Author: अनंत पांगारकर
गुरुवार, दि. १६ मे बँक अपहार प्रकरणी दाखल असलेल्या गुन्ह्यात आरोपी करून मालमत्ता जप्त करण्याची भीती दाखवत तक्रारदार आणि साक्षीदाराकडे तब्बल एक कोटी रुपयांची आर्थिक गुन्हे शाखेचा तपासी अधिकारी पोलीस निरीक्षक, सहाय्यक फौजदाराने लाच मागितल्याचा धक्कादायक प्रकार बीडमधून समोर आला आहे. पोलीस निरीक्षक हरिभाऊ खाडे, सहाय्यक फौजदार रवीभूषण जाधवर आणि व्यापारी कुशाल प्रवीण जैन अशी कारवाई केलेल्या आरोपींची नावे आहेत. बीड येथील जिजामाता मल्टीस्टेट प्रकरणी दाखल असलेल्या गुन्ह्यात आरोपी न करण्यासाठी एका बिल्डरकडून पोलीस अधिकाऱ्याने एक कोटी रुपयांची लाच मागितली तडजोडीअंती ठरलेल्या लाचेचा पहिला हप्ता व्यापाऱ्याकडे देण्यास सांगितले. व्यापाऱ्याने लाचेची रक्कम स्वीकारताच त्याला बेड्या ठोकण्यात आल्या आहे. कुशाल प्रवीण जैन…
बुधवार, दि. १५ मे शाळा बंद असल्याबाबतचे प्रमाणपत्र देण्यासाठी आणि शाळेची आरटीई मान्यता वर्धित करण्याचे काम करून दिल्याच्या बदल्यात पन्नास हजार रुपयांची लाच घेणारा शिक्षण अधिकारी (प्राथमिक) बुधवारी एसीबीच्या जाळ्यात अडकला. सतीश सुरेश चौधरी (वय ५२ वर्ष, रा. शांतीनगर, नंदुरबार) असे लाचखोर जिल्हा शिक्षण अधिकाऱ्याचे नाव असून ते नंदुरबार येथे कार्यरत आहे तक्रारदार यांना नवापूर शहर नगरपालिका हद्दीत मालमत्ता क्रमांक ८२६, सिटी सर्वे क्रमांक ६२४, पंचरत्न शॉपिंग कॉम्प्लेक्स येथे नम्रता हॉटेल सुरू करावयाचे असल्याने सदर परिसरात ७५ मीटर अंतरावर बंद पडलेली जिल्हा परिषद शाळा असल्याने उत्पादन शुल्क विभागाने FL३ परवाना देण्यास हरकत घेतली होती. परंतु सदर शाळा इमारत ही जीर्ण…
बुधवार, दि. १५ मे बांधकाम कार्यारंभ आदेश देण्यापूर्वीच १५ टक्क्यांप्रमाणे १ लाख ८२ हजार रुपयांची लाच घेणाऱ्या मुख्याधिकारीपदाचा पदभार असलेल्या नायब तहसीलदारासह नगराध्यक्ष, बांधकाम समिती सभापती, नगरसेवक, नगरसेविकाचा पती आणि एका व्यापाऱ्यावर लाचलुचपत विभागाने मंगळवारी गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल झालेल्या यांचा आहे समावेश… गोंदिया जिल्ह्यातील सडक-अर्जुनी नगरपंचायतीमध्ये लाचखोरीचा हा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी नगरपंचायतीची कामे घेणाऱ्या ठेकेदाराच्या वडिलांनी गोंदिया लाच लुचपत विभागाकडे तक्रार दाखल केली. तेजराम किसन मडावी (वय ६६ वर्ष, नगराध्यक्ष), सडक अर्जुनी नगरपंचायतीच्या मुख्याधिकारी पदाचा अतिरिक्त पदभार असलेले नायब तहसीलदार शरद विठ्ठल हलमारे (वय ५६ वर्ष), नगरपंचायतीच्या बांधकाम समितीचे सभापती आश्लेष मनोहर अंबादे (वय ३५…
मंगळवार, दि. १४ मे घाटकोपरमध्ये मोठे होर्डिंग कोसळून झालेली दुर्घटना अत्यंत दुर्दैवी आहे, या घटनेत १४ लोक ठार तर ८० लोक जखमी झाले असून ही काही साधी घटना नाही. घाटकोपर दुर्घटनेची राज्य सरकारने सखोल चौकशी करुन या घटनेला जे लोक जबाबदार आहेत त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी ज्येष्ठ काँग्रेस नेते व राज्याचे प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी केली आहे. काँग्रेस प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी राजावाडी हॉस्पिटला भेट देऊन घाटकोपर दुर्घटनेतील जखमींची विचारपूस केली व डॉक्टरांकडून माहिती घेतली. त्यानंतर प्रसार माध्यमांशी बोलताना रमेश चेन्नीथला म्हणाले, घाटकोपरमधील होर्डिंग दुर्घटनेला राज्य सरकार व मुंबई महानगरपालिका प्रशासन जबाबदार आहे. दोन वर्षांपासून महानगरपालिकेत लोकप्रतिनिधी नाहीत…
मंगळवार, दि. १४ मे लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू असतानाच पुण्यातील मतदान संपताच मोठी बातमी समोर आली आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या युवासेनेत मोठी फूट पडली असून अनेक पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदाचे राजीनामे दिले आहेत. यामुळे मुख्यमंत्री शिंदे यांच्या पक्षाला पुण्यात मोठा धक्का बसला आहे. पुण्यातील निवडणूक पार पडताच पुणे शहर शिवसेना शिंदे गटातील धुसफुस समोर आली आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत शिवसेना पदाधिकाऱ्यांना विचारात घेतले नसल्याबद्दल नाराजी व्यक्त करत युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी पक्ष सोडला आहे. पुण्यात महायुतीकडून शिवसेना पदाधिकाऱ्यांना डावलले जात असल्याची तक्रार गेल्या अनेक दिवसापासून आहे. निवडणुकी दरम्यानही शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये याबाबत नाराजी होती. मात्र निवडणुकीदरम्यान मतदारांमध्ये वेगळा मेसेज…
मंगळवार, दि. १४ मे शिक्षक मतदार संघातील दोन आणि पदवीधर मतदारसंघातील दोन अशा चार जागांवर निवडणूक आयोगाकडून १० जूनला निवडणुक घेतली जाणार असल्याची घोषणा करण्यात आली होती. मात्र आता या निर्णयात बदल करण्यात आला असून नाशिकसह चारही मतदार संघाच्या निवडणुका अनिश्चित काळासाठी लांबणीवर पडल्या आहे. ७ जुलै २०२४ रोजी नाशिक विभाग शिक्षक मतदार संघाचे आमदार किशोर भिकाजी दराडे, मुंबई विभाग शिक्षक मतदार संघातील आमदार कपिल पाटील यांच्यासह विधान परिषदेतील मुंबई पदवीधर मतदारसंघाचे आमदार विलास पोतनीस व कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार निरंजन डावखरे यांचा कार्यकाल संपत असल्याने या चारही मतदारसंघात निवडणुकीचा निवडणूक आयोगाने ८ मे रोजी कार्यक्रम जाहीर केला होता. त्याचबरोबर…
मंगळवार, दि. १४ मे मुंबई : कांदिवली येथे व्यावसायिकाची पाच कोटींच्या खंडणीसाठी अपहरण केल्याचा गंभीर प्रकार घडला आहे. दोन अज्ञात आरोपींनी ६० लाख रुपयांची खंडणीची रक्कम स्वीकारल्यानंतर व्यावसायिकाची सुटका केली. याप्रकरणी समता नगर पोलिसांनी व्यावसायिकाच्या चालकासह तिघांना अटक केली. तक्रारदार बोरिवली येथील रहिवासी असून त्यांचे अंधेरी येथे कार्यालय आहे. बुधवारी ८ मे रोजी काम संपवून मित्रांसह कार्यालयातून घरी जाण्यासाठी निघाले होते. कांदिवली येथे त्यांचा मित्र मोटरगाडीतून उतरला. गाडीचे दरवाजे बंद करण्यापूर्वीच दोन तरुण आले व ते जबरदस्ती गाडीमध्ये बसले. त्यांनी शस्त्रांचा धाक दाखवून मोटरगाडी दहिसरच्या दिशेने घेऊन जाण्यास सांगितले. तेथे व्यावसायिकाला मारहाण करून पाच कोटींच्या खंडणीची मागणी केली. अखेर व्यावसायिकाने…
सोमवार, दि. १३ मे सोमवारी राज्यात अकरा लोकसभा मतदारसंघात चौथ्या टप्प्याचे मतदान पार पडले. यात प्रामुख्याने अहमदनगरमध्ये ६१% तर शिर्डीमध्ये ६२% टक्के सरासरी मतदान झाल्याची माहिती अहमदनगरचे जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ व शिर्डीचे अपर जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी बाळासाहेब कोळेकर यांनी दिली आहे. लोकसभा सार्वत्रिक निवडणुकी दरम्यान अहमदनगर येथे किरकोळ वादातून राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला. शेवगाव तालुक्यातील भातकुडगाव येथे मतदाराने ईव्हीएमवरील मतदानाचे चित्रीकरण केल्याने संबंधितावर गुन्हा दाखल करण्यात आला तर राहाता तालुक्यातील कोल्हार येथे निळया रंगाच्या शाईची बाटली घेऊन अवैधरित्या शाई लावणाऱ्या व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निवडणुकी दरम्यान अशा किरकोळ घटना वगळता अहमदनगर जिल्ह्यात लोकसभा…
माजी मंत्री बाळासाहेब थोरात, माजी मंत्री राम शिंदे, उमेदवार उत्कर्षा रूपवते यांनी परिवारासह बजावला मतदानाचा हक्क शिर्डी लोकसभा मतदारसंघात सकाळी नऊ वाजेपर्यंत ६.४% मतदान अहमदनगर लोकसभेसाठी ५.६८% मतदान सोमवार, दि. १३ मे लोकसभा निवडणुकीसाठी १० राज्यातील ९६ मतदार संघात चौथ्या टप्प्यातील मतदानाला सकाळी सात वाजता सुरुवात झाली आहे. यात राज्यातील महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या ११ जागांचा समावेश आहे. अहमदनगर, शिर्डी, बीड, पुणे, शिरूर, मावळ, छत्रपती संभाजी नगर, जालना, धुळे, रावेर आणि नंदुरबार या राज्यातील पंधरा जागांचा आज होत असलेल्या मतदानात समावेश आहे. सत्ताधारी महायुती आणि महाविकास आघाडी या दोघांसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची असल्याने या जागांवरून मातब्बरांचे भवितव्य आज मतदान यंत्रात बंद होईल.…
निवडणूक निर्णय अधिकारी बाळासाहेब कोळेकर यांनी संवाद साधत दिल्या शुभेच्छा शिर्डी, रविवार दि. १२ मे निवडणूक आयोगाने घोषित केलेल्या निवडणूक कार्यक्रमानुसार शिर्डी लोकसभा मतदारसंघात सोमवारी (दि. १३ मे) रोजी सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत मतदान होणार आहे. १ हजार ७०८ केंद्रांवर होणाऱ्या या मतदान प्रक्रियेसाठी मतदान पथके पोलीस बंदोबस्तात रवाना झाली. मतदान केंद्रावर नियुक्त मतदान पथकांशी अपर जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी बाळासाहेब कोळेकर यांनी संवाद साधून त्यांना शुभेच्छा दिल्या. तसेच मनावर कोणतेही दडपण न घेता आपल्यावर सोपविलेली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडावी, अशा सूचना केल्या अपर जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतः संवाद साधल्याने आपल्या मनावरील दडपण कमी झाले असून आता अधिक उत्साहाने…
