Author: अनंत पांगारकर

मुंबई, दि. ८ मार्च खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील भारत जोडो न्याय यात्रा अंतिम टप्प्यात आली असून नंदूरबार जिल्ह्यातून १२ तारखेला ही न्याय यात्रा महाराष्ट्रात प्रवेश करेल. १७ मार्च रोजी या यात्रेची सांगता शिवाजी पार्कवर इंडिया आघाडीच्या जाहीर सभेने होणार आहे. यासाठी प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्या निर्देशानुसार काँग्रेस पक्षाने यासाठी समन्वय समित्या गठीत केल्या आहेत. भारत जोडो न्याय यात्रेच्या समन्वयासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली समन्वय समिती स्थापन करण्यात आली असून या समितीत विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, विधान परिषद गटनेते सतेज बंटी पाटील, मुंबई विभागीय काँग्रेसच्या अध्यक्ष वर्षा गायकवाड, काँग्रेस कार्यसमिती सदस्य…

Read More

दि. ९ मार्च रक्तपेढीच्या तपासणीत त्रुटी न काढण्यासाठी रक्तपेढी चालकाकडे एक लाख दहा हजाराची लाच मागणाऱ्या उदगीरच्या उपजिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकारी व धाराशिवच्या वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी असलेल्या अस्थिरोगतज्ञाविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डॉ. अश्विनी किशनराव गोरे (वय ४२ वर्षे) व डॉ. प्रितम तुकाराम राऊत (वय ४८ वर्षे, दोघे रा. क्वॉटर्स क्र.३, क्लास १ क्वॉटर्स, सिव्हील हॉस्पिटल कॅम्पस, मारवाडी गल्ली, धाराशिव, जि. धाराशिव) अशी गुन्हा दाखल झालेल्या डॉक्टर दांपत्याची नावे आहेत. डॉ. अश्विनी गोरे या उदगीरच्या जिल्हा रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी असून त्यांच्याकडे प्रादेशिक रक्त संक्रमण अधिकारी वर्ग १ या पदाचा अतिरिक्त कार्यभार आहे. त्यांनी…

Read More

दि. ८ मार्च, मुंबई लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडत आहेत. जागा वाटपावरून महायुती आणि विरोधी महाविकास आघाडीमध्ये चर्चा सुरू आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार दिल्लीत असून हे दोन्ही नेते भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसोबत चर्चा करणार आहेत. या चर्चेत एकनाथ शिंदे आणि अजित पवार लोकसभेच्या सर्वाधिक जागा मिळवण्यात यश मिळवतात का? ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. तर दुसरीकडे पक्षांतर्गत सर्व्हेनंतर भाजपकडून तब्बल डझनभर खासदारांची तिकिटे कापले जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या संदर्भात टीव्ही नाईन मराठीने दिलेल्या वृत्तानुसार, भाजप महाराष्ट्रात ३६ पेक्षा जास्त जागांवर निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे शिंदे गट आणि ठाकरे गटाची धाकधूक वाढल्याची…

Read More

दि. ८ मार्च, संगमनेर राज्यात गोवंश हत्या बंदी कायदा लागू असताना त्याचे उल्लंघन करत एका पिकअपमधून निर्दयतेने वाहतूक केली जात असलेली ३६ जिवंत वासरांची सुटका करत ही वासरे संगमनेर तालुका पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. पोलीस कॉन्स्टेबल अनिल उगले यांनी दिलेल्या फिर्यादीवरून या प्रकरणी संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात अबूबकर इसाक शहा (रा. ममदापुर, ता. राहता) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुरुवारी रात्री साडेनऊ वाजता संगमनेर तालुक्यातील तळेगाव दिघे येथील ग्रामपंचायत कार्यालयासमोरील रस्त्यावर पोलिसांनी ही कारवाई केली. राज्यात गोवंश हत्या बंदी कायदा लागू असताना कत्तलीच्या उद्देशाने एका पीकअप मधून जिवंत वासरांची निर्दयतेने वाहतूक केली जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.…

Read More

दि. ८ मार्च प्रत्येक क्षेत्रात महिलांनी केलेली कामगिरी ही अभिमानास्पद आहे. याच पार्श्वभूमीवर क्रिकेटमध्ये देखील भारतीय मुलींची कामगिरी देशवासीयांसाठी अभिमानास्पद ठरत आहे. कॅन्सरतज्ञ डॉ. जयश्री थोरात यांच्या संकल्पनेतून एकविराच्यावतीने सुरू झालेल्या महिला क्रिकेट व विविध क्रीडा स्पर्धांमुळे तालुक्यातील मुली व महिलांसाठी मोठे व्यासपीठ निर्माण झाले असल्याचे गौरवोद्गार काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी काढले. सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात क्रीडा संकुलात एकविरा फाउंडेशनच्यावतीने महिला टेनिस बॉल क्रिकेट व रस्सीखेच स्पर्धेच्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते. यावेळी समवेत माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, कांचनताई थोरात, माजी नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे, तालुका युवक काँग्रेस अध्यक्ष डॉ. जयश्री थोरात, पद्मा थोरात, सुनंदा जोर्वेकर, शितल…

Read More

नाशिक, दि. ८ मार्च कॉलेज परिसरात कॅफे चालवून विद्यार्थ्यांना चुकीच्या कृत्यासाठी आडोसा करून देतो, थांब तुझ्यावर कारवाई करतो असे धमकावत कॅफे चालकाकडून दरमहा २००० ते ३००० रुपये हप्त्याच्या रूपात उकळणारा सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गुरुवारी अडीच हजार रुपये घेताना एसीबीच्या जाळ्यात अडकला. शंकर जनार्दन गोसावी (रा. टाकळी रोड, नाशिक) असे लाचखोर सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकाचे नाव आहे. लाचखोर गोसावी हा पोलीस आयुक्तालयातील विशेष शाखेत कार्यरत आहे.शहरातील एका कॉलेजच्या परिसरात तक्रारदाराचे कॅफे आहे. या कॅफेमध्ये येणाऱ्या जोडप्यांना प्रायव्हसी मिळावी यासाठी तेथे व्यवस्था (आडोसा) करण्यात आली होती. हा प्रकार लक्षात आल्यानंतर सहा महिन्यांपूर्वी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गोसावी याने कॅफे चालकाची भेट घेत त्याच्यावर कारवाईचा…

Read More

अहमदनगर, दि. ७ मार्च केवळ सत्तेसाठी भाजपमध्ये नव्याने आलेल्या लोकांमुळे जुन्या निष्ठावंतांवर अन्याय सुरू आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाध्यक्षांच्या एका निर्णयामुळे संगमनेर भाजपाची अंतर्गत धुसफूस समोर आली, असे असले तरी स्वतःचाच निर्णय पुन्हा फिरविण्याची आफत भाजपच्या जिल्हाध्यक्षांवर ओढावली. महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील व खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या भाजप प्रवेशानंतर नगर जिल्ह्यातही विखे व्हर्सेस भाजप नेते, कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांमधील हा संघर्ष सातत्याने बघावयास मिळत आहे. नव्या जुन्यातील संघर्ष आणि अंतर्गत वादामुळे जिल्हाध्यक्ष विठ्ठलराव लंघे चांगलेच अडचणीत सापडले असल्याचे दिसत आहे. बुधवारी संगमनेर तालुका मंडळ कार्यकारिणी रद्द केल्याचा स्वतःचाच दिलेला आदेश गुरुवारी पुन्हा २४ तासाच्या आत फिरविण्याची व आहे तीच कार्यकारिणी…

Read More

कोल्हापूर, दि. ७ मार्च मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सोबत शिवसेनेतून (उद्धव बाळासाहेब ठाकरे) बाहेर पडताना गद्दारीचा शिक्का माथी बसलेल्या मुख्यमंत्री शिंदे गटातील काही खासदारांचा पत्ता भाजप कट करण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे या खासदारांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली असून काहीही करा, पण उमेदवारी द्या, धनुष्यबाण मिळणार नसेल तर कमळावर लढू! असं साकडं या खासदारांनी मुख्यमंत्री शिंदे यांना घातल आहे. या मागणीसाठी खासदारांनी दबाव गट तयार केला अजून दोन दिवसात ते एकत्रित भेटणार असल्याचे वृत्त महाराष्ट्र टाइम्सने दिले आहे. शिवसेना फुटीवेळी मुख्यमंत्री शिंदे यांच्यासोबत शिवसेनेतील तेरा खासदार गेले होते. आगामी लोकसभा निवडणुकीत पुन्हा उमेदवारी आणि भरपूर निधी असा शब्द त्यावेळी गृहमंत्री अमित शहा यांनी…

Read More

संगमनेर दि. ६ मार्च युवक काँग्रेसच्या संगमनेर तालुका अध्यक्षपदी एकविरा फाउंडेशनच्या संस्थापक अध्यक्ष कॅन्सर तज्ञ डॉ. जयश्री थोरात यांची तर जिल्हा सरचिटणीसपदी निलेश थोरात यांची नियुक्ती करण्यात आली आहे. डॉ. जयश्री थोरात यांची या माध्यमातून सक्रिय राजकारणात वाटचाल सुरू झाली असून या माध्यमातून नव्या युवा पर्वाची सुरुवात झाल्याचे मानले जात आहे. युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष कुणाल राऊत, महाराष्ट्र युवक कॉंग्रेसचे प्रभारी उदयभानू, जिल्हा प्रभारी रोहित कुमार आणि सहप्रभारी एहसान खान यांनी ही निवड जाहीर केली. युवक काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष स्मितल वाबळे यांनी डॉ. जयश्री यांच्या निवडीची घेषणा केली. डॉ. थोरात या कॅन्सर तज्ज्ञ असून मुंबईच्या टाटा हॉस्पिटलमध्ये कार्यरत होत्या. अभ्यासू आणि सेवाभावी…

Read More

संगमनेर, दि. ६ मार्च गंभीर दुखापतीने मैदानाबाहेर रहावे लागलेल्या बेसबॉलपटू तुषार सोनावणे याची संगमनेरचे  आर्थो सर्जन डॉ. सौरभ पगडाल यांनी यशस्वीरित्या लिगामेंट शस्त्रक्रिया केल्याने तुषार सोनावणेची अखिल भारतीय आंतरविद्यापिठ स्पर्धेच्या पुणे विद्यापिठ संघात निवड झाल्याची माहीती संगमनेर तालुका बेसबॉल असोशिएशनचे अध्यक्ष वैभव दिवेकर यांनी दिली. दिवेकर यांनी सांगितले की, तुषार सोनावणे हा एक उत्कृष्ट बेसबॉलपटू असून अनेक स्पर्धांमध्ये संगमनेर महाविद्यालयाचे प्रतीनिधीत्व करीत उत्तम खेळाचे प्रदर्शन करीत आला आहे. मात्र काही दिवसांपुर्वी त्याचा रस्ते अपघात होऊन पायाचे लिगामेंट फाटून तो जायबंदी झाला व त्यामुळे अनफिट होऊन घरी बसावे लागले होते. आम्ही त्यास अस्थिरोगतज्ञ डॉ. सौरभ पगडाल यांच्याकडे नेले असता त्यांनी शस्त्रक्रिया…

Read More