Author: Annant Ppangarkar
खासदार शरद पवार व डॉ. जयप्रकाश दांडेगावकर यांच्या हस्ते पुण्यात पुरस्कार वितरित महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली देशातील सहकारासाठी दिशादर्शक ठरलेल्या सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याने उभारलेल्या सहवीज निर्मिती प्रकल्पास तृतीय क्रमांकाच्या पुरस्काराने गौरवण्यात आले. यांनी पुरस्कार स्वीकारला: पुणे येथे झालेल्या को- जनरेशन असोसिएशन ऑफ इंडियाच्यावतीने भारतात सहकारातून वीज निर्मितीसाठी काम करणाऱ्या कारखान्यांचा गौरव देशाचे ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार व फेडरेशनचे अध्यक्ष डॉ. जयप्रकाश दांडेगावकर यांच्या हस्ते करण्यात आला. कारखान्याच्यावतीने अध्यक्ष बाबा ओहोळ, उपाध्यक्ष संतोष हासे व कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर यांनी स्वीकारला. उपपदार्थ निर्मिती: काँग्रेस पक्षाचे नेते…
महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – तीन वर्षापूर्वी त्याने तिला पळवून आणत तिच्याशी म्हसोबा मंदीरात लग्न करून नोटरी करीत बायकोचा दर्जा दिला. आणि तिनेच साथीदाराच्या मदतीने नवऱ्याची गळा चिरून हत्या केल्याचा गुन्हा संगमनेर पोलीस ठाण्यात दाखल झाला आहे. संगमनेर शहरालगत संगमनेर खुर्द शिवारात प्रवरा नदीच्या पात्रात एका व्यक्तीचा मृतदेह तरंगत असल्याची माहिती संगमनेर शहर पोलिसांना समजली होती. घटनास्थळी गेलेल्या पोलिसांना हा मृतदेह मारुती आबा डामसे (वय 41 वर्ष, रा. कोपरे ता. जुन्नर जि. पुणे हल्ली रा. संगमनेर खुर्द ता. संगमनेर) याचा असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी नातेवाईकांच्या मदतीने हा मृतदेह पाण्याबाहेर काढला. घटनास्थळी नदीपात्रालगत खडकावर मृत मारुती आबा डामसे याच्या चपलालगत रक्ताचे…
अपर जिल्हाधिकारी कार्यालयाचे लोकार्पण; उत्तरेतील ६ तालुक्यातील नागरिकांची पायपीट थांबणार महाराष्ट्र संवाद न्यूज शिर्डी – उत्तर नगरमधील सहा तालुक्यातील नागरिकांच्या प्रशासकीय कामांसाठी शिर्डी येथे अपर जिल्हाधिकारी कार्यालयाचे शुक्रवारी (15 सप्टेंबर) लोकार्पण झाले. शेती महामंडळाच्या जागेवर या कार्यालयाच्या इमारतीसाठी १०० कोटी रूपये मंजूर झाले आहेत. अपर जिल्हाधिकारी कार्यालयाची राज्यातील सर्वात मोठी अत्याधुनिक इमारत या ठिकाणी लवकर उभारण्यात येणार आहे, अशी माहिती राज्याचे महसूल, पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखेपाटील यांनी दिली. शिर्डी येथे उत्तर नगरमधील नागरिकांच्या शासकीय कामासाठी सुरू करण्यात आलेल्या अपर जिल्हाधिकारी कार्यालयाचे लोकार्पण महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या…
महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – निवडून यायचे एका पक्षातून नंतर मात्र दुसऱ्या पक्षात जायचे यातून लोकशाहीला खूप मोठा धोका निर्माण झाला आहे. राजकीय पक्षांतराच्या घटनांना आळा घालण्यासाठी संसदेने मंजूर केलेल्या पक्षांतर बंदी कायद्याचे राज्यात पालन होत नाही, अशी खंत काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केली. माध्यमांशी बोलताना आमदार बाळासाहेब थोरात म्हणाले की, शिवसेनेत फूट पडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील आमदारांचा मोठा गट बाहेर पडला. राज्यातील सत्ता संघर्षाचा पेच सर्वोच्च न्यायालयात पोहोचला. सर्वोच्च न्यायालयाने संविधानातील तरतुदीनुसार आमदार अपात्रतेच्या संदर्भात निर्णय घेण्याचे आदेश विधानसभा अध्यक्षांना दिले आहेत. न्यायालयाने आदेश देऊन चार महिने उलटून गेले तरी विधानसभा अध्यक्षांकडे…
महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – संगमनेरचा सांस्कृतिक मानबिंदू ठरलेला संगमनेर फेस्टिव्हल यंदा पंधरा वर्ष पूर्ण करीत आहे. यंदाही श्री स्थापनेच्या दुसर्या दिवसापासून सलग पाच दिवस विविध सांस्कृतिक आणि मनोरंजक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. पेशाने संगणक अभियंता असलेल्या दोघा तरुणांच्या ‘गोष्ट इथे संपत नाही..’ या छत्रपती शिवाजी महाराजांच्या दक्षिण दिग्विजयावरील शौर्यगाथेने फेस्टिव्हलचा शुभारंभ होणार आहे. यंदाच्या पाच दिवसांच्या संगमनेर फेस्टिव्हलमध्ये राज्यस्तरीय समूह नृत्यस्पर्धेसह अभिनेता भरत जाधव आणि निवेदिता सराफ यांच्या धम्माल मराठी नाट्यप्रयोगांचेही सादरीकरण होणार आहे. कार्यक्रमांसाठी प्रवेश खुला असल्याची माहिती संगमनेर फेस्टिव्हलचे जनक, राजस्थान युवक मंडळाचे अध्यक्ष मनीष मालपाणी यांनी दिली. गेल्या पंधरा वर्षांपासून संगमनेरचा गणेशोत्सव म्हणजे ‘संगमनेर फेस्टिव्हल’…
खासदार सदाशिव लोखंडे यांच्या उपस्थितीत महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते होणार शुभारंभ; अर्धन्यायिक प्रकरणाच्याही होणार शिर्डीत सुनावण्या… बाळासाहेब कोळेकर शिर्डीचे पहिले अपर जिल्हाधिकारी महाराष्ट्र संवाद न्यूज शिर्डी – शुक्रवारपासून (15 सप्टेंबर) शिर्डीमध्ये नागरिकांच्या सेवेसाठी अपर जिल्हाधिकारी कार्यालयाचा शुभारंभ होत आहे. राज्याचे महसूल मंत्री तथा अहमदनगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते या कार्यालयाचा शुभारंभ होत असून शिर्डीचे खासदार सदाशिव लोखंडे यांची यावेळी उपस्थिती राहणार आहे. नव्याने सुरू होत असलेल्या या कार्यालयामुळे उत्तर नगरमधील कोपरगाव, राहाता, श्रीरामपूर, संगमनेर, अकोले व राहूरी या ६ तालुक्यातील नागरिकांना आता अर्धन्यायिक सुनावणी व इतर शासकीय कामांसाठी अहमदनगर येथे जाण्याची आवश्यक राहणार नसल्याने नागरिकांची…
महाराष्ट्र संवाद न्यूज शिर्डी – सध्या देश एका वेगळ्या संक्रमणातून जात असून हुकूमशाहीच्या दिशेने सुरू असलेली देशाची वाटचाल लोकशाहीसाठी धोकादायक असल्याने जनसंवाद यात्रेच्या माध्यमातून काँग्रेसचा विचार सामान्य माणसांपर्यंत नेण्याचे आवाहन काँग्रेसच्या सचिव, राज्य महिला आयोगाच्या सदस्य उत्कर्षा रुपवते यांनी केले. जनसंवाद यात्रेस यांची उपस्थिती: काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या प्रदेश महासचिव व राज्य महिला आयोगाच्या सदस्य उत्कर्षा रुपवते, तालुका निरीक्षक सचिन गुजर यांच्या प्रमुख उपस्थितीत काँग्रेसचे तालुकाध्यक्ष ॲड. पंकज लोंढे, ज्येष्ठ नेते मामा पगारे, सावळीविहीरचे काँग्रेस अध्यक्ष साहिल म्हस्के यांच्या नेतृत्वाखाली सावळीविहीर गावामध्ये काँग्रेसची जनसंवाद यात्रा काढण्यात आली. या जनसंवाद यात्रेत…
महाराष्ट्र संवाद न्यूज अकोले (अहमदनगर) – पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांनी देशातील व राज्यातील नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेत आयुष्यमान भव: हा कार्यक्रम हाती घेतला आहे. या कार्यक्रमांतर्गत आरोग्याचे अनेक उपक्रम राबविले जाणार असून जास्तीत जास्त नागरिकांनी आयुष्यमान भव: योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन अकोले नगरपंचायतचे उपनगराध्यक्ष बाळासाहेब वडजे यांनी केले. यांची उपस्थिती: अकोले ग्रामीण रुग्णालयात आयोजित “आयुष्यमान भव:” उपक्रमाचा शुभारंभ वडजे यांच्या हस्ते झाला त्यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी रुग्ण कल्याण समितीचे सदस्य प्राध्यापक सुरेश खांडगे होते. ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. बाळासाहेब मेहत्रे, नगरसेवक चौधरी, माजी नगरसेवक परशराम शेळके, नवनाथ मोहिते, वैद्यकीय…
महाराष्ट्र संवाद न्यूज @ अनंत पांगारकर राजकीय प्रतिष्ठेचा बुरखा अंगावर चढला की एखाद्या संस्थेच्या माध्यमातून जनतेला सहज उल्लू बनविता येते याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे दूधगंगा नागरी सहकारी पतसंस्थेचा अध्यक्ष भाऊसाहेब कुटे. बँकेतील ठेवीदारांच्या तब्बल 81 कोटींच्या ठेवींचा गैरवापर करून या रकमेचा अपहार करणाऱ्या प्रतिष्ठितांच्या टोळी विरोधात गुन्हा दाखल झाला असला तरी अद्याप मुख्य आरोपीसह अन्य आरोपींना अटक होत नसल्याने या गुन्ह्याच्या तपासावर मात्र प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. न्यायासाठी दबावाची आवश्यकता: दहा वर्ष कारखान्याचा व्हाईस चेअरमन, मावळत्या जिल्हा परिषदेचा सदस्य यासह संगमनेरच्या अर्थकारणातील महत्त्वाच्या असलेल्या दूधगंगा नागरी सहकारी पतसंस्थेच्या स्थापनेपासून अध्यक्ष राहिलेल्या भाऊसाहेब कुटेसह 21 जणांवर संगमनेर शहर पोलीस ठाण्यात 81…
महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – संगमनेर वकील सेवा सहकारी संस्थेच्या अध्यक्षपदी ॲड. दिलीप साळगट व उपाध्यक्षपदी ॲड. जनार्दन वाळुंज यांचे बिनविरोध निवड करण्यात आली. यांच्या उपस्थितीत निवड: वकील सेवा संस्थेच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष यांची निवड करण्यासाठी मंगळवारी (ता. १२ सप्टेंबर) संचालक मंडळाची बैठक बोलविण्यात आली होती. यावेळी संचालक ॲड. श्रीकांत उर्फ बापूसाहेब गोंगे, ॲड. सुनील सराफ, ॲड. पोपटराव शिंदे, ॲड. दीपक थोरात, ॲड. विजयानंद पगारे, ॲड. मोहनराव फटांगरे, ॲड. बाबासाहेब गायकर, ॲड. सचिन डुबे, ॲड. सीमा काळे, ॲड. मीना डोंगरे यांच्यासह सचिव संजय भंडारी उपस्थित होते. यांनी मांडली नावांची सूचना: बैठकीवेळी अध्यक्षपदासाठी ॲड. दिलीप साळगट यांच्या नावाची सूचना ॲड. बापूसाहेब गोंगे…
महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – शासनाच्या विविध खात्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर जागा रिक्त असून या जागांच्या भरतीसाठी विविध विभागांमधून सध्या जाहिराती दिल्या जात आहेत. यामुळे राज्यातील तरुणांमध्ये काहीसा आशावाद निर्माण झाला मात्र शासनाने कंत्राटी पद्धतीने विविध विभागांमध्ये नव्याने नियुक्तीचा घेतलेला निर्णय हा अत्यंत चुकीचा असून यामुळे नियुक्त झालेल्या युवकांच्या भवितव्याचे काय असा प्रश्न नाशिक पदवीधर मतदारसंघाचे माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी उपस्थित केला आहे. तांबे म्हणाले, राज्यातील विविध विभागांमध्ये हजारो जागा रिक्त आहेत. गेली अनेक वर्ष नव्याने नोकर भरती न झाल्याने अनेक सुशिक्षित बेरोजगार या भरतीची वाट पाहत होते. मात्र पात्रता असतानाही कंत्राटी पद्धतीने भरतीमुळे त्यांचे भवितव्य काय असेल? असा…
महाराष्ट्र संवाद न्यूज नाशिक – नाशिक जिल्हा न्यायालयातील एका न्यायाधीशांविरोधात नाशिकच्या वकिलांनी एल्गार दिला आहे. कामकाजावेळी अरेरावी करणे, अपमानास्पद वक्तव्य करणे, उद्घटपणे वर्तणूक करणे अशा स्वरूपाचे वर्तन हे न्यायाधीश महोदय करत असल्याने त्यांची त्वरित बदली करण्याची मागणी वकिलांनी केली आहे. अन्यथा त्यांच्या समोरील कामकाजावर बहिष्कार टाकण्याचा इशारा देण्यात आला आहे. प्रधान न्यायाधीशांना निवेदन: वकिलांनी नाशिक बार कौन्सिलच्या वतीने आपल्या मागणीचे निवेदन प्रधान जिल्हा न्यायाधीश एस. डी. जगमलानी यांना दिले. एका न्यायाधीशांच्या विरोधात वकिलांनी उघड-उघड भूमिका घेत त्यांच्या समोरील कामकाजावर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिल्याने हा विषय राज्यभर चर्चेचा ठरला आहे. तर मुंबई उच्च न्यायालयाकडे तक्रार: संबंधित न्यायाधीशांची जिल्हा विधी प्राधिकरणामध्ये बदली…
महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – तहसीलदारांना केलेले फोन उचलले नाही म्हणून थेट तहसीलदारांच्या घरी जाऊन शिवीगाळ व जीवे मारण्याची धमकी देण्याचा प्रकार सोमवारी रात्री पावणे बारा वाजता संगमनेरमध्ये घडला. संगमनेरचे तहसीलदार धीरज मांजरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शहर पोलीस ठाण्यात आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. थोरात विरोधात गुन्हा दाखल: शुभम थोरात (पूर्ण नाव माहित नाही) रा. मालदाड रोड, संगमनेर असे आरोपीचे नाव असून त्याच्या विरोधात संगमनेर शहर पोलिसांनी भारतीय दंड विधान संहिता कलम 452, 504, 506 नुसार गुन्हा दाखल केला आहे. रात्री घडली घटना: सोमवारी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास झोपेत असलेल्या तहसीलदार मांजरे यांच्या मोबाईलवर दहा ते बारा कॉल…
महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली काँग्रेसचा विचार जन माणसापर्यंत पोहोचवण्यासाठी शहर काँग्रेस कमिटीच्यावतीने प्रभाग 1, 3, 4, 11, 12 व 14 मध्ये झालेल्या जनसंवाद यात्रेस उस्फुर्त प्रतिसाद मिळाला असल्याची माहिती शहराध्यक्ष सोमेश्वर दिवटे यांनी दिली. यांचा सहभाग: संगमनेर शहरात झालेल्या पदयात्रेत माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, शहराध्यक्ष सोमेश्वर दिवटे, मनोज पुंड, बाळासाहेब पवार, सुनंदाताई दिघे, मुन्ना कडलग, किशोर टोकसे, शाकिब बागवान, जीवन पंचारिया, सुभाष दिघे, निखिल पापडेजा, शैलेश कलंत्री, अंबादास आडेप, गणेश गोडसे, गौरव डोंगरे, चंद्रकांत काळंग, अशोक जाधव, संजय पुंड, श्याम करपे, संजय पुरी, हरी भोसले, सचिन पाबळकर, सचिन सोनवणे,…
महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – आपली भाषा समृध्द असली की जाणीवा समृध्द होतात. संगमनेर महाविद्यालयातर्फे चालवल्या जाणाऱ्या पदव्युत्तर पदविका पत्रकारिता अभ्यासक्रमाच्या माध्यमातून केवळ पत्रकारितेचे विविध पैलूंच शिकविले जात नाहीत तर जाणीवा समृध्द केल्या जातात, असे प्रतिपादन शिक्षण प्रसारक संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ. संजय मालपाणी यांनी केले. यांची उपस्थिती: संगमनेर महाविद्यालयाच्यावतीने चालवल्या जाणाऱ्या पुणे विद्यापीठाच्या पत्रकारिता अभ्यासक्रमाच्या गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार सोहळ्यात मालपाणी बोलत होते. यावेळी व्यासपीठावर उद्योजक कैलास सोमाणी, महाविद्यालयाचे कार्यकारणी सदस्य मधुसूदन नावंदर, महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो. अरूण गायकवाड, पत्रकारिता अभ्यासक्रमाचे प्रमुख डॉ. संतोष खेडलेकर उपस्थित होते. मालपाणी म्हणाले, संगमनेर महाविद्यालयात मागील बारा वर्षांपासून चालविल्या जाणाऱ्या या अभ्यासक्रमात विद्यार्थी, गृहिणी, डॉक्टर्स, पत्रकार,…
घोलप यांच्या पाठोपाठ शिर्डीतून पदाधिकारी ही राजीनाम्याच्या तयारीत! महाराष्ट्र संवाद न्यूज नाशिक – त्या ४० लोकांनी बंडखोरी केली, ते आमदार, खासदार पुन्हा निवडून येता कामा नये, असे आदेश उद्धव ठाकरे यांनी दिले होते. त्यासाठी त्यांनी मला अमरावती किंवा शिर्डी यापैकी एका लोकसभा मतदारसंघाची निवड करायला सांगितले होते. मी शिर्डीची निवड केली, पण तिथे गद्दार वाकचौरेंना उमेदवारी जाहीर केली. त्यांना उमेदवारी द्यायची होती, मग मला का तयारी करायला सांगितले? असा सवाल करीत माजीमंत्री घोलप यांनी आपली नाराजी जाहीर केली. उपनेतेपदाच्या राजीनाम्याची घोषणा: बबनराव घोलप यांनी नाशिकमध्ये पत्रकार परिषद घेत मी शिवसेना उपनेतेपदाचा राजीनामा दिलेला असल्याचे जाहीर केले. ३५ शाखांची स्थापना: शिर्डी…
महाराष्ट्र संवाद न्यूज नाशिक – उपनेते आणि शिर्डीचे संपर्कप्रमुख माजी मंत्री बबनराव घोलप यांनी पुनर्बांधणी केलेल्या आणि विजयाची खात्री असलेल्या शिर्डी लोकसभा मतदारसंघात ठाकरे यांना रविवारी मोठा धक्का बसला. ठाकरेंनी शिर्डीत केलेल्या बदलानंतर उपनेते बबनराव घोलप यांनी आपला राजीनामा ठाकरे यांना पाठविला असल्याची माहिती समोर येत आहे. नाराजी: एकीकडे जळगावच्या दौऱ्यावर असलेल्या ठाकरे यांना दुसरीकडे शिर्डीतून हा मोठा धक्का मानला जात आहे. ठाकरे संगमनेर-शिर्डी दौऱ्यावरून जळगावमध्ये जात नाही तोच शिर्डीत नव्या संपर्कप्रमुखांची निवड करण्यात आली आहे. याशिवाय शिवसेनेसोबत गद्दारी करत काँग्रेस, भाजपची साथ केलेल्या माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांना पुन्हा शिवसेनेत प्रवेश देऊन उमेदवारी देण्याचे निश्चित मानले जात असल्याने बबनराव…
महाराष्ट्र संवाद न्यूज @ अनंत पांगारकर संगमनेर तालुक्याच्या विकासाचा पाया सहकारावर आधारित आहे. सहकाराच्या माध्यमातून या तालुक्याने भरारी घेत राज्यात दिशादर्शक काम केले आहे. दिवंगत माजी मंत्री बी. जे. खताळ पाटील, दिवंगत स्वातंत्र्य सेनानी सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात या प्रमुख नेत्यांसह सहकारात काम करणाऱ्या अनेकांनी तालुक्यात सहकाराचा पाया रोवला. या सहकारातून समृद्धीची राज्यालाच नव्हे तर देशाला दिशा दिली. समाजाच्या प्रगतीचे उद्दिष्ट समोर ठेवून तत्कालीन धुरीनांनी हा सहकार जसा वाढवला, जोपासला तसाच तो संपविण्याचे काम आता पांढऱ्या कपड्यातील लुटारू करीत असल्याचे दिसून येत आहे. सहकारात अपप्रवृत्ती: संगमनेर तालुक्यात पतसंस्थांची चळवळ जोमात उभी राहिली आहे. माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी येथील…
रविवार विशेष @ प्रवीण पूरो कोणतीही अपेक्षा नसताना मनोज जरांगे पाटलांनी सार्यांनाच जमिनीवर आणून ठेवलं आहेे. विशेषत: भारतीय जनता पक्षाने आणि त्यांच्या नेत्यांनी केलेला खोटारडेपणा जरांगे पाटलांच्या उपोषणाने असा काही जिरला की यापुढे या पक्षाची माणसं खोटी बोलणार नाहीत अशी अपेक्षा आहे. इतकं होऊनही ती खोटारडेपणा करू लागली तर त्यांची अवस्था काय होईल, हे कोणीही सांगू शकत नाही. मराठा जरांगे पाटलांच्या सुरू असलेल्या आंदोलनाने दिलेली सबक हा सर्वच राजकीय पक्षांना मिळालेला धडा आहे. ज्यांनी मराठा आरक्षणाचं निमित्त करत राजकीय पोळी भाजून घेतली त्यांच्यासाठी तर तो मोठा धक्का आहे. यामुळेच अशी खोटी आश्वासनं देताना सर्वांनाच सावध राहण्याची आवश्यकता आहे. विशेष म्हणजे…
महाराष्ट्र संवाद न्यूज शिर्डी – निळवंडे धरणाच्या डाव्या कालव्यातील कामांच्या त्रुटी दुरुस्त करण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. हे काम पूर्ण होताच धरणातून पाणी सोडण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे महसूल मंत्री तथा अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली. थोरातांनी केली होती मागणी: तीन-चार दिवसांपूर्वी माजी मंत्री, काँग्रेस नेते, आमदार बाळासाहेब थोरात यांनी दुष्काळग्रस्त भागासाठी निळवंडे धरणातून पाणी सोडण्याची मागणी केली होती. या मागणी पाठोपाठ पालकमंत्र्यांनी पाणी सोडण्याचे घोषणा केल्याने निळवंडे धरणाच्या डाव्या कालव्यातून दुष्काळग्रस्तांना पाणी मिळण्याची चिन्हे निर्माण झाली आहे. मंत्री विखेंच्या सूचना: गत आठवड्यामध्ये पालकमंत्र्यांनी जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांच्या बैठकीत निळवंडे धरणाच्या डाव्या कालव्यातून पाणी सोडण्याचे गांभीर्याने नियोजन…
