Author: अनंत पांगारकर
गुरुवार १८ जुलै शेत जमिनीचा फेरफार मंडल निरीक्षकांना सांगून प्रतिवादीच्या नावावर न करण्यासाठी पाच हजार रुपयांची लाच घेणे तलाठ्याच्या अंगलट आले आहे. अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयात तलाठ्याविरुद्ध आरोप सिद्ध झाल्याने न्यायालयाने विविध कलमांतर्गत अनुक्रमे तीन व दोन वर्ष कारावासाची आणि दंडाची शिक्षा ठोठावली आहे. उत्तमराव पांडुरंग तांबे असे शिक्षा झालेल्या तलाठ्याचे नाव असून त्याच्या विरोधात उस्मानाबाद ग्रामीण पोलीस ठाण्यात गु.र.नं. १८/२०११ कलम ७, १३(१)(ड) सह १३(२) ला.प्र. अधिनियम, सन १९८८ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. लाच लुचपत विभागाच्या तत्कालीन पोलीस निरीक्षक श्रीमती अश्विनी भोसले यांनी या प्रकरणाचा तपास करत न्यायालयात आरोपी विरुद्ध आरोप पत्र दाखल केले होते. या…
गुरुवार, १८ जुलै अवैध धंद्यांवर कारवाईचा थातूरमातूर फार्स करणाऱ्या संगमनेर पोलिसांनी केलेल्या दोन कारवाया चर्चेचा विषय ठरल्या आहे. शहर पोलिसांनी दोघा गांजा ओढणाऱ्यांवर गुन्हा दाखल केला आहे. गांजा ओढणारे पोलिसांना सापडतात मात्र विकणारे पोलिसांना सापडत नाहीत याबाबत आश्चर्य व्यक्त होत आहे. सार्वजनिक ठिकाणी अमली पदार्थ असलेल्या गांजाचे सेवन केल्याच्या कारणावरून पांडुरंग सावळीराम अस्वले (वय ४९ वर्ष नॅशनल शाळेजवळ, कोल्हेवाडी रोड, संगमनेर) आणि राजेश सोमनाथ दिघे (वय २९ वर्ष, शिवरामनगर, कासारवाडी रोड, संगमनेर) अशी गुन्हा दाखल झालेल्या दोघा आरोपींची नावे आहे. या दोघांविरोधात अनुक्रमे पोलीस कॉन्स्टेबल विशाल रामदास कर्पे आणि पोलीस कॉन्स्टेबल रोहिदास धर्मनाथ शिरसाठ यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुंगीकारक औषधी द्रव्य…
लाडक्या बहिणींनंतर लाडक्या भावासाठी सरकारची स्टायपेंड, सात लाख कोटींच्या कर्जानंतर पैसा आणणार कुठून?
विशेष प्रतिनिधी / मुंबई ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण’ योजनेच्या पाठोपाठ मुख्यमंत्र्यांनी आता ‘लाडका भाऊ योजने’ची घोषणा केलीय. मात्र ‘लाडका भाऊ योजने’मुळे राज्याच्या तिजोरीवर अतिरिक्त बोजा वाढणार असल्याचं सांगितलं जात आहे. महाराष्ट्र विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात राज्य सरकारने राज्यातील महिलांसाठी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजना आणली. राज्यभरातून या योजनेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. तर गाव-खेड्यात या योजनेचा अर्ज दखल करण्यासाठी महिलांची गर्दी पाहायला मिळत आहे. या योजनाची राज्यभरात सर्वत्र जोरदार चर्चा सुरू असताना, आता विद्यार्थ्यांसाठी ‘लाडका भाऊ’ योजना राज्य सरकारनं आणली आहे. या योजनेची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंढरपूर येथे केली आहे. एकीकडे राज्याच्या तिजोरीत खडखडाट असताना आणि राज्यावर सात लाख हजार कोटी…
बुधवार, १७ जुलै पर्यावरण संवर्धन आणि वृक्षारोपण हे मानवतेचे काम आहे. ही वसुंधरा अधिक समृद्ध करण्यासाठी पर्यावरण व संवर्धनाच्या या लोक चळवळीत सर्वांनी सहभागी व्हावे, असे आवाहन करत सर्वांच्या सहभागामुळे दंडकारण्य अभियान ही पर्यावरण संवर्धनाची मोठी लोकचळवळ ठरली असल्याचे गौरवोद्गार माजी मंत्री, आमदार बाळासाहेब थोरात यांनी केले. स्वातंत्र्य सेनानी सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या दंडकारण्य अभियानाचा १९ व्या वर्षाचा शुभारंभ आज पेमगिरीच्या चंदनगड येथून थोरात यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी अभियानाचे मुख्य प्रवर्तक माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, दुर्गाताई तांबे, कॅन्सरतज्ञ डॉ. जयश्री थोरात, रणजीतसिंह देशमुख, कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर, अनिल थोरात, उपविभागीय वन अधिकारी संदीप पाटील,…
बुधवार,१७ जुलै भावाची मुलगी सून म्हणून घरात आणली. विवाह संबंधातून काही दिवसांनी ती गर्भवती राहिली. बाळंतपणासाठी तिला तीन-चार दिवसांपूर्वी लोणी येथील प्रवरा रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान तिला मुलगीदेखील झाली, मात्र त्यानंतर जे समोर आले त्यातून दोन्ही कुटुंबातील पाच जणांवर घारगाव पोलीस ठाण्यात बलात्कार, बालविवाह प्रतिबंधक कायदा आणि पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लोणी येथील रुग्णालयात बाळंतपणासाठी दाखल करतेवेळी दाखल केलेल्या कागदपत्र आणि इतर बाबींवरून गर्भवतीचे वय कमी असल्याचे व ती अल्पवयीन डॉक्टरांच्या लक्षात आले. ती अल्पवयीन असताना तिचा विवाह झाल्याचे डॉक्टरांच्या निदर्शनास आले त्यांनी ही बाब पोलिसांना कळविली. दरम्यानच्या काळात तिचे बाळंतपण होऊन तिला मुलगीदेखील झाली. या…
आषाढी एकादशी निमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते विठ्ठल- रुक्मिणीची महापूजा विठ्ठलाच्या दर्शनासाठी दर्शन मंडप व टोकन दर्शन पद्धत राबवण्यासाठी १०३ कोटीचा निधी मंजूर पंढरपूर येथे एक हजार बेडचे हॉस्पिटल निर्माण करण्याची घोषणा विठ्ठल रुक्मिणी मंदिर संवर्धनासाठी ७३ कोटी ८० लाखाच्या निधीतून उत्कृष्ट कामे सुरू बुधवार, १७ जुलै आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरचे वातावरण भक्तीमय झालेले असून सर्वजण पांडुरंगाच्या भक्तीमध्ये भान हरपून गेलेले आहेत. “हे बा… विठ्ठला माझ्या बळीराजाला सुखी ठेव, कष्टकऱ्यांच्या व सामान्यांच्या जीवनात समृद्धी येऊ दे, प्रत्येकाचे दुःख दूर कर” असे साकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विठ्ठलाच्या चरणी घातले. आषाढी एकादशी निमित्त श्री विठ्ठल रुक्मिणीची महापूजा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे…
बुधवार, १७ जुलै रस्त्यावर सार्वजनिक ठिकाणी व्यवसाय थाटून रहदारीस अडथळा निर्माण करणाऱ्या व्यावसायिकांवर संगमनेरमध्ये पोलिसांनी मोठ्या प्रमाणात गुन्हे दाखल केले आहेत. नव्याने आलेल्या भारतीय न्याय संहिता कायद्याच्या कलम २९३ अंतर्गत या कारवाया करण्यात आल्या आहे. या संदर्भात शहर पोलीस ठाण्यात पोलीस कॉन्स्टेबल अतुल दिनकर उंडे, पोलीस हेडकॉन्स्टेबल कानिफनाथ दत्तात्रय जाधव आदींनी दिलेल्या फिर्यादीवरून संगमनेरमधील मेनरोडवर, अशोक चौक, नवीन नगर रस्त्यावर सार्वजनिक ठिकाणी रस्त्यावर हातगाडी, दुकाने लावून रहदारीस अडथळा निर्माण करणाऱ्या, येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना उपद्रव होईल अशा प्रकारचे कृत्य करणाऱ्या पंधरा ते वीस व्यावसायिकांवर गुन्हे दाखल करण्यात आले. गेल्या आठवड्यात या कारवाया करण्यात आल्याचे समोर आले असले तरी रस्त्यावरील व्यावसायिकांच्या वाहतुकीला…
विशेष प्रतिनिधी / मुंबई उप मुख्यमंत्री अजित पवार, माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल, माजी मंत्री खा. सुनील तटकरे यांच्या बरोबरच आता राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनाही ३३ कोटी रुपयांच्या वृक्ष लागवडीच्या भ्रष्टाचार प्रकरणी क्लीनचिट देण्यात आली आहे. मुनगंटीवार यांना देण्यात आलेल्या क्लीनचिटमुळे शिंदे सरकारवर क्लीनचिट सरकार अशी शेरेबाजी केली जावू लागली आहे. राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना राज्यात राबवलेल्या महत्त्वाकांक्षी ३३ कोटी वृक्ष लागवड मोहिम प्रकरणात क्लीन चिट मिळाली आहे. कोणत्याही प्रकारची अनियमितता किंवा गैरव्यवहार न झाल्याचे समितीने स्पष्ट केलं आहे. सुधीर मुनगंटीवार यांना क्लीन चिट मिळाली असली तशीच याआधीही महायुतीतील अनेक नेत्यांना क्लीन चिट देण्यात आली आहे. राज्यात तत्कालीन…
मंगळवार १६ जुलै | अनंत पांगारकर दूधगंगा नागरी सहकारी पतसंस्थेतील सुमारे ८१ कोटी रुपयांचा अपहार प्रकरणातील मुख्य आरोपी राजकीय आसामी असलेला चेअरमन भाऊसाहेब कुटे याच्यासह व्यवस्थापक भाऊसाहेब गुंजाळ सध्या अटकेत आहेत. यातील भाऊसाहेब विठ्ठल गुंजाळ याला न्यायालयासमोर हजर करण्यासाठी जेल प्रशासनाला प्रोडक्शन वॉरंट काढण्यात आले आहे. पतसंस्थेतील या घोटाळ्याप्रकरणी चेअरमन असलेला कुटे अनेक महिने फरार होता. त्याच्या कुटुंबीयांना सर्वोच्च न्यायालयात दिलासा मिळाल्यानंतर तो स्वतःहून पोलिसात हजर झाला. तर या गुन्ह्यातील दुसरा प्रमुख आरोग्य पतसंस्थेचा व्यवस्थापक भाऊसाहेब गुंजाळ हा देखील गुन्हा दाखल झाल्यानंतर काही दिवसातच स्वतःहून पोलिसात हजर झाला होता. त्या वेळेपासून सध्या तो न्यायालयीन कोठडीत आहे. त्याच्यासह सहा जणांविरोधात न्यायालयात…
मंगळवार, १६ जुलै ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या संकल्पनेतून पर्यावरण संवर्धनासाठी सुरू झालेल्या दंडकारण्य अभियानाचा शुभारंभ यावर्षी संगमनेर तालुक्यातील पेमगिरी गावाच्या चंदनगड डोंगरावर बुधवारी (१७ जुलै) सकाळी नऊ वाजता होणार असल्याची माहिती प्रकल्प प्रमुख दुर्गाताई तांबे यांनी दिली. अभियानाचे यंदाचे १९ वे वर्ष आहे. काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते आमदार बाळासाहेब थोरात व माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्या उपस्थितीत हा शुभारंभ होत आहे. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी निसर्गाचे संवर्धन करणे प्रत्येकाची मुलभूत जबाबदारी बनली असून वृक्षारोपन व पर्यावरणाचे संवर्धन करणे भावी पिढयांसाठी काळाची गरज बनली आहे. आमदार बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली मागील १८ वर्षात तालुक्यातील विविध संस्था, विद्यालये, कार्यकर्ते…
