Author: अनंत पांगारकर
महाराष्ट्र संवाद न्यूज गावठी कट्टा आणि दोन राऊंड सोबत बाळगत संशयास्पदरित्या फिरणाऱ्या श्रीरामपूरमधील व्यक्तीला संगमनेर पोलिसांनी जेरबंद केले आहे. विक्रीच्या उद्देशाने गावठी कट्टा आरोपीने जवळ बाळगण्याचे पोलिसांच्या चौकशीत निष्पन्न झाले आहे. अज्जू उर्फ अजीम अन्वर पठाण (वय 26 वर्ष, रा. वार्ड नंबर 1, मिल्लतनगर, श्रीरामपूर असे पोलिसांनी पकडलेल्या व्यक्तीचे नाव आहे. बुधवारी सायंकाळी वडगाव पान ते समनापुर दरम्यान ही कारवाई करण्यात आली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु आज गुरुवारी शनिशिंगणापूर दौऱ्यावर येत आहे. या पार्श्वभूमीवर सतर्क झालेल्या संगमनेर पोलिसांनी परिसरातील हॉटेल, लॉजिंगची तपासणी व नाकाबंदी सुरू केली असताना त्यांना यासंदर्भात गोपनीय माहिती मिळाली होती. पोलिसांनी संबंधित व्यक्तीला ताब्यात घेऊन त्याची अंगझडती घेतली…
महाराष्ट्र संवाद न्यूज राज्य मंत्रिमंडळाची बैठक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज पार पडली. या बैठकीमध्ये विविध निर्णय घेण्यात आले असून बैठकीसाठी मुख्यमंत्री शिंदे यांच्यासह दोन्ही उपमुख्यमंत्री अनुक्रमे देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांच्यासह मंत्रिमंडळातील मंत्री उपस्थित होते. बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयाची संक्षिप्त माहिती खालील प्रमाणे – ???? अवकाळीग्रस्त भागांचे एकत्रित पंचनामे तातडीने सादर करणार. शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्यात येणार आहे. ???? झोपडीधारकांना मोठा दिलासा देण्यात आला आहे. झोपडपट्टी पुनर्वसनमधील सदनिका हस्तांतरण शुल्कात ५० टक्के कपात करण्यात आली आहे. ???? राज्यात मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा अभियान राबविण्याचा निर्णय़ झाला आहे. पहिल्या टप्प्यात ४७८ शाळांचे मूल्यांकन करण्यात येणार आहे. ???? मराठी…
महाराष्ट्र संवाद न्यूज पर्जन्य छायेमुळे सातत्याने दुष्काळ, पाण्याची कमतरता असतानादेखील काँग्रेसचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली येथील सहकारी संस्थांच्या माध्यमातून साधला गेलेला ग्रामीण विकास आणि तालुक्यातील सामाजिक, आर्थिक, औद्योगिक, शैक्षणिक प्रगती या सहकारातून साधलेल्या पॅटर्नचे नाबार्डच्या अधिकाऱ्यांनी कौतुक केले आहे. नाबार्डच्या मुंबई विभागीय शाखेतील अधिकाऱ्यांच्या अभ्यास गटाने शनिवार व रविवारी अमृत उद्योग समूहाच्या माध्यमातून कार्यरत असलेल्या विविध सहकारी संस्थांना भेटी देत पाहणी केली. मुंबई मुख्यालयाचे डेप्युटी जनरल मॅनेजर राकेश सिंग, विजय तिरूमला, मंगला श्रॉफ, वंदना वेणुगोपाल, गीता यादव, विवेक खानोलकर आदींचा साठ अधिकाऱ्यांचा या अभ्यास गटात समावेश होता. सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखाना, राजहंस दूध संघ, जोर्वे…
महाराष्ट्र संवाद न्यूज देशाच्या स्वातंत्र्यात व राष्ट्र उभारणीत मोठे योगदान असणाऱ्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षात विधिमंडळ पक्षनेते व काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष आमदार बाळासाहेब थोरात यांच्या प्रमुख उपस्थितीत राहता तालुक्यातील विविध पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला आहे. सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या अतिथी गृहावर या पदाधिकाऱ्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यावेळी तालुकाध्यक्ष ॲड. पंकज लोंढे, सचिन चौगुले, विक्रांत दंडवते, नितीन सदाफळ, विनायकराव मते, प्रदेश काँग्रेसचे सचिव सचिन गुंजाळ, मुन्ना फिटर, अमोल आरने, अमोल बनसोडे आदी उपस्थित होते. यांचा झाला प्रवेश: याप्रसंगी निलेश यादव, रामदास गिधाड, नवनाथ गिधाड, सौरभ भाकरे, रविंद्र भाकरे, संजय गिधाड, हरीश गिधाड, प्रमोद गिधाड, विठ्ठल…
महाराष्ट्र संवाद न्यूज मुंबई येथील मराठा मंदिर साहित्य शाखेच्यावतीने देण्यात येणाऱ्या साहित्य पारितोषिक 2022 ची घोषणा करण्यात आली आहे. वैचारिक साहित्य प्रकारांमध्ये संगमनेरमधील लेखक संदीप वाकचौरे यांच्या ‘सृजनाची वाट’ या पुस्तकाला पारितोषिक जाहीर करण्यात आल्याची माहिती शाखेचे कार्याध्यक्ष प्रदीप विचारे यांनी दिली. वाकचौरे यांच्या सृजनाची वाट या पुस्तकाला वैचारिक साहित्य प्रकारातून द्वितीय क्रमांकाचे पारितोषक जाहीर करण्यात आले आहेत. सनय प्रकाशनाच्यावतीने प्रकाशित करण्यात आलेले ‘सृजनाची वाट’ हे शिक्षण विषयावरचे पुस्तक आहे. मराठा मंदिर साहित्य शाखेच्यावतीने कादंबरी, कथा, काव्य, प्रवास, समीक्षा, संशोधन, चरित्र, बाल वांड:मय, ललित वांड:मय, वैचारिक साहित्य अशा विविध साहित्य प्रकारांमध्ये साहित्य पारितोषिकांची घोषणा करण्यात आली आहे. वाकचौरे यांनी सृजनाची…
लवकरच येतोय ‘धर्मवीर-२, मुक्काम पोस्ट ठाणे’, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत चित्रीकरणाचा झाला शुभारंभ!
महाराष्ट्र संवाद न्यूज धर्मवीर आनंद दिघे यांच्या जीवनावर आधारित ‘धर्मवीर-२, मुक्काम पोस्ट ठाणे’ या चित्रपटाच्या चित्रीकरणाचा मुहूर्तसोहळा सोमवारी पार पडला. यावेळी सिनेमाची संपूर्ण टीम उपस्थित होती. विशेष बाब म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील या सोहळ्याला आवर्जून हजेरी लावली. त्यामुळे आता लवकरच 2024 मध्ये हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. धर्मवीर आनंद दिघे यांच्या जीवनावर आधारित ‘धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे’ या २०२२ साली आलेल्या चित्रपटाने बॉक्स ऑफीसवर सुपरहिट कामगिरी केली. आनंद दिघे यांच्या आयुष्यातले महत्वाचे टप्पे या सिनेमात पाहायला मिळाले. त्यानंतर धर्मवीर २ या चित्रपटाची घोषणा झाल्यापासून याची प्रचंड उत्सुकता प्रेक्षकांच्या मनात आहे. आता या चित्रपटाचा पुढील भाग येत असून…
महाराष्ट्र संवाद न्यूज भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे मंगळवारी 28 नोव्हेंबर संगमनेर आणि राहाता येथे शिर्डी लोकसभा मतदारसंघाच्या सहा तालुक्यातील युवा वॉरियर्सशी संवाद साधून संघटनात्मक कार्याचा आढावा घेणार आहे, अशी माहिती भाजपचे जिल्हाध्यक्ष विठ्ठलराव लंघे यांनी दिली. पाच राज्यांच्या निवडणुकांचे निकाल तोंडावर असतानाच भारतीय जनता पक्षाने लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. या पार्श्वभूमीवर पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे शिर्डी लोकसभा मतदारसंघाचा मंगळवारी आढावा घेणार आहे. लोकसभा प्रवास योजनेच्या माध्यमातून प्रदेशाध्यक्ष बावनकुळे राज्यातील मतदारसंघाचा दौरा करत आहे. या दौऱ्याअंतर्गत संगमनेर आणि राहाता येथे संघटनात्मक कार्याचा आढावा घेण्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. बावनकुळे यांचे सकाळी शिर्डी विमानतळावर आगमन झाल्यानंतर संगमनेरमध्ये…
महाराष्ट्र संवाद न्यूज शिवसेनेने (उद्धव बाळासाहेब ठाकरे) राज्यात संघटनात्मक बांधणीसाठी भर दिला असून त्यासाठी विभागीय नेत्यांची यादी जाहीर केली आहे. या यादीमध्ये नगर आणि शिर्डी लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्याकडे देण्यात आली आहे. राऊत यांच्याकडे नगर, शिर्डीसह उत्तर महाराष्ट्र आणि पुणे जिल्ह्याची जबाबदारी सोपविण्यात आली. त्यामुळे राऊत यांच्या नेतृत्वाखाली आता नव्याने संघटना बांधणीला वेग येण्याची चिन्हे आहे. या बांधणी दरम्यान काही पदाधिकारी देखील बदलले जाण्याची शक्यता व्यक्त होत आहे. नाशिक, दिंडोरी, जळगाव, रावेर, धुळे, नंदुरबार, अहमदनगर, शिर्डी, पुणे, बारामती, शिरूर, मावळ या लोकसभा मतदारसंघासह विधानसभा मतदारसंघ पिंपरी चिंचवड व मावळची जबाबदारी राऊत यांच्यावर सोपविण्यात आली आहे.…
महाराष्ट्र संवाद न्यूज एका लग्न समारंभात अल्पवयीन मुलीशी झालेल्या ओळखीनंतर तिचे नको त्या अवस्थेतील फोटो काढून ते समाज माध्यमात व्हायरल करण्याची धमकी देत तिच्यावर वेळोवेळी अत्याचार करणाऱ्या फोटोग्राफरविरुद्ध अहमदनगर मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नगर तालुक्यातील एका अल्पवयीन मुलीने दिलेल्या फिर्यादीनंतर पोलिसांनी महेश गोवर्धन कराळे (वय २३, रा. आगडगाव ता. नगर, हल्ली रा. नालेगाव, दिल्ली गेट) याच्याविरोधात विनयभंग, अत्याचार, पोक्सो आदी कलमान्वये गुरूवारी (दि. २३) रात्री तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. १४ डिसेंबर २०२२ रोजी पीडित मुलगी केडगाव येथे मावस भावाच्या लग्नासाठी गेली होती. त्यावेळी तिची तेथे फोटोग्राफीसाठी आलेल्या महेश कराळे सोबत तिची ओळख झाली होती. आरोपीने…
महाराष्ट्र संवाद न्यूज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू असतानाच नगर, नाशिकच्या धरणांमधून जायकवाडीसाठी पाणी सोडण्यात आल्याने समन्यायी पाणी वाटप कायदा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. या पार्श्वभूमीवर संगमनेरमध्ये काँग्रेसने पाणी सोडण्याच्या निर्णयाला विरोध दाखवत आंदोलन केले. प्रवरा उपखोऱ्यातील भंडारदरा व निळवंडे धरणातून जायकवाडीसाठी सोडण्यात आलेल्या पाण्याला स्थगिती देण्याची मागणी करीत आंदोलन करण्यात आले. थोरात कारखान्याचे अध्यक्ष बाबा ओहोळ, काँग्रेसचे शहराध्यक्ष सोमेश्वर दिवटे, तालुकाध्यक्ष मिलिंद कानवडे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस कार्यकर्ते व पदाधिकारी या आंदोलनात सहभागी झाले होते. का करावे लागले आंदोलन: अहमदनगर जिल्ह्यातील प्रवरा खोऱ्यातील भंडारदरा व निळवंडे लाभ क्षेत्रामध्ये यावर्षी सरासरी आठ ते दहा इंचापेक्षा कमी पर्जन्यमान झाले असल्याने भीषण पाणीटंचाई…
