read More

संगमनेर – इयत्ता नववी मध्ये शिकणाऱ्या व डिग्रस येथे बिबट्याच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या प्रगती सखाराम श्रीराम हिची शनिवारी रात्री राज्याचे माजी मंत्री, लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी हॉस्पिटलमध्ये जाऊन भेट घेत तिची आपुलकीने चौकशी केली. यावेळी त्यांनी बिबट्यांच्या वाढत्या हल्ल्यांवर तीव्र चिंता व्यक्त केली आणि वन विभागाने तातडीने प्रभावी उपाययोजना करण्याची गरज असल्याचे सांगितले. डिग्रस येथील सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात विद्यालयात शिकणारी प्रगती शनिवारी सकाळी शाळेत जात असताना दबा धरून बसलेल्या बिबट्याने तिच्यावर अचानक हल्ला केला. या हल्ल्यात प्रगतीच्या मानेला मोठ्या जखमा झाल्या असून ती गंभीर जखमी झाली. तिच्यावर सध्या संगमनेरमधील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. शाळेत जाणाऱ्या विद्यार्थिनीवर बिबट्याने केलेल्या…

Read More

देशातील बिघडत्या सामाजिक वातावरणाने आता अतिरेक गाठला आहे. धार्मिक आणि सामाजिक सलोखा बिघडवणार्‍यांवर सरकारचा कोणताही अंकुश राहिलेला नाही. ते कोणत्याही थराला जाऊ शकतात. डॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉम्रेड गोविंद पानसरे, पत्रकार गौरी लंकेश, प्रा. एम. एम. कलबुर्गी यांचा बळी घेणार्‍या शक्तीने टोकाचं पाऊल गाठत आता थेट सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांना टार्गेट केलं आहे. खंडपीठापुढे सुनावणी सुरू असताना 75 वर्षाच्या राकेश तिवारीने त्यांच्यावर पायातला बुट फेकला. ही घटना एकट्या गवईंपुरती मर्यादित राहिलेली नाही. ज्यांनी देशातील जनतेला न्याय द्यावा, अशा यंत्रणेच्या प्रमुखावरच बुट फेकला जात असेल तर सामान्यांचं या देशातील स्थान काय? असा साधा प्रश्‍न आहे. गवईंनी या व्यक्तीला माफ केलं…

Read More

मेष (Aries): आजचा दिवस तुमच्यासाठी सकारात्मक असून घरात समाधानाचे वातावरण राहील. तुम्ही हाती घेतलेल्या कामात यश मिळण्याची शक्यता आहे. मुलांबद्दल आणि जोडीदाराबद्दल प्रेमाची भावना वाढेल. बुद्धी आणि विवेक वापरून घेतलेले व्यावसायिक निर्णय यशस्वी होतील. वृषभ (Taurus): दूरदृष्टी आणि चांगले नियोजन तुमच्या संपत्तीत वाढ करेल. तुमच्या यशामुळे कुटुंबाला अभिमान वाटेल. तुम्हाला मौल्यवान वस्तू मिळण्याचे योग आहेत. आर्थिक व्यवहारात सावधगिरी बाळगा. आज तुमचे विचार इतरांना प्रभावीपणे मांडण्याची तीव्र इच्छा असेल. मिथुन (Gemini): आज तुम्ही तुमच्या कामाच्या ठिकाणी बरीच प्रगती कराल, हा सकारात्मक टप्पा आहे. निरोगी खाण्याच्या सवयींमुळे किरकोळ आजारांपासून दूर राहाल. एखादा महत्त्वाचा घरगुती प्रश्न तुमच्या कौशल्याने हाताळावा लागेल. कामामध्ये जास्त घाई…

Read More

संगमनेर – तालुक्यातून जाणाऱ्या पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावर अपघातांची मालिका सुरूच असल्याचे पुन्हा एकदा पाहायला मिळाले. शनिवारी (दि. ११ ऑक्टोंबर) सकाळी दहा वाजेच्या सुमारास आनंदवाडी शिवारात भरधाव चारचाकी वाहनाने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार झाला. याबाबत डोळासणे महामार्ग पोलीस मदत केंद्राकडून मिळालेल्या माहितीनुसार, सचिन बबन इघे (वय ३१, रा. खडकवाडी, ता. पारनेर) हे त्यांची दुचाकी रस्त्याच्या कडेला उभी करून लघुशंकेसाठी थांबले होते. त्याच वेळी दत्तात्रेय देवराम गाडगे (वय ४९, रा. लोणी, ता. राहाता) याने रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून आणि हयगयीने चारचाकी वाहन चालवून उभ्या दुचाकीला जोराची धडक दिली. धडकेमुळे दुचाकीस्वार सचिन इघे…

Read More

संगमनेर: पोलीस उपाधीक्षकांच्या विशेष पथकाने संगमनेर शहरातील रहेमतनगर परिसरात छापा टाकून गोवंश जातीचे मांस तस्करी करताना रंगेहाथ एका आरोपीला पकडले, तर गोमांसाचा मालक आणि एका वाहनाचा मालक असलेले दोन आरोपी पळून जाण्यात यशस्वी झाले. या कारवाईत सुमारे १७ लाख रुपयांचे गोमांस आणि दोन वाहने जप्त करण्यात आली आहेत. संगमनेर शहर पोलीस ठाण्यात आरोपींविरोधात महाराष्ट्र पशु संरक्षण अधिनियम आणि भारतीय न्याय संहितेतील कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शनिवारी (११ ऑक्टोंबर) सकाळी ०७.०५ वाजता पोलीस उपअधीक्षक डॉ. कुणाल सोनवणे यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, संगमनेर शहरातील मौलाना आझाद मंगल कार्यालयाच्या पाठीमागे, रहेमतनगर येथे मोहंमद अतीक रफीक कुरेशी ऊर्फ सोन्या (रा.…

Read More