Author: अनंत पांगारकर
मुंबई, दि. १ मार्च महाराष्ट्र विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे मंत्री दादा भुसे व आमदार महेंद्र थोरवे यांच्यात विधिमंडळाच्या लॉबीत धक्काबुक्की झाली. महाराष्ट्राच्या विधिमंडळात असा प्रकार होणे चुकीचे आहे. भारतीय जनता पक्षाने सुरु केलेल्या राजकारणामुळे सभागृहाचा आखाडा झाला असून विधिमंडळाच्या लॉबीतच आमदारांनी एकमेकांना धक्काबुक्की, मारहाण करणे हे भूषणावह नाही तर महाराष्ट्राला लाज आणणारी घटना आहे, अशी टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.आमदारांच्या धक्काबुक्की प्रकरणावर बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, सत्ताधारी आमदारांची जनतेच्या मुलभूत प्रश्नापेक्षा स्वतःच्या, वैयक्तिक प्रश्नांसाठी कुरघोडी चाललेली आहे. विधिमंडळाच्या लॉबीमध्ये मंत्र्यांवर खोक्यांचे आमदार तुटून पडतात हे खोक्याचे…
संगमनेर, सुदृढ व निकोप समाज निर्मितीचे काम करणाऱ्या, महिलांसाठी एक हक्काचे व्यासपीठ असलेल्या जयहिंद महिला मंच व जाणीव फाउंडेशनच्या वतीने शनिवारी (दि. २ मार्च) दुपारी १२ वाजता सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात महाविद्यालयात नारीशक्ती सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती देण्यात आली आहे. जागतिक महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर होणाऱ्या या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी माजी नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे उपस्थित राहणार असून सामाजिक कार्यकर्त्या कांचनताई थोरात, एकविरा फाउंडेशनच्या संस्थापक अध्यक्ष कॅन्सरतज्ञ डॉ. जयश्री थोरात, अमृतवाहिनी शेती व शिक्षण संस्थेच्या विश्वस्त शरयू देशमुख, प्रमिला कर्डिले, डॉ. श्रद्धा वाणी, माया पवार, सुनिता गाडे, दीप्ती सांगळे, मंगला काकड, डॉ. दिपाली पानसरे, सीमा सातपुते आदींसह आदिवासी सेवक प्रा.…
नाशिक, भारताला उत्तम तंत्रज्ञानाची व अत्याधुनिक उपचारांची आवश्यकता आहे. उपचार परवडणारे असलेच पाहिजेत पण त्यात एक्सलन्स अधिक महत्वाचा भाग आहे. अत्याधुनिक उपचारांचे एसएमबीटी मॉडेल देशात आदर्श बनेल, असे प्रतिपादन प्रख्यात शास्रज्ञ पद्मविभूषण डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी केले. एसएमबीटी कॅन्सर इन्स्टीट्युट टाटा मेमोरियल सेंटर यांच्या तांत्रिक मार्गदर्शनाने साकारल्या जाणाऱ्या विशेष सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचा भूमिपूजन सोहळा आणि एसएमबीटी केअर प्लस, एसएमबीटी बोन मॅरो ट्रान्सप्लांट, एसएमबीटी टेलीमेडीसीन, एसएमबीटी ई-कॅम्पस या विविध सेवा उपक्रमांच्या शुभारंभ प्रसंगी डॉ. माशेलकर बोलत होते. याप्रसंगी आमदार बाळासाहेब थोरात, माजी विधानपरिषद सदस्य डॉ. सुधीर तांबे, टाटा मेमोरियल सेंटरचे डॉ एस. डी. बनवली, डॉ पंकज चतुर्वेदी, डॉ राहुल पुरवार यांच्यासह…
अहमदनगर, दि. २९ गुन्हा दाखल होऊन तब्बल सहा महिन्यांचा कालावधी उलटून देखील दूधगंगा नागरी सहकारी पतसंस्थेतील सुमारे ८१ कोटी रुपयांच्या अपहार प्रकरणातील आरोपी पोलिसांच्या रडारवर येत नसल्याने ठेवीदारांच्या ठेवी परत मिळण्याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले असतानाच काही दिवसांपूर्वी आर्थिक गुन्हे शाखेत वर्णी लागलेल्या पोलीस उपाधीक्षक संदीप मिटके यांच्याकडून ठेवीदारांच्या अपेक्षा उंचावल्या होत्या. मात्र त्यांनी तपास सुरू करण्यापूर्वीच बुधवारी त्यांची नाशिकला सहाय्यक पोलीस आयुक्तपदी बदली झाल्याने ठेवीदारांच्या अपेक्षा मावळल्या आहे. पोलीस उपाधीक्षक असलेल्या मिटके यांची बदली काही दिवसांपूर्वी नाशिकला सहाय्यक पोलीस आयुक्तपदी झाली होती. मात्र तेथे हजर होण्यापूर्वीच त्यांच्या बदली आदेशात पुन्हा बदल करत त्यांच्याकडे अहमदनगरच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलीस उपाधीक्षकपदाचा पदभार…
संगमनेर, दि. २८ काँग्रेसचे विधिमंडळ पक्ष नेते माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली देशात आदर्श सहकारासाठी दीपस्तंभ ठरलेल्या संगमनेरच्या सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्यांने यावर्षीच्या दुष्काळी परिस्थितीतही ८ लॉक मॅट्रिक टन ऊस गाळपाचा टप्पा पार केल्याची माहिती कारखान्याच्या व्यवस्थापनाने दिली आहे. दुष्काळजन्य परिस्थितीमुळे यावर्षीचा हंगाम साखर कारखानदारीसाठी अडचणीचा आहे. अशा स्थितीतही थोरात साखर कारखान्यावर सभासद, कार्यक्षेत्रातील व कार्यक्षेत्राबाहेरील ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा मोठा विश्वास आहे. या बळावरच कारखान्याने गाळपाचा हा टप्पा पार केला. सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांचे हे जन्मशताब्दी वर्ष असल्याने कारखान्याच्या नवीन प्रशासकीय इमारतीसह तेथे त्यांचा अर्धाकृती पुतळा उभारण्यात आला आहे. याशिवाय विविध उपक्रम देखील राबविले…
संगमनेर, दि.२८ येथील कडलग इन्व्हेस्टमेंटचे संचालक सुनील कडलग यांना समाजात अर्थसाक्षरता निर्माण करण्यासाठी दिलेल्या योगदानाबद्दल तर साईनाथ उद्योग समूहाच्या माध्यमातून कृषी क्षेत्रातील व्यवसायात नाविन्यपूर्ण कामगिरीबद्दल सुदीप वाकळे यांना प्रतिष्ठेच्या “इंडियन ग्लोरी अवॉर्ड्स” या राष्ट्रीय गुणवत्ता पारितोषिकाने सन्मानित करण्यात आले आहे. नवी दिल्ली येथे आयोजित व्यावसायिक व शैक्षणिक शिखर परिषदेत सर्वोच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायाधीश डॉ. के. जी. बालकृष्णन, माजी क्रिकेटपटू मदनलाल, भारतीय उद्योग महासंघाच्या पहिल्या महिला आणि माजी उपमहासंचालक मनिषा रॉय, संस्थापक अध्यक्ष आणि कौन्सिलचे संचालक जॉर्ज कोचुपुरकल यांच्या हस्ते कडलग व वाकळे यांना इंडियन ग्लोरी अवॉर्ड्स राष्ट्रीय गुणवत्ता पारितोषिकाने सन्मानित करण्यात आले. ग्लोबल चेंबर ऑफ कंजूमर राइट्स व काईटस् क्राफ्ट…
संगमनेर, दि. २८ नगर एलसीबी आणि तालुका पोलिसांनी केलेल्या वाळू तस्करीच्या कारवाईनंतर संगमनेरचे तहसीलदार धीरज मांजरे ॲक्शन मोडवर आले आहे. संगमनेर खुर्द येथून अवैध वाळू उपसा करणाऱ्या आठ जणांना तुमच्यावर कारवाई का करू नये, अशा आशयाच्या नोटिसा बजावल्या आहे. याशिवाय महसूलची हेरगिरी करणाऱ्या आणि वाळू तस्करीला मदत करणाऱ्यांना देखील कारवाईच्या नोटिसा बजावण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे.राज्याचे महसूल आणि जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी संगमनेरसह राज्यातील विविध राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसह वाळू तस्करांकडून सुरू असलेल्या बेकायदा वाळू तस्करीकडे विशेष लक्ष केंद्रित केले आहे. त्यासाठी त्यांनी नवे वाळू धोरण देखील आणले असून त्याची राज्यात अंमलबजावणी सुरू आहे. असे असले तरी या धोरणाची…
मुंबई, दि. २७ विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी पुरवणी मागण्या संदर्भात काँग्रेसचे विधिमंडळ गटनेते बाळासाहेब थोरात यांनी विधानसभेत विविध प्रश्न उपस्थित सरकारची कोंडी केली. सुरुवातीलाच त्यांनी विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनाही धारेवर धरले. मला पहाटे साडेपाच वाजता कामकाजपत्रिका मिळाली, अशी तक्रार करत बाळासाहेब थोरात यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली. यावर राहुल नार्वेकर यांनीही चौकशी करण्यात येईल, असे स्पष्ट केले. सभागृहात मंगळवारी प्रबळ विरोधकाची भूमिका बजावताना बाळासाहेब थोरात म्हणाले, महानंदा ही दुधाची प्रतिष्ठित अशी शिखर संस्था होती. यामागे महाराष्ट्राचा दुधाचा एक ब्रँड करायचा असा उद्देश होता. गोरेगाव मध्ये या संस्थेची ५० एकर जमीन आणि अत्याधुनिक प्लांट आहे. मात्र…
अहमदनगर, दि. २६ फेब्रुवारी ८० हजार कोटी रुपयांचा सुरत ते दक्षिणेतील राज्यांना जोडणारा नवीन रस्ता व पुणे ते छत्रपती संभाजी नगर रस्ता महाराष्ट्राचे भविष्य बदलविणारा रस्ता ठरेल, असा विश्वास केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला. अहमदनगर शहरातील द्वारका लॉन्स येथे ९६१ कोटी रुपये किंमतीच्या अहमदनगर शहर बाह्यवळण रस्ता, ९८० कोटी रुपये किंमतीच्या अहमदनगर-मिरजगाव-करमाळा-टेंभुर्णी पॅकेज (एक) अहमदनगर ते घोगरगाव, व पॅकेज (दोन) घोगरगाव ते चापडगाव या १०३२ कोटी रुपये किंमतीच्या रस्त्यांचे लोकार्पण केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते आज सोमवारी करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. यावेळी खासदार डॉ. सुजय विखे पाटील,…
संगमनेर, दि. २६ राज्यातील वाळू तस्करीला लगाम लावण्यासाठी महसूल तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील सातत्याने प्रयत्न करत आहे. यासाठी त्यांनी नवे वाळू धोरण देखील आणले, मात्र वाळू तस्करांकडून बेकायदा वाळू उपसा सुरूच आहे. संगमनेर तालुका पोलिसांनी केलेल्या कारवाईत एका झेनॉन गाडीला भगवा ध्वज लावून वाळू तस्करी सुरू असल्याचे समोर आले. नगर एलसीबीने दोन दिवसांपूर्वीच संगमनेर मधील वाळू तस्करांवर कारवाई केली, याला काही तासांचा अवधी उलटत नाही तोच तालुका पोलिसांनी महसूलमंत्र्यांच्याच मतदारसंघातील पिंपरणे-जोर्वे रस्त्यावर केलेली कारवाई समोर आली आहे. सोमवारी मध्यरात्री ही कारवाई करण्यात आली असून संगमनेर तालुका पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, टाटा कंपनीच्या एम. एच. ४२ बी ४०२६ या…
