Author: अनंत पांगारकर
शिर्डी, दि.२० एप्रिल लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी ३८-शिर्डी लोकसभा मतदारसंघात शनिवार, २० एप्रिल २०२४ रोजी एकही नामनिर्देशनपत्र दाखल झाले नाही. तर आजच्या तिसऱ्या दिवशी १२ व्यक्तींनी २३ नामनिर्देशनपत्रे प्राप्त करून घेतली. शिर्डी लोकसभा मतदारसंघात नामनिर्देशन पत्रे भरण्यास १८ एप्रिल २०२४ पासून सुरूवात झाली. मागील तीन दिवसात आतापर्यंत ४८ इच्छूक उमेदवारांनी ८९ नामनिर्देशनपत्रे प्राप्त करून घेतली. नामनिर्देशन पत्रे प्राप्त करून घेतलेल्यांपैकी भाऊसाहेब राजाराम वाकचौरे (शिवसेना – उध्दव बाळासाहेब ठाकरे) यांनी १९ एप्रिल रोजी आपले नामनिर्देशनपत्र दाखल केले आहे. उर्वरित ४७ नावे इच्छूक उमेदवारांची नावे खालीलप्रमाणे… सतिष भिवा पवार, संजय हरिश्चंद्र खामकर, बाळासाहेब हिरामण भोसले, ॲड. सिध्दार्थ दिपक बोधक, चंद्रकांत संभाजी दोंदे, अभिजित…
शनिवार, दि.२० एप्रिल अनुसूचित जाती प्रवर्गासाठी राखीव असलेल्या शिर्डी लोकसभा मतदार संघातील महाविकास आघाडीचे (शिवसेना-उद्धव बाळासाहेब ठाकरे) उमेदवार माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे १० कोटींचे मालक असून वाकचौरे पती-पत्नीत पत्नी सरस्वती संपत्तीच्या बाबतीत वरचढ आहे. वाकचौरे यांनी शुक्रवारी शिर्डी लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल करतेवेळी आपल्या मालमत्तेचे शपथपत्र जोडले आहे. या शपथपत्रांत वाकचौरे दांपत्याकडे सुमारे दहा कोटी रुपयांची स्थावर व जंगम मालमत्ता असल्याचे म्हटले आहे. शंभर तोळे सोने या दाम्पत्याकडे आहे. संपत्तीचे विवरण पुढील प्रमाणे:- उमेदवार वाकचौरे यांच्याकडे पन्नास तोळे सोने आणि पाच किलो चांदी असून त्याचे बाजार मूल्य तेहतीस लाख बारा हजार पाचशे रुपये दाखवण्यात आले आहे. तर वाकचौरे यांच्या…
शनिवार, दि.२० एप्रिल एप्रिल महिना निम्म्याहून अधिक उलटून गेला तरीदेखील मार्च महिन्याचे मानधन अंगणवाडी कर्मचाऱ्यांना मिळू शकलेले नाही. मानधनाअभावी राज्यातील दोन लाख दहा हजाराहून अधिक कर्मचाऱ्यांची उपासमार सुरू आहे. प्रचारात रममाण असलेल्या मुख्यमंत्री आणि महिला बालकल्याण मंत्र्यांनी अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे मानधन त्वरित जमा करण्याची मागणी अंगणवाडी कर्मचारी सभेच्या राज्य अध्यक्ष ॲड. निशा शिवूरकर यांनी केली आहे. शिवूरकर यांनी म्हटले आहे की, सरकार अंगणवाडी कर्मचाऱ्यांवर विविध कामे लादते. निवडणूक प्रशिक्षण, आरोग्याची कामे सोपवली जातात. परंतु अल्प मानधनावर काम करणाऱ्या या कर्मचाऱ्यांचे मानधन वेळेवर देण्याची जबाबदारी टाळत आहे. सणासुदीच्या दिवसात मानधन नसल्यामुळे सण साजरे करणे या कर्मचाऱ्यांना मुश्कील झाले आहे. कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष…
शनिवार, दि.२० एप्रिल उपक्रमशील शाळा म्हणून तालुक्यात नावलौकिक असलेल्या जिल्हा परिषदेच्या धांदरफळ येथील देशमुख मळा शाळेतील पहिलीच्या वर्गातील विद्यार्थिनी जिजाई कुलदीप देशमुख हिने मंथन राज्यस्तरीय स्पर्धा परीक्षेत यश मिळवत संगमनेर तालुक्यात प्रथम येण्याचा मान मिळविला आहे. जिजाई देशमुख हिने राज्यात एकविसावा तर जिल्ह्यात सोळावा आणि संगमनेर तालुक्यात प्रथम क्रमांक मिळविला. गेल्या काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा अभियानात दोन लाखाचे द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक पटकावणाऱ्या शाळेच्या या नेत्रदीपक यशामुळे उपक्रमशील मार्गदर्शक शिक्षिका वृषाली सुनील कडलग व मुख्याध्यापक हनुमंत अडांगळे यांचे अभिनंदन होत आहे. जिजाई देशमुख हिने मिळवलेल्या नेत्रदीपक यशाबद्दल सरपंच उज्वला नवनाथ देशमाने, विस्ताराधिकारी एकनाथ भांगरे, केंद्रप्रमुख अशोक आवारी, मुख्याध्यापक…
शनिवार, दि.२० एप्रिल आपल्या आदर्श कारभारातून देशातील सहकारासाठी मार्गदर्शक ठरलेल्या सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या सन २०२३-२०२४ च्या गळीत हंगामाची सांगता सोमवारी (दि.२२ एप्रिल) सकाळी ९ वाजता माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्या पत्नी कांचनताई थोरात, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, कारखान्याचे अध्यक्ष बाबा ओहोळ यांच्या उपस्थितीत होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. यावेळी आमदार सत्यजित तांबे, माधवराव कानवडे, दुर्गाताई तांबे, रणजीतसिंह देशमुख, बाजीराव खेमनर, कॅन्सरतज्ञ डॉ. जयश्रीताई थोरात, काँग्रेसचे शहराध्यक्ष सोमेश्वर दिवटे यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी व मान्यवर उपस्थित राहणार आहेत. दिवंगत सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांनी बिजारोपण केलेल्या साखर कारखान्याची आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली दिशादर्शक…
शुक्रवार, दि. 19 एप्रिल मुंबई : महाराष्ट्रातील पाच जागांसह देशभरातील 102 जागांसाठी आज पहिल्या टप्प्यात कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत सकाळी 7 ते संध्याकाळी 6 या वेळेत मतदान पार पडले. देशात पहिल्या टप्प्यात 60 टक्क्यांहून अधिक मतदान झाले, महाराष्ट्रात 55.29 टक्के मतदान झाले. महाराष्ट्रात पहिल्या टप्प्यात 55.29 टक्के मतदान भंडारा-गोंदियात 56.87 टक्के गडचिरोली-चिमूरमध्ये 65.97 टक्के रामटेकमध्ये 52.38 टक्के नागपूरमध्ये 49.07 टक्के चंद्रपूरमध्ये 55.11 टक्के
शुक्रवार, दि.१९ एप्रिल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे तिसऱ्यांदा देशात सरकार आल्यास तीनशे युनिट पर्यंत मोफत वीज मिळणार असल्याचे मोठे वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी धाराशिवमध्ये प्रचार सभेत केले आहे. पवार म्हणाले, पाठीमागच्या काळामध्ये आम्ही सरकारमध्ये असताना गरिबांना वीजबिल माफी केली होती. सुशीलकुमार शिंदे त्यावेळी मुख्यमंत्री होते. त्या मुद्द्यावर निवडणूक जिंकली आणि पहिले वीज बिल शून्याचे दिले. मात्र नंतर पुन्हा आधीसारखे बिल देण्यास सुरुवात झाली. असे करणे परवडत नाही. मात्र मोदी हे कोणतेही काम मागील पुढील विचार करून करतात. ”राज्यात कार्यक्रमासाठी जेव्हा मोदी येतात, त्यावेळी राज्याचे प्रतिनिधी म्हणून त्यांच्याशी संवाद साधण्याची आम्हाला संधी मिळते. आम्ही त्यांच्याशी चर्चा करतो. आता ३००…
शुक्रवार, दि. १९ एप्रिल भारतीय जनता पक्षाचा २०१४ चाच जुमला आता २०२४ मध्ये मोदी गॅरंटी नावाने समोर आणला जात आहे. ज्यांनी दहा वर्षाचा कार्यकाळात केवळ खोटे बोलून जनतेला फसविले तेच मंडळी आता या निवडणुकीत मोदी गॅरंटीचा ढोल वाजवत आहे. मात्र महाराष्ट्रात केवळ महाविकास आघाडी सरकारच्या काळातील फक्त “ठाकरे गॅरंटी” चालते, असे प्रतिपादन शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) युवा नेते आमदार आदित्य ठाकरे यांनी केले. शिर्डी लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा उमेदवारी अर्ज आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत दाखल करण्यात आला. यावेळी झालेल्या सभेवेळी महाविकास आघाडीचे ज्येष्ठ नेते आमदार बाळासाहेब थोरात, माजी मंत्री शंकरराव गडाख, आमदार लहू कानडे, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे…
शुक्रवार, दि.१९ एप्रिल पोलिसांच्या ११२ क्रमांकावर कॉल आला. कॉल करणाऱ्या व्यक्तीने हद्दपार करण्यात आलेला इसम हा शहरातील इंदिरानगर भागात फिरत असल्याची माहिती दिली. त्यामुळे तातडीने मिळालेल्या माहितीची खातर जमा करण्यासाठी पोहोचलेल्या पोलीस पथकाला धीरज राजेंद्र पावडे हद्दपारीच्या आदेशाचे उल्लंघन करून गावात फिरताना आढळून आल्याने त्याला पकडण्यात आले. धीरज राजेंद्र पावडे याला संगमनेरच्या प्रांत अधिकाऱ्यांनी संगमनेर तालुक्याच्या महसूल स्थळ सीमेतून २४ एप्रिल पर्यंत हद्दपार करण्याचे आदेश काढले होते. प्रांत अधिकाऱ्यांच्या आदेशाचे पालन करत पावडे याला हे आदेश पोलिसांनी बजावले होते. मात्र या आदेशाचे उल्लंघन करून तो शहरात फिरत होता. त्यामुळे अज्ञात व्यक्तीने यासंदर्भात पोलिसांच्या ११२ क्रमांकावर फोन करत यासंदर्भात माहिती दिली…
शुक्रवार, दि.१९ एप्रिल गोवंश जनावरांच्या हत्येसाठी प्रसिद्ध असलेल्या संगमनेरमधील कत्तलखान्यावर शुक्रवारी पहाटे नगरच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकून २९०० किलो गोवंश मांसासह २१ लाख रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला. या कारवाईत तीन जणांना पोलिसांनी अटक केली आहे. एलसीबीच्या कारवाईनंतर संगमनेरमधील कत्तलखाने केवळ कागदावर बंद असल्याचे समोर आले आहे. स्थानिक पोलिसांना हे कत्तलखाने बंद करण्यात पूर्णतः अपयश आले आहे. नगरच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला संगमनेर मधील जमजम कॉलनीत सुरू असलेल्या कत्तलखान्यात गोवंश जनावरांची कत्तल सुरू असल्याची माहिती मिळाली होती. त्यामुळे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक तुषार धाकराव, पोलीस अंमलदार सचिन अडबल, बापूसाहेब फोलाने, गणेश भिंगारदे, सचिन लोंढे, अतुल लोटके, संतोष खैरे,…
