Author: Annant Ppangarkar

महाराष्ट्र संवाद न्यूज मुंबई – शिंदे फडणवीस सरकारने आज अचानक सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश काढले आहे. सरकार गेल्या वर्षी जुलैमध्ये सत्तेत आल्यापासून राज्यात अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा सिलसिला सुरू आहे. आपल्या कामगिरीमुळे सातत्याने वलयांकित ठरलेल्या तुकाराम मुंडे यांची देखील पुन्हा बदली करण्यात आली आहे. या अधिकाऱ्यांच्या झाल्या बदल्या… यादी… 1. श्रीमती सुजाता सौनिक, IAS (1987) ACS (AR&OM), GAD, मंत्रालय, मुंबई यांना ACS (गृह), गृह विभाग, मंत्रालय, मुंबई म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. 2. श्री एस. व्ही. आर. श्रीनिवास, IAS (1991) MC, MMRDA, मुंबई यांना OSD, धारावी पुनर्विकास प्रकल्प, मुंबई म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. 3. श्री लोकेश चंद्र, IAS (1993) GM, BEST,…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज स्थापनेनंतर प्रथमत:च संगमनेर मर्चंट बँकेची निवडणूक बिनविरोध करण्यात सत्ताधारी गटाला यश आले. विशेष म्हणजे सत्ताधारी गटाकडून काही विरोधी उमेदवारांना देखील संधी दिली गेल्याने परंपरागत प्रमुख विरोधी उमेदवारांनी देखील निवडणूक बिनविरोध करण्याचा मोठेपणा दाखविला. अनुसूचित जाती जमाती मतदार संघातून राजेंद्र कारभारी वाकचौरे यांनी सुरुवातीलाच व्यापारी एकताच्या बिनविरोध निवडीची सलामी दिली होती. त्यानंतर उर्वरित 16 जागांसाठी 38 उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले होते. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या काही मिनिटांपर्यंत विमुक्त जाती भटक्या जमाती / विशेष मागास प्रवर्ग मतदार संघातील जागे संदर्भात चर्चा सुरू होती. शेवटी तीही जागा बिनविरोध करण्यात सत्ताधारी मंडळाला यश आले. बिनविरोध निवड झालेले उमेदवार खालीलप्रमाणे: सर्वसाधारण…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर: शहरातील नासिक-पुणे महामार्गावर असलेल्या जोर्वे नाका येथे रविवारी रात्री झालेल्या हाणामारी आणि दंगल प्रकरणी पोलिसांनी सोळा आरोपींच्या पोलीस कोठडीत न्यायालयाने पाच तारखेपर्यंत वाढ केली आहे. सुरुवातीला पकडलेल्या 16 आरोपींची पोलीस कोठडीची मुदत शुक्रवारी संपल्यानंतर त्यांना न्यायालयासमोर उभे केले असता पोलिसांच्यावतीने सरकारी वकील मिराज पर्बत यांनी जोरदार व्यक्तिवाद करत आरोपींच्या पोलीस वाढ करण्याची मागणी केली. आरोपींच्या वकिलांचा आणि सरकारी वकिलांचे म्हणणे ऐकल्यानंतर न्यायालयाने आरोपींच्या कोठडीत आणखी वाढ केली. रविवारी रात्री जोर्वे नाका येथे झालेल्या वादातून काही नागरिकांवर प्राणघात हल्ल्याचा प्रयत्न झाला. धारदार शस्त्राचा वापर करत दहशत माजविण्याचा प्रयत्न झाला. गुन्हेगारांनी थेट कायदा व सुव्यवस्थेला आव्हान देत अशांतता…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज शिर्डी – राज्‍यात जनतेच्‍या मनातील सरकार असल्‍यामुळेच लोकांच्‍या हिताचे निर्णय होत आहेत. सर्व समाज घटकांसाठी योजनांची अंमलबजावणी प्रभावीपणे सुरु आहे. सततच्‍या पावसाने नुकसान झालेल्‍या पिकांची भरपाई या आठवड्यातच शेतकऱ्यांच्या खात्‍यात वर्ग होईल, अशी ग्‍वाही महसूल, पशुसंवर्धन व दूग्‍ध व्‍यवसाय विकास मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी दिली. राहाता तालुक्यातील वाकडी व पंचक्रोशीतील गावांमधील शेतकरी, नागरिकांचा समस्‍या मंत्री विखे पाटील यांनी आज राहाता येथे जाणून घेतल्‍या. ‘शासन आपल्‍या दारी’ या शासन उपक्रमाचा आढावाही त्यांनी यावेळी घेतला. यावेळी शिर्डी उपविभागीय अधिकारी माणिक आहेर, तहसीलदार अमोल मोरे तसेच विविध शासकीय विभागांचे अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते. विखे म्हणाले, शासन आपल्या दारी…

Read More

नव्या युगाचे आर्थिक व्यवस्थापन कार्यशाळा महाराष्ट्र संवाद न्यूज  शेवगाव – कोरोना महामारीनंतर रशिया-युक्रेन युद्धाच्या जागतिक पातळीवरील झालेल्या आर्थिक ध्रुवीकरणाचा सकारात्मक परिणाम म्हणून भारतीय रुपया हे चलन जागतिक पातळीवर अमेरिकन डॉलर नंतर आंतरराष्ट्रीय चलन म्हणून पर्याय ठरू पाहत आहे, सद्यस्थितीत जागतिक आर्थिक क्रमवारीत भारताचे असलेले पाचवे स्थान लवकरच आणखीन मजबूत होऊन येत्या काही वर्षांत भारत जागतिक पातळीवर तिसरी आर्थिक महासत्ता म्हणून उदयास येईल, असा आशावाद एमएफडी सुनील कडलग यांनी व्यक्त केला. मंगळवारी मेडिकल असोसिएशन आणि केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनच्यावतीने चला अर्थसाक्षर होऊया या उपक्रमांतर्गत ‘नवीन युगाचे आर्थिक व्यवस्थापन’ या कार्यशाळेत कडलग बोलत होते. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ समाजसेवक डॉ. संजय लड्डा होते. रोटरी…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – २०२३-२०२४ या आर्थिक वर्षाकरिता ठक्कर बाप्पा आदिवासी वस्ती योजना अंतर्गत संगमनेर तालुक्यातील विविध गावांमधील विकास कामासाठी एक कोटी तीन लाख रुपयांचा निधी काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते,आमदार बाळासाहेब थोरात यांच्या माध्यमातून मंजूर झाल्याची माहिती थोरात कारखान्याचे संचालक इंद्रजीत थोरात यांनी दिली. संगमनेर तालुक्यातील प्रत्येक गावात आरोग्य, शिक्षण, दळणवळण, सिमेंट बंधारे, रस्ते, पिण्याच्या पाण्याच्या योजनासह अनेक विकासाच्या योजना आमदार थोरात यांनी सातत्याने राबविल्या. सहकारातून समृद्धी निर्माण झालेला हा तालुका राज्यात विकसित असलेल्या पहिल्या पाच तालुक्यांमध्ये गणला जातो. सन २०२३-२०२४ या आर्थिक वर्षासाठी ठक्कर बाप्पा आदिवासी वस्ती योजनेअंतर्गत संगमनेर तालुक्यातील पेमगिरी येथे येळुशी ठाकरवाडी वस्ती अंतर्गत सामाजिक सभागृहाचे…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज आज सकाळी किरकोळ कारणाने बायकोशी कटकट झाली, वैतागून दवाखान्यात आलो होतो. ओपीडी मध्ये नर्सने एक केसपेपर आत आणून दिला. पेशंटचं नाव वाचलं, पुढे वय लिहिलं होतं…१०३ वर्षे! मी सिस्टरला आत बोलवून ‘नीट वय विचारत जा!’ असं म्हणालो. “सर, त्याहून जास्ती असेल असं घरचे म्हणताहेत” ती म्हणाली. मी खुर्चीवरून उठून पलीकडे गेलो. टेबलावर कृश, छोटीशी आजी, अबोली रंगाची साधीशी नऊवारी नेसलेली, सुरकुत्याने भरलेला चेहरा, तोंडचं बोळकं, चेहऱ्यावर मिश्किल हसू.. ऐकायचा प्रॉब्लेम असेल असं उगाच गृहीत धरून मी बरोबर उभ्या असलेल्या सुनेला ‘काय होतंय” असं विचारलं. ती काही सांगणार इतक्यात “मला इचारा, मी सांगते की” आजी हसून म्हणाली. “मला…

Read More

Maharashtra sanvad news Anant Pangarkar संगमनेर – अहमदनगरसह नाशिक व पुणे जिल्ह्याचे कार्यक्षेत्र असलेल्या आणि व्यापाऱ्यांची आर्थिक कामधेनू म्हणून परिचित असलेल्या संगमनेर मर्चंट बँकेची निवडणूक बिनविरोध होणार की बँकेची निवडणूक लागणार? याचा आज दुपारपर्यंत अंतिम निर्णय समोर येणार आहे. दरम्यान सत्ताधारी गटाने निवडणूक बिनविरोध करण्याचे आवाहन केल्यानंतर अनेक उमेदवारांनी निवडणूक रिंगणातून माघार घेतली. नव्या जुन्यांचा मेळ साधत सत्ताधारी गटाने आपल्या व्यापारी एकता पॅनलची अंतिम यादी जाहीर केली आहे. बँकेची पंचवार्षिक निवडणूक जाहीर झाले असून शुक्रवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा अखेरचा दिवस आहे. सत्ताधारी गटाच्या काही संचालकांनी दुसऱ्या इच्छुक उमेदवारांना संधी मिळावी यासाठी यावेळी उमेदवारी अर्ज भरले नाही. राखीव जागेपैकी एका…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज अहमदनगर – महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन विभागाच्या वतीने ३ व ४ जूनला भंडारदर्‍याच्या पांजरे गावात काजवा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या काजवा महोत्सवाला जास्तीत जास्त पर्यटकांनी भेट देण्याचे आवाहन नासिक पर्यटन संचालनालयाच्या उपसंचालक श्रीमती मधुमती सरदेसाई-राठोड यांनी केले आहे. सरदेसाई-राठोड यांनी यासंदर्भात दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, काजवा महोत्सवामध्ये सहभागी होणाऱ्या पर्यटकांना प्रशिक्षित मार्गदर्शकासोबत काजवे बघण्याची संधी मिळणार आहे. याशिवाय विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचा देखील आनंद घेता येणार आहे. तसेच या महोत्सवाच्या ठिकाणी स्थानिक आदिवासी लोकांनी उत्पादन केलेल्या विविध वस्तूंचे प्रदर्शन व विक्री देखील करण्यात येणार आहे. यामध्ये भंडारदरा परिसरामध्ये विशेष करुन घेतल्या जाणाऱ्या काळा भात व…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – कांदा अनुदान मिळण्यासाठी प्रस्ताव सादर केले मात्र ज्या शेतकऱ्यांच्या सातबारा उताऱ्यावर ई पीक पेऱ्याची नोंद झाली नाही अशा शेतकऱ्यांनी समितीचे अहवाल संबंधितांकडे सादर करण्याचे आवाहन संगमनेरच्या सहकारी संस्थेचे उपनिबंधक संतोष कोरे यांनी केले आहे. या संदर्भात कोरे यांनी म्हटले आहे की, महाराष्ट्र शासनाकडील कांदा अनुदान योजनेप्रमाणे कृषी उत्पन्न बाजार समिती, खाजगी बाजार, चेट पणन अनुज्ञाप्ती धारक व नाफेडमध्ये शासन निर्णय दिनांक २७ मार्च २०२३ नुसार दिनांक १ फेब्रुवारी २०२३ ते ३१ मार्च २०२३ या कालावधीत कांदा विक्री केलेल्या शेतक-यांनी कांदा अनुदान मिळणेसाठी प्रस्ताव सादर केलेले आहेत. परंतु ज्या ठिकाणी शेतक-यांचा ७/१२ उता-यावर ई पीक पे-यांची…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज  अहमदनगर – आयुष्मान भारत – प्रधानमंत्री जन आरोग्य योजना ही केंद्र शासनाची महत्त्वकांक्षी आरोग्य विमा योजना आहे. या योजनेंतर्गत पात्र लाभार्थ्याना योजनेच्या अंगीकृत रुग्णालयात ५ लाख रुपयापर्यंतचे उपचार मोफत करण्यात येत असुन या योजनेच्या लाभासाठी जिल्ह्यातील पात्र लाभार्थ्यांनी आयुष्यमान भारत कार्ड प्राप्त करुन घेण्याचे आवाहन प्रशासनामार्फत करण्यात आले आहे. या योजनेंतर्गत अहमदनगर जिल्ह्यात ४४ अंगीकृत रुग्णालये असुन १ हजार २०९ प्रकारच्या विविध आजारावर मोफत उपचार केले जातात. या आजारामध्ये हृदय विकार, मेंदू विकार, किडनी विकार, अपघात, कर्करोग इत्यादी प्रकारच्या गंभीर आजारावर उपचार व शस्त्रक्रिया मोफत केल्या जातात. या योजनेचा लाभ हा आर्थिकदृष्ट्या, सामाजिकदृष्ट्या दुर्बल घटकातील लाभार्थ्याना दिला…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – वैद्यकीय व्यवसायासाठीचे परवानगी नसताना देखील रुग्णांच्या जीवाशी खेळणाऱ्या बनावट डॉक्टरवर संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जावेद आयुब शेख, (रा. नवरंग कॉम्प्लेक्स, बागवानपुरा, संगमनेर) असे या बनावट डॉक्टरचे नाव आहे. विशेष म्हणजे संगमनेर शहरात या डॉक्टरचा दवाखाना राजरोसपणे सुरू होता. संगमनेर नगर परिषदेच्या कॉटेज रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकारी प्रतिभा कचकुरे यांच्या तक्रारीवरून संगमनेर शहर पोलीस ठाण्यात महाराष्ट्र वैद्यकीय व्यवसाय अधिनियम 1961 अधिनियमाचे कलम 33 व 37 प्रमाणे संगमनेर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. प्रशासनाच्या ही बाब निदर्शनास आल्यानंतर संगमनेर नगर परिषदेचे मुख्याधिकारी तथा बोगस डॉक्टर शोध समितीचे अध्यक्ष राहुल वाघ यांनी संबंधित डॉक्टरवर…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – आपल्या ताब्यातील दुचाकी हयगयीने व भरधाव वेगात चालवून दुसऱ्या दुचाकीला पाठीमागून जोराची धडक देत दुचाकीवरील पती-पत्नीच्या अपघातास व त्यांच्या दुखापतीस कारणीभूत ठरलेल्या विचारते स्वरावर संगमनेर शहर पोलीस ठाण्यात भारतीय दंड विधान संहिता व मोटार वाहन कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशोक दशरथ सहाणे (रा. चिखली, ता. संगमनेर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शंकर बाबुराव तोरकडी (रा. धांदरफळ, ता. संगमनेर) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अपघातात फिर्यादी अशोक सहाणे आणि त्यांची पत्नी सुनीता हे दोघेजण जखमी झाले होते. या संदर्भात शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल धनवट करत आहे.

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर- कोरोनासारखे संकटे आली, सोशल माध्यमांची स्पर्धा वाढली तरी मुद्रित माध्यमांचे महत्व कधीही कमी होणार नाही. मात्र वृत्तपत्रांनी उथळ बातम्या देण्याऐवजी विश्‍लेषणात्मक लेखन आपल्या वृत्तपत्रातून करावे. ती काळाची गरज आहे. सध्या राजकारणाचा दर्जा झपाट्याने घसरला आहे अशावेळी माध्यमांनी सवंग लोकप्रियतेसाठी धावणार्‍या वाचाळ नेत्यांना माईक व लेखनीबंदी करावी तरच माध्यमांचा दर्जा टिकवून राहील, असे प्रतिपादन राज्याचे माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी केले. संपादक व पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र संघटनेच्या वतीने रविवारी संगमनेरात संपादक राज्य परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी आ. थोरात बोलत होते. व्यासपीठावर माजी आ. डॉ. सुधीर तांबे, माजी नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे, डॉ. वि. ल.…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – शुक्रवारी (ता. २ जून) सकाळी सव्वा आठ वाजता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला दुर्गाभिषेक करून महाआरती केली जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक दिनाला यावर्षी ३५० वर्षे पूर्ण होत असल्याने विश्व हिंदू परिषद बजरंग दलाच्या विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. जगतगुरू संत तुकोबारायांचे ११ वे वंशज ह.भ.प. शिरीष मोरे महाराज यांचे जाहीर व्याख्यान शनिवारी (ता. ३ जून) सायंकाळी सहा वाजता नगर परिषदेसमोरील लालबहादूर शास्त्री चौक येथे होणार आहे. यासाठी संगमनेरकरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन संस्कृती संवर्धन मंडळ व सकल हिंदू समाज, बजरंग दल प्रखंड संयोजक…

Read More

Maharashtra sanvad news By Anant Pangarkar संगमनेर – कोरोना महामारीमुळे रखडलेल्या पोलिसांच्या बदल्यांना काही दिवसांपूर्वी मुहूर्त लाभला. जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी महत्त्वाची शाखा असलेल्या एलसीबीसह जिल्ह्यातील सर्वच पोलिस ठाण्यातील दीर्घकाळ वतनदार बनलेल्या कर्मचाऱ्यांच्या बदल्या केल्या. बदल्या करताना बहुतांशी वतनदारांना चांगले काम करतील या आशेने मनाजोगे पोलीस ठाणे देखील दिले. मात्र संगमनेर शहर पोलीस ठाण्यासह उपविभागातील अनेक कर्मचारी बदली झालेल्या ठिकाणी अद्यापही हजर झालेले नाहीत. मनाप्रमाणे बदली होऊनही नव्या नियुक्तीच्या ठिकाणी जाण्यास इच्छुक नसलेल्या कर्मचाऱ्यांना शहर पोलीस ठाण्याच्या निरीक्षकांनी तातडीने मुक्त करण्याची आवश्यकता आहे. संगमनेर शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत कायदा सुव्यवस्था नियंत्रणात ठेवण्यासाठी बदल्या झालेल्या कर्मचाऱ्यांना नव्या नियुक्तीच्या ठिकाणी…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज अहमदनगर – पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांनी उत्तम राज्य कारभाराचा आदर्श घालून दिला आहे. त्यांनी भारताला प्रशासकीय संरचनेची मोठी देणगी दिली असून अहमदनगर जिल्ह्याला अहिल्यादेवी होळकर यांचे नाव देण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे केली. त्यांच्या नावामुळे जिल्ह्याचा मान मोठा होणार असल्याचेही ते म्हणाले. चौंडी (ता.जामखेड) येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 298 व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री बोलत होते. व्यासपीठावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल, पशुसंवर्धन, दुग्धविकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, खासदार सदाशिव लोखंडे, खासदार सुजय विखे पाटील, आमदार प्रा. राम शिंदे, आमदार मोनिका राजळे, आमदार बबनराव पाचपुते, आमदार गोपीचंद…

Read More

डाव्या कालव्यातून पाणी सोडण्याची चाचणी यशस्वी… शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद! महाराष्ट्र संवाद न्यूज निळवंडे, निळवंडे धरण लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांसाठी आजचा दिवस आनंदाचा व ऐतिहासिक आहे. निळवंडे धरण कालव्यांच्या उर्वरित कामासाठी निधीची कमतरता पडू देणार नाही. हे शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे, धरणामुळे विस्थापित झालेल्या शेतकऱ्यांना मोबदल्यापासून वंचित ठेवले जाणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. अहमदनगर व नाशिक जिल्ह्यातील दुष्काळी भागासाठी जीवनदायी ठरणाऱ्या निळवंडे धरणातून पाणी सोडण्याची प्रथम चाचणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज निब्रळ येथे यशस्वीरित्या पार पडली. यावेळी महसूल तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण ‍विखे पाटील, खासदार सदाशिव लोखंडे, खासदार डॉ. सुजय विखे…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर: शहरातील नासिक-पुणे महामार्गावर असलेल्या जोर्वे नाका येथे रविवारी रात्री झालेल्या हाणामारी आणि दंगल प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत अटक केलेल्या आरोपींची संख्या वीसवर गेली आहे. यातील सोळा आरोपींना मंगळवारी न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आल्यानंतर उर्वरित आरोपींना न्यायालयाने बुधवारी पाच जूनपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. रविवारी रात्री जोर्वे नाका येथे झालेल्या वादातून काही नागरिकांवर प्राणघात हल्ल्याचा प्रयत्न झाला. धारदार शस्त्राचा वापर करत दहशत माजविण्याचा प्रयत्न झाला. गुन्हेगारांनी थेट कायदा व सुव्यवस्थेला आव्हान देत अशांतता निर्माण केल्याने पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांनी या प्रकाराची गंभीर दखल घेत तातडीने आरोपींविरोधात गुन्हा दाखल करून तपास सुरू केला होता. यामुळे…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर : संगमनेर वकील संघाचे विद्यमान अध्यक्ष ॲड. उदयसिंह जगन्नाथ ढोमसे पाटील यांना ‘एशिया इंटरनॅशनल रिसर्च युनिव्हर्सिटी बेंगलोर’ यांच्या वतीने देण्यात येणारी मानाची डॉक्टरेट पदवी प्राप्त झाली आहे. डॉक्टरेट मिळवणारे संगमनेर वकील संघाचे ते पाहिले वकील ठरले. ॲड. उदयसिंह ढोमसे पाटील यांना कुलगुरू डॉ. अरुणकुमार, न्यायमूर्ती हरिदास व मान्यवरांच्या उपस्थितीत बंगलोर येथे आयोजित कार्यक्रमात त्यांना ही पदवी प्रदान करण्यात आली. विद्यापीठाने त्यांना “स्वातंत्र्योत्तर काळातील सामाजिक स्थित्यंतरे” या विषयावरील लेखनासाठी डॉक्टरेट पदवीने सन्मानित केले. ढोमसे यांचा वकीलीबरोबर, पत्रकारितेतील अनुभव (Master In Journalism, Master In Political Science पदव्या) शेती विषयक वृत्तपत्रांचे योगदान तसेच दुग्ध उत्पादन वाढीबाबत त्यांनी पुणे विद्यापीठाकडे…

Read More