Author: अनंत पांगारकर

गुरुवार दि. २१ मार्च, मुंबई निवडणूक आयोगाने लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या आहेत. या निवडणुका एकूण सात टप्प्यात होणार असून त्यासाठी मागच्या शनिवारपासून देशभरात आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. या निवडणूक कालावधीत आचारसंहितेचे उल्लंघन होत असल्यास सर्वसामान्य मतदार नागरिकांना आता थेट निवडणूक आयोगाकडे तक्रार करता येणार आहे. त्यासाठी भारत निवडणूक आयोगाने सीव्हिजिल सिटीझन ॲप विकसित केले आहे. या ॲपवर दाखल होणाऱ्या तक्रारींवर पहिल्या १०० मिनिटांत पहिली कार्यवाही केली जात आहे. आचारसंहिता कालावधीत काय करावे आणि काय करु नये याविषयी निवडणूक उमेदवार, प्रशासन आणि राजकीय पक्षांना माहिती दिली जाते. पण, काही वेळेला या आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन होते. त्याची तक्रार करणे…

Read More

गुरुवार दि. २१ मार्च, संगमनेर गेल्या काही दिवसांपासून सातत्याने वादात असलेल्या जोर्वे नाका पहाटेच्या घटनेमुळे पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. क्रिकेटची मॅच खेळून आपल्या जोर्वे गावाकडे परतणाऱ्या मुलांवर हल्ला करण्यात आला आहे. या मुलांना त्यांच्याकडील बॅटनेच बेदम मारहाण केल्याचा प्रकार पहाटे एक वाजण्याच्या सुमारास घडला. याप्रकरणी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नांदूर शिंगोटे (ता. सिन्नर, नाशिक) येथे सुरू असलेल्या क्रिकेटच्या मॅच संपवून काही मुले घराकडे परतत असताना तीन बत्ती चौक ते जोर्वे नाका परिसरात त्यांना अडवून मारहाण करण्यात आली. या संदर्भात साई महेश जाधव यांच्या तक्रारीवरून एका दुचाकी चालकासह सात ते आठ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात…

Read More

गुरुवार दि. २१ मार्च, अकोले राज्यात दुधाचे भाव सातत्याने कोसळत असताना शेतकरी श्रीमंत होणार, शेतकऱ्याला दुधाचे पैसे मिळणार, मार्चअखेर शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होणार अशी जाहिरातबाजी करून राज्याचे दुग्धविकास तथा महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार करीत असल्याची संतप्त प्रतिक्रिया कॉम्रेड डॉ. अजित नवले यांनी व्यक्त करत दुग्ध विकास मंत्री आणि सरकारचा तीव्र निषेध केला आहे. डॉ. नवले यांनी मंत्र्यांच्या या जाहिरातबाजीवर संतप्त होत सोशल मीडियातून प्रतिक्रिया व्यक्त केली असून सरकारवर जबरदस्त टीका केली आहे. दुधाचे भाव आणखी कोसळलेले असताना दुग्धविकास मंत्री काय जाहिरात करत आहेत पहा असे म्हणत सोशल मीडियावरून सरकारला चांगलेच धारेवर धरले…

Read More

गुरुवार दि. २१ मार्च, संगमनेर १० वर्ष वयाच्या मतिमंद असलेल्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या दत्तू पंढरीनाथ डोळझाके (रा. हिवरगाव पठार, ता. संगमनेर) याला संगमनेरच्या जिल्हा न्यायालयाने पाच वर्षे सश्रम कारावास आणि २७,५०० रुपये दंडाचे शिक्षा सुनावली आहे. २५ मे २०२२ रोजी पठार भागातील एका गावात घडलेल्या या प्रकारासंदर्भात घारगाव पोलीस ठाण्यात पीडित मुलीच्या मामाने दिलेल्या तक्रारीवरून भा. द. वि. कलम ३५४(अ), ३५४(ब), ३२३, पोस्को, अनुसूचित जाती जमाती कायद्यानुसार दत्तू पंढरीनाथ डोळझाके यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. संगमनेरचे तत्कालीन पोलीस उपाधीक्षक राहुल मदने यांनी या गुन्ह्याचा तपास केला होता. फिर्यादी व त्याच्या कुटुंबीय घरात असताना फिर्यादीची भाची दुपारी साडेतीन…

Read More

बुधवार दि. २० मार्च, अहमदनगर साकुर (ता. संगमनेर) येथील अल्पवयीन मुली सोबत घडलेल्या घटनेबाबत महाराष्ट्र राज्य महिला आयोगाने “सु-मोटो” दखल घेतली असून या संदर्भात संबंधितांवर कारवाईचे पोलीस प्रशासनाला निर्देश देत लवकरात लवकर यासंबंधीचा अहवाल सादर करण्याचे आदेश दिले दरम्यान राज्य महिला आयोगाच्या सदस्य उत्कर्षा रुपवतेंनी पीडितेच्या कुटुंबीयांची भेट घेत या प्रकरणीचा घटनाक्रम जाणून घेतला. यावेळी त्यांनी संबंधितांना तपासाच्या अनुषंगाने काही सूचना केल्या. रुपवते यांनी बुधवारी संगमनेरच्या साकुर येथे जात पीडित मुलीच्या कुटुंबीयांची भेट घेतली. गेल्या महिन्यात २९ तारखेला घडलेल्या या घटनेची दखल पोलिसांनी दोन दिवसांपूर्वी घेतली होती. या संदर्भात पोलीस प्रशासनाकडून दिरंगाई होत असल्याचा आरोप पीडित मुलीच्या कुटुंबियांनी केला. रूपवते…

Read More

बुधवार दि. २० मार्च, संगमनेर साकुर येथील अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचार व तिच्या मृत्यूप्रकरणी पोलीस यंत्रणेने तातडीने तपास पूर्ण करत आरोपींना कठोर शिक्षा होईल यासाठी प्रयत्न करण्याची मागणी जयहिंद महिला मंच, एकविरा फाउंडेशनच्यावतीने तालुका काँग्रेसच्या अध्यक्ष डॉ. जयश्रीताई थोरात यांनी केली आहे. थोरात यांनी महिला कार्यकर्त्यांसह पीडितेच्या कुटुंबीयांची भेट घेत त्यांचे सांत्वन केले. तसेच संगमनेरचे पोलीस उपाधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांची भेट घेत या घटने संदर्भातील माहिती जाणून घेतली. यावेळी त्यांनी आरोपींवर कठोर कारवाई होण्यासाठी पोलीस प्रशासनाने सखोल तपास करण्याची मागणी केली. साकुर येथे दहावीत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचारानंतर तिने आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आल्यानंतर सर्वत्र खळबळ उडाली. उशिराने या…

Read More

अनंत पांगारकर, दि. २० मार्च, अहमदनगर नगर दक्षिणमधून भारतीय जनता पक्षाने विद्यमान खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांना पुन्हा उमेदवारी दिल्याने खासदार विखे व पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्यासमोर पक्षांतर्गत नाराजी दूर करण्याचे मोठे आव्हान निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर सोमवारी झालेल्या पहिल्याच भाजपच्या कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात खासदार विखे यांनी कार्यकर्त्यांसमोर माफीनामा सादर केला होता. त्या पाठोपाठ पालकमंत्री विखे पाटील यांनी नाराज असलेल्या आमदार राम शिंदे यांची भेट घेत त्यांच्यासोबत बंद दाराआड गुप्त खलबते केली. या पार्श्वभूमीवर महसूल मंत्री असलेल्या विखे पाटलांनी पक्षांतर्गत संवाद मोहीम साधण्यात सुरुवात केली असल्याने त्यांची ही मोहीम कितपत यशस्वी ठरते हे निवडणूक निकालानंतरच स्पष्ट होईल. नगर…

Read More

दि. २० मार्च, अहमदनगर १३ मे रोजी अहमदनगर व शिर्डी या दोन्ही मतदारसंघात लोकसभेसाठी मतदान होत आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीस दलाने कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी दोन्ही मतदारसंघातील १७,८९९ गुन्हेगारांवर जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या नेतृत्वाखाली प्रतिबंधात्मक कारवाईचा स्वतंत्र आराखडा तयार केला आहे. निवडणूक व मतदान प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी या आराखड्यानुसार शिर्डी व अहमदनगर लोकसभा मतदारसंघात कारवाईस सुरुवात करण्यात आली आहे. जिल्ह्यात ७ हजारावर पोलीस व ४ हजारावर गृहरक्षक दलाचे जवान तैनात केले जाणार आहे. दोन्ही मतदारसंघात संभाव्य उमेदवारांनी, राजकीय पक्षांनी प्रचाराला सुरुवात केली आहे. तर दुसरीकडे पोलीस यंत्रणेने देखील कायदा सुव्यवस्था बिघडवू शकणाऱ्या गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाईला…

Read More

दि. १९ मार्च, संगमनेर संगमनेर तालुक्यातील पठार भागात असलेल्या साकुरमध्ये दहावी शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीवर केलेल्या अत्याचारानंतर तिने बदनामीच्या भीतीने विषारी औषध सेवन करून आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला. या अमानुष अत्याचाराचा निषेध नोंदवत आरोपींवर कठोर शासन करण्याची मागणी जयहिंद महिला मंच व एकविरा फाउंडेशनच्यावतीने माजी नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे व तालुका काँग्रेस अध्यक्ष जयश्रीताई थोरात यांनी केली आहे. २९ फेब्रुवारीला घडलेल्या या घटने प्रकरणी सोमवारी तालुक्यातील घारगाव पोलीस ठाण्यात पाच आरोपीं विरोधात बाल लैंगिक अत्याचारासह (पोक्सो) विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करून तिघा आरोपींना अटक करण्यात आली आहे. या आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी माजी नगराध्यक्ष व जय हिंद महिला मंचच्या प्रमुख…

Read More

उमेदवारीवर एकमत होताच पूर्ण ताकदीनिशी पालकमंत्री विखेंना उभे राहावे लागेल नांदगावकरांच्या पाठीशी! दि. १९ मार्च, मुंबई लोकसभा निवडणुकीतील सर्वच पक्षांच्या उमेदवारांच्या जागा वाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात असतानाच आता महायुतीला राज्यात नवा सहकारी मिळण्याची शक्यता निर्माण झाली. ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांची नावे राजकीय क्षितिजावरून कायमची हटवा’, असे सांगणारे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज ठाकरे यांनी गृहमंत्री अमित शहा यांची मंगळवारी दिल्लीत भेट घेतली. या भेटीत मनसेला महायुतीत घेण्याचा निर्णय झाला असून यावर महायुतीमधील सर्व मित्र पक्षांचे एकमत झाले असल्याची माहिती समोर येत आहे. सोमवारी रात्री राज ठाकरे अचानक दिल्लीला रवाना झाले होते. मंगळवारी त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची…

Read More