Author: अनंत पांगारकर
मंगळवार दिनांक ४ जून शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे मतमोजणी सुरू असून शिर्डीतून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार भाऊसाहेब वाकचौरे १७३८४ मतांनी आघाडीवर असून त्यांना आणि त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार शिवसेना शिंदे गट सदाशिव लोखंडे यांच्यासह प्रमुख उमेदवारांना मिळालेली मते पुढील प्रमाणे…. (स्त्रोत केंद्रीय निवडणूक आयोग)
मंगळवार, दि. ४ जून गेल्या काही दिवसापासून लोकशाहीचा उत्सव असलेल्या लोकसभा निवडणुकीचे सातही टप्पे पार पडल्यानंतर लोकसभा निवडणुकीची मतमोजणी मंगळवारी सकाळी सुरू झाली आहे. मतमोजणीनंतर देशात सत्ता कोणाची हे स्पष्ट होणार आहे. लोकसभा निवडणुकीसाठी राज्यात महाविकास आघाडी व सत्ताधारी महायुतीमध्ये तर, देशात इंडिया व सत्ताधारी एनडीएमध्ये लढत झाली. लोकसभा निवडणुकीचे मतदान संपल्यानंतर त्या त्या मतदारसंघात राज्यात आणि देशात कोणाचे वारे होते याविषयी मतदारात चर्चा सुरू होती. दरम्यान देशातील सातवे टप्प्याचे मतदान संपल्यानंतर पाठोपाठ विविध सर्वेक्षणाचे एक्झिट पोल समोर आले. आज मात्र या एक्झिट पोलसह सर्वच उमेदवारांचे परीक्षा होणार असून त्याचे निकाले लगेच समोर येणार आहेत. एक्झिट पोल किती खरे किती…
सोमवार, दि. ३ जून मंगळवारी लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होत आहे. या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासन अलर्ट मोडवर आले असून दोन दिवसांसाठी व्हाट्सअप ग्रुपचे सेटिंग ‘Only admin’ करण्याची नोटीस पोलीस प्रशासनाने काढली असून व्हाट्सअप ग्रुपच्या माध्यमातून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवल्यास संबंधित ग्रुपच्या ॲडमिनवर देखील कारवाई केली जाणार आहे. भारतीय दंड विधान संहिता व माहिती तंत्रज्ञान कायद्याअंतर्गत संबंधितांवर कठोर कारवाई होऊ शकते, असा इशारा संगमनेर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांनी दिला आहे. गेल्या काही दिवसात व्हाट्सअप ग्रुपच्या माध्यमातून राजकीय पक्षाच्या नेत्यांवर विविध प्रकारे खालच्या पातळीवर टीकाटिप्पणी सुरू आहे. संगमनेरमध्येदेखील अशा टीकाटिप्पणीतून वाद उद्भवल्याने संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात…
सोमवार, दि. ३ जून नाशिक विभागाच्या शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीसाठी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे बंधू डॉ. राजेंद्र एकनाथराव विखे पाटील यांनी सोमवारी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यामुळे या मतदारसंघात आता एकूण पाच उमेदवारांचे अर्ज दाखल झाले आहेत. भाजप नेते विवेक कोल्हे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करत या मतदारसंघात वेगळी लढत करण्याचे संकेत दिले. कोल्हे यांच्यासह आता भाजपाच्या महसूलमंत्र्यांच्या बंधूंनी अपक्ष दाखल केलेल्या उमेदवारीमुळे या मतदारसंघात भाजपच्या भूमिकेकडे लक्ष लागले आहे. सोमवारी भाजपने नाशिक वगळता उर्वरित तीनही विधानपरिषद मतदारसंघाचे उमेदवार जाहीर केले असताना या मतदारसंघात आता महायुतीची भूमिका काय आहे हे स्पष्ट होईल. कोल्हे-विखे यांच्या अपक्ष उमेदवारीमुळे…
सोमवार, दि. ३ जून पुणे सीमा शुल्क विभागाच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने तब्बल २ कोटी २० लाख रुपये किमतीचा ८८३ किलो गांजा जप्त केला आहे. एका आयशर ट्रकद्वारे ओरिसा राज्यातून हा गांजा महाराष्ट्रात येत असल्याची माहिती पथकाला मिळाली होती. देशभरात गांजा विक्रीला बंदी असली तरी सर्वत्र मुबलक गांजा मिळत असल्याचे चित्र सर्रासपणे दिसते. गांजाची राज्यात मोठी बाजारपेठ असल्याचे अनेकदा समोर आले आहे. त्यामुळे आता पकडलेला गांजा महाराष्ट्रात कोठे वितरित होणार होता याचा देखील शोध पथकाला घ्यावा लागणार आहे. ओरिसा येथून एका आयशर ट्रकद्वारे हा गांजा महाराष्ट्रात येणार असल्याची माहिती सीमा शुल्कच्या अधिकाऱ्यांना मिळाली होती. यानंतर पुणे सीमा शुल्क विभागाच्या एका…
सोमवार, दि. ३ जून (अनंत पांगारकर) लोकसभा निवडणुकीचे मतदान पार पडले असून उद्या मंगळवारी देशभरात मतमोजणी होत आहे. ही रणधुमाळी आटोपत असतानाच राज्यातील विधान परिषदेच्या चार जागांवर निवडणूक होत आहे. महायुतीत बिघाडी झाल्याचे चित्र समोर येत असून नाशिक वगळता उर्वरित तीन मतदारसंघात भाजपने आपले उमेदवार सोमवारी जाहीर केले. ट्विस्ट… कोकण पदवीधर, मुंबई पदवीधर, मुंबई शिक्षक आणि नाशिक शिक्षक या चार मतदारसंघासाठी निवडणूक होत असून सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा दुसरा दिवस होता. दुसऱ्या दिवसाअखेर नासिक पदवीधर मतदारसंघात मोठा ट्विस्ट बघायला मिळत असताना नाशिक वगळता उर्वरित तीन जागांवर भाजपने आपले उमेदवार जाहीर केले आहे. यांना संधी… कोकण पदवीधर मतदार संघात भाजपाने…
विशेष लेख ★★★★★★★★★★★ ★★★★★★★★★★★ तो उगवतो आणि अंधाराला हटवतो. उगवताना सौम्य, दुपारी प्रखर तेजाने, जगाला लख्ख करून टाकतो, तो एक सूर्य ह्या जगती असतो. असाच एक क्रांतिसूर्य, त्याचे जन्मामुळे आणि कार्य कर्तृत्वामुळे दुःखाचा अंधार बाजुला सारून सुखाचा प्रकाश दारात आला. अनाथाचे “नाथ ” बनून, दीनदुबळ्यांचा उत्कर्ष केला. महान नेत्यांचे कार्याची आठवण म्हणून कार्यकर्तृत्वाचा थोडक्यात घेतलेला आढावा. गोपीनाथ मुंडे साहेबांचा जन्म नाथ्रा गावी परळी तालुक्यात बीड जिल्ह्यात १२ डिसेंबर १९४९ साली पांडूरंग मुंडे आणी लिंम्बाबाई मुंडे या वारकरी आणि अध्यात्मावर प्रेम असणाऱ्या दांपत्याच्या पोटी झाला. पदवीपर्यंत शिक्षण त्यांनी अंबेजोगाई येथे घेतले. साहेबांनी पुढे कायद्याचे शिक्षण पुणे येथे घेतले. महाविद्यालयीन शिक्षण घेत…
सोमवार, दि. ३ जून लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर करीत असताना सर्वप्रथम पोस्टाने आलेल्या मतांची (पोस्टल बॅलेट्स) मोजणी केली जावी, अशी मागणी इंडिया आघाडीच्या नेत्यांनी रविवारी निवडणूक आयोगाकडे केली. आघाडीच्या एका शिष्टमंडळाने यासंदर्भात निवडणूक आयुक्तांची भेट घेतली. मागील काही काळात आम्ही तिसऱ्यांदा निवडणूक आयोगात आलो आहोत. पोस्टल बॅलेट हे निकालात महत्वाची भूमिका बजावत असतात. पोस्टल बॅलेटची सर्वप्रथम मोजणी केली जावी, हा निवडणूक आयोगाचा नियम आहे. त्यामुळे चार तारखेला निकालादरम्यान या मतांची आधी मोजणी केली जावी, अशी मागणी करण्यात आली असल्याचे कॉंग्रेसचे नेते अभिषेक मनू सिंघवी यांनी निवडणूक आयोगाला दिलेल्या भेटीनंतर पत्रकारांशी बोलताना सांगितले. पोस्टल बॅलेटची आधी मोजणी करण्याचा मुद्दा आयोगाने त्यांच्या…
सोमवार, दि. ३ जून परमपूज्य आचार्य सम्राट राष्ट्रसंत आनंदऋषीजी महाराज यांच्या आशीर्वादाने आणि परमपूज्य जिन शासन गौरव परमपूज्य सुनंदाजी म. सा. यांच्या प्रेरणेने आश्वी येथील सुशील भंडारी यांची इंजिनीयर कन्या मुमुक्षु कु. प्रतीक्षा ही जैन भगवती दीक्षा घेणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. अर्हमविजाप्रणेता उपाध्याय प्रवर प. पू. श्री. प्रवीणऋषीजी म. सा., प्रखर व्याख्याता प. पू. लोकेशऋषीजी म. सा., मधुरकंठी आतापणा साधक प. पू. तीर्थेशऋषिजी म. सा., उपप्रवर्तिनी साध्वीरत्ना प. पू. संन्मतिजी म. सा., वाणीभूषण प. पू. प्रीतीसुधाजी म. सा., कैवल्यधाम प्रेरक प. पू. कैवल्यरत्नाश्रीजी म. सा., स्वाध्याय प्रेमी प. पू. श्री प्रियदर्शनाची म. सा., मधुरव्याख्याता प. पू. विश्वदर्शनाची म.…
रविवार, दि. २ जून शिर्डीतील सागर शेजवळ हत्याप्रकरणी कोपरगाव सब जेलमध्ये असलेला आरोपी रुग्णालयात घेताना पोलीस कर्मचाऱ्याला चकवा देत पसार झाल्याचे घटना रविवारी पहाटे घडली. योगेश सर्जेराव पारधे असे पसार झालेल्या आरोपीचे नाव आहे. शिर्डी येथील २०१५ मध्ये झालेल्या सागर शेजवळ हत्याकांडातील नऊ आरोपीपैकी एक आरोपी योगेश पारधे हा कोपरगाव कारागृहात आहे. पारधे याला शनिवारी रात्री रक्ताच्या उलट्या झाल्याने कारागृहातून त्याला पोलीस हेड कॉन्स्टेबल ढाकणे आपल्या दुचाकीवरून मध्यरात्रीच्या सुमारास ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी घेऊन जात होते. तहसील कार्यालयाच्या आसपास ते आले असता एका वळणावर दुचाकीचा वेग कमी झाल्याची संधी साधून आरोपी पारधे याने पोलीस कर्मचारी ढाकणे यांना चकवा देत पळ काढला.…
