Author: अनंत पांगारकर
शुक्रवार, दि.१९ एप्रिल बुधवारी श्रीराम नवमीच्या दिवशी संगमनेर तालुक्यातील हिवरगाव पावसा येथे दुर्दैवी घटना घडली. पावसे परिवारातील दोन सख्या लहान भावंडांचा शेततळ्यात घडून दुर्दैवी मृत्यू झाला. संगमनेर तालुका एक परिवार समजून कुटुंबप्रमुख असलेले काँग्रेस नेते, आमदार बाळासाहेब थोरात यांनी शुक्रवारी सकाळी या शोकाकुल कुटुंबीयांची भेट घेत त्यांचे सांत्वन केले. श्रीराम नवमीच्या दिवशी सायंकाळी खेळता खेळता शेत तळ्यात बुडून पाचव्या इयत्तेत शिकणाऱ्या रितेश सारंगधर पावसे (वय १२ वर्षे) व तिसरा इफेक्ट शिकणाऱ्या प्रणव सारंगधर पावसे (वय ८ वर्ष) या दोघा भावंडांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे संगमनेर तालुक्यात दुःखद वातावरण तयार झाले. वर्षभरापूर्वीच घरातील कर्त्या व्यक्तीचे निधन झाल्याने या कुटुंबावरील छत्र हरपले…
गुरुवार, दि. १८ एप्रिल राज्य महिला आयोगाच्या सदस्य असलेल्या उत्कर्षा रूपवते यांनी काँग्रेसचा राजीनामा देत वंचित बहुजन आघाडी प्रवेश करतात गुरुवारी वंचित कडून शिर्डी लोकसभा मतदारसंघासाठी त्यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली. यामुळे आता शिर्डीत महाविकास आघाडी विरुद्ध महायुती विरुद्ध वंचित बहुजन आघाडी अशी तिरंगी लढत रंगणार आहे. शिर्डीत वंचितच्या उमेदवारामुळे राजकीय गणिते बदलण्यास सुरुवात झाली आहे. रुपवते यांच्या उमेदवारीचा फटका महाविकास आघाडीचे उमेदवार भाऊसाहेब वाकचौरे यांना सर्वाधिक बसण्याची चिन्हे वर्तवली जात आहे. तर दुसरीकडे गेल्या दहा वर्षापासून मतदार संघात फारसे न फिरकणाऱ्या खासदार सदाशिव लोखंडे यांच्या विषयी मतदारसंघात नाराजीचे वातावरण आहे. अशा स्थितीत रूपवते यांची उमेदवारी या मतदारसंघात काय परिणाम…
शिर्डी, गुरुवार दि. १८ एप्रिल लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ अंतर्गत ३८ शिर्डी (अनुसूचित जाती) लोकसभा मतदारसंघात चौथ्या टप्प्यात सोमवारी (दि. १३ मे) मतदान होणार आहे. यासाठी उमेदवाराकडून नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची प्रक्रिया आजपासून (दि. १८ एप्रिल) सुरूवात झाली आहे. पहिल्या दिवशी एकाही उमेदवाराने नामनिर्देशन पत्र अर्ज दाखल केला नाही. मात्र पहिल्या दिवशी १८ उमेदवारांनी ३१ अर्ज घेतले. गुरूवारी निवडणुकीची अधिसूचना प्रसिद्ध झाली. तसेच याच दिवसापासून २५ एप्रिल २०२४ पर्यंत ११ ते ३ वाजेपर्यंत निवडणूक निर्णय अधिकारी, ३८ शिर्डी (अ.जा.) लोकसभा मतदारसंघ यांचे कार्यालय, १ ला मजला, राहाता तालुका प्रशासकीय इमारत, राहाता येथे नामनिर्देशन पत्र नाममात्र शुल्कात दिले जात आहेत. नामनिर्देशन…
गुरुवार, दि.१८ एप्रिल एकादशीच्या दिवशी पांडुरंगाच्या दर्शनाला जायचे असे सांगून अल्पवयीन पुतणीला दुचाकीवर जुन्नर तालुक्यात असलेल्या खंडोबा मंदिरात नेत तेथे तिच्यावर बलात्कार करणाऱ्या चुलत्याला संगमनेरच्या जिल्हा व सत्र न्यायालयाने विविध कलमांतर्गत दोषी ठरवत दहा वर्ष सक्तमजुरी आणि तीस हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. पांडुरंग यशवंत शेंगाळ, रा. शेंगाळवाडी, हिवरगाव पठार ता. संगमनेर असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. घटनेच्या दिवसापासून तब्बल सात वर्ष फरार होता. कोरोना महामारीच्या काळात आरोपी आपल्या घरी आला होता. नेमकं याच दरम्यान आरोपीला पकडण्यासाठी न्यायालयाने अटक वॉरंट काढले होते. न्यायालयाने काढलेल्या वॉरंटमुळे फरार असलेला आरोपीला पोलिसांना पकडता आले. त्यानंतर आरोपी तुरुंगात होता. १९ जुलै २०१३…
गुरुवार, दि.१८ एप्रिल राज्य महिला आयोगाच्या सदस्य, काँग्रेसच्या महासचिव पदासह सर्व पदांचा राजीनामा देणाऱ्या उत्कर्षा रुपवते यांनी अखेर वंचित बहुजन आघाडीत प्रवेश केला आहे. शिर्डी लोकसभा मतदारसंघातून वंचित कडून त्यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. रुपवते वंचितच्या उमेदवार असल्यास या मतदारसंघातील राजकीय गणित बदलणार असून त्याचा सर्वाधिक फटका महाविकास आघाडीला बसण्याची चिन्ह आहेत. बुधवारी रुपवते यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना आपल्या सर्व पदांचा राजीनामा पाठवल्यानंतर पाठोपाठ त्यांनी अकोल्यात वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतली. या भेटीत त्यांनी आंबेडकरांच्या यशवंत भवन निवासस्थानी वंचित मध्ये प्रवेश केला असून आंबेडकर यांनी त्यांचे स्वागत केले आहे. यावेळी वंचितचे राज्य…
बुधवार, दि.१७ एप्रिल पाटाच्या कडेला खेळण्यासाठी गेलेल्या दोघा सख्या भावंडाचा शेततळ्यात पडून मृत्यू झाल्याचे दुर्दैवी घटना बुधवारी संगमनेर तालुक्यातील हिवरगाव पावसा येथे घडली. संगमनेर मध्ये राम नवमी उत्सव जल्लोषात साजरा होत असताना दोघा भावंडाच्या मृत्यूच्या या वृत्तामुळे संगमनेरात दुःखाची छाया पसरली. ऋतिक सारंगधर पावसे (वय १२ वर्ष) व प्रणव सारंगधर पावसे (वय ८ वर्ष, दोघे रा. हिवरगाव पावसा ता. संगमनेर) अशी दोघा मृत भावंडांची नावे आहे. बुधवारी सायंकाळी चार वाजण्याच्या दरम्यान हा प्रकार घडल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. रात्री उशिराने संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात घुलेवाडीच्या ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिलेल्या खबरीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार दुर्दैवाची…
बुधवारी संगमनेर मध्ये श्रीराम नवमी उत्सवानिमित्त शहरातील विविध मार्गावरून भव्य शोभायात्रा काढण्यात आली. या शोभायात्रेत संगमनेरकर नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. (सर्व छायाचित्रे आणि व्हिडिओ काशिनाथ गोसावी, संगमनेर) बघा शोभा यात्रेचे व्हिडिओ आणि छायाचित्रे…
बुधवार, दि.१७ एप्रिल शिर्डी लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडी कडून उमेदवारी करण्यासाठी इच्छुक असलेल्या राज्य महिला आयोगाच्या सदस्य उत्कर्षा रुपवते यांनी बुधवारी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या महासचिव पदाचा व अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वासह सर्व पदांचा राजीनामा दिला आहे. काँग्रेस पक्षासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. रूपवते यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना आपल्या राजीनामा पाठविला आहे. रुपवते-चौधरी कुटुंबातील तिसरी पिढी काँग्रेस पक्षात कार्यरत असताना निस्वार्थीपणे अहोरात्र पक्षासाठी झटणाऱ्या माझ्यासारख्या युवा कार्यकर्तीला पक्ष सोडण्याचा निर्णय का घ्यावा लागतो याबद्दल पक्ष नेतृत्वाने विचार करण्याची गरज त्यांनी आपल्या राजीनामा पत्रात व्यक्त केली आहे. काँग्रेसच्या महासचिव आणि राज्य महिला आयोगाच्या सदस्य…
बुधवार, दि.१७ एप्रिल धुळे, सातारा आदि महत्त्वाच्या मतदारसंघातील संभाव्य बंडखोरी टाळण्यासाठी महाविकास आघाडीतील काँग्रेसचे बडे नेते बाळासाहेब थोरात सर्वतोपरी प्रयत्न करत असताना त्यांचे भाचे नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजित तांबे यांनी साताऱ्यामध्ये घेतलेल्या भूमिकेमुळे थोरातांची कोंडी झाली असल्याचे दिसते. तांबे यांनी विशाल पाटील यांच्यावर अन्याय झाल्याचे सांगत त्यांच्यावरचा अन्याय दूर करण्याचे आवाहन केले आहे. महाविकास आघाडीच्या जागा वाटपात सांगलीची जागा शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) वाटेला गेली आहे. येथून शिवसेनेने चंद्रहार पाटील यांना उमेदवारी दिली. साताऱ्याच्या या जागेसाठी काँग्रेस आग्रही होती. यासाठी शेवटपर्यंत प्रयत्न करण्यात आले. संभाव्य बंडखोरी आणि काँग्रेस मधील अंतर्गत नाराजी दूर करण्याचे थोरात यांच्यासमोर आव्हान आहे. अशातच सांगलीच्या…
अहमदनगर, बुधवार दि.१७ एप्रिल नगर जिल्हयात जुन ते सप्टेंबर, २०२३ या कालावधीत झालेली पर्जन्यमानातील तुट तसेच उपलब्ध असलेल्या भुजलाची कमतरता यामुळे निर्माण झालेली पाणी टंचाई, चारा टंचाई तसेच दुष्काळ परिस्थितीच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालय अहमदनगर येथे टंचाई नियंत्रण कक्ष कार्यान्वीत करण्यात आला आहे. या कक्षाचा दुरध्वनी क्र.1077 (टोल फ्री) व 0241-2323844 असा असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्रकुमार पाटील यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.
