Author: अनंत पांगारकर
जमिनीच्या मोजणीसाठी ४ लाखाची लाच मागणाऱ्या लाचखोर भूमापकाविरोधात गुन्हा, ५० हजार घेतांना एकाला पकडले
शनिवार, २२ जून जमीन मोजण्यासाठी व क्षेत्राची हद्द ठरवून देण्यासाठी ४ लाख रुपयांची लाच मागितल्या प्रकरणी लाचखोर भूमापकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर ४ लाखापैकी ५० हजार रुपये घेतांना एकाला पकडले आहे. दौलत मधुकर गायकवाड (वय ३५ वर्षे, भूकरमापक भूमी अभिलेख कार्यालय, हवेली, येरवडा, पुणे.) व योगेश्वर राजेंद्र मारणे (वय २५ वर्षे, रा. एरंडवणे, पुणे) या दोन लाचखोर आरोपीविरोधात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम सन १९८८ चे कलम ७ अ १२ अन्वये येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदाराच्या देहूगाव, पुणे येथील जमीन मोजण्यासाठी व क्षेत्राची हद्द ठरवून देण्यासाठी लाचखोर आरोपी हवेली भूमी अभिलेख कार्यालयाचा भुकरमापक दौलत गायकवाड याने…
शनिवार, २२ जून शेतकऱ्यांच्या गाळप केलेल्या उसाचे पैसे थकविल्याच्या कारणावरून २१ कोटी ०३ लाख ५० हजार रुपयांच्या वसुलीसाठी नगर जिल्ह्यातील श्रीगोंद्याच्या कर्मयोगी कुंडलिकराव जगताप (कुकडी) सहकारी साखर कारखान्याची जंगम, स्थावर मालमत्ता जप्त करण्याचे आदेश देण्यात आले आहे. यासाठी अहमदनगरचे जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांना प्राधिकृत करण्यात आले असल्याची माहिती समोर आली आहे. राज्याच्या साखर आयुक्तांनी ३१ मे रोजी कुकडी (कर्मयोगी कुंडलिकराव जगताप) कारखान्यासाठी हा आदेश दिला आहे. शेतकऱ्यांचे थकविलेले पैसे परत मिळावेत यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाने गेल्या तीन आठवड्यात कोणतीही पाऊले उचललेली नसल्याचे यासंबंधीचे वृत्त लोकसत्ताने दिले आहे. नियमानुसार उसाचे गाळप झाल्यानंतर १४ दिवसात शेतकऱ्यांना त्यांचे पेमेंट अदा करणे कारखान्यांवर बंधनकारक आहे.…
महायुती सरकारने भ्रष्टाचाराच्या सर्व सीमा ओलांडल्या, १०० टक्के कमीशनखोरी. महायुती सरकारच्या भ्रष्टाचारावर पावसाळी अधिवेशनात आवाज उठवणार शुक्रवार, दि २१ जून पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते ज्या अटल सेतुचे उद्घाटन करण्यात आले त्या रस्त्याला अवघ्या तीन महिन्यातच भेगा पडल्या आहेत. नवी मुंबईकडील एका भागात अर्धा किलोमीटरपर्यंत रस्ता एक फुट खाली खचला आहे. महायुती सरकारने भ्रष्टाचाराच्या सर्व सीमा ओलांडल्या आहेत. कर्नाटकातील आधीचे भाजपा सरकार ४० टक्के कमिशनवाले होते पण महायुती सरकार तर १०० टक्के कमीशनखोर आहे, असा गंभीर आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींबरोबर अटल सेतुची पाहणी करून रस्त्याला भेगा…
शुक्रवार, २१ जून दिल्ली दारू धोरणाशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना मोठा झटका बसला आहे. केजरीवाल यांच्या जामीन याचिकेवर दिल्ली उच्च न्यायालयाने सुनावणी होईपर्यंत कनिष्ठ न्यायालयाच्या आदेशाला स्थगिती दिली असल्याचे सांगितले. म्हणजेच हायकोर्टात सुनावणी होईपर्यंत केजरीवाल तिहार तुरुंगातून सुटणार नाहीत. अरविंद केजरीवाल यांच्या जामीनाविरोधात ईडीच्या याचिकेवर दिल्ली उच्च न्यायालयाने तातडीने सुनावणी घेण्याची परवानगी दिली. या खटल्याची सुनावणी होईपर्यंत खालच्या न्यायालयाचा आदेश प्रभावी ठरणार नाही, असे उच्च न्यायालयाने म्हटले आहे. उच्च न्यायालयात याचिका दाखल करताना ईडीने युक्तिवाद केला की, आम्हाला कनिष्ठ न्यायालयात आमचे म्हणणे मांडण्याची संधी मिळाली नाही. यावर उत्तर देताना केजरीवाल यांच्या वकिलाने असे म्हणणे योग्य नसल्याचे…
शुक्रवार, २१ जून अहमदनगर जिल्ह्यातील अंत्योदय व प्राधान्य कुटुंब योजनेतील लाभार्थ्यांनी रेशन घेण्यासाठी आपल्या रास्त भाव दुकानातून ३० जून पर्यंत ई-केवायसी करून घेण्याचे आवाहन अहमदनगरच्या जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांमार्फत करण्यात आले आहे. नगर जिल्ह्यात सार्वजनिक वितरण व्यवस्था अंतर्गत रास्त भाव दुकानामार्फत अंत्योदय व प्राधान्य कुटुंब लाभार्थ्यांना धान्याचे वितरण करण्यात येते. राज्य शासनाच्या निर्देशानुसार नगर जिल्ह्यातील २९ लाख ३४ हजार ४८५ लाभार्थ्यांचे ई-केवायसी आधार प्रमाणीकरण करणे बंधनकारक करण्यात आले आहे. अंत्योदय व प्राधान्य कुटुंब योजनेतील लाभार्थ्यांच्या शिधापत्रिकेसोबत संलग्न करण्यात आलेले आधार क्रमांक बरोबर असल्याचे तसेच शिधापत्रिकेमध्ये नमुद असलेल्या व्यक्ती त्याच आहेत, याची खात्री करण्यासाठी ई-केवायसी प्रणाली उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्याव्दारे…
शुक्रवार, २१ जून बीड लोकसभा मतदारसंघातून झालेल्या पराभवानंतर भाजपाच्या माजी मंत्री पंकजा मुंडे यांना राज्यसभेवर घेण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या गोटात हालचाली सुरू असल्याचे वृत्त आहे. असे झाले तर अनेकदा डावलल्या गेलेल्या मुंडे आणि त्यांच्या समर्थकांसाठी हा आनंदाचा धक्का असेल. दिल्लीत भाजप नेत्यांच्या झालेल्या बैठकीत मुंडे यांना राज्यसभेवर पाठविण्यासंदर्भात चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे. उदयनराजे भोसले आणि पियुष गोयल हे दोन सदस्य लोकसभा निवडणुकीत निवडून आल्याने राज्यसभेतील त्यांच्या जागा व्यक्त झाल्या आहेत. यातील एका जागेवर मुंडे यांना घेण्यासंदर्भात चर्चा सुरू आहे. मुंडे यांच्या लोकसभेतील पराभवानंतर त्यांच्या समर्थक कार्यकर्त्यांनी आत्महत्या करण्याचे प्रकार समोर आले आहेत. तसेच राज्यात सध्या मराठा विरुद्ध ओबीसी…
शुक्रवार, २१ जून नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकी पाठोपाठ निवडणूक प्रक्रिया सुरू असलेल्या राज्यातील ८३०५ सहकारी संस्थांच्या निवडणुका राज्य सरकारने सप्टेंबर अखेर पुढे ढकलल्या आहेत. या अगोदरही वेगवेगळ्या कारणाने सहकारी संस्थांच्या निवडणूका पुढे ढकलण्यात आल्या होत्या. २०२४-२०२५ या वर्षात राज्यातील २४७१० सहकारी संस्थांची निवडणूक प्रलंबित असून त्यापैकी राज्यातील ८३०५ सहकारी संस्थांची निवडणूक प्रक्रिया सुरू आहे. मात्र राज्य सरकारने पावसाळ्यामुळे या निवडणुका ३० सप्टेंबर २०२४ पर्यंत पुढे ढकलण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. याबाबतचा आदेश राज्य शासनाने जारी केला आहे. गुरुवारी (२० जून) सरकारने काढलेल्या या आदेशात म्हटले आहे की, हवामान विभागाने २०२४ मध्ये सर्वसाधारण पावसाचा अंदाज वर्तविला आहे. मदत व पुनर्वसन विभागाकडून…
गुरुवार, २० जून कथित मद्य घोटाळ्याप्रकरणाशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी दिल्लीच्या राऊज ऍव्हेन्यू न्यायालयाने मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना दिलासा दिला आहे. केजरीवाल यांना जामीन मंजूर करण्यात आला असून त्यांच्या जमीन आला स्थगिती देण्याची ईडीची याचिका न्यायालयाने फेटाळून लावल्याने केजरीवाल यांची शुक्रवारी तिहारमधून सुटका होईल. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी केजरीवाल्यांना सर्वोच्च न्यायालयाने २१ दिवसांसाठी जामीन दिला होता. वैद्यकीय कारणावरून केजरीवाल यांनी जामीन वाढ करून देण्याची मागणी मात्र न्यायालयाने फेटाळून लावली होती. त्यांना २ जून रोजी सरेंडर करण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते. सरेंडर झाल्यापासून ते तिहार तुरुंगात होते. यानंतर पुन्हा त्यांनी राउज एवेन्यू न्यायालयांत जामिनासाठी याचिका दाखल केली होती. त्यावरील सुनावणी दरम्यान गुरुवारी…
गुरुवार, २० जून दोन मुलांचा शेततळ्यात टाकून खून केल्याप्रकरणी पोलिसांनी या मुलांच्या आईसह तिच्या प्रियकराला अटक केली असून दोन्ही आरोपींना न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. कविता सारंगधर पावसे व सचिन बाबाजी गाडे अशी पोलिसांनी अटक केलेल्या दोन्ही आरोपींची नावे आहेत. तब्बल दोन महिन्यानंतर या खून प्रकरणाला वाचा फुटली आहे. स्थानिक ग्रामस्थांनी पोलीस यंत्रणेवर आंदोलनाच्या माध्यमातून दबाव वाढविल्यानंतर पोलिसांनी याप्रकरणी तपास करत प्रत्यक्षदर्शीच्या फिर्यादीवरून खुनाचा गुन्हा दाखल केला असल्याची माहिती मिळते. संगमनेर तालुक्यातील हिवरगाव पावसा येथे राम नवमीच्या दिवशी १७ एप्रिल रोजी शेततळ्यात दोन शाळकरी मुलांचा मृतदेह आढळून आला होता. याप्रकरणी संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात…
गुरुवार, २० जून मेडिकल शिक्षणाच्या प्रवेशासाठी अनिवार्य असलेल्या नीट- २०२४ या परीक्षेमध्ये मोठा गैरप्रकार झाला असून भाजपशासित राज्यातील विद्यार्थ्यांना ग्रेसमार्क देण्यात आले आहे. यामुळे प्रामाणिक व पात्र विद्यार्थ्यांवर मोठा अन्याय झाला असून या विरोधात युवक काँग्रेसच्या अध्यक्ष डॉ. जयश्रीताई थोरात यांच्या नेतृत्वाखाली संगमनेर तालुका युवक काँग्रेसच्यावतीने निदर्शने करण्यात आली असून दोषींवर कारवाई करावी, या मागणीचे निवेदन देण्यात आले. काँग्रेस पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या यशोधन जनसंपर्क कार्यालयात संगमनेर तालुका युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. यावेळी विविध परीक्षांमधील गोंधळ, नीट परीक्षेतील गैरप्रकार, नुकतीच रद्द झालेली यूजीसीची-नेट परीक्षा, याचबरोबर पोलीसभरतीसह इतर स्पर्धा परीक्षांमधील गैरप्रकाराबाबत तरुणांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. यानंतर प्रांताधिकारी…
