Author: अनंत पांगारकर
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क नासिकहुन पुण्याला जाणारी शिवशाही बस सिन्नरहून संगमनेरच्या दिशेने येत असताना माळवाडी शिवारात या बसने पेट घेतला. बसला लागलेल्या आगीमध्ये बस पूर्णतः जळून खाक झाली असून केवळ नशीब बलवत्तर म्हणून प्रवासी बालंबाल बचावले आहेत. सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली आहे. शिवशाही बसने सकाळी सात वाजता नाशिक सोडल्यानंतर ती प्रवासी घेऊन सिन्नर स्थानकात आली होती. तेथून बस संगमनेरच्या दिशेने मार्गस्थ झाल्यानंतर माळवाडी शिवारामध्ये अचानकपणे धूर निघत असल्याचे बस चालकाच्या लक्षात आले. त्यामुळे तातडीने बस रस्त्याच्या कडेला उभी करण्यात आली आणि शिवशाही बसमधील सर्व प्रवाशांना खाली उतरवण्यात आले. त्यानंतर काही क्षणातच शिवशाही बसने पेट घेतला आणि आगीच्या…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क आगामी महानगरपालिका आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुका भारतीय जनता पक्षासोबत लढणार असल्याने आरपीआयला सत्तेत चांगला वाटा मिळायला हवा. यासाठी राज्यपाल नियुक्त बारापैकी एक जागा आरपीआयला देण्याची मागणी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली. केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी मंगळवारी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. आगामी महानगरपालिका, जिल्हा परिषद निवडणुका संदर्भात त्यांच्यात यावेळी चर्चा झाली. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आरपीआय) भाजपसोबत ही निवडणूक लढणार असल्याचे त्यांनी सांगितले. 2012 पासून आरपीआय भारतीय जनता पक्षासोबत आहे. त्यामुळे तुमच्याकडे दुर्लक्ष होणार नाही तुम्हाला सत्तेमध्ये नक्कीच चांगला वाटा मिळेल, असा विश्वास उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी दिला…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क पहिली वेळ आहे म्हणून माफ करतोय, पण यापुढे कोणीही असला तरी प्रहारचा वार काय आहे हे दाखवून देऊ. सत्ता गेली चुलीत. अशा थेट शब्दात प्रहारचे आमदार बच्चू कडू यांनी थेट निर्वाणीचा इशारा दिला आहे. 50 खोक्यांच्या आरोपावरून आमदार रवी राणा आणि आमदार बच्चू कडू यांच्यातील वादावर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी मध्यस्थी केल्यानंतर आमदार कडू यांनी कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात अमरावतीमध्ये आज भूमिका जाहीर केली. आपल्यावरील आरोपांना उत्तर देताना आमदार कडू यांनी शिंदे फडणवीस सरकारलाही निर्वाणीचा इशारा दिला. मेळाव्यात आपली भूमिका स्पष्ट करताना आमदार बच्चू कडू म्हणाले, सत्ता गेली चुलीत गेल्या वीस वर्षांपासून साडेतीनशे गुन्हे अंगावर घेऊन महाराष्ट्रात फिरतोय. बाकीचे नेते…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विशेष कार्य अधिकारी (ओएसडी) असलेले संगमनेरचे भूमिपुत्र डॉ. राहुल गेठे यांना नक्षलवाद्याकडून जीवे मारण्याचे धमकी मिळाली आहे. यामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. डॉक्टर देठे यांना मिळालेल्या धमकी पत्रामध्ये म्हटले आहे की, जय लाल सलाम, जय किसान डॉक्टर राहुल गेठे को आखरी चेतावणी… एकनाथ शिंदे का ऑफिसर डॉक्टर राहुल गेठे बहुत उड रहा है. हमारा नुकसान गडचिरोली मे बहुत कर रहा है. हम हमारे भाईयों का बदला जलद ही लेने वाले है. उसकी मौत का एलान निकल चुका है. महाराष्ट्र सरकार को उसकी जबाबदारी जितना लेना हे ले लो. जय नक्षलवाद…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क राज्यभरात बिजनेस कोच म्हणून प्रसिद्ध असलेले विनीत बनसोडे आता संगमनेर मधील उद्योजकांना शनिवारी (५ नोव्हेंबर) उद्योग वृद्धीसाठी मार्गदर्शन करणार आहेत, अशी माहिती सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्टच्या संगमनेर शाखेचा सेक्रेटरी डॉ. सागर गोपाळे यांनी दिली. नासिक-पुणे महामार्गावरील हिवरगाव पावसा येथील हॉटेल मयूर एक्सप्रेसमध्ये शनिवारी सायंकाळी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. विनीत बनसोडे हे बिजनेस कोच म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात सुपरिचित आहेत. सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्टच्या सेक्रेटरी जनरल या पदावर ते कार्यरत आहेत. प्रसिद्ध बिझनेस कोच संतोष नायर यांचे ते गुरु आहेत. सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्ट ही उद्योजकांसाठीची संघटना वीस वर्षांहून अधिक काळ व्यावसायिकांसाठी कार्यरत आहे. महाराष्ट्रात ७५…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यातील वादामुळे निर्माण झालेली राज्यातील सत्ता संघर्षाची सुनावणी आता तब्बल चार आठवडे म्हणजेच महिना अखेरपर्यंत लांबणीवर पडली आहे. पुढील सुनावणीसाठी न्यायालयाने २९ नोव्हेंबरची तारीख निश्चित केली आहे. राज्यातील सत्ता संघर्षावर सर्वोच्च न्यायालयात मंगळवारी सकाळी सुनावणी सुरू झाली. सुनावणी मध्ये घटनापिठाने दोन्ही बाजूच्या पक्षकारांना लिखित बाजू मांडण्यास सांगितले आहे. त्यामुळे 29 नोव्हेंबर पर्यंत दोन्ही बाजूच्या वकिलांना लिखित स्वरुपात न्यायालयासमोर कागदपत्रे सादर करावे लागणार आहे. यानंतर मात्र न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी सलगपणे होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. ठाकरे गटाचे प्रवक्ते अनिल देसाई यांनी सांगितले की, सुनावणी राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क सक्तवसुली संचालनालयाच (ईडी) नाव काढलं की भल्या भल्या राजकारणांना घाम फुटतो. मात्र आता एक वेगळेच प्रकरण समोर आले आहे. अनेकांना घाम फोडणाऱ्या या ईडीच्याच एका अधिकाऱ्याला सर्वोच्च न्यायालयाने तब्बल एक लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. हा दंड ईडी अधिकाऱ्याला आपल्या पगारातून भरावा लागणार आहे. 24 कोटी रुपयांच्या फसवणुकीचा आरोप असलेल्या कॅन्सरग्रस्त बँक कर्मचारी असलेल्या आरोपीला हायकोर्टाने जामीन दिला होता, मात्र तरीही ईडीनं याला सुप्रीम कोर्टात आव्हान दिलं. त्यामुळे सुप्रीम कोर्टानं ईडीला तर फटकारले. ईडीकडून दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर शुक्रवारी सुनावणी झाली. तसेच कॅन्सरग्रस्त आरोपीचा जामीन कायम ठेवला. लीगल शुल्क, स्टेशनरी सोबतच कोर्टाचा वेळही वाया घालवला, असे…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क सोलापूर जिल्हा परिषदेतील लाचखोर शिक्षणाधिकारी किरण अनंत लोहार याला एका शैक्षणिक संस्थेच्या अध्यक्षाकडून २५ हजाराची लाच घेतांना सोलापूर लाचलुचपत विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले आहे. यामूळे राज्याच्या शिक्षण वर्तुळात खळबळ उडाली असून वरिष्ठ शिक्षण अधिकाऱ्याचा लाचखोरीचा विषय चव्हाट्यावर आला आहे. लोहार याच्याविरोधात सोलापूर शहरातील सदर बझार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रीया रात्रीपर्यत सुरु होती. शिक्षणाधिकारी लोहार याने एका शैक्षणिक संस्थेच्या अध्यक्षाकडे ऑनलाईन असलेल्या युडायस प्लस या प्रणालीमध्ये त्यांच्या शाळेचे ८ वी ते १० वी चे वर्ग वाढ करण्याबाबत अर्ज केला असून संबधित संस्थेचे तक्रारदार अध्यक्ष हे या अर्जाबाबत पाठपुरावा करत असतांना शिक्षणाधिकारी लोहार याने ऑनलाईन असलेल्या…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क राज्यात परतीच्या पावसाने थैमान घातले असून शेतकऱ्यांची तयार झालेली पिके पाण्यात गेल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. राज्यभर ३६ लाख हेक्टरवरील पिके बरबाद झाली आहेत. शेतकऱ्यांना अशा आपत्तीच्या काळात सरकारने तातडीने भरपाई व मदत देणे अपेक्षित असताना राज्यातील शिंदे- फडणवीस सरकार मात्र केवळ घोषणा व दिखावा करत आहे. शेतकऱ्यांच्या व सामान्य जनतेच्या मनात सरकारच्या या दुर्लक्षाच्या विरोधात तीव्र संताप खदखदत आहे. सोमवारी (३१ ऑक्टोबर) अकोले येथे अखिल भारतीय किसान सभेच्या महाराष्ट्र राज्य अधिवेशनाला उत्साहात सुरुवात झाली. ३१ ऑक्टोबर ते २ नोव्हेंबर असे तीन दिवस चालणाऱ्या अधिवेशनासाठी किसान सभेचे केंद्रीय अध्यक्ष डॉ. अशोक ढवळे, केंद्रीय कोषाध्यक्ष पी. कृष्णप्रसाद, किसान सभेचे नेते…
मुख्यमंत्री शिंदे गटाच्या कार्यकारिणीला अखेर मुहूर्त लाभला; नव्या पदाधिकाऱ्यांचा खासदारांच्या हस्ते शिर्डीत सत्कार महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क ‘बाळासाहेबांची शिवसेना’ पक्षाच्या संपर्क प्रमुख पदे बाजीराव दराडे आणि बाळासाहेब उर्फ निरंजन पवार यांची तर जिल्हाप्रमुख पदी कमलाकर कोते आणि राजेंद्र देवकर यांची निवड जाहीर करण्यात आली आहे. याशिवाय उत्सुकता लागलेल्या संगमनेर तालुका अध्यक्षपदी रमेश काळे आणि राजेंद्र सोनवणे यांच्यासह शहराध्यक्षपदी दिनेश फटांगरे यांची वर्णी लागली आहे. शिवसेना फुटीनंतर प्रतीक्षेत असलेली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील ‘बाळासाहेबांची शिवसेना’ पक्षाची शिर्डी लोकसभा मतदारसंघाची कार्यकारिणी अखेर जाहीर करण्यात आली आहे. नव्या निवडीमुळे शिंदे गटाच्या बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे शिर्डी लोकसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट झाले आहे. खासदार…
