Author: अनंत पांगारकर

सोमवार, २९ जुलै  शेतामध्ये गवत कापत असताना दबा धरून बसलेल्या बिबट्याने वयोवृद्ध महिलेवर हल्ला करत तिला शेतात ओढून नेत असताना नातवाच्या हा प्रकार लक्षात आल्याने बिबट्याच्या मागे धाव घेत बिबट्याच्या तावडीतून त्याने आजीचा जीव वाचविण्याची घटना समोर आली. दरम्यान बिबट्याच्या हल्ल्यात गंभीर जखमी महिलेवर संगमनेरमधील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. संगमनेर तालुक्यातील देवगाव गावामध्ये ही घटना रविवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास घडली. भिमाबाई लक्ष्मण लामखडे (वय ७५, रा. देवगाव, संगमनेर) असे बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या वयोवृद्ध महिलेचे नाव आहे. सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास भीमाबाई लामखडे आपल्या शेतामध्ये गवताची कापणी करत होत्या. यावेळी जवळच बिबट्या दबा धरून बसला होता. जवळ असलेला…

Read More

रविवार, २८ जुलै मुंबई – नुकत्याच निवडून आलेल्या विधान परिषदेच्या ११ जागांवरील नवनिर्वाचित सदस्यांना विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आज रविवारी (२८ जुलै) विधान परिषद सदस्यत्वाची शपथ दिली. नवनिर्वाचित सदस्यांमध्ये भारतीय जनता पक्षाचे पाच, शिवसेनेचे दोन, राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार) दोन काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या प्रत्येकी एक आमदाराचा समावेश आहे. निवडून आलेल्या योगेश टिळेकर, पंकजा मुंडे, परिणय फुके, अमित गोरखे, सदाभाऊ खोत, भावना गवळी, कृपाल तुमाने, शिवाजीराव गर्जे, राजेश विटेकर, मिलिंद नार्वेकर, प्रज्ञा सातव यांचा शपथ घेणाऱ्या सदस्यात समावेश आहे. विधानपरिषदेच्या ११ जागांसाठी १२ जुलै रोजी मतदान पार पडले होते. निवडून आलेल्या या सर्व सदस्यांना…

Read More

रविवार, २८ जुलै संगमनेर – केंद्रातील भाजप सरकारने स्वायत्त असलेल्या ईडी, सीबीआयसारख्या संस्था आपल्या गुलाम बनविल्या. दबावाचे राजकारण सुरू केले. देशात महागाई, बेरोजगारी वाढीस लागले असून शेतकरी, कामगार, सर्वसामान्य माणूस अडचणीत आला असताना त्याकडे सरकारने लक्ष दिले नाही. प्रचंड जातीभेद आणि घमेंड असलेल्या केंद्रातील भाजप सरकारला रोखण्याचे काम महाराष्ट्रातील महाविकास आघाडी आणि येथील जनतेने केले आहे. संगमनेर तालुक्यातील चंदनपुरी येथे आमदार थोरात यांच्या प्रयत्नातून ५ कोटी २७ लाख रुपये निधीच्या विविध विकास कामांचा शुभारंभ थोरात यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी खासदार भाऊसाहेब वाकचौरे होते. यावेळी नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजित तांबे, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे,…

Read More

रविवार, २८ जुलै मुंबई – शिळफाटा येथील एका मंदिरात आश्रयासाठी गेलेल्या महिलेवर सामूहिक अत्याचार करून तिची हत्या केल्याच्या घटनेचा तपास जलदगतीने करण्यात येणार आहे. दोशींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी यासाठी कार्यवाही करत हा खटला फास्टट्रॅक कोर्टात चालविण्यात येणार असून विशेष सरकारी वकील म्हणून या खटल्यात उज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात यावी, अशा सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी ठाणे नवी मुंबई पोलीस आयुक्त आणि गृह विभागाचे प्रधान सचिव यांना दिल्या आहे. ही अत्यंत गंभीर घटना असून याप्रकरणी ठाणे आणि नवी मुंबई पोलीसांकडे एफआयआर दाखल करण्यात आला आहे. घटना शिळफाटा, ठाणे येथे घडली असून तेथील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला…

Read More

रविवार, २८ जुलै  स्थानिक नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या आणि घंटागाडीवर घरोघर जात कचरा गोळा करण्याचे काम करणाऱ्या कामगारांच्या प्रश्नी ठेकेदार आणि संगमनेर नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांकडून दुर्लक्ष होत असल्याने स्थानिक नागरिकांसह १५ ऑगस्टच्या स्वातंत्र्य दिन कार्यक्रमात काळे झेंडे दाखविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. संगमनेर शहर व उपनगरातील कचरा उचलणाऱ्या ठेकेदार कंपनीने “स्वच्छ संगमनेर सुंदर संगमनेर” या ब्रीद वाक्याची पूरती वाट लावली आहे. या कंपनीशी संलग्न असलेल्या घंटा गाडीवरील कचरा गोळा करणारा कामगारांच्या उघड्यावरच निर्माण केलेल्या वस्तीमुळे या कामगार, त्यांच्या कुटुंबीयांसह स्थानिक नागरिकांचे आरोग्य धोक्यात येण्याची चिन्हे निर्माण झाली आहे. वारंवार निवेदने देऊन तक्रारी करून देखील संगमनेर नगरपालिकेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी राहुल वाघ…

Read More

रविवार, २८ जुलै  नवी दिल्ली : शनिवारी मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास दहा राज्ये तसेच केंद्रशासित प्रदेशांच्या राज्यपालांच्या बदल्या तसेच नियुक्त्यांचे वृत्त जारी करण्यात आले. गेल्या पाच वर्षात महाराष्ट्राला तिसऱ्यांदा नवे राज्यपाल मिळाले आहे. महाराष्ट्राच्या राज्यपालपदी सी. पी. राधाकृष्णन यांची नियुक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेते हरिभाऊ बागडे यांची राजस्थानच्या राज्यपालपदी नियुक्ती झाली. राष्ट्रपती भवनाकडून याविषयी परिपत्रक प्रसिद्धीस देण्यात आले. त्यानुसार संबंधित नेत्यांनी पदभार स्वीकारल्याच्या तारखेपासून या नियुक्त्या लागू होतील. राधाकृष्णन सध्या झारखंडचे राज्यपाल आहेत. त्यांच्या जागी संतोषकुमार गंगवार यांच्याकडे जबाबदारी सोपविण्यात येईल. तमिळनाडूचे ६७ वर्षीय राधाकृष्णन भाजपचे नेते आहेत. त्यांचा जन्म चार मे १९५७ रोजी तिरुपूरमध्ये झाला. वयाच्या १६…

Read More

             दुसर्‍यावर आरोप करणारा आपण किती पाण्यात आहोत, याचा विचार कधीच करत नसतो. नैतिकता गुंडाळलेल्यांकडून तर याची अपेक्षाही नसते. तेव्हा अमित शहा आणि त्यांच्या कंपुतली माणसं कोणावर काय टीका आणि आरोप करतात याकडे पाहावं अशी परिस्थिती नाही. मात्र यामुळे परिस्थिती बिकट बनते, अनेकांच्या भावना दुखावतात, मनं विस्कळीत होतात, असं होणं हेही अयोग्यच. म्हणूनच अशा बावळट आणि अहंकार्‍यांचा समाचार घेणं अगत्याचं ठरतं. गेल्या रविवारी भाजपचे ज्येष्ठ नेते आणि देशाचे गृहमंत्री अमित शहा पुण्यात येऊन गेले. लोकसभा निवडणुकीत सपाटून आपटलेल्या भाजपच्या पदाधिकार्‍यांना जागं करण्यासाठी पक्षाने पुण्यात कानफुंकणीचा कार्यक्रम ठेवला होता. या कार्यक्रमात विरोधकांवर मनसोक्त टीका करून शहांपासून…

Read More

रविवार, २८ जुलै – अहमदनगर  जीवन एक तडजोड आहे. आपल्या आयुष्यात प्रत्येकाने तडजोड करायला शिकले पाहिजे. आप आपसात तडजोड करून जास्तीत जास्त वादातील प्रकरणी मिटविले पाहिजे. लोक अदालत मध्ये ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, महसूल, वीज वितरण, बँका, पतसंस्था, इन्शुरन्स कंपनीचा सहभाग असतो. त्यामुळे लोक अदालत हा एक महायज्ञ असून त्यामध्ये प्रत्येकाने आपले योगदान दिले पाहिजे, असे प्रतिपादन अहमदनगरचे प्रमुख जिल्हा न्यायाधीश सुधाकर यार्लगड्डा यांनी केले. जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, अहमदनगर बार असोसिएशन आणि सेंट्रल बँक असोसिएशनच्यावतीने शनिवारी (२७ जुलै) आयोजित केलेल्या लोक अदालतीचे उद्घाटन न्यायाधीश सुधाकर यार्लगड्डा यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र पाटील, अतिरिक्त पोलीस…

Read More

शनिवार, २७ जुलै  पर्यावरण संवर्धनाचे महत्त्वाचे काम दंडकारण्य अभियानाच्या माध्यमातून संगमनेरमध्ये सुरू आहे. थोर स्वातंत्र्य सेनानी सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या या कामाची दखल काही वर्षांपूर्वी आंतरराष्ट्रीय पातळीवर युनोस्कोत घेतली गेली असून तालुक्यात वृक्षांची संख्या वाढली असल्याचे प्रतिपादन काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी केले. एसएमबीटी सेवाभावी ट्रस्ट, युवक काँग्रेस आणि कऱ्हे ग्रामस्थांच्यावतीने संगमनेरजवळ नाशिक-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील कऱ्हे घाटामध्ये शनिवारी थोरात यांच्या उपस्थितीत वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, दुर्गाताई तांबे, डॉ. जयश्री थोरात आदींसह विविध संस्थांचे पदाधिकारी, काँग्रेसचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. थोरात म्हणाले, स्वर्गीय भाऊसाहेब थोरात…

Read More

शनिवार, २७ जुलै  एक लाख रुपयांच्या वैयक्तिक जात मुचलक्यावर तीन महिन्यांसाठी तात्पुरत्या स्वरूपात जामीन मिळालेल्या नगर अर्बन बँकेचा कर्जदार संगमनेरमधील उद्योजक अमित पंडितने अखेर न्यायालयात कबूल केल्याप्रमाणे थकीत कर्जापोटी १० कोटी ६४ लाख रुपये बँकेत जमा केल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे पंडितला नियमित जामीन मिळण्याचा मार्ग मोकळा झाल्याचे मानले जात असून पत्नी, मुलगा आणि भागीदाराच्या जामीन अर्जावर उच्च न्यायालय काय निर्णय घेते याकडे लक्ष लागले आहे. नगर अर्बन बँकेतील बड्या कर्जदारांमध्ये अमित पंडितचा समावेश आहे. संगमनेरच्या सहकारातील सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी अमृतवाहिनी बँकेचा अनेक वर्ष अध्यक्ष असलेल्या अमित पंडितचे नाव नगर अर्बन बँकेच्या फॉरेन्सिक ऑडिट नंतर आरोपींमध्ये समोर…

Read More