Author: अनंत पांगारकर
संगमनेर, प्रतिनिधी – “अभिधान सार्थ हे व्हावे, हिंदुस्थान म्हणुनिया जिवाचे ज्यांनी केले रान, त्याचीच तपस्या हे सिंहासन वंद्य” या ओळींनी सुरू होणारा हिंदू साम्राज्य दिनाचा पवित्र सोहळा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्यावतीने उत्साहात साजरा होणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची आठवण करून देणारा आणि हिंदू समाजाला ‘स्वत्वा’ची जाणीव करून देणारा हा प्रेरणादायी दिवस उद्या मंगळवारी (१७ जून) सायंकाळी ७ वाजता, मदन कुलकर्णी सभागृह, दिगंबर गणेश सराफ विद्यालय, घास बाजार, संगमनेर येथे संपन्न होणार आहे. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान ॲड. श्रीकांत गोंगे भूषविणार असून प्रमुख वक्ते म्हणून महेश शेळके सर (महाविद्यालयीन विद्यार्थी प्रमुख, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, उत्तर नगर जिल्हा) यांचे मार्गदर्शन होणार आहे. हिंदवी स्वराज्याच्या…
संगमनेर, प्रतिनिधी: शहरातील स्वामी समर्थ नगर ते संतोषी माता मंदिर दरम्यान म्हाळुंगी नदीवर नव्याने बांधण्यात आलेला पूल जनतेसाठी खुला करण्यात आला आहे. जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून, आमदार अमोल खताळ यांच्या हस्ते या पुलाचे लोकार्पण झाले. शाळा सुरू होण्याच्या पूर्वसंध्येला हा पूल वाहतुकीसाठी खुला झाल्याने विद्यार्थी आणि स्थानिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. चार वर्षांपूर्वी हा पूल कोसळल्याने विद्यार्थी आणि नागरिकांना प्रचंड गैरसोयीचा सामना करावा लागला होता. स्थानिक नागरिकांनी अनेकदा आंदोलने केल्यानंतर या पुलाच्या कामास सुरुवात झाली होती. यावेळी बोलताना आमदार अमोल खताळ यांनी सांगितले की, पूर्वी या पुलाचे बांधकाम स्वर्गीय बाळासाहेब विखे पाटील यांच्या निधीतून झाले…
संगमनेर, प्रतिनिधी: संगमनेर तालुक्यातून एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. तेरा वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याच व पीडित मुलगी पाच महिन्यांची गर्भवती असल्याचा हा घृणास्पद प्रकार समोर आला. या प्रकरणी संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात दोन महिलांसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, संगमनेरनजीक कोकणगाव येथे सकाळी झालेल्या भीषण अपघाताच्या घटनेला काही तास उलटत नाहीत तोच हा अत्यंत गंभीर प्रकार समोर आला आहे. पीडित मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीनुसार, पंडित हिरामण वैराट, संगीता पंडित वैराट, संग्राम उर्फ शेरू पंडित वैराट आणि माधुरी पंडित वैराट (सर्व रा. कळस, ता. अकोले, जि. अहमदनगर) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे…
संगमनेर, प्रतिनिधी – संगमनेर शहर आणि तालुक्यात अन्नपदार्थांमधील भेसळीच्या वाढत्या तक्रारींनी नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. अन्न व औषध प्रशासनाने (FDA) यापूर्वी अनेक ठिकाणी छापे टाकून संशयित नमुने गोळा केले असले, तरी अद्याप ठोस कारवाई झालेली नाही. आता संगमनेरमध्ये गुळात भेसळ झाल्याची गंभीर तक्रार समोर आल्याने, प्रशासन यावर काय पाऊल उचलते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. संगमनेर येथील ‘सिद्धी नैसर्गिक गुळ’ या दुकानाचे विक्रेते आणि निर्माते मोहनलाल बन्सीलाल दर्डा यांच्याविरुद्ध शंकर ढमाले यांनी अन्न व औषध प्रशासन विभागाकडे सविस्तर तक्रार दाखल केली आहे. संबंधित व्यक्तींवर कठोर कारवाई करण्याची मागणी ढमाले यांनी केली आहे. रासायनिक भेसळीमुळे त्रास झाल्याचा आरोप ढमाले यांनी…
संगमनेर, प्रतिनिधी – रविवारी सकाळीच संगमनेरकरांसाठी दुःखद वार्ता समोर आली आहे. सकाळी पावणे सात वाजण्याच्या दरम्यान कोल्हार घोटी राज्यमार्गावर कोकणगावजवळ स्लिपरकोच ट्रॅव्हल्स आणि आंब्याने भरलेल्या ट्रकची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला. या अपघातात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला असून, सहा ते सात जण गंभीर जखमी झाले आहेत. कोल्हार घोटी मार्गावरील हॉटेल भाग्यलक्ष्मीसमोर ही दुर्दैवी घटना घडली असून या अपघातात प्रवीण सोपान कांदळकर (वय २८, रा. सुकेवाडी, ता. संगमनेर), फिरोज लाला शेख (वय ४६, रा. कसारादुमाला, ता. संगमनेर) आणि अंजु प्रवीण वाल्मिकी (वय ३९, रा. पानिपत हरियाणा) या तिघांचा मृत्यू झाला आहे. तर या अपघातात हर्षिता सोनू वाल्मिकी, बिराला पूनम,…
राज्याच्या राजकारणात नवा पैलू निर्माण करू पाहणार्या दोन ठाकरेंच्या एक होण्याच्या संभाव्य घटनेने शिवसेना आणि मनसे कार्यकर्त्यांच्या आशा चांगल्याच पल्लवीत झाल्या होत्या. असं काही झालं तर त्याचे सकारात्मक परिणाम महाराष्ट्रात पहायला मिळतील आणि अनैतिक मार्गाने सत्तेवर बसलेल्या महायुतीला त्याची किंमत मोजावी लागेल, अशी चिन्हं दिसू लागली होती. दोन भाऊ एक होण्याची शक्यता दिसू लागल्याने महाविकास आघाडीच्या घटक पक्षांनाही हायसं झालं होतं. सत्तेचा वारू उधळणार्या भाजपला याचा सर्वाधिक फटका बसू शकतो हे लक्षात आल्याने आपला फायदा न होता भाजपची उडू पाहणारी संभाव्य त्रेधा महाविकास आघाडीच्या घटक पक्षांना हवीच होती. यामुळे आतून काहीही वाटत असलं तरी दोन्ही भाऊ एक व्हावेत, अशा मानसिकतेत…
संगमनेर, प्रतिनिधी- सरकारने शेतकरी कर्जमाफीसाठी समिती स्थापन करण्याचा घेतलेला निर्णय म्हणजे शेतकऱ्यांची पुन्हा एकदा फसवणूक ठरू नये, अशी आग्रही मागणी माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली आहे. बच्चू कडू यांनी शेतकरी कर्जमाफी आणि इतर मागण्यांसाठी सुरू केलेले अन्नत्याग आंदोलन थांबवण्यासाठी सरकारने घेतलेली भूमिका फसवी असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. सत्ताधारी पक्षाने सत्तेवर येण्यापूर्वी पहिल्याच कॅबिनेट बैठकीत शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचं आश्वासन दिलं होतं. हे आश्वासन पाळणं हे सरकारचं नैतिक आणि राजकीय कर्तव्य आहे. त्यामुळे सरकारने समिती स्थापन करण्याऐवजी सरसकट कर्जमाफीची घोषणा करावी, अशी स्पष्ट भूमिका थोरात यांनी मांडली. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी समिती कशाला? माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी सरकारवर जोरदार टीका करताना म्हटलं…
अहिल्यानगर, अहिल्यानगर जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. प्रभारी अपर जिल्हादंडाधिकारी अरुण उंडे यांनी मुंबई पोलीस अधिनियम १९५१ च्या कलम ३७ (१) (३) अन्वये जिल्ह्यात शस्त्रबंदी आणि जमावबंदी आदेश जारी केला आहे. हा आदेश १३ जून २०२५ पासून ते २६ जून २०२५ रोजी रात्री १२ वाजेपर्यंत लागू राहणार आहे. या आदेशानुसार, जिल्ह्यात कोणतीही व्यक्ती शस्त्र बाळगणार नाही किंवा पाचपेक्षा अधिक व्यक्तींचा जमाव करणार नाही. जिल्ह्याची शांतता आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. या आदेशातून कोणाला वगळण्यात आले आहे? प्रशासनाने नागरिकांच्या सोयीसाठी आणि काही अपवादात्मक परिस्थिती विचारात घेऊन काही घटकांना…
संगमनेर, प्रतिनिधी – शहरालगत असणाऱ्या खांडगाव शिवारात प्रवरा नदीपात्रातून बेकायदा वाळू वाहतूक करण्याच्या उद्देशाने सुमारे ४० ब्रास वाळू साठा करणाऱ्या वाळू तस्करांवर आणि पिकअपमधून वाळू वाहतूक करणाऱ्या एका अशा सहा जणांवर संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान वाळू वाहतूक करणारा वाहनचालक कारवाईदरम्यान पळून गेला असल्याची माहिती मिळाली. तलाठी प्रवीण डहाके यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संगमनेर शहर पोलीस ठाण्यात शरद कारभारी गुंजाळ, गणेश बालोडे, सुनील बोऱ्हाडे, बबलू सातपुते, लहानु बालोडे, निकुंज सुधीर ढोले या सहा वाळू तस्करांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रशासन या प्रकरणे आता या तस्करांवर नेमकी काय कारवाई करते याकडे लक्ष लागले आहे. वाळू तस्करी…
आषाढी यात्रेसाठी अहिल्यानगर जिल्ह्याला २.६१ कोटींचा निधी मंजूर: वारकऱ्यांसाठी मिळणार अद्ययावत सुविधा
अहिल्यानगर- आषाढी वारीसाठी पंढरपूरकडे मार्गस्थ होणाऱ्या वारकऱ्यांच्या सोयीसाठी अहिल्यानगर जिल्ह्याला राज्य सरकारकडून २ कोटी ६१ लाख ८० हजार रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. राज्याचे जलसंपदामंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी ही माहिती दिली. ग्रामविकास विभागामार्फत उपलब्ध होणाऱ्या या निधीतून वारकऱ्यांसाठी वॉटरप्रूफ मंडप, शौचालये, स्नानगृहे, पिण्याचे पाणी, वैद्यकीय सुविधा आणि ग्रामपंचायत सहाय्य अनुदान यांसारख्या आवश्यक सुविधा पुरवण्यात येणार आहेत. दरवर्षी अहिल्यानगर जिल्ह्यातून पैठण येथील संत एकनाथ महाराज, त्र्यंबकेश्वर येथील संत निवृतीनाथ महाराज, पिंपळनेर येथील संत निळोबाराय महाराज यांच्या प्रमुख पालख्यांसह सुमारे १६० स्थानिक पालख्या पंढरपूरकडे जातात. या प्रवासात वारकऱ्यांची, विशेषतः महिला वारकऱ्यांची कोणतीही गैरसोय होऊ नये, यासाठी पालकमंत्री विखे…
