Author: अनंत पांगारकर

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क मराठी नाटक, चित्रपटांसह हिंदी सिनेसृष्टीने आज एक ख्यातनाम अभिनेता गमावला आहे! पुण्यातील रूग्णालयात उपचार घेत असलेल्या विक्रम गोखले यांचे निधन झाले. ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांची प्रकृती चिंताजनक होती आणि त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. मराठी हिंदी चित्रपट सृष्टीवर अनेक दशक त्यांनी आपल्या अभिनयामुळे गाजवली. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या प्रकृतीत चढ-उतार जाणवत होते. त्यांना रुग्णालयात व्हेंटिलेटर सपोर्टवर ठेवण्यात आले होते. गोखले यांच्या प्रकृतीत सुधारणा होण्याची अपेक्षा त्यांच्या कुटुंबीयांसह त्यांचे चाहते बाळगून होते. शुक्रवारी त्यांच्या प्रकृतीमध्ये आश्वासक सुधारणा दिसून आल्या. ते डोळे उघडत होते, हात पाय हलवत होते. पुढील ४८ तासात त्यांचा व्हेंटिलेटर सपोर्ट निघेल, त्यांचा रक्तदाब…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क महिला साडी आणि सलवार सूटमध्ये छान दिसतात. काही घातलं नाही तरी छान दिसतात, असं वादग्रस्त वक्तव्य योगगुरू रामदेव बाबा यांनी केले. महिलांविषयी विकृत मानसिकता दाखवणाऱ्या रामदेव बाबांचा शिवसेना उपनेत्या तथा विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी निषेध केला आहे. अशातच महाराष्ट्र राज्य महिला आयोग त्यांच्या वक्तव्याबद्दल रामदेव बाबांना नोटीस पाठवणार आहे. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी याबद्दलची माहिती दिली आहे. बाबा रामदेव यांच्या महिलांविषयीच्या या वक्तव्यानंतर राज्यातील वातावरण चांगलंच तापले आहे. महिलांच्या बाबतीत केलेल्या विधानानंतर या विधानाचा रामदेव बाबा यांच्याकडून खुलासा मागविला जाणार आहे, त्या संदर्भात महिला आयोगाकडून नोटीस बजावली जाणार आहे. नेमके…

Read More

संविधान दिन म्हणजे काय? यापूर्वी हा दिवस साजरा केला जात नव्हता? संविधान दिन साजरा केलाच पाहिजे? संविधान सरनामा-प्रास्ताविका म्हणजे काय? डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना घटनेचे शिल्पकार का म्हटले जाते? २६ नोव्हेंबरला ‘संविधान दिन’ का साजरा केला जातो? भारतीय संविधानाविषयी अशा अनेक प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न या लेखात करण्यात आला आहे. जगातील सर्वात मोठी लोकशाही असणाऱ्या भारत देशात भारतीय संविधानाच्या अंमलबजावणीने खऱ्या अर्थाने लोकशाहीची मुहूर्तमेढ रोवली गेली. भारत देशावर इंग्रजांनी येथील संस्थानिक, राजे यांच्या मदतीने दीडशे वर्ष राज्य कारभार केला. स्वातंत्र्य लढयातील महापुरुषांनी आंदोलन, उपोषण, सविनय कायदेभंग या मार्गाने स्वातंत्र्यासाठी लढा दिला. महापुरूषांच्या बलिदान व त्यागामुळे सरतेशेवटी ब्रिटिशांनी भारताला वसाहतीचे स्वराज्य देण्याचे…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली कन्याकुमारी ते काश्मीर निघालेले भारत जोडो यात्रा महाराष्ट्र मध्ये यशस्वी ठरली आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि भारत जोडो यात्रेचे समन्वयक बाळासाहेब थोरात यांनी यात्रा यशस्वी करणाऱ्या सर्वांचे एका पत्राद्वारे आभार मानले आहेत. भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात यशस्वी करण्यात अनेकांचे सहकार्य लाभले. ही ऐतिहासिक पदयात्रा यशस्वी करण्यासाठी राज्यातील काँग्रेस नेत्यांसह पदाधिकारी कार्यकर्ते आणि जनता उत्स्फूर्तपणे राबत १४ दिवसाच्या या कालखंडात सर्वांनी यात्रा यशस्वीतेसाठी मोठे सहकार्य केले. राहुलजींबरोबर पायी चालत आपल्या समस्या, व्यथा, वेदना सांगितल्या व राहुलजी यांनीही त्या ऐकून घेतल्या. भारतयात्रींच्या आदरातिथ्यात आपण कुठेही कमी पडलो नाही. ही यात्रा…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क जिल्ह्यात अवैध मद्यविक्री करणाऱ्या हॉटेल, ढाबे, चायनीज गाड्यांसह सहा अवैध मद्य विक्रेत्यांसह पिणाऱ्यांविरोधात दंडात्मक कारवाई करण्यात आल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक गणेश पाटील यांनी दिली आहे. याशिवाय जिल्ह्यात अवैध मद्य विक्री होत असल्याची माहिती असल्यास राज्य उत्पादन शुल्क विभागाशी संपर्क साधण्यासाठी टोल फ्री व मोबाईल क्रमांक जाहीर करण्यात आले आहे. अवैध मद्यविक्री करणाऱ्यांवर तसेच अवैधरित्या मद्य पिणाऱ्यांवर न्यायालयाच्या आदेशावरुन नगर जिल्ह्यात कारवाया सुरु करण्यात आल्या आहे. मद्य पिण्यासाठी जागा उपलब्ध करुन देणाऱ्या जागामालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. यात नगरच्या हॉटेल साहिबाच्या मालकास २५ हजार रुपयांचा दंड, तेथे मद्य पिणाऱ्या चार जणांना प्रत्येकी १…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली देशभरातील सहकारी साखर कारखान्यांसाठी अनुकरणीय व आदर्शवत ठरलेल्या संगमनेरच्या सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याने आत्तापर्यत उच्चांकी भावाची परंपरा जपली आहे. कारखान्यात गाळपासाठी येणाऱ्या या चालू हंगामाकरीता पहिली उचल २५०० रुपये प्रति टन जाहीर करण्यात आली असल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष बाबासाहेब ओहोळ यांनी दिली. स्वातंत्र्य सेनानी सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या आदर्श तत्त्वांवर संगमनेरच्या सहकाराची वाटचाल सुरू असून थोरात सहकारी साखर कारखान्याने शेतकरी, सभासद, व कामगारांचे हित जोपासताना कायम उच्चांकी भाव दिला आहे. मागील वर्षी सन २०२१-२०२२ या हंगामामध्ये १५ लाख ५३ हजार मेट्रीक टनाचे उच्चांकी गाळप…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क राज्याचे माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्या अधिपत्याखाली आणि राज्यात प्रथम क्रमांकावर असलेल्या संगमनेर शेतकी संघाच्या अध्यक्षपदी संपतराव विष्णू डोंगरे यांची तर उपाध्यक्षपदी सुनील कडलग यांची निवड झाली. संघाच्या अतिथीगृहामध्ये अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी योगेश कापसे यांच्या देखरेखीखाली व आमदार बाळासाहेब थोरात, नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे यांच्या उपस्थितीत बैठक झाली. या बैठकीत सर्वानुमते या निवडी करण्यात आल्या. अध्यक्षपदासाठी डोंगरे यांच्या नांवाची सूचना दिलीप वर्पे यांनी मांडली. शिवाजी दिघे यांनी अनुमोदन दिले तर उपाध्यक्षपदासाठी कडलग यांच्या नांवाची सूचना सचिन दिघे यांनी मांडली. त्यास तुकाराम कोठवळ यांनी अनुमोदन दिले. यावेळी संचालक साहेबराव बारवे, दिलीप वर्पे, बाळकृष्ण…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क पंचायत राज व्यवस्थेसह ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी देताना सहकार साहित्य, समाजकारण, शिक्षण, कृषी अशा विविध क्षेत्रात दिशादर्शक काम करणाऱ्या यशवंतराव चव्हाण यांनी महाराष्ट्राच्या विकासाचा पाया रोवला. ते आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार आहेत असे गौरवोद्गार राज्याचे माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी काढले. अमृतवाहिनी शेती व शिक्षण विकास संस्थेच्या वतीने यशवंत तीर्थ येथे चव्हाण यांच्या ३८ पुण्यतिथी अभिवादन समारंभात संगमनेरमध्ये थोरात बोलत होते. संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल शिंदे, व्यवस्थापक प्रा. व्ही. बी. धुमाळ, इंजीनियरिंग कॉलेजचे प्राचार्य डॉ. एम. ए. व्यंकटेश, डॉ. बी. एम. लोंढे, डॉ. मच्छिंद्र चव्हाण, डॉ. मनोज शिरभाते, प्रा. एस. टी. देशमुख, प्राचार्य जे. बी. शेट्टी,…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क संगमनेर मधील ज्येष्ठ रंगकर्मी, निर्माते वसंत बंदावणे यांचे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या सांस्कृतिक विभागाच्या जिल्हा अध्यक्षपदी निवड करण्यात आले आहे. प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले, सांस्कृतिक विभागाच्या राज्याध्यक्ष विद्या कदम, सरचिटणीस सम्राट साळवी, समन्वयक अमोल थोरात यांनी बंदावणे यांची सांस्कृतिक सेलच्या जिल्हाध्यक्षपदी निवड केली आहे. माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी बंदावणे यांना निवडीचे पत्र दिले. बंदावणे पंचेचाळीस वर्षांपासून संगमनेर व नगरच्या सांस्कृतिक क्षेत्रात कार्यरत आहेत. लीनीयर फिल्म्स या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी बंदीशाळा व अनेक मालिका, लघु चित्रपटांची निर्मिती केली आहे. संग्राम संस्थेच्या अनेक नाटकांत भूमिका, नेपथ्य, प्रकाश योजना अशा जबाबदाऱ्या पार पाडून राज्य नाट्य स्पर्धेत अनेक…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क अकोले तालुका तालीम संघाच्यावतीने आणि अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय मंत्री माजी आमदार वैभव पिचड यांच्या नेतृत्वाखाली अकोलेत रविवार (ता. २७) आणि सोमवारी (ता. २८) कुस्त्यांचा थरार रंगणार आहे. जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेतून महाराष्ट्र केसरीसाठी पैलवानांची निवड केली जाणार असल्याची माहिती अकोले तालुका तालीम संघाचे तालुका अध्यक्ष बबलू धुमाळ, उपाध्यक्ष शामराव शेटे यांनी दिली. जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते व माजी मंत्री मधुकरराव पिचड यांच्या अध्यक्षतेखाली या स्पर्धा होणार आहेत. आमदार प्रा. राम शिंदे, भाजपा अहमदनगर जिल्हा तालीम संघाचे अध्यक्ष वैभव लांडगे, भाजपा जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर, माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे, खासदार सदाशिव…

Read More