Author: अनंत पांगारकर
महाराष्ट्र ही संत व विचारवंतांची भूमी आहे. देशाच्या राजकारणाला महाराष्ट्राने कायम दिशा दिली आहे. छत्रपती शिवाजी महाराज, फुले-शाहू-आंबेडकरांचा वारसा सांगणार्या या भूमीत स्व. यशवंतरावजी चव्हाण यांनी कृषी-औद्योगिक क्रांतीचा पाया घालून विकसित महाराष्ट्र निर्माण केला. याच विचारांचा वारसा घेऊन राज्यात कार्यरत असलेले काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष व माजी महसूलमंत्री लोकनेते बाळासाहेब थोरात हे सर्वसामान्य जनतेचे खऱ्या अर्थाने आश्वासक व महाराष्ट्राचे राजहंस नेतृत्व ठरले असून सर्वांगीण विकासाचे आर्किटेक्ट आहे. स्वातंत्र्यसैनिक सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात व हरितक्रांतीचे प्रणेते डॉ. अण्णासाहेब शिंदे यांच्या विचारातून प्रेरणा घेऊन १९८५ साली बाळासाहेब थोरात यांनी सर्वात कमी वयाचे लोकप्रतिनिधी म्हणून आपल्या कार्यकर्तृत्वाला सुरुवात केली. पाण्यासाठी आग्रह धरताना भंडारदर्याच्या पाण्यावर…
विशेष प्रतिनिधी / मुंबई रायगड आणि नाशिक जिल्हा पालकमंत्री पदावरून सत्ताधारी महायुतीत धुसफूस सुरू असताना भाजपने बुधवारी १७ जिल्ह्यात संपर्क मंत्र्यांची नेमणूक जाहीर केली. पक्ष आणि सरकार यामध्ये समन्वय साधण्यासाठी जिल्हा संपर्क मंत्री नियुक्त केल्याचे भाजपने म्हटले असले, तरी ज्या जिल्ह्यात भाजपचा पालकमंत्री नाही त्या जिल्ह्यात संपर्क मंत्री देऊन पक्षाने शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेसला शह दिल्याचे बोलले जाते. अशातच आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना धक्का दिला आहे. गृह विभागाने राजपत्र प्रकाशित करत पुढील आदेशापर्यंत महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या अध्यक्षपदी संजय सेठी या आयएएस अधिकाऱ्याची नियुक्ती केली आहे. यापूर्वी एसटीची सारी जबाबदारी ही परिवहन मंत्र्यांकडे दिली जायची.…
संगमनेर दि. ०६ फेब्रुवारी – पोलीस उपअधीक्षक कुणाल सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर पोलीस उपविभागाच्यावतीने अकोले व संगमनेर तालुक्यातील शाळकरी मुला-मुलींसाठी सुरक्षितता कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. प्रत्यक्ष कार्यशाळेबरोबरच थेट प्रक्षेपणाद्वारे (ऑनलाइन) देखील यामध्ये हजारो विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला आणि सदर कार्यशाळा यशस्वीरित्या पार पडली. कार्यशाळेमध्ये बालकांबाबत घडणारे गुन्हे, त्याचा प्रतिबंध, स्वसंरक्षण, बालकासंबंधीच्या महत्त्वाच्या कायद्यातील तरतुदी, विद्यार्थी व विद्यार्थिनी यांच्या दृष्टीने करिअरचे महत्त्व, तसेच पालकांनी घ्यावयाची काळजी याबाबत प्रबोधन करण्यात आले. कार्यशाळा अकोले तालुक्यातील कळस येथील कळसेश्वर विद्यालयामध्ये घेण्यात आली. ऑनलाइन कार्यशाळेमध्ये विविध प्रकारचे व्याख्यान आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी अकोले पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अमर माने संगमनेर पंचायत समितीचे गटविकास…
मुंबई : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेच्या मंत्र्यांनी जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी ‘जनता दरबार’ आयोजित केला होता. शिवसेनेच्या मंत्र्यांसोबत या जनता दरबारावेळी संगमनेरचे आमदार अमोल खताळ देखील उपस्थित होते. शिवसेना पक्ष मध्यवर्ती कार्यालय, बाळासाहेब भवन येथे पार पडलेल्या या विशेष उपक्रमात मंत्री शंभुराजे देसाई, प्रताप सरनाईक, प्रकाश आबिटकर यांनी राज्यभरातून आलेल्या नागरिकांच्या समस्या ऐकून तातडीने निर्णय घेतले. सामान्य जनतेला थेट शासनाशी जोडण्यासाठी हा उपक्रम सुरू करण्यात आला असून, दर सोमवार, मंगळवार आणि बुधवार शिवसेनेचे मंत्री बाळासाहेब भवन येथे जनतेसाठी उपलब्ध राहणार आहेत. या दरबारात नागरिकांच्या तक्रारींवर त्वरित निर्णय घेण्यात येत असून, प्रशासनाच्या माध्यमातून तातडीने मदत केली जात आहे. जनतेच्या समस्या…
संगमनेर, दि. ०६ फेब्रुवारी – निवडणुकांमध्ये जय पराजय होत असतात. परंतु सातत्याने जनतेच्या विकासासाठी काम करणारे नेतृत्व हे जनतेच्या हृदयात असते. अत्यंत स्वच्छ प्रतिमा आणि प्रामाणिकपणे सातत्याने काम करणारे लोकनेते बाळासाहेब थोरात हे राजकारणातील संत असल्याचे गौरवोद्गार साहित्यिक संजय कळमकर यांनी काढले. सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात महाविद्यालय येथे सह्याद्री संस्थेच्या आजी-माजी पदाधिकारी पालक व सेवकांच्या मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर काँग्रेसच्या राष्ट्रीय वर्किंग कमिटीचे सदस्य लोकनेते बाळासाहेब थोरात, संस्थेचे चेअरमन माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, दुर्गाताई तांबे, सेक्रेटरी लक्ष्मणराव कुटे, लहानुभाऊ गुंजाळ, डॉ. सोमनाथ सातपुते, साहेबराव कवडे, नानासाहेब गुंजाळ, सिताराम वर्पे, सेक्रेटरी दत्तात्रय चासकर, रजिस्टर आचार्य बाबुराव गवांदे, प्राचार्य…
संगमनेर, दि. ०६ फेब्रुवारी – संगमनेरमधील कचरा लाख मोलाचा असून या कचऱ्याच्या माध्यमातून लाखो रुपये नगर परिषदेला मिळतील यासाठी आपण प्रयत्नशील आहोत, असे प्रतिपादन संगमनेर नगर परिषदेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक रामदास कोकरे यांनी केले. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या संगमनेर शाखेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या कला महोत्सवाच्या पारितोषिक वितरण समारंभात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी नाट्य परिषदेचे प्रा. डॉ. संजयकुमार दळवी होते. कोकरे म्हणाले, संगमनेर शहरातील कचऱ्याचे लवकरच व्यवस्थापन केले जाणार असून कचरा व्यवस्थापना अंतर्गत समाज जागृतीसाठी अभियान हाती घेतले जाणार आहे. याचाच एक भाग म्हणजे विविध स्पर्धांचे आयोजन यासाठी केले जाणार आहे. तसेच शहराच्या वैभवात भर घालणारे कवी अनंत पंडित नाट्यगृह…
अहिल्यानगर, दि. ०६ फेब्रुवारी – गरजू रुग्णांना झटपट मदत मिळावी यासाठी राज्यात प्रत्येक जिल्ह्यात जिल्हास्तरावर मुख्यमंत्री सहाय्यता कक्ष स्थापन करण्यात येणार आहे. अहिल्यानगर मध्ये देखील जिल्हाधिकारी कार्यालयात निवासी उपजिल्हाधिकारी यांच्या कार्यालयात शेजारी या योजनेचे कार्यालय सुरू केले जाणार आहे. गंभीर आजारावरील उपचारासाठी गरजू नागरिकांना, रुग्णांना मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्षाकडून आर्थिक मदत दिली जाते. यासाठी संबंधितांना मदतीकरिता मुंबईला संपर्क करावा लागत असे. आता मुख्यमंत्री सहाय्यता कक्ष जिल्हाधिकारी कार्यालयांमध्ये सुरू करण्यात येत असल्याने जिल्हास्तरावर रुग्णांना मदत उपलब्ध होण्यास सुरुवात होणार आहे. आजाराचे पुनर्विलोकन करणे, आजारांकरिता देण्यात येणाऱ्या अर्थसहाय्याची रक्कम नव्याने निश्चित करणे, रुग्णालय सलग्नी करण्यासाठी, विविध निकष ठरविण्यासाठी शासनाकडे ही समिती…
अहिल्यानगर दि. ०६ फेब्रुवारी – सुरक्षित वाहतुकीसाठी फेब्रुवारी अखेरपर्यंत जिल्ह्यातील महामार्गालगतची अतिक्रमणे त्वरित काढण्यात यावी आणि रस्त्याच्या बाजूला असलेले धोकादायक फलकही काढण्यात यावे, असे आदेश जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी दिले. मंगळवारी (०४ फेब्रुवारी) जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित रस्ता सुरक्षा समितीच्या बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांनी हे आदेश दिले. बैठकीस सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता भरतकुमार बाविस्कर, उपजिल्हाधिकारी अतुल चोरमारे आणि विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. जिल्हाधिकारी म्हणाले, रस्त्याच्या कडेला असणारी अतिक्रमणे काढण्यासाठी उपविभागीय अधिकारी समन्वयक अधिकारी म्हणून काम पाहतील. तोडलेल्या रस्ता दुभाजकांची दुरूस्ती करण्यात यावी. दुभाजक तोडणाऱ्या संबंधित पेट्रोल पंप चालक अथवा आस्थापना मालकावर कारवाई करावी. वाहतूक सुरक्षेबाबत सर्वेक्षण करण्यासाठी संस्थेची नियुक्ती करण्यात…
अहिल्यानगर, दि. ०६ फेब्रुवारी – शिर्डीत मंगळवारी भल्या पहाटे तीन जणांवर जीव गेला हल्ला करण्याचा प्रकार घडला. शिर्डी संस्थांच्या दोघा कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला. या हत्याकांडाच्या पार्श्वभूमीवर शिर्डीच्या पोलीस निरीक्षकांची नियंत्रण कक्षात तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. शिर्डीचे पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांना नियंत्रण कक्षात बोलाविण्यात आले असून त्यांच्या जागेवर राहता पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रणजीत गलांडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. गलांडे यांनी यापूर्वी शिर्डीत काम केले आहे. त्यामुळे त्यांच्यावर पुन्हा शिर्डी पोलीस ठाण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. याशिवाय गलांडे यांच्या रिक्त झालेल्या जागेवर आर्थिक गुन्हे शाखेतील पोलीस निरीक्षक नितीन चव्हाण यांची बदली करण्यात आली आहे. शिर्डीत घडलेल्या घटना नंतर…
शिर्डी, दि. ०६ फेब्रुवारी – साईबाबांच्या शिर्डीमध्ये दुहेरी हत्याकांडाचा प्रकार घडल्यानंतर सतर्क झालेल्या साई संस्थानने साई भक्तांसाठी आता मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी गुरुवारपासून लगेचच केली जाणार असल्याचे संस्थांनचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी म्हटले आहे. साई दर्शनासाठी रांगेत उभे असलेल्या साई भक्तांना आता दर्शन रांगेतच मोफत प्रसाद भोजन कुपन मिळणार आहे. तसेच, संस्थानच्या भक्त निवासात राहणाऱ्या भक्तांनाही हे कूपन वितरित केले जाणार आहे. दुहेरी हत्याकांड प्रकरणानंतर साई संस्थांचे यंत्रणा सतर्क झाली आहे. यापूर्वी साई संस्थानच्या प्रसादालयात थेट प्रवेश मिळत असे. ज्यामुळे मोफत जेवणासाठी कुणालाही सहज प्रवेश करता येत होता. यापूर्वी मोफत भोजनासाठी थेट प्रसादालयात प्रवेश दिला…
