Author: अनंत पांगारकर
महाराष्ट्र संवाद न्यूज पुणे – एमपीएससी परीक्षेमध्ये राज्यात सहाव्या आलेल्या अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगावच्या 26 वर्षीय दर्शना पवार हिचा संशयास्पद मृत्यू प्रकरणाला वेगळ वळण मिळाल आहे. दर्शनाच्या डोक्यात आणि शरीरावर आढळलेल्या गंभीर जखमांमुळे तिच्या मृत्यू झाल्याचा अहवाल पोस्टमार्टम रिपोर्टमधून समोर येत आहे. त्यामुळे अज्ञात व्यक्ती विरोधात वेल्हे पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांची पाच पथके आरोपीचा शोध घेत आहे. दर्शना पवार हिचा मृतदेह राजगड किल्ल्याच्या पायथ्याला कुजलेल्या अवस्थेत रविवारी आढळून आल्याने याप्रकरणी वेल्हे पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. आता मात्र पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला असून त्या दृष्टीने तपास सुरू केला आहे. दर्शना दत्ता पवार…
महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वाणिज्य व व्यवस्थापन विद्या शाखेअंतर्गत संगमनेर येथील ज्ञानवर्धिनी शिक्षण संस्थेच्या ग्लोबल इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटचे प्राध्यापक ऋषिकेश जगदीश मालाणी यांना विद्यावाचस्पती (पीएचडी) पदवी प्रदान करण्यात आली आहे. प्रा. ऋषिकेश मालाणी यांनी बँकिंग अँड फायनान्स या विषयांतर्गत “महाराष्ट्रातील नागरी सहकारी पतसंस्थांच्या समस्या आणि संभावनांचा अभ्यास” या विषयावर संशोधन कार्य केले. त्यांना मार्गदर्शक म्हणून प्रो. डॉ. आर. एन. वाकचौरे यांचे मार्गदर्शन लाभले. पीएचडी प्रबंधाच्या मौखिक सादरीकरणासाठी रेफरी म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वाणिज्य व व्यवस्थापन विभाग प्रमुख प्रा. डॉ. वीणा हुंबे तर बहिस्थ परीक्षक म्हणून वींझर महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. संजीव लाटे यांचे…
महाराष्ट्र संवाद न्यूज अहमदनगर – खरीप हंगामात शेतकऱ्यांना गुणवत्तापुर्ण व दर्जेदार निविष्ठा वेळेत उपलब्ध होतील यासाठी कृषी विभागाने दक्षता घ्यावी. तसेच बोगस निविष्ठा विक्री व कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या उत्पादक, वितरक व विक्रेत्यांवर कडक कारवाई करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी दिले. खरीप हंगाम तयारी संदर्भात राज्याचे मुख्य सचिव मनोज सैनिक यांनी दूरदृष्य प्रणालीद्वारे आढावा घेतला. तदनंतर उपस्थित अधिकाऱ्यांची बैठक घेत जिल्हाधिकारी सालीमठ यांनी अधिकाऱ्यांना सूचना केल्या. यावेळी पोलीस अधीक्षक राकेश ओला, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी सुधाकर बोराळे, जिल्हा परिषदेचे कृषि विकास अधिकारी निलेश कानवडे आदी उपस्थित होते. जिल्हाधिकारी म्हणाले, खरीप हंगामात सर्व शेतकऱ्यांनी…
महाराष्ट्र संवाद न्यूज अहमदनगर – जिल्हयात सार्वजनिक शांतता आणि सार्वजनिक सुरक्षितता राखण्यासाठी जिल्हा दंडाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी त्यांना प्राप्त अधिकारानुसार संपूर्ण अहमदनगर जिल्हा महसूल स्थळ सीमेच्या हद्दीत महाराष्ट्र पोलीस अधिनियमाचे कलम 37 (1) व 37(3) अन्वये 3 जुलै 2023 पर्यंत प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत. जिल्ह्यात तसेच ग्रामीण भागात सभा, महासभा, आंदोलने व जातीय संवेदनशील वातावरण इत्यादीमुळे सार्वजनिक शांतता राखण्यासाठी जिल्हादंडाधिकारी यांनी 3 जुलै 2023 रोजीच्या रात्रीचे 12 वाजेपर्यंत हे प्रतिबंधात्मक आदेश लागु राहतील, असे प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकान्वये कळविले आहे. या आदेशानुसार नमूद कालावधीत कोणत्याही इसमास शस्त्रे, मोटे, तलवारी, भाले, दंडुके, बंदुका, सुरे, काठ्या किंवा लाठ्या किंवा शारीरिक इजा करण्यासाठी…
महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर शहर व तालुका शिवसेनेच्यावतीने (ठाकरे) वर्धापन दिनानिमित्त सोमवारी शहरातील नेहरू गार्डन जवळ असलेल्या शिवसेना कार्यालयात सत्यनारायण महापूजा आयोजित करण्यात आली होती. पदाधिकारी कार्यकर्त्यांचा नागरिकांनी यावेळी प्रसादाचा लाभ घेतला. शिवसेनेचा ५७ वा वर्धापन दिन राज्यभरात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत असून शिवसेनेत पडलेल्या फुटीनंतरदेखील एकनिष्ठ शिवसैनिकांनी रविवारी मुंबईत झालेल्या पदाधिकारी शिबिरात मोठी गर्दी केली होती. या शिबिरासाठी संगमनेर शहर व तालुका शिवसेनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी रविवारी मुंबई येथे उपस्थित राहून मान्यवरांचे मार्गदर्शन घेतले तसेच आज १९ जूनला शिवसेना शहर व तालुक्याच्यावतीने (ठाकरे गट) संगमनेर येथील नेहरू गार्डन परिसरातील कार्यालयात सत्यनारायण महापूजेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पदाधिकारी व…
विखे गटाची सत्ता उलथून सभासदांनी केले परिवर्तन महाराष्ट्र संवाद न्यूज राहाता – राहाता तालुक्याची कामधेनु असलेल्या श्री गणेश सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीत काँग्रेस नेते आमदार बाळासाहेब थोरात व युवा नेते विवेकभैय्या कोल्हे यांच्या नेतृत्वावर गणेश परिसरातील सभासदांनी विश्वास ठेवून श्री गणेश परिवर्तन पॅनलचे 18 उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजय केले असून विखे गटाला अवघ्या एका जागेवर समाधान मानावे लागले आहे. राज्यभराचे लक्ष लागलेल्या श्री गणेश सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत प्रचाराची रणधुमाळी उठली होती. काँग्रेस पक्षाचे नेते व सहकारातील आदर्श नेतृत्व आमदार बाळासाहेब थोरात यांनी प्रथमच गणेशच्या निवडणुकीत लक्ष घातले. युवा नेतृत्व विवेकभैय्या कोल्हे व आमदार थोरात यांच्या नेतृत्वाखाली गणेश परिवर्तन…
महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर: शहरातील नासिक-पुणे महामार्गावर असलेल्या जोर्वे नाका येथे रविवारी (ता २८मे) रात्री झालेल्या हाणामारी आणि दंगल प्रकरणी पोलिसांनी अटक केलेल्या वीस आरोपींना सोमवारी संगमनेरच्या जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. जवळपास तीन आठवडे आरोपी तुरुंगामध्ये होते. शहरातील जोर्वे नाका येथे झालेल्या वादातून काही नागरिकांवर धारदार शस्त्राचा वापर करत प्राणघातक हल्ल्याचा प्रयत्न झाला. यात जोर्वे येथील आठ जणांना बेदम मारहाण करत जखमी करण्यात आले होते. पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांनी या प्रकाराची गंभीर दखल घेत तातडीने आरोपींविरोधात गुन्हा दाखल करून तपास सुरू केला होता. या घटनेचे पडसाद तालुक्यात व शहरात देखील उमटले. घटनेच्या निषेधार्थ संगमनेरमध्ये…
महाराष्ट्र संवाद न्यूज अहमदनगर – नगरच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात नोकरी करणाऱ्या नर्सने जवळपास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार रविवारी समोर आला आहे. ऋतिका पांडुरंग आंधळे (वय 19 वर्ष, मूळ रा. गिरेवाडी, ता. पाथर्डी, हल्ली रा. नर्सिंग वसतिगृह, जिल्हा रुग्णालय अहमदनगर) असे आत्महत्या केलेल्या दुर्दैवी नर्सचे नाव आहे. या नर्सच्या आत्महत्येचे कारण समजू शकलेले नाही. जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या आवारामध्ये असलेल्या नर्सिंग वसतिगृहामध्ये रूम नंबर 77 मध्ये ऋतिका आंधळे राहत होत्या. त्यांनी शनिवारी रात्री वसतीगृहातील आपल्या खोलीत दोरीच्या साह्याने गळफास घेत आत्महत्या केली. रविवारी सकाळी नऊ वाजता सुमारास हा प्रकार समोर आला. आंधळे यांना रुग्णालयात हलविण्यात आले मात्र उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय…
महाराष्ट्र संवाद न्यूज पुणे – एमपीएससी परीक्षेमध्ये राज्यात सहाव्या आलेल्या अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगावच्या 26 वर्षीय दर्शना पवार हिचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. पवार हिचा मृतदेह राजगड किल्ल्याच्या पायथ्याला कुजलेल्या अवस्थेत आढळून आल्याने याप्रकरणी वेल्हे पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या प्रकाराने पुण्यात खळबळ उडाली आहे. दर्शना दत्ता पवार ही मुळची अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगावची आहे. गेल्या काही वर्षांपासून ती स्पर्धा परिक्षेचा अभ्यास करत होती. पुण्यात देखील तिने क्लास लावला होता. त्यानंतर ती गावी जाऊन सेल्फ स्टडी करत होती. तसेच तिने स्पर्धा परिक्षेतून फॉरेस्ट ऑफिसर म्हणून राज्यातून तिसऱ्या क्रमांकाने यश मिळवले होते. त्यामुळे पुण्यातील एका ॲकेडमीच्यावतीने तिचा सत्कार समारंभ…
महाराष्ट्र संवाद न्यूज हातात खराटे, फावडी, घमेली घेत एक अवलिया गावांमध्ये अवतरतो आणि गावाची उत्स्फूर्तपणे स्वच्छता करू लागतो. ऐरवी गावाला परिचीत नसलेल्या या अवलियाचे लोकांना अप्रुप वाटते. लोकही त्यांच्या स्वच्छता मोहीमेत सहभागी होतात. काही तासात गावातील काना-कोपरा चकाचक झालेला असतो. ही किमया करणारा अवलिया आहे हरिभाऊ ज्ञानोबा उगले. अकोले तालुक्यातील डोंगरगाव येथील रहिवासी असलेल्या हरिभाऊ ज्ञानोबा उगले यांनी संत गाडगेबाबांना आदर्श मानत ग्रामस्वच्छेतेचा वसा घेतला असून त्यांनी आजपर्यंत महाराष्ट्रातील एक हजार खेड्यांना भेटी देत तेथे स्वच्छता केली आहे. उत्तर महाराष्ट्र, विदर्भ व मराठवाड्यातील अनेक खेड्यांमध्ये एक रात्र मुक्काम करून त्यांनी ग्रामस्वच्छता करून घेतली आहे. ग्रामस्थ, पदाधिकाऱ्यांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून सांगितले…
