Author: अनंत पांगारकर
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क म्युच्युअल फंडाला गुंतवणूकदारांची पसंती मिळत असल्याने त्यात गुंतवणुकीचा ओघ वाढत आहे. येत्या चार ते पाच वर्षांत हा उद्योग १०० लाख कोटींचा होईल आणि भारत शक्तीशाली अर्थव्यवस्था म्हणून उदयास येत असताना गुंतवणूकदार संपत्ति निर्माण करतील असा आशावाद आर्थिक गुंतवणूक तज्ज्ञ सुनील कडलग यांनी व्यक्त केला. घारगाव येथे साईनाथ उद्योग समूहाच्या दिपावली निमित्त आयोजित स्नेहबंध मेळाव्यात कडलग प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी साईनाथ उद्योग समूहाचे संस्थापक बजरंगशेठ वाकळे उपस्थित होते. प्रास्तविक भाषणात साईनाथ उद्योग समूहाचे संचालक सुदिप वाकळे यांनी कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट केला. समाजातील प्रत्येक घटक अर्थसाक्षर झाल्यास जीवनातील समस्या दूर होतील व संपत्ती निर्माण होईल…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क दीपावलीच्या पहील्या दिवशी वसुबारसेला म्हणजेच गोपाष्टमीला शुक्रवारी सकाळी संगमनेरमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्यावतीने गो ग्राम परिक्रमा आयोजित करण्यात आली होती. मोठ्या उत्साहात ही गो ग्राम परिक्रमा आणि गो पूजन सकाळी सात वाजता पार पडले. वसुबारसेला अतिशय श्रद्धेने गोमातेचे पूजन केले जाते, अशा पवित्र गोमातेचे रक्षण करणे हे आपले हिंदू धर्मीय म्हणून प्रथम कर्तव्य आहे. सद्यस्थितीत देशभरात हजारोंच्या संख्येने गोमातेची कत्तल होत असल्याने तिचे अस्तित्व धोक्यात आले आहे. गोमातेला सांभाळणं शेतकऱ्याला आर्थिक दृष्टीने परवडत नसल्याने तो कसायांना गाई विकतो. शहरात आपल्याला गाई पाळणे शक्य नाही परंतु शेतकऱ्यांच्या गाई वाचवणं आपल्या हातात आहे. गोमाता कामधेनु आहे.…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क दीपावली सणाच्या पार्श्वभूमीवर संगमनेर नगर परिषदेने आपल्याकडे सेवेत असलेल्या आणि सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना विविध देय रकमेपोटी सुमारे एक कोटी रुपयांचे वाटप केले आहे. अशी माहिती पालिकेचे प्रशासक तथा प्रांताधिकारी डॉ. शशिकांत मंगरूळे आणि मुख्याधिकारी राहुल वाघ यांनी दिली. दीपावली सण उत्साहात व आनंदात साजरा करण्यासाठी नगर परिषदेचे प्रशासक डॉ. शशिकांत मंगरुळे व मुख्याधिकारी राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली नियोजन करतांना कायम सेवेत असलेल्या कर्मचाऱ्यांना शासन निर्णयाप्रमाणे दीपावली सण अग्रीम तसेच कायम कर्मचाऱ्यांसह सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोगाच्या फरकापोटी ही रक्कम अदा करण्यात आली आहे. तसेच शासन निर्णयाप्रमाणे दीपावली सणानिमित्त माहे ऑक्टोबर महिन्याचे वेतन 22 तारखेपर्यंत करणार असल्याची…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क ज्या पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यावरून ‘ईडी’ सरकारमध्ये वादाची ठिणगी पडली होती, त्या बहुचर्चित बदल्या अखेरीस करण्यात आले आहे. आपल्या पोलीस दलातील पहिल्याच नियुक्तीत श्रीरामपूरमध्ये अपर पोलीस अधीक्षक म्हणून काम केलेल्या राकेश ओला यांची अहमदनगर जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षकपदी नियुक्ती केली आहे. शिंदे फडणवीस सरकारने प्रथमत:च आयपीएस अधिकाऱ्यांच्या एवढ्या मोठ्या प्रमाणात बदल्या केल्या आहेत. ऐन दीपावलीच्या तोंडावर अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. राज्यातील 45 पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश अखेर गृह विभागाने काढले आहेत. यातील 24 जणांना नियुक्ती देण्यात आली आहे. तर अन्य अधिकाऱ्यांना अद्याप नियुक्ती देण्यात आली नसून ते नियुक्तीच्या प्रतीक्षेत आहेत. यात अहमदनगरचे सध्याचे एसपी मनोज पाटील यांचाही…
शिर्डी | महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क राज्यातील सरकार हे जनतेच्या मनातील सरकार असल्याने गरिबांच्या हिताचे निर्णय सरकार घेत आहे. ‘आनंदाचा शिधा’ देणारे महाराष्ट्र एकमेव राज्य आहे. असे प्रतिपादन राज्याचे महसूल, पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी गुरुवारी केले. सर्वसामान्य जनतेची दिवाळी गोड व्हावी; म्हणून शासनाने जाहीर केलेला ‘आनंदाचा शिधा’चे कीट जिल्ह्यात पोहचले आहेत. या शिधा वाटप उपक्रमाचा जिल्ह्यातील शुभारंभ पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्याहस्ते आज राहाता येथून करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. विखे म्हणाले की, आनंदाच्या शिधा’ कीटच्या माध्यमातून गरिबांना १०० रूपयांत प्रत्येकी एक किलो साखर, रवा, चणाडाळ व एक लीटर पामतेल वाटप केले…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहीत शिवसेना विरोधात अंधेरी पूर्व मध्ये पोट निवडणुकीत भाजपने उमेदवार देऊ नये, अशी विनंती मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी केली होती. भाजपने त्यांच्या विनंतीला मान दिल्यानंतर आता ठाकरेंनी थेट मुख्यमंत्र्यांना पत्र लिहीत राज्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली आहे. त्यामुळे आता मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेकडे लक्ष लागले आहे. मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी अंधेरी पूर्व विधानसभा पोट निवडणुकीत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांच्या विरोधात भारतीय जनता पक्षाने उमेदवार देऊ नये, अशी मागणी केल्यानंतर उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी ठाकरे यांच्या विनंतीला मान देत भाजपने आपले अधिकृत उमेदवार…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क देशात उत्तम प्रकारच्या सर्व आरोग्य सुविधा उपलब्ध करून स्वस्थ भारत बनविण्यासाठी केंद्र सरकार कटीबध्द असल्याचे प्रतिपादन केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण, रसायने व खते मंत्री डॉ. मनसुख मंडविया यांनी केले. अहमदनगरच्या डॉ. विठ्ठलराव विखे पाटील मेडिकल फाऊंडेशन, मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल येथे आयोजित कॅन्सर सेंटर, न्युक्लियर मेडिसिन सेंटर, उद्घाटन समारंभात मंडविया बोलत होते. मंडविया यांच्या हस्ते राळेगणसिध्दी येथे प्राथमिक आरोग्य केंद्राचा पायाभरणी व पढेगांव येथे नव्याने उभारण्यात आलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्राचे लोकार्पण दुरदृष्य प्रणालीद्वारे करण्यात आले. कार्यक्रमाला राळेगणसिध्दी येथुन दुरदृष्य प्रणालीद्वारे ज्येष्ठ समाजसेवक, पद्मभुषण आण्णा हजारे, कार्यक्रमस्थळी खा. डॉ. सुजय विखे पाटील, आमदार मोनिकाताई राजळे, आमदार…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क कोल्हार-घोटी मार्गावर वडगाव पान फाटा येथे मोटार सायकल आणि डंपरच्या झालेल्या अपघातात दोन मावस भावांचा डंपर खाली सापडून मृत्यू झाला. तर एक मुलगी जखमी झाली आहे. तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दीपावलीच्या तोंडावर घडलेल्या या दुर्दैवी घटनेमुळे हळहळ व्यक्त होत आहे. अक्षय तात्यासाहेब रोकडे (रा. दुर्गापूर ता. राहाता) आणि सुनील जालिंदर लांडगे (रा. वडगाव लांडगा, ता. संगमनेर) असे मयत युवकांचे नाव आहे. तर कावेरी तात्यासाहेब रोकडे असे जखमी मुलीचे नाव आहे. ही घटना गुरुवारी (दिनांक २० ऑक्टोबर २२) सकाळी घडली. याबाबत समजलेली माहिती अशी, सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास संगमनेर तालुक्यातील वडगाव लांडगा येथील सुनील जालिंदर लांडगे…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क प्लास्टिक बंदी आदेश धुडकावत या आदेशाची पायमल्ली करत प्लास्टिक विक्री करणाऱ्या शहरातील विक्रेत्यांवर नगर परिषदेच्या प्लास्टिक विरोधी पथकाने कारवाई केली. या कारवाईत तब्बल 45 हजार रुपये दंड वसूल करण्यात आला असून 100 किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले आहे. दरम्यान बंदी असलेल्या प्लास्टिकची विक्री न करण्याचे आवाहन प्रशासक डॉ. शशिकांत मंगरूळे आणि मुख्याधिकारी राहुल वाघ यांनी विक्रेत्यांना केले आहे. प्लास्टिक बंदी आदेशाची शहरातील विक्रेत्यांकडून पायमल्ली सुरू होती बंदी असलेले प्लास्टिक पिशव्यांची सर्रासपणे विक्री केली जात असल्याने दीपावलीच्या पार्श्वभूमीवर सक्रिय झालेल्या नगर परिषदेच्या प्लास्टिक विरोधी पथकाने शहराच्या विविध भागात दोन दिवस ही कारवाई केली. दरम्यान काही प्लास्टिक विक्रेत्यांना…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क काँग्रेसचे विधीमंडळ पक्षनते व राज्याचे माजी महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्या अधिपत्याखाली कार्यरत असलेल्या संगमनेर तालुका सहकारी दूध उत्पादक व प्रक्रिया संघाच्यावतीने दीपावलीनिमित्त दूध फरक, दुध पेमेंट, दूध वाहतूक ठेकेदारांचे पेमेंट व अनामत, कामगारांचा बोनस आणि पगारापोटी ३३ कोटी रुपये बँकेत वर्ग केले आहे. अशी माहिती दूध संघाचे अध्यक्ष रणजितसिंह देशमुख यांनी दिली. देशमुख म्हणाले, दूध संघाकडून दरवर्षी चांगल्या प्रतीच्या दूध पुरवठ्यावर जास्तीत जास्त दूध फरक अदा करण्यात येतो. सरासरी ३५ रुपये भाव, दूध संघाचे रिबेट व स्थानिक संस्थांचे रिबेट म्हणून दूध उत्पादकास सर्वाधिक भाव राजहंस दूध संघाकडून मिळत असतो. १६ ऑक्टोबर २०२२ पासून एक…
