Author: अनंत पांगारकर
एखाद्याला अहंकार जडला की तो कोणाचेच ऐकण्याच्या मनस्थितीत नसतो. अशा व्यक्तीला ‘ग’ची बाधा झाली असं म्हणतात. सत्ताधारी भाजपच्या अनेकांना या बाधेने पछाडल्याने त्यांचे कान उपटून काहीही साध्य होणार नाही. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्रात सरकार बसलं खरं. पण त्याने मोदी आणि त्यांच्या पिळावलीशिवाय कोणीही समाधानी नाही, हेच आता सिध्द होतय. संघाचं मुखपत्र म्हणून ज्याची पूर्वांपार ओळख आहे त्या ‘ऑर्गनायझर’ या नियतकालिकाने मोदी आणि त्यांच्या वाचाळ नेत्यांचे ओढलेले कान हेच सांगताहेत. त्याआधी संघ सरसंचालक मोहन भागवत यांनी मोदी आणि त्यांच्या सत्ता परिवाराला असाच कानमंत्र दिला आणि असं वागणं नियतीला मान्य नाही, असं सांगून टाकलं. संघात सुरू असलेल्या खदखदीवरून मोदी आणि शहा…
शनिवार दिनांक १५ जून २०२४ संगमनेर शहरालगच्या कासारवाडी गावच्या शिवारात एका तीस वर्षीय महिलेचा मृतदेह संशयास्पद स्थितीत आढळून आला आहे. दरम्यान मृत महिलेची ओळख पटली असून तिचा घातपात असल्याचा संशय नातेवाईकांनी व्यक्त केला आहे. रंजना भिकाजी खेमनर (रा. अंभोरे, ता. संगमनेर) असे या मृतावस्थेत आढळलेल्या विवाहित महिलेचे नाव आहे. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे. मृतावस्थेत आढळून आलेली रंजना खेमनर ही महिला आपल्या सासूच्या डोळ्याचे ऑपरेशन करण्यासाठी तिच्या समवेत संगमनेरमध्ये आली होती. सासूसाठी जेवणाचा डबा आणण्याकरिता ती शुक्रवारी सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास रुग्णालयातून बाहेर पडली होती. रात्री उशिरा तिचा मृतदेह शहरालगतच्या कासारवाडी शिवारात आढळून आला. रुग्णालयात सासू जवळ विवाहिता नसल्याने…
शनिवार दिनांक १५ जून २०२४ शनिवारी दुपारी शेततळ्यात बुडून तीन शाळकरी मुलींचा मृत्यू झाल्याचे दुर्दैवी घटना समोर आली आहे. काही दिवसांपूर्वी संगमनेर तालुक्यातील हिवरगाव पावसा येथे दोघा भावंडांचा शेततळ्यात बुडून मृत्यू झाला होता. त्या पाठोपाठ आज पुन्हा दुसरी घटना तालुक्यात मेंढवन या गावात घडली आहे. अनुष्का सोमनाथ बडे (वय ११ वर्ष), सृष्टी उत्तम ठापसे (वय १३ वर्ष) आणि वैष्णवी अरुण जाधव (वय १२ वर्षे) अशी मृत झालेल्या तिन्ही मुलींची नावे आहेत. तिघीजणी शनिवारी दुपारी शाळेतून सुटल्यानंतर घरी आल्या होत्या. दुपारी जेवण करून त्या सोमनाथ बडे यांच्या शेतात असलेल्या शेततळ्याजवळ गेल्या होत्या. अर्धवट काम सुरू असलेल्या या शेततळ्यामध्ये पावसाचे पाणी साचले…
शनिवार, दिनांक १५ जून २०२४ लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने मोठे यश मिळविले असताना शिवसेना ठाकरे गटाची साथ सोडत माजी मंत्री जयप्रकाश मुंदडा यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटासाठी हा मोठा धक्का आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी शुक्रवारी (ता. १४) हा प्रवेश सोहळा पार पडला. हिंगोली विधानसभा मतदारसंघातून सलग चार वेळा निवडून आलेले जयप्रकाश मुंदडा हे काही काळ माजी सहकार राज्यमंत्री होते. मात्र गेल्या काही वर्षापासून पक्षात डावलले जात असल्याने ते नाराज होते. लोकसभा निवडणुकीतही पक्षातील कोणत्याही पदाधिकाऱ्यांनी, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी देखील आपलं ऐकून घेतलं नाही.…
शुक्रवार, दिनांक १४ जून २०२४ विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाची तारीख निश्चित झाली असून गुरुवार पासून (२७ जून) अधिवेशनाला प्रारंभ होणार आहे. ते पुढील महिन्याच्या शुक्रवारपर्यंत (१२ जुलै) चालणार आहे. तेरा दिवस चालणाऱ्या या अधिवेशनात राज्याचा अतिरिक्त अर्थसंकल्प देखील लगेचच २८ जून रोजी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात मांडण्यात येणार आहे. शनिवार २९ जून २०२४ सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी देखील विधिमंडळाचे कामकाज सुरू राहणार आहे. शुक्रवारी विधान भवनात विधानपरिषद आणि विधानसभा कामकाज सल्लागार समितीची बैठक पार पडली या बैठकीत अधिवेशनाच्या कामकाजाबाबत चर्चा करण्यात आली. बैठकीला विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ, उपमुख्यमंत्री देवेंद्र…
शुक्रवार, दिनांक १४ जून २०२४ अहमदनगरचे जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी जिल्हा महसूल स्थळ सीमेच्या हद्दीत महसूल पोलीस अधिनियमाच्या कलम ३७(१) व ३७(३) नुसार २८ जूनपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू केले आहेत. अहमदनगर जिल्ह्यात सार्वजनिक शांतता आणि सार्वजनिक सुरक्षितता राखण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी हा निर्णय घेतला आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या या आदेशानुसार १५ जून ते २८ जून या दरम्यान पुढील कृत्य करण्यास मनाई करण्यात आले आहे. शस्त्रे, मोटे, तलवारी, भाले, दंडुके, बंदुका, सुरे, काठ्या किंवा लाठ्या किंवा शारीरिक इजा करण्यासाठी वापरता येईल अशी कोणतीही वस्तू बरोबर नेणे. दगड किंवा इतर क्षेपणास्त्रे, किंवा क्षेपणास्त्रे सोडावयाची किंवा फेकावयाची उपकरणे किंवा साधने जवळ बाळगणे, जमा करणे. जाहीरपणे घोषणा देणे,…
शुक्रवार, दिनांक १४ जून २०२४ कॅफे आणि हॉटेलमध्ये नेत अत्याचार केल्याच्या घटना संगमनेरमध्ये समोर आल्या असतानाच आता श्रीरामपूरमधूनही अशीच संतापजनक घटना समोर आली आहे. एका सतरा वर्षीय विद्यार्थिनीच्या अज्ञानपणाचा गैरफायदा घेत कॅफे आणि हॉटेलमध्ये नेत तिच्यावर तिघा तरुणांनी अत्याचार केला. गुन्हा दाखल झाल्यानंतर तिन्ही संशयित आरोपी पसार झाले आहेत. एप्रिल २०२४ मध्ये ही घटना घडली. आरोपी हे विद्यार्थिनीचे परिचित असून शहरातील कॅफेमध्ये दोघा तरुणांनी विद्यार्थिनीवर अत्याचार केला. तर त्यानंतर तिला शिर्डी येथे नेण्यात आले. तेथेही तिच्यावर सामूहिक अत्याचार करण्यात आला. श्रीरामपूर शहरातील एका कॅफेत आणि शिर्डीतील एका हॉटेलमध्ये हा प्रकार घडल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी शहर पोलिसांनी तिघा तरुणांवर पोक्सो…
शुक्रवार, दिनांक १४ जून २०२५ तब्बल २९१ कोटी रुपयांच्या नगर अर्बन बँकेतील आर्थिक घोटाळ्याप्रकरणी नगरच्या आर्थिक गुन्हे शाखेने पुण्यातून बँकेच्या एका अधिकाऱ्याला ताब्यात घेतले आहे. राजेंद्र केशव डोळे (रा. सातारा) असे ताब्यात घेतलेल्या आरोपीचे नाव आहे. ताब्यात घेतलेल्या आरोपीकडून काय माहिती समोर येते हे लवकरच समजणार आहे. डोळे याला पुण्यातून गुरुवारी दुपारी ताब्यात घेण्यात आले असून रात्री उशिराने त्याला नगरमध्ये आणण्यात आले होते. आर्थिक घोटाळा प्रकरणी राजेंद्र गांधी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून व त्या पाठोपाठ आलेल्या फॉरेनसिक ऑडिटच्या अहवालानुसार आर्थिक गुन्हे शाखेकडून संशयित आरोपींची चौकशी सुरू आहे. यातील काही संचालक, अधिकारी व कर्जदारांना गुन्हे शाखेने अटक केली असून काही अधिकाऱ्यांचे जबाब…
शुक्रवार, दिनांक १४ जून २०२४ नगर अर्बन बँक आर्थिक घोटाळा प्रकरणी अहमदनगरच्या जिल्हा व सत्र न्यायालयाने गुरुवारी पाच कर्जदार आरोपींचे जामीन अर्ज फेटाळून लावले आहे. यात संगमनेरमधील तिघा जणांचा समावेश आहे. नगर पोलिसांनी यापूर्वी अटक केलेल्या व उच्च न्यायालयाने तात्पुरत्या स्वरूपात तीन महिन्यांच्या कालावधीसाठी जामीन मंजूर केलेल्या अमित पंडित याची पत्नी सपना पंडित, मुलगा सात्विक पंडित, भागीदार सत्येंद्र रावत यांच्यासह संजय सारडा व सुशील सारडा यांच्या जामीन अर्जावर विशेष न्यायालयाचे न्यायाधीश पी. आर. सित्रे यांच्यासमोर सुनावणी पार पडली होती. या संदर्भात न्यायाधीश सित्रे यांनी गुरुवारी (१३ जून) निर्णय देत पाचही आरोपींचे जामीन अर्ज फेटाळून लावले. ठेवीदार व तपास अधिकाऱ्यांसाठी ही…
नाशिक शिक्षक मतदार संघासाठी अहमदनगर जिल्ह्यात २० मतदान केंद्र, सर्वाधिक केंद्र संगमनेर, अहमदनगरमध्ये
गुरुवार, दिनांक १३ जून २०२४ नाशिक विभाग शिक्षक मतदार संघासाठी २६ जूनला मतदान होत आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने मान्यता दिलेल्या मतदान केंद्रातून शिक्षक मतदारांना मतदानाचा हक्क बजावता येणार आहे. त्यासाठी अहमदनगर जिल्ह्यात वीस मतदान केंद्र निर्माण करण्यात आल्याची माहिती निवडणूक शाखेचे तहसीलदार प्रदीप पाटील यांनी दिली आहे. सर्वाधिक प्रत्येकी तीन-तीन मतदान केंद्र संगमनेर आणि अहमदनगरमध्ये आहेत. या मतदान केंद्रात सकाळी सात ते सायंकाळी सहा या वेळेत मतदान पार पाडणार आहे. नाशिक विभाग शिक्षक मतदार संघातून २१ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले असून भाजपाचे विवेक कोल्हे आणि अजित पवार गटाचे महेंद्र भावसार यांचे अर्ज कायम राहिल्याने महायुतीत बिघाडी झाल्याचे बघावयास मिळाले. कोल्हे…
