Author: अनंत पांगारकर
गुरुवार, दिनांक ६ जून २०२४ येत्या दोन-तीन दिवसात नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली एनडीएचे (NDA) सरकार स्थापन होण्याचे शक्यता वर्तवली जात आहे. या पार्श्वभूमीवर शेअर मार्केट मधील मोठा घोटाळा बाहेर आला आहे. शेअर मार्केटमध्ये देशातील सर्वात मोठा घोटाळा भाजपाने केल्याचा आरोप करत त्याची संयुक्त संसदीय समितीमार्फत चौकशी करण्याची मागणी काँग्रेस नेते, खासदार राहुल गांधी यांनी केली आहे. लोकसभा निवडणुकीच्या आधी विविध संस्थांचे एक्झिट पोल समोर आले होते. या सर्व एक्झिट पोलमध्ये भाजपला ३०० च्या आसपास जागा दाखविण्यात आल्या होत्या. त्यामुळे शेअर मार्केटमध्ये अचानक मोठ्या प्रमाणावर उसळी पाहायला मिळाली होती. मात्र, ४ जूनला निवडणुकीच्या निकालाच्या दिवशी शेअर मार्केट अचानक कोसळले होते. त्यामुळे अनेक…
गुरुवार, दिनांक ६ जून २०२४ राज्याचे महसूल तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या जाचाला कंटाळून भाजपातील अनेक नेत्यांनी निलेश लंके यांना निवडणुकीत मदत केली, असा गौप्यस्फोट करत ज्याप्रमाणे राज्यातील पराभवाची जबाबदारी स्वीकारून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दुसरी जबाबदारी देण्याची मागणी पक्षाकडे करण्यात आली, त्याप्रमाणे जिल्ह्यातील दोन्ही जागा गमावल्याने पालकमंत्र्यांनीही अशीच पक्षशिस्त व नैतिकता दाखवावी असा सल्ला देत अप्रत्यक्षपणे त्यांच्या राजीनाम्याची मागणी राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांनी केली. माध्यमांशी संवाद … नगर लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार नीलेश लंके यांच्या विजयानिमित्त ‘मविआ’च्या पदाधिकाऱ्यांनी परस्परांना बुंदीचे लाडू भरवले. त्यावेळी फाळके यांनी माध्यमांशी संवाद साधला. यांची उपस्थिती … यावेळी…
गुरुवार, दि. ६ जून २०२४ नगर विकास मंत्रालयात उपसचिव असलेले अकोले तालुक्यातील अंभोळचे भूमिपुत्र विजय कारभारी चौधरी यांना सहसचिवपदी पदोन्नती मिळाली आहे. महाराष्ट्र राज्याचे अपर सचिव वि. बा. माने यांनी चौधरी त्यांच्या निवडीचे आदेश काढले. नगर विकास मंत्रालयाचे उपसचिव म्हणून कार्यरत असताना चौधरी यांनी नागरी जमीन कमाल धारणा कायदा निरसिद्ध झाल्यानंतर शासन देयक्षेत्रापोटी सन २०१९ ते २०२३ या कालावधीत योजना धारकांकडून सुमारे ११०० कोटींचा महसूल राज्य शासनाला मिळवून देण्यामध्ये मोलाचे योगदान दिले आहे. संचालक नगर रचना व अधिनस्त कार्यालयांसाठी सुमारे ११९९ पदांचा सुधारित आकृतीबंध त्यांनी निश्चित केला तसेच गुणवंत अधिकारी व कर्मचारी व कार्यालयांसाठी पुरस्काराची योजना ही तयार केली. मुंबई…
गुरुवार, दिनांक ६ जून २०२४ राज्यात लक्षवेधी ठरलेल्या अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून निलेश लंके निवडून आले. तर सुजय विखे पराभूत झाले. यानंतर मात्र आता राजकारण तापले असून समर्थक आमने-सामने येण्यास सुरुवात झाली आहे. गुरुवारी निलेश लंके समर्थक पीए राहुल झावरे यांच्यावर हल्ला करण्यात आला यामुळे पारनेर तालुक्यात खळबळ उडाली आहे. राज्याचे महसूल मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री असलेल्या राधाकृष्ण विखे पाटील यांचे सुपुत्र भारतीय जनता पक्षाचे माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांचा धक्कादायक पराभव करत नगर लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे निलेश लंके निवडून आले. निवडणुकीनंतर आता गावागावात गटागटातील राजकारण पेटले असून कोणी कोणाला लीड दिला कोणी कोणाचा कार्यक्रम…
गुरुवार दिनांक ६ जून २०२४ केंद्रात सरकार बनविण्याइतपत साधे बहुमतही भारतीय जनता पक्षाला यावेळी मिळाले नाही. २४० वरच त्यांचा आत्मा लटकताना दिसत आहे. तरीही नरेंद्र मोदी यांनी बहुमत दिल्याबद्दल जनतेचे आभार मानले, मोदी हे आता त्यांच्या ‘ब्रॅण्ड’चे म्हणजे मोदी सरकार बनवत नाहीत तर, त्यांनी ‘रालोआ’चे सरकार बनवत असल्याचे जाहीर करून स्वतःचा पराभव मान्य केला, असे सांगत ठाकरे गटाने मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. अग्रलेखातून टीका – नरेंद्र मोदी आणि त्यांच्या भाजपाचा पुरता पचका लोकसभा निवडणुकांच्या निकालात झाला आहे. जनतेने त्यांना जवळ जवळ सत्तेवरून खाली खेचले आहे. ही खेचाखेची करताना जनतेने सभ्यता आणि संस्कृतीचे दर्शन घडवले. त्याचा गैरफायदा मोदी घेत आहेत,…
गुरुवार दिनांक ६ जून २०२४ बोगस डॉक्टरविरुद्ध केलेल्या तक्रारीची दखल घेत तालुका आरोग्य अधिकारी आणि गटविकास अधिकाऱ्यांच्या पथकाने छापा टाकत श्रीरामपूरमध्ये कारवाई केली. कथित डॉक्टर बोगस असल्याचे उघड झाल्यानंतर त्याचा दवाखाना सील करण्यात आला आहे. सागर अहिरे असे या बोगस डॉक्टरचे नाव असेल श्रीरामपूर तालुक्यातील माळेवाडी येथे त्याचा दवाखाना सुरू होता. या डॉक्टर विरुद्ध श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गोंधवणी (श्रीरामपूर) येथील अरुण माणिक शिंदे यांनी हा डॉक्टर बोगस असल्याबद्दल तक्रार केली होती. या तक्रारीची दखल घेऊन गटविकास अधिकारी प्रवीण सिनारे व वैद्यकीय अधिकारी डॉ. मोहन शिंदे यांनी माळेवाडीचे समुदाय आरोग्य अधिकारी संदीप माने, आरोग्य सेवक…
गुरुवार, दिनांक ६ जून २०२४ डॉ. सुभाष भामरे चार हजार मतांनी निवडून आल्याची बातमी आल्याने आणि मतमोजणीच्या १९ फेऱ्या बाकी असताना निवडणूक निकाल कसा जाहीर होऊ शकतो, यामुळे आम्ही चार वाजण्याच्या सुमारास सर्वजण मतमोजणी केंद्रात पोहोचलो असताना तेथे प्रतिस्पर्धी उमेदवाराकडून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोन जोडून देत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न झाल्याचा गंभीर आरोप नवनिर्वाचित खासदार डॉ. शोभा बच्छाव यांनी केला आहे. भाजपचे उमेदवार डॉ. सुभाष भामरे यांचा अगदी अटीतटीच्या लढतीत डॉ. बच्छाव यांनी पराभव केला. त्यानंतर डॉ. बच्छाव यांचा बुधवारी धुळ्याच्या काँग्रेस कार्यालयात सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांनी मंगळवारी रात्री उशिरापर्यंत मतमोजणी…
बुधवार दिनांक ५ जून २०२४ लोकसभा निवडणुकीचे निकाल समोर आल्यानंतर राज्यात सत्ताधारी महायुतीला मोठा झटका बसला असून निवडणुकीत महाविकास आघाडीचे वर्चस्व दिसले. यानंतर आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पराभवाची जबाबदारी स्वीकारली असून त्यांनी यासंदर्भात राजीनाम्याची तयारी दर्शविली आहे. सरकारमधून मला मोकळं करावं, अशी विनंती त्यांनी पक्षाच्या नेतृत्वाला केली आहे. यासंदर्भात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपली प्रतिक्रिया दिली असून ते म्हणाले, यश-अपयशाची आमची सामूहिक जबाबदारी आहे. निवडणुकांमध्ये हार-जीत होत असते. सध्याच्या निवडणुकांमधील मतांची टक्केवारी बघितली तर मविआला जास्त जागा मिळाल्या असल्या तरी मतांची टक्केवारी सारखी आहे. मुंबईमध्ये दोन लाख मतं आम्हाला जास्त मिळाली आहे. आम्ही सर्वांनी मिळून काम केलं आहे.…
बुधवार, दिनांक ५ जून २०२४ संगमनेरात मटक्यासारखे अवैध व्यवसाय बंद असल्याचा पोलिसांचा दावा त्यांच्याच कारवायांमुळे खोटा ठरत आहे. संगमनेरातील मटका व्यावसायिक अश्रफअली जहागीरदार चालवत असलेल्या मटका अड्ड्यांवर एलसीबी आणि स्थानिक पोलिसांनी आठवडाभराच्या आत तीन कारवाया केल्या असून या तिन्ही गुन्ह्यात सय्यद याच्यासह आणखी पाच जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. कारवाई १ – विशेष म्हणजे बुधवारी दाखल झालेल्या गुन्ह्यात मटका व्यावसायिक अश्रफअली जहागीरदार हा फरार दाखविण्यात आला आहे. तर बुधवारी दुपारी शहरालगतच्या समनापुरमध्ये एका पत्राच्या शेडमध्ये टाकलेल्या छाप्यात पोलिसांना टाईम बाजार नावाचा मटका सुरू असल्याचे आढळून आले. पोलिसांनी या कारवाईत राज मोहम्मद अरीफ सय्यद (वय ४० अलकानगर, संगमनेर) याला पकडत…
बुधवार, दिनांक ५ जून २०२४ सहाय्यक पोलीस निरीक्षकासाठी ४० हजार रुपयांची लाच स्वीकारताना न्यायालयात पैरवी कर्मचारी असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याला लाच लुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी सापळा लावत रंगेहाथ पकडले आहे. यामुळे पोलिसांचा लाचेचा नवा कारनामा समोर आला. सागर कुमार टकले (वय ३७ वर्ष, कोपरखैरणे पोलीस स्टेशन, नवी मुंबई) व प्रज्ञेश नरेंद्र कोठेकर (वय ४२ वर्ष, कोपरखैरणे पोलीस स्टेशन, नवी मुंबई) अशी लाचखोर सहाय्यक पोलीस निरीक्षक व पोलीस नाईक असलेल्या अधिकाऱ्यांची नाव आहेत. कोपरखैरणे पोलीस ठाण्यात तक्रारदाराच्या चुलत्यांवर दाखल असलेल्या गुन्ह्यांमध्ये पोलीस कोठडीत असलेल्या चुलत्याला कोठडीची मुदत संपल्यानंतर जामीन अर्जावरील सुनावणी दरम्यान वेळेत म्हणणे (Say) देण्यासाठी तसेच उर्वरित गुन्ह्याच्या तपासात मदत करण्याकरिता सहाय्यक…
