Author: अनंत पांगारकर

संगमनेर – संगमनेर तालुक्यात घरकुल वाटपात येथून मागे राजकारण झाले होते. परंतु येथून पुढे घरकुल वाटपाचे काम अत्यंत पारदशींपणे केले जाईल. ज्याला खऱ्या अर्थाने घरकुलाची गरज आहे. अशा गरजू लाभार्थ्यांना घरकुलाचा लाभ दिला जाईल, असे प्रतिपादन आमदार अमोल खताळ यांनी केले. तालुक्यातील ७,१४५ घरकुल लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर पहिला हप्ता ऑनलाइन जमा करण्यात आले असल्याचे प्रमाणपत्र लाभार्थ्यांना आमदार खताळ यांच्या हस्ते पंचायत समिती सभागृहात देण्यात आले. यावेळी संगमनेर पंचायत समितीचे सहाय्यक गटविकास अधिकारी राजेंद्र ठाकूर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश घोलप, रोहिदास गुंजाळ, सार्वजनिक बांधकाम उप विभागाचे उपअभियंता गणेश गुंजाळ, लघुपाटबंधारे विभागाचे उपअभियंता हितेंद्र गव्हाळे, कृषी अधिकारी वाळीबा उघडे व रामराव…

Read More

संगमनेर, दि. २३ फेब्रुवारी आधीच शेतमालाला भाव नाही त्यातच डाळिंबाच्या शेतातून चारशे ते पाचशे किलो डाळिंब चोरी गेल्याचा प्रकार समोर आला आहे. संगमनेर शहरालगच्या सुकेवाडी येथे हा प्रकार घडला. शहर पोलीस ठाण्यात या संदर्भात संजय बबन सातपुते (वय ३०, धंदा शेती, रा. खांजापूर, ता. संगमनेर, जि. अहिल्यानगर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सुकेवाडी येथील एका मुलाविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या संदर्भात अधिक माहिती अशी, फिर्यादी संजय सातपुते यांचे सुकेवाडी (संगमनेर) येथे डाळिंबाचे शेत आहे. बुधवारी (१९ फेब्रुवारी) ते दुपारच्या वेळी शेतात आले असताना त्यांना गावातील मुलगा शेतातून त्यांच्या संमतीशिवाय डाळिंब तोडून घेऊन जात होता. फिर्यादीला बघून बांधावरून पळत असताना…

Read More

संगमनेर, दि. २३ फेब्रुवारी नगरपालिका हद्दीतील अवैध बांधकामे व अवैध कत्तलखान्यांविरोधात हाती घेण्यात आलेल्या अतिक्रमण हटाव मोहिमेमध्ये अतिक्रमण हटवितांना असे काही समोर आढळले की त्यामुळे पोलिसांनी स्वतः फिर्यादी होत संबंधितांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.  गुरुवारी (२० फेब्रुवारी) संगमनेर नगर परिषदेचे मुख्याधिकारी त्याचा प्रशासक रामदास कोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील काही कत्तलखान्यांचे अतिक्रमण निष्काशीत करण्याची कारवाई करण्यात आली. नगरपालिकेचे प्रशासन अधिकारी प्रल्हाद देवरे, उपनगर अभियंता महेश गोर्डे, अल्ताफ शेख, भीमाशंकर वर्पे, जयराम मंडलिक, पंकज मुंगसे यांच्यासह पालिकेच्या कर्मचाऱ्यांचे पथक व संगमनेरचे पोलीस उपअधीक्षक डॉ. कुणाल सोनवणे, पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांच्या नेतृत्वाखालील पोलीस पथक संयुक्तरित्या अवैध बांधकामे व बेकायदेशीर कत्तलखान्याचे बांधकामे पाडण्याचे…

Read More

संगमनेर, दि. २३ फेब्रुवारी –  माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडे काँग्रेसचे राज्यातील मातब्बर नेते म्हणून बघितले जाते. अनेक जण त्यांच्या नेतृत्वाखाली काम करत आहे, मात्र नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत थोरात यांचा पराभव झाल्याने आता काँग्रेसला गळती लागल्याचे समोर येत आहे. काही दिवसांपूर्वीच काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिलेले अहिल्यानगरचे किरण काळे आज रविवारी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश करत आहे. तर पुण्याचे कसब्याचे आमदार रवींद्र धंगेकर हे देखील शिवसेना शिंदे गटाच्या वाटेवर असून त्याच्या दोन दिवसात कार्यकर्त्यांसोबत चर्चा करून ते निर्णय घेणार असल्याची माहिती समोर येत आहे. विशेष म्हणजे हे दोन्ही नेते मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या विचारांशी बांधिलकी सांगणारे…

Read More

          हिंदवी स्वराज्याचे प्रणेते छत्रपती शिवरायांचे आपणच जणू कर्तेधर्ते आहोत, अशा तोर्‍यात भाजपचे नेते छत्रपतींचे आज पोपटासारखे गुणगाण करत आहेत. शिवरायांवर आपलाच तेवढा अधिकार असल्याची भाजपची मस्ती अजून उतरलेली दिसत नाही. विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या ट्विटवर टीका करताना भाजपच्या नेत्यांनी कंबरेचंही सोडलं. आपल्या टीकेला जनाधार नाही, हे लक्षात असूनही त्या पक्षाचे नेते स्वत:ला आवरू शकत नाहीत, याचं आश्‍चर्य वाटतं. छत्रपती शिवरायांच्या जयंतीनिमित्त राहुल गांधी यांनी श्रध्दांजली अर्पण केल्याचं ट्विटचं निमित्त करत भाजपच्या काही नेत्यांनी जिभेवर येईल ती टीका केली. भाजपशी आणि त्या पक्षाची पालकसंस्था असलेल्या संघाशी अर्थाअर्थी संबंध नसलेले नेतेच बडबड करत होते. कोणी राहुल…

Read More

संगमनेर, दि. २२ फेब्रुवारी –  दुचाकीस्वाराला भरधाव वेगाने जाणाऱ्या आयटेन कारने जोराची धडक दिल्याने शेजारून जाणाऱ्या उसाच्या ट्रॅक्टरच्या चाकाखाली सापडून झालेल्या विचित्र अपघातामध्ये दुचाकी स्वाराचा मृत्यू झाला. नासिक पुणे बाह्यवळण मार्गावर कृष्णा लॉन्स जवळ शनिवारी दुपारी पावणे एक वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली. सुदाम देवराम वर्पे (वय ४८ रा. चिकणी ता. संगमनेर जि. अहिल्यानगर) असे अपघातात मृत झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.  या संदर्भात माहिती अशी, सुदाम वर्पे हे त्यांच्या ताब्यातील दुचाकीवरून (MH 17 M 9879) पुण्याच्या दिशेने जात असताना कृष्णा लॉन्स जवळ त्यांच्या दुचाकी ला मागून येणाऱ्या आयटेन कार चालकाने जोराची धडक दिली. कारची जोरात धडक बसल्याने वर्पे दुचाकी वरून…

Read More

शनिवार दि. २१ फेब्रुवारी  सिंधुदुर्ग (सावंतवाडी) – सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तारकर्ली येथे पर्यटनासाठी आलेले पुण्याचे पाच पर्यटक तारकर्ली समुद्रात बुडाले असून यापैकी दोघांचा मृत्यू झाला आहे. तर एक जण गंभीर असून दोघेजण बचावले असल्याची माहिती समोर येत आहे. पुण्याच्या हडपसर मधून पर्यटनासाठी गेलेल्या पर्यटकांचा समुद्रात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याने पुण्यात दुःखद वातावरण निर्माण झाले आहे. शनिवारी सकाळी साडेअकरा वाजता तारकर्ली पर्यटन केंद्रानजीकच्या समुद्रात ही दुर्घटना घडली. रोहित बाळासाहेब कोळी (२१) व शुभम सुनील सोनवणे (२२) दोन्ही रा. हडपसर, हवेली पुणे अशी या दुर्घटनेतील दोघा मृतांची नावे आहेत. तर दुर्घटनेतील तिसरा ओंकार भोसले या युवकावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. कुश संतोष गदरे…

Read More

संगमनेर, दि. २२ फेब्रुवारी – संगमनेर शहरालगत असलेल्या आणि शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गुंजाळवाडी शिवारामध्ये गुरुवारी पुण्याच्या रेव्हेन्यू इंटेलिजन्सच्या पथकाने स्थानिक पोलिसांच्या मदतीने मोठी कारवाई केली होती. या कारवाईत संगमनेरमध्ये भारतीय चलनातील बनावट नोटा तयार करण्याचा प्रयत्न होत असल्याचे समोर आले होते. कारवाईदरम्यान पोलिसांनी अटक केलेल्या आरोपी रजनीकांत राजेंद्र राहणे याला शुक्रवारी न्यायालयासमोर उभे करण्यात आले असता त्याला २५ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले असल्याची माहिती संगमनेर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांनी दिली आहे. त्यामुळे पोलीस तपासात आता या प्रकरणी नेमके काय समोर येते याकडे लक्ष लागले आहे. बनावट नोटा प्रकरणातील आरोपी रजनीकांत राहणे हा…

Read More

संगमनेर, दि. २२ फेब्रुवारी – संगमनेर रोटरी क्लबच्या वतीने उद्या रविवारी (२३ फेब्रुवारी) स्वर्गीय ओंकारनाथ मालपाणी मार्गावर आनंदी रस्ते या अनोख्या उपक्रमाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. सकाळी ७ ते १० या वेळेत विद्यार्थी आणि नागरिकांसाठी आनंददायक ठरणाऱ्या या उपक्रमात संगमनेरमधील विविध शाळांचे विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी होणार असून विविध मनोरंजनात्मक आणि क्रीडा संबंधी कार्यक्रमाचे यात आयोजन करण्यात आले आहे. उपक्रमामध्ये झुंबा डान्स, रॉक बँड, मल्लखांब, गाणी सादरीकरण, खेळणी वाटप आणि मनोरंजक गोष्टी सादरीकरण यांसारखे उपक्रम घेण्यात येणार आहेत. नागरिकांनी आपल्या कुटुंबासह या उपक्रमात सहभागी व्हावे आणि आनंददायी वातावरणाचा अनुभव घ्यावा, असे आवाहन रोटरी क्लबचे अध्यक्ष साईनाथ साबळे…

Read More

शनिवार, दि. २२ फेब्रुवारी –  बनावट नोटा तयार करण्यासाठी लागणारा कागद तस्करीच्या रूपाने बाहेरच्या देशातून कुरियर कंपनीच्या माध्यमातून भारतात आला असल्याची माहिती समोर आल्यानंतर केंद्रीय डायरेक्टरेट ऑफ रेव्हेन्यु इंटीलिजन्सच्या पथकांनी स्थानिक पोलिसांच्या मदतीने देशभरात एकाच वेळी ११ ठिकाणी छापे टाकले. यात बहुतांश ठिकाणी बनावट नोटा छापण्याचे प्रकार सुरू असल्याचे समोर आल्याने नऊ जणांना अटक करण्यात आले आहे. गुरुवारी (२० फेब्रुवारी) महाराष्ट्रामधील संगमनेर, कोल्हापूरमध्ये तर हरियाणा, तेलंगणा, तामिळनाडू, बिहार या राज्यांमध्ये छापेमारी करण्यात आली. देशभरात टाकलेल्या ११ छापांमध्ये सात ठिकाणी बनावट चलनी नोटा छपाई सुरू असल्याचे उघडकीस आले. याप्रकरणी संगमनेरमध्ये गुंजाळवाडी ग्रामपंचायतच्या एका कर्मचाऱ्याला तर कोल्हापूरमध्ये दोघांना पथकाने अटक केली. त्यांच्याकडून…

Read More