Author: अनंत पांगारकर

विशेष प्रतिनिधी | मुंबई महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत मतांच्या टक्केवारीतील तफावत गंभीर आणि चिंताजनक प्रकार आहे. निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार मतदानाच्या दिवशी संध्याकाळी ५ वाजता ५८.२२ टक्के मतदान झालं, त्याच रात्री ११.३० वाजता ते ६५.०२ टक्के तर दुसऱ्या दिवशी २१ नोव्हेंबर रोजी हेच मतदान ६६.०५ टक्के कसं झालं असा सवाल प्रदेश काँग्रेसने निवडणूक आयोगाला विचारला आहे. व्हिडिओ फुटेज जाहीर करा – ही वाढ चक्क ७.८३ टक्के वाढ झाल्याचे स्पष्ट दिसत आहे. तब्बल ७६ लाख मतांची ही वाढ असून मतदानाचा टक्का कसा वाढला? असा प्रश्न उपस्थित करून निवडणूक आयोगाने जिथे मतदान वाढले त्या केंद्राचे व्हिडीओ फुटेज जाहीर करावे, असे आव्हान काँग्रेसने…

Read More

गुरुवार २८ नोव्हेंबर – अहिल्यानगर जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी शुक्रवारपासून अहिल्यानगर जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी शस्त्र व जमावबंदी आदेश लागू केले आहे. जिल्ह्यात सर्वत्र आदेश लागू – मुंबई पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७(१)(३) अन्वये २९ नोव्हेंबरपासून १२ डिसेंबरच्या मध्यरात्रीपर्यंत अहिल्यानगर जिल्ह्यात सर्वत्र हे आदेश लागू करण्यात आले आहे. यांना वगळले – जिल्हाधिकाऱ्यांनी काढलेल्या आदेशात धार्मिक कार्यक्रम, लग्नकार्य, लग्नाच्या मिरवणुका, प्रेतयात्रेच्या जमावास, याशिवाय पोलीस अधिकारी, कामावर असलेल्या इतर शासकीय अधिकारी-कर्मचारी यांच्यासह परवानगी घेतलेल्या मिरवणुकांना हे आदेश लागू राहणार नसल्याची माहिती देण्यात आली आहे. आदेशाचा भंग केल्यास कारवाई – उर्वरित सर्व ठिकाणी हे आदेश लागू असून या…

Read More

महाराष्ट्र संवाद – गुरुवार, २८ नोव्हेंबर  नाशिक – लासलगावच्या दत्तनगरमधील अल्पवयीन मुलीवर प्राणघातक हल्ला करून तिला जिवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीला न्यायालयाने तीन वर्ष सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली आहे. अतिष दगडु ढगे (वय २४ रा. टाकळी विंचुर, ता. निफाड, जि. नाशिक) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. निफाडच्या जिल्हा व सत्र न्यायालयात न्यायाधीश बा. द. पवार यांच्यासमोर या खटल्याची सुनावणी झाली. सरकार पक्षाच्या वतीने श्रीमती बंगले यांनी काम बघितले. ६ नोव्हेंबर २०१९ रोजी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास आरोपीने पीडित मुलीच्या घरामध्ये अनाधिकाराने प्रवेश करत फिर्यादीच्या १७ वर्षीय वयाच्या मुलीस ‘तू तुझ्या मित्र-मैत्रिणींसोबत का फिरते, अशी विचारणा करत यावरून वाद घालत कुरापत…

Read More

बुधवार, २७ नोव्हेंबर – संगमनेर  नगर दक्षिणचे माजी खासदार सुजय विखे पाटील यांच्या वाढदिवशी आयोजित करण्यात आलेल्या संगमनेरचे नवनिर्वाचित आमदार अमोल खताळ यांच्या विजयी सभेत अज्ञात चोरट्याने अहिल्यानगरमधील व्यावसायिकाची ५० ग्रॅम वजनाची सोन्याची चैन लांबविल्याचा प्रकार समोर आला आहे. पोलिसात तक्रार दाखल – दरम्यान या संदर्भात हिंगणगाव जि. अहिल्यानगर येथील दीपक रामभाऊ सोनवणे यांनी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मालपाणी लॉन्सवर घटना – संगमनेर विधानसभा मतदारसंघाचा निकाल लागल्यानंतर दुसऱ्या दिवशी नगर दक्षिणचे माजी खासदार सुजय विखे यांचा वाढदिवस होता. संगमनेरमधून निवडून आलेले नवनिर्वाचित आमदार अमोल खताळ यांची विजयी सभा आणि विखे…

Read More

बुधवार २७ नोव्हेंबर – मुंबई  मुख्यमंत्री पदावरून भाजप आणि शिवसेनेत रस्सीखेच सुरू असताना आता त्यात पुन्हा एका नव्या वादाची भर पडली आहे. पालकमंत्री पदावरून महायुतीमध्ये वाद सुरू झाल्याचे समोर येत आहे. पालकमंत्रीपदावरून ठिणगी – राज्यात महायुतीला स्पष्ट बहुमत मिळून देखील चार दिवस उलटून गेले तरी सत्ता स्थापन करण्यात अपयश आले आहे. महायुतीमध्ये मुख्यमंत्रीपदावरून वाद सुरू असतानाच आता पालकमंत्री पदावरून देखील वादाची ठिणगी पडली आहे. मुख्यमंत्रीपदासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भारतीय जनता पक्षाची पसंती देवेंद्र फडणवीस यांच्या नावाला आहे तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडेच मुख्यमंत्री पद कायम ठेवण्यात यावे अशी मागणी शिवसेना आमदारांकडून केली जात आहे. मंत्री ठरण्याआधीच पालकमंत्री – महायुती…

Read More

बुधवार २७ नोव्हेंबर लोकसभा निवडणुकीत मोठे यश मिळविणाऱ्या काँग्रेस पक्षाला विधानसभा निवडणुकीत दारुण पराभवाला सामोरे जावे लागल आहे. राज्यात मोठ्या प्रमाणात काँग्रेसची पडझड झाल्याने काँग्रेसमध्ये मोठ्या फेरबदलाचे संकेत मिळत आहे. पटोले राजीनामा देणार देशमुख नवे प्रदेशाध्यक्ष – काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि विधानसभा निवडणुकीत अगदी काठावर निवडून आलेले नाना पटोले प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देत असून त्यांच्या जागी अमित देशमुख यांची निवड केली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पटोले यांचा राजीनामा स्वीकारला जाणार असल्याची मोठी बातमी समोर येत असून काँग्रेसमध्ये हालचालींना वेग आला आहे. देशमुख लातूरहून विमानाने दिल्लीला – अमित देशमुख यांच्याकडे काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी येणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. काँग्रेस हाय कमांडच्या आदेशाने…

Read More

बुधवार, २७ नोव्हेंबर – मुंबई  निवडणूक आयोगाने आचारसंहिता समाप्तीची घोषणा करतात सरकारने पुन्हा राज्याच्या पोलिस महासंचालकपदी सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आलेल्या रश्मी शुक्ला यांची सोमवारी संध्याकाळी नियुक्ती केली. शुक्ला यांनीआपल्या पदाचा पदभार स्वीकारला आहे. शुक्ला आता पुन्हा एकदा राज्याच्या पोलिस महासंचालक (डीजीपी) असतील. राज्यात विधानसभा निवडणुकीपूर्वी महाविकास आघाडीने केलेल्या मागणीनंतर निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार शुक्ला यांना पदावरून हटवत सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आले होते. त्यांच्या जागी संजय कुमार वर्मा यांनी राज्याचे सर्वोच्च पोलीस अधिकारी म्हणून पदभार स्वीकारला होता. निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर सोमवारी आदर्श आचारसंहिता संपुष्टात आल्याचे जाहीर झाल्यानंतर गृह विभागाने लगेचच शुक्ला यांचा सक्तीच्या रजेचा कालावधी संपवत त्यांना पुन्हा काम करण्यास सांगितले.…

Read More

बुधवार, २७ नोव्हेंबर – मुंबई मुख्यमंत्री पदासाठी भाजप आणि शिवसेनेमध्ये रस्सीखेच सुरूच असून भाजप आणि शिवसेनेच्या शिंदे गटाने ही मुख्यमंत्रीपदावर दावा केला आहे. दोन्ही पक्षाचा मुख्यमंत्री पदावरील तिढा आता दिल्ली दरबारी गेला आहे. शिवसेना शिंदे गटाचे समजूत काढण्यासाठी भारतीय जनता पक्षाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दोन ऑफर दिल्या असून मुख्यमंत्रीपद भाजपकडेच राहण्याची खात्रीलायक माहिती समोर येत आहे. निरीक्षक आज मुंबईत – दरम्यान भाजपाचे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्यासोबत भाजपचे निरीक्षक आज मुंबईत येत असून मुख्यमंत्री पदा संदर्भातील रिपोर्ट ते दिल्लीला देणार आहे. त्यामुळे अजून काही दिवस तरी मुख्यमंत्रीपदाचा सस्पेन्स कायम राहण्याची चिन्ह आहेत. अमित शहा मुंबईत – दरम्यान मुख्यमंत्री पदाचा निर्माण…

Read More

प्रवीण पुरो | मुंबई राज्याच्या मुख्यमंत्रीपदाच्या अपेक्षेने विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यातील दुरावा वाढू लागला आहे. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रि‍पदाचा राजीनामा दिला आहे. यांच्याकडे सोपविला राजीनामा – राजभवनात जाऊन एकनाथ शिंदेंनी राज्याचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्याकडे राजीनामा सुपुर्द केला. यावेळी या दोघांमधील दरी स्पष्ट दिसत होती. यावेळी देवेंद्र फडणवीस, अजित पवार, दीपक केसरकर, दादा भुसे उपस्थित होते. पण शिंदे आणि फडणवीस यांच्यातील दुराव्याचं दर्शन झालं. शिंदेच काळजीवाहू मुख्यमंत्री – विधानसभेचा कार्यकाळ आज संपल्याने एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. राज्यपालांनी हा राजीनामा स्वीकारून नवीन मुख्यमंत्र्यांची नियुक्ती होईपर्यंत एकनाथ शिंदे यांची काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून नियुक्ती करत…

Read More

मंगळवार २६ नोव्हेंबर – अहिल्यानगर अहिल्यानगर जिल्ह्यात सर्वत्र पशु गणनेचे काम २८ फेब्रुवारी पर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे. या मोहिमेत पशुपालकांनी आपल्याकडील जनावरांची खरी माहिती देण्याचे आवाहन अहिल्यानगरचे जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी केले आहे. यांची होणार गणना – या पशुगणनेत गाय वर्ग, म्हैस वर्ग, शेळी, मेंढी, अश्व, वराह यांच्यासह बिल्ला मारलेल्या (टॅगिंग केलेल्या) जनावरांची व भटक्या समुदायातील पशुधनाची देखील गणना करण्यात येणार आहे. पशु गणनेसाठी यांची केली नियुक्ती – जिल्ह्यातील ग्रामीण भागात २९५ प्रगणक व ७६ पर्यवेक्षक तर शहरी भागात ५६ प्रगणक व १८ पर्यवेक्षकांची या कामासाठी नियुक्ती केली जाणार आहे. पशु गणना कशासाठी – पशुगणनेमुळे जनावरांची नेमकी संख्या स्पष्ट…

Read More