Author: अनंत पांगारकर

श्रीमंत आणि योगी हे शब्दकोषातील दोन स्वतंत्र शब्द. बर्‍याचअंशी विरुध्द अर्थी. जो श्रीमंत, ऐहिक सुखाचा मालक. तरी तो एखाद्या योग्याप्रमाणे दैदिप्यमान, ज्याचा निर्धार अखंड, ज्याचा निश्‍चय मेरू पर्वताएवढा विराट.. असे एकच राजे होऊन गेले. छत्रपती शिवाजी महाराज. रामदेव राय यादवांपासून शककर्त्या सम्राटांनी या भूमीवर राज्य केलं. त्यात शक आहेत, चालुक्य आहेत, हूण आणि चौलही आहेत. ज्यांच्या साम्राज्यावर सूर्य मावळत नव्हता असं म्हणतात त्या नेपोलियन बोनापार्ट, तैमूरलंग, चेंगीझखान, अलेक्झांडर अशा सम्राटांची साम्राज्यंही लयाला गेली. या सम्राटांची महान योध्दे म्हणून जगाने प्रशंसा केली. पण छत्रपतींसारखं महान त्यांना होता आलं नाही. हिंदवी स्वराज्याच्या अशा महान योध्दयाच्या पासंगाला तरी कोणी उतरू शकेल काय? दुर्देवाने…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज – प्रत्येक कुटुंब आणि देशाच्या विकासात स्त्रियांचे मोठे महत्त्व आहे. ५० टक्के लोकसंख्या असलेल्या स्त्रियांनी स्वतःच्या आरोग्याची काळजी घेणे गरजेचे असून महिला निरोगी असली तर कुटुंब निरोगी राहते. संगमनेर तालुका हा एक परिवार समजून आमदार थोरात यांनी प्रत्येक गाव-वाडी-वस्तीपर्यंत विकासाच्या योजना राबविल्या. त्यांच्याच अथक प्रयत्नातून साकारलेल्या निळवंडे धरण आणि कालव्यांमुळे शेतकऱ्यांच्या जीवनात आनंद निर्माण झाल्याचे प्रतिपादन कॅन्सर तज्ञ डॉ. जयश्री थोरात यांनी केले. कोळवाडे येथे महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान उमेद व एकवीरा फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य स्त्री ग्रामसंघ भवन उद्घाटन व तिळगुळ वाटपप्रसंगी कार्यक्रमात त्या बोलत होत्या. यावेळी संशोधक कॅन्सर तज्ञ डॉ. हसमुख जैन, गटविकास…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – संगमनेर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अनिल नागणे यांनी लिहिलेल्या व स्पर्धा परीक्षेतील विद्यार्थ्यांना उपयोगी ठरणाऱ्या “मध्ययुगीन भारताचा इतिहास” या पुस्तकाचे रविवारी केरळचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान यांच्या हस्ते प्रकाशन होत आहे. नामवंत व्याख्याते, विचारवंत अविनाश धर्माधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली पुणे येथे बालगंधर्व रंगमंदिरात रविवारी (ता. २८) सायंकाळी साडेपाच वाजता हा कार्यक्रम होत असल्याची माहिती देण्यात आली. नागणे यांनी लिहिलेले हे पुस्तक स्पर्धा परीक्षेतील विद्यार्थ्यांना उपयोगी पडेल असे आहे. नागणे हे संगमनेर पंचायत समितीमध्ये गेल्या काही वर्षांपासून गटविकास अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. अभ्यासू अधिकारी म्हणून त्यांना ओळखले जाते. महाराष्ट्रातील अनेक विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची तयारी करणे, मुलाखतीची तयारी…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – ”औद्योगिक प्रगतीत सुरक्षा रक्षकांची भूमिका अत्यंत महत्वाची आहे. जिथे सुरक्षितता तिथे प्रगती हे औद्योगिक प्रगतीचे सूत्र आहे” असे प्रतिपादन मालपाणी उद्योग समूहाचे संचालक हर्षवर्धन मालपाणी यांनी येथे केले. ७५ वा प्रजासत्ताक दिन मालपाणी उद्योग समूहात उत्साहात साजरा करण्यात आला. मालपाणी इस्टेट येथे हर्षवर्धन मालपाणी व इशिता मालपाणी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना मालपाणी यांनी वरील उद्गार काढले. यावेळी व्यासपीठावर व्यवस्थापक रमेश घोलप, मानव संसाधन विभाग व्यवस्थापक शिवाजी आहेर, कामगार नेते माधव नेहे, प्रदीप कानवडे, रवींद्र कानडे, देवदत्त सोमवंशी, विशाल वाजपेयी आदी उपस्थित होते. मालपाणी म्हणाले, आपल्या देशाची प्रगती खूप झपाट्याने होत…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – ‘येरे येरे पावसा, तुला देतो पैसा’ या काव्य पंक्तींपासून सुरू होणारे पैशाचे महत्व प्राथमिक शिक्षणातूनही अधोरेखित होते. हातात आलेला पैसा कसा वाचवायचा, त्याची बचत गुंतवणुकीत कशी परावर्तित करायची आणि त्यातून संपत्ती कशी निर्माण करायची याचे ज्ञान म्हणजेच आर्थिक साक्षरता होय. ही आर्थिक साक्षरता प्राथमिक शिक्षणातूनच शिकवण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे, असे प्रतिपादन कडलग इन्व्हेस्टमेंटचे संचालक आणि आर्थिक गुंतवणूक तज्ञ सुनील कडलग यांनी केले. संगमनेर तालुक्यातील मालुंजे येथील जिल्हा परिषदेच्या रामवाडी शाळेत प्रजासत्ताक दिनी कडलग यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. याप्रसंगी ‘चला अर्थसाक्षर होऊयात’ हा उपक्रम उपक्रमशील शिक्षक केशव घुगे यांच्या संकल्पनेतून राबविण्यात आला. यावेळी विद्यार्थी व…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज अहमदनगर – देशाच्या प्रगतीचा रथ सर्वसामान्य व्यक्तींच्या योगदानामुळेच पुढे जात आहे. समाजातील शेवटच्या घटकाचा सर्वांगिण विकास व्हावा, यासाठी सामाजिक सुरक्षेचे योजनारुपी कवच तळागाळातील शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचवण्यासाठी शासनामार्फत यशस्वी प्रयत्न करण्यात येत असल्याचे प्रतिपादन राज्याचे महसूल, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले. प्रजासत्ताक दिनाच्या ७४ व्या वर्धापन दिनानिमित्त पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर मुख्य शासकीय ध्वजारोहण पालकमंत्री विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, पोलीस अधीक्षक राकेश ओला, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, महानगरपालिकचे आयुक्त डॉ. पंकज जावळे आदींची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. पालकमंत्री विखे म्हणाले,…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – प्रत्येकाला समान संधी, मतदानाचा अधिकार आणि समानता देणारी अशी भारतीय राज्यघटना ही जगातील सर्वश्रेष्ठ राज्य घटना असून या राज्यघटनेच्या मूलभूत तत्त्वांना धक्का लागू नये, यासाठी सतर्क राहण्याची आवश्यकता आहे. देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात योगदान दिलेल्या सर्व महापुरुषांच्या स्मरण करतानाच राज्यघटनेची तत्त्व जपणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. यासाठी सर्वांनी कटिबद्ध असले पाहिजे, असे प्रतिपादन राज्याचे माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी केले. सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या कार्यस्थळावर अमृत उद्योग समूहाच्या सामूहिक ध्वजवंदन प्रसंगी आयोजित कार्यक्रमात थोरात बोलत होते. विविध संस्थांचे पदाधिकारी, कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. थोरात म्हणाले, राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी देशाला स्वातंत्र्य मिळवून…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज बिबट्याच्या हल्ल्यात दहा दिवसांपूर्वी नऊ वर्षाच्या बालकाचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच गुरुवारी सायंकाळी पुन्हा एकदा बिबट्याच्या हल्ल्यात पाच वर्षीय बालकाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. दोन्ही घटना संगमनेर राहता तालुक्याच्या सीमेवर घडल्या. हर्षल राहुल मोरे (रा. सादतपूर) असे बिबट्याच्या हल्ल्यात मृत झालेल्या दुर्दैवी बालकाचे नाव आहे. दहा दिवसांपूर्वी लोणी येथे प्रवरा रुग्णालयासमोरील भर लोकवस्तीत असलेल्या गोसावी वस्तीवर बिबट्याच्या हल्ल्यात अथर्व प्रवीण लहामगे या नववर्षीय बालकाचा मृत्यू झाला होता. याच घटनेची पुनरावृत्ती गुरुवारी पुन्हा झाल्याचे दिसून आले. लोणीपासून जवळच असलेल्या सादतपूर येथे गुरुवारी सायंकाळी चार ते साडेचार वाजण्याच्या सुमारास गोरे वस्तीवर बिबट्याच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज मुंबई – महिला बाल विकास आयुक्त रुबल अग्रवाल व अन्य अधिकाऱ्यांसोबत अंगणवाडी कर्मचारी कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडल्यानंतर ५२ दिवसाच्या प्रदीर्घ लढ्यानंतर अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या संपात अखेर तोडगा निघाला आहे. या बैठकीत कर्मचाऱ्यांच्या बहुतांशी मागण्या मान्य करण्यात आल्या आहे. शासनाच्या सकारात्मक भूमिकेमुळे तसेच ग्रॅच्युएटी व पेन्शनचा महत्त्वाचा निर्णय होत असल्याने अंगणवाडी कर्मचारी कृती समितीने आपला संप मागे घेतला. सचिव आणि आयुक्तांसोबत झालेल्या आजच्या बैठकीला एम. ए. पाटील, ॲड. निशा शिवूरकर, शुभा शमीम, दिलीप उटणे, दत्ता देशमुख, सुवर्णा तळेकर, आप्पा पाटील, ॲड. माधुरी क्षीरसागर आदी उपस्थित होते. अंगणवाडी कर्मचाऱ्यांसाठी पेन्शन योजनेचा अंतिम प्रस्ताव तातडीने तयार करण्याचे शासनाने मान्य…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते, माजी महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्या वाढदिवसानिमित्त जाणता राजा मैदानावर ४ फेब्रुवारी ते ७ फेब्रुवारी दरम्यान डॉ. अमोल कोल्हे यांची प्रमुख भूमिका असलेले “शिवपुत्र संभाजी” हे महानाट्य सादर होणार असून या महानाट्यात स्थानिक कलावंतांना संधी मिळणार आहे. यासाठी इच्छुक कलाकारांची ऑडिशन गुरुवारी (ता.२५) सकाळी १० वाजता शॅम्प्रो येथे होणार आहे डॉ. अमोल कोल्हे अभिनित आणि महेंद्र महाडिक लिखित दिग्दर्शित “शिवपुत्र संभाजी”हे महानाट्य ४ ते ७ फेब्रुवारी दरम्यान दररोज सायंकाळी ६ वाजता शहरातील जाणता राजा मैदानावर सादर होणार आहे. या महानाट्यात खासदार डॉ. अमोल कोल्हे हे संभाजी महाराजांच्या मुख्य भूमिकेत असून महाराणी…

Read More