Author: अनंत पांगारकर
अहिल्यानगर, विशेष प्रतिनिधी संगमनेर १३२ केव्ही सबस्टेशन ते धांदरफळ दरम्यान टाकण्यात आलेली ३३ केव्ही उच्चदाब विद्युत वाहिनी अत्यंत धोकादायक आणि बेकायदेशीर असल्याची तक्रार करत, बाधित गावकऱ्यांनी थेट जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव घेतली आहे. ही वाहिनी तातडीने सुरक्षित ठिकाणी न हलवल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा इशारा राम अरगडे, सतीश खताळ, अरुण चव्हाण आणि योगेश सातपुते यांच्यासह बाधित गावकऱ्यांनी दिला आहे. निवेदनात नमूद केल्यानुसार, गेल्या दीड वर्षांपासून संगमनेर शहर, गुंजाळवाडी, राजापूर, मंगळापूर, चिखली आणि धांदरफळ या गावातील नागरिक या अन्यायाविरुद्ध संघर्ष करत आहेत. महावितरणने सुरुवातीला ही वाहिनी संगमनेर ते वाडापूर सबस्टेशनला जोडली जाणार असल्याचे सांगून दिशाभूल केली, मात्र प्रत्यक्षात ती चिखलीकडून धांदरफळच्या दिशेने खाजगी…
संगमनेर, प्रतिनिधी- संगमनेर शहरात हनुमान जयंतीचा उत्सव अत्यंत भक्तिमय वातावरणात आणि पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात आला. या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या भव्य रथ मिरवणुकीत शेकडो महिलांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवत हनुमानाचा रथ ओढण्याची वर्षांनुवर्षांची परंपरा यंदाही मोठ्या उत्साहात जपली. सकाळी आठ वाजता शहर पोलीस स्थानकापासून पोलीस निरीक्षक समीर बारवकर यांनी आपल्या पोलीस पथकासह मानाचा भगवा ध्वज हाती घेत जयघोषात चंद्रशेखर चौकात हनुमान रथापाशी आणला. तेथे सजवलेल्या रथावर विधीवत ध्वज फडकवण्यात आला. आमदार अमोल खताळ तसेच पोलीस निरीक्षक समीर बारवकर यांच्या हस्ते पवनपुत्र हनुमानरायाची महाआरती करण्यात आली. यानंतर रथाचा दोर हातात धरत नगराध्यक्ष डॉ. मैथिली तांबे, माजी नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे, डॉ. जयश्री…
संगमनेर, प्रतिनिधी शहराच्या विकासकामांना गती देण्यासाठी आणि आर्थिक शिस्त लावण्यासाठी संगमनेर नगरपालिकेने राबविलेल्या आक्रमक कर वसुली मोहिमेला नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. पालिकेच्या प्रभावी नियोजनामुळे मालमत्ता कर आणि पाणीपट्टीच्या वसुलीमध्ये मागील वर्षाच्या तुलनेत यंदा तीन कोटी रुपयांची लक्षणीय वाढ झाली असून, चालू आर्थिक वर्षात पालिकेने तब्बल १८ कोटी रुपयांचा महसूल जमा केला आहे. नगरपालिकेकडून शहरात विविध पायाभूत सुविधा पुरविल्या जातात. या सुविधांचा दर्जा टिकवून ठेवण्यासाठी आणि शहराचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी मालमत्ता कर आणि पाणीपट्टी ही महसुलाची प्रमुख साधने आहेत. मात्र, अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेली थकबाकी आणि कोरोना काळातील आर्थिक अडचणींमुळे वसुलीचे मोठे आव्हान पालिका प्रशासनासमोर होते. या पार्श्वभूमीवर मुख्याधिकारी दयानंद…
संगमनेर, प्रतिनिधी- संगमनेर तालुक्यातील पठार भागात दुचाकीला कट लागल्याच्या किरकोळ कारणावरून राष्ट्रपती सुवर्णपदक विजेत्या दिवंगत विठाबाई नारायणगावकर यांच्या तमाशा फडातील कलावंतांवर जमावाने हल्ला केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. या भीषण प्रकारात महिला कलावंतांनाही मारहाण करून त्यांचा विनयभंग करण्यात आला असून, कलावंतांची रोकडही लुटण्यात आली आहे. बुधवारी दुपारी दोनच्या सुमारास नाशिक-पुणे महामार्गावरील वरुडी पठार शिवारात ही घटना घडली. संबंधित तमाशा फड पोखरी बाळेश्वर (ता. संगमनेर) येथील कार्यक्रम आटोपून माळेगाव पठार येथे पुढील कार्यक्रमासाठी वाहनांतून जात होता. वाटेत वरुडी पठार येथील एका पेट्रोल पंपावर इंधन भरण्यासाठी वाहने थांबली असताना, एका दुचाकीस्वाराने तमाशाच्या वाहनाला कट मारला. यावरून झालेल्या वादाचे पर्यावसान हाणामारीत झाले.…
जालना: समृद्धी महामार्गावर बुधवारी सायंकाळी एक काळजाचा थरकाप उडवणारी घटना घडली. नागपूरहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या एका भरधाव वाहनाने कामगारांच्या उभ्या वाहनाला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात सात महिला मजुरांचा जागीच मृत्यू झाला असून अन्य १० ते १२ मजूर गंभीर जखमी झाले आहेत. मृतांमध्ये निधोना येथील अलकाबाई दादाराव आदमाने, मीना परमेश्वर आदमाने, कांचनबाई प्रकाश आदमाने, लक्ष्मीबाई संतोष मदन, सुमनबाई कचरू आदमाने आणि केळीगव्हाण येथील कडुबाई रामदास मदन व ताराबाई गहेनाजी चौधरी यांचा समावेश आहे. अपघातानंतर महामार्गावर रक्ताचा सडा पडला होता आणि मृतदेहांचा खच पडला होता, हे दृश्य अत्यंत हृदयद्रावक होते. मिळालेल्या माहितीनुसार, जालना जिल्ह्यातील कडवंचीनजीक हे सर्व मजूर समृद्धी महामार्गावर…
अहिल्यानगर, विशेष प्रतिनिधी संगमनेर तालुक्यातील कोल्हार-घोटी मार्गावरील वडगाव पान येथे इयत्ता सहावीत शिकणाऱ्या एका अल्पवयीन मुलीवर झालेल्या भीषण ॲसिड हल्ल्याच्या घटनेला आता १५ दिवस उलटून गेले आहेत. मात्र, एवढा काळ लोटूनही पोलीस प्रशासनाला या प्रकरणातील मुख्य आरोपीचा शोध घेण्यात यश आलेले नाही. या धक्कादायक घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात संतापाची लाट असून पोलिसांच्या तपास यंत्रणेसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन आता अहिल्यानगर पोलीस दलाच्या गुन्हे शाखेने आरोपीची ओळख पटवणाऱ्या किंवा माहिती देणाऱ्या व्यक्तीस २ लाख रुपयांचे रोख बक्षीस जाहीर केले आहे. ही दुर्दैवी घटना पंधरा दिवसांपूर्वी घडली होती. पीडित मुलगी दुपारी शाळेतून घरी परतत होती. ती एकटीच…
संगमनेर, प्रतिनिधी- संगमनेर तालुक्यात रविवार आणि सोमवार अशा सलग दोन दिवस झालेल्या अवकाळी पावसाने पिकांचे प्रचंड नुकसान केले असून शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. या नैसर्गिक आपत्तीमुळे तालुक्यातील १५ गावांमधील सुमारे ४ हजार ५९१ शेतकऱ्यांना फटका बसला असून प्राथमिक अंदाजानुसार ३ हजार १७७.४६ हेक्टर क्षेत्रावरील पिके बाधित झाली असल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी रेजा बोडके यांनी दिली आहे. तालुक्यात रविवारी (२९ मार्च) आणि सोमवारी (३० मार्च) सायंकाळच्या सुमारास वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. या वादळाचा वेग इतका प्रचंड होता की अनेक ठिकाणच्या घरांचे आणि गोठ्यांचे पत्रे उडून गेले. शेतात काढणीला आलेला गहू, कांदा, मका यासह भाजीपाला आणि डाळिंबाच्या बागांचे मोठे…
मुंबई, विशेष प्रतिनिधी शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे आमदार अमोल खताळ यांना मुंबई उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठाकडून मोठा कायदेशीर दणका बसला आहे. आपल्या निवडणुकीला आव्हान देणारी काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांची याचिका रद्द करावी, अशी मागणी करणारा खताळ यांचा अर्ज न्यायालयाने फेटाळून लावला आहे. या निर्णयामुळे खताळ यांची आमदारकी धोक्यात आली असून, आता या प्रकरणाचा रीतसर खटला चालवला जाणार आहे. बाळासाहेब थोरात यांनी खताळ यांच्या निवडीला निवडणूक याचिकेच्या माध्यमातून आव्हान दिले आहे. अमोल खताळ यांनी विधानसभा निवडणुकीच्या वेळी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात आपल्या उत्पन्नाचे स्त्रोत आणि करांच्या थकबाकीबाबत चुकीची माहिती दिल्याचा आरोप थोरात यांनी केला आहे. या याचिकेला उत्तर देताना खताळ…
मुंबई, विशेष प्रतिनिधी राज्य शासनाने आज प्रशासकीय पातळीवर मोठे फेरबदल करत भारतीय प्रशासकीय सेवेतील (IAS) १० वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश निर्गमित केले आहेत. या नव्या नियुक्त्यांमध्ये मुख्यमंत्री कार्यालयापासून ते मुंबई महानगरपालिकेपर्यंत महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सोपवण्यात आल्या आहेत. या फेरबदलात महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीचे (महावितरण) अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांची मुख्यमंत्री कार्यालयाचे अतिरिक्त मुख्य सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या जागी मुख्यमंत्री कार्यालयात कार्यरत असलेल्या अश्विनी भिडे यांची मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तपदी वर्णी लागली असून, देशातील सर्वात श्रीमंत महानगरपालिकेच्या त्या नवीन प्रमुख असतील. याचसोबत कृषी आणि पदुम विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव विकास चंद्र रस्तोगी यांची वित्त विभागात अतिरिक्त मुख्य…
शिर्डी, विशेष प्रतिनिधी- महिलांचे लैंगिक शोषण करणाऱ्या भोंदू बाबा खरात याचा आणखी एक नवा कारनामा समोर आला आहे. यामुळे खरातच्या अडचणीत वाढ झाली आहे. शिर्डी येथील जमीन व्यवहारात कोट्यवधी रुपयांची आर्थिक फसवणूक करत बेकायदेशीर सावकारी प्रकरणी शिर्डी पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणात मुख्य आरोपी कॅप्टन अशोककुमार एकनाथ खरात, त्यांची पत्नी कल्पना खरात आणि इतर तीन साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी यातील दोन आरोपींना अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ऑगस्ट २०२३ पासून शिर्डी, नाशिक आणि राहाता परिसरात हा जमीन व्यवहाराचा घोळ सुरू होता. पीडित व्यक्तीला पैशांची गरज असताना कॅप्टन अशोककुमार खरात याने दरमहा दोन टक्के व्याजाने पैसे…
