Author: अनंत पांगारकर

शनिवार, दि. १ जून नाशिकच्या विभागीय महसूल आयुक्तपदी बदली होताच डॉ. प्रवीण गेडाम यांनी महसूल आयुक्त पदाचा कार्यभार मावळते आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्याकडून स्वीकारला. गेडाम आता नाशिकचे नवे महसूल आयुक्त असतील. गमे सेवानिवृत्त झाल्याने त्यांच्या रिक्त होणाऱ्या जागेवर राज्य शासनाने गेडाम यांची नियुक्ती केली. यापूर्वी नाशिकमध्ये महापालिका आयुक्त राहिलेले गेडा म सध्या कृषी आयुक्त म्हणून कार्यरत होते. डॉ. गेडाम राज्यात कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून परिचित आहे. राज्यभरात गाजलेला जळगावचा घरकुल घोटाळा गेडाम यांनी बाहेर काढला होता. याच प्रकरणात माजी आमदार सुरेश जैन यांच्यासह अन्य बड्या राजकीय नेत्यांना तुरुंगवास भोगावा लागला होता. गेडाम यांच्या अगदी सुरुवातीच्या काळात त्यांनी संगमनेर नगर परिषदेत मुख्याधिकारीपदाचा…

Read More

शुक्रवार, दि. ३१ मे  शिक्षक हे देशाचा कणा आहेत. ते राष्ट्र जडणघडण करण्यात मोलाचे योगदान देतात. मात्र विविध प्रश्नांच्या विळख्यात पिढी घडवणारे गुरुजन अडकून पडले असताना त्यांना योग्य तो न्याय मिळावा, यासाठी मला अनेकांनी मागणी केल्यानंतर विधानपरिषद लढवण्याचा मी निर्णय घेतला आहे. अनेक शिक्षक संघटना, पाच जिल्ह्यातील शिक्षक संस्थाचालक यांच्याशी संवाद साधल्यानंतर आपल्याला सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याचा विश्वास नाशिक शिक्षक मतदार संघातील अपक्ष उमेदवार विवेक कोल्हे यांनी व्यक्त केला. माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या सोबतीने गणेश कारखाना निवडणुकीच्या माध्यमातून मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पॅनलचा पराभव करत राज्याला परिचित झालेल्या माजी मंत्री स्वर्गीय शंकरराव कोल्हे यांचे नातू, माजी आमदार स्नेहलता…

Read More

शुक्रवार, दि. ३१ मे  गेल्या आठवड्यात २८ हजार रुपयांची लाच घेताना पकडलेल्या कार्यकारी अभियंत्याच्या नावावर असलेल्या बँकेच्या लॉकरमध्ये लाच लुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांना आज मोठे घबाड आढळून आले. चिंचोटी तलावातील बुडीत क्षेत्रातील गाळ व माती शेतात टाकण्याकरिता परवानगी मिळण्यासाठी माजलगाव, परळी वैजनाथ येथील कार्यकारी अभियंत्याला सात शेतकऱ्यांनी विनंती अर्ज दिला होता. या शेतकऱ्यांना गाळ व माती त्यांच्या शेतात टाकण्यासाठी परवानगी देण्यासाठी प्रत्येकी पाच हजार रुपयांप्रमाणे पस्तीस हजार रुपयांची लाच घेताना गेल्या आठवड्यात तक्रारदाराकडून दि. २२ मे रोजी कार्यकारी अभियंता राजेश आनंदराव सलगरकर याला बीडच्या लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी पकडले होते. पोलीस निरीक्षक युनूस शेख यांच्या पथकाने ही कारवाई केली होती. त्यानंतर लाच…

Read More

शुक्रवार, दि. ३१ मे नाशिक विभागाच्या शिक्षक मतदार संघाच्या निवडणूक प्रक्रियेला शुक्रवारी सुरुवात झाली. या निवडणुकीसाठी पहिल्याच दिवशी नगर जिल्ह्यातील दोघा उमेदवारांनी तीन उमेदवारी अर्ज दाखल केले आहे. कोपरगावच्या भाजपच्या माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांचे चिरंजीव विवेक बिपिनदादा कोल्हे यांनी दोन अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केले. याशिवाय डॉ. छगन भिकाजी पानसरे यांनी देखील हिंदुस्तान जनता पार्टी कडून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. विधान परिषदेच्या नाशिकसह चार जागांसाठी २६ जून रोजी निवडणूक होत आहे. या निवडणुकीसाठी ७ जूनपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेला आजपासून सुरुवात झाली. १० जून रोजी दाखल उमेदवारी अर्जांची छाननी होणार असून…

Read More

शुक्रवार, दि. ३१ मे  नाशिकच्या विभागीय महसूल आयुक्तपदी राज्य शासनाने डॉ. प्रवीण गेडाम यांची नियुक्ती केली आहे. अपर मुख्य सचिव राजगोपाल देवरा यांनी गेडाम यांच्या नियुक्तीचे आदेश काढले असून तातडीने पदभार स्वीकारण्यास सांगितले आहे. नाशिकचे महसूल आयुक्त राधाकृष्ण गमे शुक्रवारी (३१ मे) सेवानिवृत्त झाले. त्यांच्या रिक्त जागेवर गेडाम यांची नियुक्ती करण्यात आली आहे. कडक शिस्तीचे आणि खमके अधिकारी म्हणून डॉ. गेडाम सर्वपरिचित आहेत. अहमदनगर, नासिक, नंदुरबार, धुळे आणि जळगाव या जिल्ह्यांचा कार्यभार डॉ. गेडाम यांच्याकडे असेल. गेडाम यांच्याकडे सध्या कृषी विभागाच्या आयुक्तपदाचा पदभार होता. तर सुरुवातीच्या काळात काही काळ त्यांनी संगमनेर नगर परिषदेचे मुख्याधिकारी म्हणून देखील काम पाहिले. त्यांचा कार्यकाल…

Read More

शुक्रवार, दि. ३१ मे  तक्रारदाराविरुद्ध असलेल्या तक्रार अर्जाची चौकशी करून कारवाई न करण्यासाठी लाचेची मागणी करणारा शेवगाव पोलीस ठाण्यातील पोलीस हेड कॉन्स्टेबल लाचेच्या सापळ्यात अडकला असून त्याच्याविरुद्ध शेवगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अहमदनगर लाचलुचपत विभागाने ही कारवाई केली असून पांडुरंग बाबुराव वीर असे गुन्हा दाखल झालेल्या पोलीस हेड कॉन्स्टेबलचे नाव आहे. वीर याच्याविरुद्ध श्रीरामपूर तालुक्यातील टाकळीभान येथील व्यक्तीने लाचलुचपत विभागाकडे तक्रार केली होती. तक्रारदाराविरुद्ध शेवगाव पोलीस ठाण्यात असलेल्या तक्रार अर्जाची चौकशी करून कारवाई न करण्यासाठी शेवगाव पोलीस ठाण्यातील पोलीस हेड कॉन्स्टेबल वीर यांनी पाच ते दहा हजार रुपये लाचेची मागणी केली होती. त्यामुळे तक्रारदाराने लाच लुचपतकडे ११…

Read More

शुक्रवार, दि. ३१ मे अल्पवयीन मुलीवर सार्वजनिक शौचालयात बलात्कार करणाऱ्या दोघा नराधमांना जिल्हा व सत्र न्यायाधीश मलकापट्टी रेड्डी यांनी २० वर्षे सश्रम कारावास व ४५ हजारांचा दंड अशी शिक्षा सुनावली. वसंत तुकाराम गांगोडे (वय ३५), हरिदास ऊर्फ सोनू पांडुरंग राऊत (२०) अशी शिक्षा झालेल्या आरोपींची नावे आहेत. नाशिकच्या गंगापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत २०१९ मध्ये ही घटना घडली होती. आरोपी गांगोडे व राऊत यांनी एका अल्पवयीन मुलीला सार्वजनिक शौचालयात एकटे गाठले होते. नैसर्गिक विधीसाठी ती शौचालयात गेली असता गांगोडे याने आतमध्ये जाऊन कडी लावून घेत बळजबरीने अत्याचार केले होते. तसेच राऊत याने पीडितेसोबत तिच्या राहत्या जाऊन अत्याचार केला होता. याप्रकरणी गंगापूर…

Read More

शुक्रवार, दि. ३१ मे गेल्या काही दिवसांपासून पुण्यातील ससून सर्वोपचार रुग्णालय येथील गैरव्यवहारामुळे चर्चेत आले आहे. त्यातच आता या रुग्णालयासंदर्भात धक्कादायक बाब समोर आली आहे. राज्यातील सरकारी रुग्णालयातील सर्वाधिक मृत्यू या रुग्णालयात गेल्या वर्षभरात झाले असून या रुग्णालयात दिवसाला सरासरी २४ रुग्णांचा मृत्यू होत असल्याचे समोर आले आहे. ललित पाटील, अग्रवाल प्रकरणानंतर ससून रुग्णालय चर्चेत आले आहे. या रुग्णालयात गैरप्रकार वाढत असून प्रशासनाचे रुग्णसेवेकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसते. राज्यातील सरकारी रुग्णालयांत गेल्या वर्षी झालेल्या रुग्णांच्या मृत्यूची आकडेवारी माहिती अधिकारांतर्गत सामाजिक कार्यकर्ते संतोष घोलप यांनी मागविली होती. त्याला सार्वजनिक आरोग्य विभागाने उत्तर दिले आहे. त्यात २०२३ मध्ये सर्व सरकारी रुग्णालयांत झालेल्या…

Read More

गुरुवार, दि. ३० मे  पुण्याचे काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर आणि शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांना राज्य उत्पादन शुल्क विभागाचे मंत्री शंभूराजे देसाई यांनी अब्रू नुकसानीची नोटीस बजावली आहे. कल्याणीनगर पोर्शे कार अपघातानंतर आक्रमक झालेल्या आमदार रवींद्र धंगेकर यांनी सर्वच विभागांची पोलखोल करण्यास सुरुवात केली आहे. पुण्यातले बेकायदेशीर आणि बार विरोधात कारवाईची मागणी करत या विभागाच्या अधिकाऱ्यांच्या हप्त्याचे रेट कार्ड समोर आणि धंगेकर आणि सुषमा अंधारे यांनी आंदोलन केलं होतं. राज्य शुल्क विभागाचे मंत्री शंभुराज देसाई यांचा फोटो असलेल्या एका खोक्यावर ५० खोके असं लिहिलं होतं. यासोबत ५०० रूपयांच्या बनावट नोटा घेऊन घोषणा दिल्या. या दोन्ही नेत्यांनी पुण्यात केलेल्या…

Read More

गुरुवार, दि. ३० मे  काँग्रेस खासदार शशी थरूर यांच्या पीएला सोने तस्करी प्रकरणी अटक करण्यात आली आहे. दिल्ली कस्टमने इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर ही कारवाई केली. काँग्रेस नेत्याच्या पीएकडून सोने तस्करीचा हा प्रकार समोर आल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. दिल्ली विमानतळावरील कस्टम विभागाने शशी थरूर यांचे पीए शिवकुमार यांना सोन्याच्या तस्करी प्रकरणी अटक केली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार शिवकुमार हा इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर एका माणसाकडून परदेशातून आणलेले सोने हस्तांतरित करत असताना कस्टमने बुधवारी ही कारवाई केली. शिवकुमार यांच्याकडून जप्त करण्यात आलेल्या सोन्याची किंमत तीस लाख रुपये आहे. तो दुबईहून दिल्लीत आला असून कस्टमचे अधिकारी त्याची चौकशी करत आहे.

Read More