Author: अनंत पांगारकर
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन, संगमनेर: अहिल्यानगर जिल्हा हा सुरुवातीपासूनच काँग्रेसचा बालेकिल्ला राहिला आहे. पक्षाने अनेकांना मंत्रिपदे आणि विरोधी पक्षनेते पदे देऊन मोठे केले, मात्र त्यांनीच कठीण काळात पक्षांतर करून सत्ताधारी पक्षाचा रस्ता धरला. संगमनेरचे नवीन लोकप्रतिनिधी स्वतः चार पक्ष बदलून आलेले आहेत, त्यामुळे त्यांनी पक्षनिष्ठेवर बोलण्यापूर्वी स्वतः कोणत्या पक्षात आहेत हे जाहीर करावे. आपली राजकीय उंची किती आणि आपण कोणावर बोलतोय याचे भान त्यांनी ठेवावे, अशी घणाघाती टीका काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अजय फटांगरे यांनी केली आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी नुकताच संगमनेर दौरा केला. या दौऱ्यात त्यांनी आमदार बाळासाहेब थोरात यांच्या एकनिष्ठेचे आणि नेतृत्वाचे कौतुक केले होते. या पार्श्वभूमीवर तालुकाध्यक्ष…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन, संगमनेर: संगमनेर तालुका महसूल स्थळ सीमा हद्दीत तब्बल १९ जणांना प्रवेशबंदी करण्यात आली असून, या संदर्भातील अधिकृत आदेश जारी करण्यात आले आहेत. कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आणि संभाव्य धोके टाळण्यासाठी श्रीरामपूर विभागाचे विशेष कार्यकारी दंडाधिकारी तथा अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी एक मोठा निर्णय घेतला आहे. भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ चे कलम १६३ अन्वये ही कारवाई करण्यात आली आहे. हा प्रवेशबंदीचा आदेश शनिवारपासूनच (दिनांक २३ मे) लागू झाला असून, तो दिनांक २९ मे २०२६ रोजी सायंकाळी ६.०० वाजेपर्यंत कार्यान्वित राहणार आहे. या कालावधीत संबंधित व्यक्तींना संगमनेर तालुक्याच्या हद्दीत प्रवेश करण्यास पूर्णपणे मनाई करण्यात…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन, संगमनेर: महाराष्ट्राच्या मातीतील जिवंत लोककला असलेल्या तमाशा क्षेत्रासाठी आपले संपूर्ण आयुष्य समर्पित करणारे संगमनेर तालुक्याचे सुपुत्र रघुवीर खेडकर यांचा नवी दिल्ली येथील राष्ट्रपती भवनात ‘पद्मश्री’ पुरस्काराने गौरव करण्यात आला. राष्ट्रपती महामहीम द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते खेडकर यांना हा सर्वोच्च नागरी पुरस्कार प्रदान करण्यात आला. राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांच्या हस्ते खेडकर यांना पद्मश्री चे वितरण करण्यात आले. या ऐतिहासिक सोहळ्याला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री अमित शहा आणि विविध क्षेत्रांतील दिग्गज मान्यवर उपस्थित होते. रघुवीर खेडकर यांना मिळालेल्या या बहुमानामुळे अहिल्यानगर जिल्ह्याचा मोठा सन्मान झाला असून, संगमनेरकरांसाठी हा क्षण अत्यंत अभिमानास्पद आणि आनंदाचा ठरला आहे, अशा…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन, अहिल्यानगर: येथील पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर नियमित प्रशिक्षण सुरू असताना एका स्मोक हँडग्रेनेडचा अचानक स्फोट झाल्याची धक्कादायक घटना सोमवारी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास घडली. या अपघातात चार प्रशिक्षणार्थी पोलीस कर्मचारी गंभीर जखमी झाले असून मुख्यालय परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. या स्फोटात शिवराज पवार, शुभम कावरे, गणेश मढे आणि योगेश सोळंके हे चार प्रशिक्षणार्थी पोलीस कर्मचारी जखमी झाले. त्यापैकी दोघांच्या हाताच्या बोटांना अत्यंत गंभीर दुखापत झाली असून त्यांच्यावर जवळच्या खाजगी रुग्णालयात तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू आहेत. यातील काही जवानांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सूत्रांकडून समजते. मिळालेल्या माहितीनुसार, जमाव नियंत्रणात आणण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या स्मोक हँडग्रेनेडची…
विशेष प्रतिनिधी, अलिबाग: पोलादपूर-महाबळेश्वर मार्गावरील आंबेनळी घाटात दाभिळ गावाजवळ एक भीषण दुर्घटना घडली आहे. पर्यटकांची स्कॉर्पिओ गाडी चालकाचे नियंत्रण सुटल्याने सुमारे ७०० ते ८०० फूट खोल दरीत कोसळली. या दुर्दैवी अपघातात सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील आसगाव येथील आठ तरुणांचा जागीच मृत्यू झाला असून, यामुळे संपूर्ण परिसरात तीव्र हळहळ व्यक्त केली जात आहे. मृतांमध्ये महेश अनिल पवार, आदित्य अशोक साळुंखे, रितेश राजेंद्र लोखंडे, सुहास जितेंद्र लोखंडे, अंश समीर चव्हाण, उत्कर्ष आनंद शिंगटे, अनिल अभिमन्यू शिंगटे आणि नितीन किसन नायकोंडे यांचा समावेश आहे. हे सर्व तरुण (वय १८ ते ३५ वर्षे) शुक्रवारी कोकणात सहलीसाठी आले होते. दापोलीतील हर्णे येथून रविवारी परतत असताना…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन, संगमनेर : संगमनेर येथील नामांकित शिक्षण प्रसारक संस्थेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत अखेर अपेक्षेप्रमाणे कार्याध्यक्ष संजय मालपाणी यांच्या नेतृत्वाखालील पॅनलने आपले वर्चस्व राखत विजय संपादन केला आहे. मात्र, ही निवडणूक पूर्णपणे बिनविरोध होईल हा अंदाज फोल ठरवत, एकमेव उमेदवार म्हणून रिंगणात उतरलेल्या ॲड. संग्राम जोंधळे यांनी सत्ताधारी पॅनलला जोरदार टक्कर दिली. कोणतीही यंत्रणा किंवा संपूर्ण विरोधी पॅनल पाठीशी नसताना केवळ वैयक्तिक पातळीवर लढून ॲड. जोंधळे यांनी तब्बल ११२ मते खेचून आणल्याने, सध्या संगमनेरच्या राजकीय आणि सामाजिक वर्तुळात त्यांच्याच धाडसी लढतीची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. शिक्षण प्रसारक संस्थेच्या संचालक मंडळाच्या एकूण जागांसाठी तब्बल ३१ उमेदवार रिंगणात…
आजचे राशीभविष्य मेष: आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत ऊर्जावान आणि उत्साहाचा राहील. कार्यक्षेत्रात नवीन जबाबदाऱ्या अंगावर पडू शकतात, ज्या तुम्ही तुमच्या कौशल्याने आणि आत्मविश्वासाने यशस्वीपणे पार पाडाल. नवीन आर्थिक योजना आखण्यासाठी किंवा गुंतवणुकीचा विचार करण्यासाठी वेळ उत्तम आहे. कुटुंबातील सदस्यांसोबतचे संबंध अधिक दृढ होतील आणि जोडीदाराची उत्तम साथ लाभेल. आरोग्याच्या दृष्टीने दिवस चांगला असला, तरी कामाच्या व्यापात खाण्यापिण्याच्या वेळा पाळणे गरजेचे आहे. वृषभ: आज तुम्हाला आर्थिक बाबतीत कमालीची सतर्कता बाळगावी लागेल. नको त्या गोष्टींवर खर्च वाढण्याची शक्यता असल्याने बजेट सांभाळून चालणे हिताचे ठरेल. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना कार्यालयात वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नाराजीला सामना करावा लागू शकतो, त्यामुळे वादविवाद टाळलेले बरे. व्यवसायात नवीन सौदे…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन, संगमनेर: सूरत–चेन्नई ग्रीनफिल्ड महामार्गासाठी संपादित करण्यात आलेल्या जमिनींच्या अत्यंत कमी मोबदल्याबाबत संगमनेर तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे. या पार्श्वभूमीवर, आमदार अमोल खताळ यांनी शिर्डी येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन शेतकऱ्यांना समृद्धी महामार्गाप्रमाणे वाढीव व न्याय्य मोबदला देण्याची मागणी निवेदनाद्वारे केली. यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी सकारात्मक विचार करून लवकरच निर्णय घेण्याचे आश्वासन दिले आहे. याप्रसंगी जलसंपदा तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील देखील उपस्थित होते. तालुक्यातील वडझरी बु., अजमपूर, आरामपूर, चिंचोली गुरव, हसनाबाद, तळेगावसह अनेक गावांमधील सुपीक आणि निळवंडे कालव्याच्या सिंचनाखालील बागायती जमिनी या महामार्गासाठी संपादित करण्यात आल्या आहेत. सन २०२१-२२ मध्ये जाहीर झालेला भूसंपादनाचा निवाडा…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन, नाशिक: सात-बारा उताऱ्यावर नाव लावण्यासाठी ५ हजार रुपयांची लाच घेणाऱ्या तलाठ्याला आणि त्याला मदत करणाऱ्या एका खाजगी व्यक्तीला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात अटक केली आहे. देवळा तालुक्यातील खामखेडा येथे ही धडक कारवाई करण्यात आली. धक्कादायक बाब म्हणजे, अटक केल्यानंतर शासकीय वाहनातून नेत असताना संशयित तलाठ्याने लाचेची रक्कम गाडीबाहेर फेकून पुरावा नष्ट करण्याचा ‘फिल्मी’ प्रयत्न केला, मात्र एसीबीच्या सतर्कतेमुळे त्याचा हा डाव पुरता फसला. पप्पू काशिनाथ सोनकांबळे (वय ४६, रा. देवळा) असे लाचखोर तलाठ्याचे नाव असून प्रशांत दावल सोनवणे (वय २४) असे त्याला मदत करणाऱ्या मजुराचे नाव आहे. या दोघांविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला…
‘शहाण्याला शब्दाचा मार’ असा एक मराठी वाक्प्रचार आहे. या वाक्प्रचाराप्रमाणे प्रत्येकाने वागावं आणि आपला कारभार करावा, अशी अपेक्षा असते. सत्तेत असलेल्यांनी तर या गोष्टी पारखून कारभार करायला हवा. मात्र, जेव्हा या अपेक्षा दूर होतात, तेव्हा सत्तेवरील लोक आणि सामान्य जनता यांच्यात मोठी दरी निर्माण होते. सत्ता जेव्हा वाह्यातपणे वागू लागते, तेव्हा लोक जाब विचारतात. केंद्रातल्या सध्याच्या सरकारविषयी तरुणांमध्ये प्रचंड राग आहे, जो आतापर्यंत व्यक्त होत नव्हता. किंबहुना तो व्यक्त होऊ नये यासाठी ‘ट्रोलभैरवांच्या’ झुंडी तयार केल्या गेल्या. परिणामी, भारतीय जनता पक्षाच्या सरकारवर लोकांचा किती रोष आहे याचे चित्र स्पष्ट होत नव्हतं. तो रोष आता या…
