Author: अनंत पांगारकर

महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – खासदार श्रीकांत शिंदे यांच्या विषयी प्रश्न विचारल्याने वाईट वक्तव्य करत थुंकणाऱ्या शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांच्या विरोधात संगमनेरच्या बस स्थानक चौकात शिवसेनेने (शिंदे गट) निषेध करत आंदोलन केले. राऊत यांनी शिवसेनेविषयी (शिंदे गट) वाईट वक्तव्य केल्यास शिवसेना गप्प बसणार नसल्याचा इशारा यावेळी देण्यात आला. यावेळी शिवसेना तालुका प्रमुख रमेश काळे, उपतालुका प्रमुख विठ्ठल ढगे, माजी शहर प्रमुख दिनेश फटांगरे, अमोल मतकर, बाळासाहेब राऊत, वाहतूक सेना तालुका प्रमुख अरुण उदमले, वैद्यकीय सहाय्यता कक्ष तालुका प्रमुख महेश उदमले, मागासवर्गीय सेल तालुका प्रमुख राहुल पवार, सरपंच सुदाम खैरे, अभिषेक गायकवाड, उपशहर प्रमुख अमोल रनाते, बाळासाहेब व्यवहारे,…

Read More

समाज माध्यमांवर जातीवाचक मेसेज अफवा पसरविणाऱ्यांवर गुन्हे दाखल करणार महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – मंगळवारी संगमनेरमध्ये निघणाऱ्या भगवा मोर्चाला पोलीस प्रशासनाने अद्याप परवानगी दिलेली नाही ही परवानगी ऐनवेळी दिली जाऊ शकते. या पार्श्वभूमीवर संयोजकांकडून वेळोवेळी आढावा घेतला जात आहे. दरम्यान संगमनेर बंदचे कोणतेही नियोजन नसल्याचे संयोजकांनी स्पष्ट केले आहे. बंदची अशी कोणतीही सक्ती करता येणार नसल्याने व्यावसायिकांनी मंगळवारी आपले व्यवसाय सुरू ठेवावेत, अशी माहिती संगमनेरचे नूतन पोलीस उपाधीक्षक सोमनाथ वाघचौरे, पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांनी रविवारी पत्रकार परिषदेत दिली. राज्यात हिंदूंच्या सणांवर होणारे हल्ले, दिल्लीत साक्षीची जिहादींकडून झालेली हत्या आणि शहरातील जोर्वे नाका येथे जोर्वे गावातील आठ हिंदू तरुणांवर झालेल्या…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज / रविवार विशेष  प्रवीण पुरो, मुंबई नव्या संसद भवनाच्या उद्घाटनाचा घाट आणि त्यानुशंगाने विरोधी पक्षांच्या बहिष्काराचं वास्तव लक्षात घेतलं तर हा सारा खेळ एका निर्लज्ज राजाच्या अहंकारासाठी खेळला जात असल्याचं स्पष्ट आहे. इतकं सारं होत असताना राजाची निबृध्द प्रजा या सार्‍या प्रकाराकडे दुर्लक्ष करत असेल तर देशाला कोणीही वाचवू शकणार नाही. पहिल्या क्रमांकाच्या लोकशाहीचा डंका पिटणार्‍या केंद्र सरकारच्या बेगड्या लोकशाहीचं सर्वत्र वस्त्रहरण होत असताना राजा स्वत:चीच पाठ थोपटून घेतो तेव्हा तो पुरता निर्लज्ज झाला असंच मानलं जातं. प्रगल्भ लोकशाहीचा पुरस्कर्ता असलेल्या भारताचं जगभर पुरतं हसं होऊनही ५६ इंची छाती काढत राजा स्वत:चच खरं करतो तेव्हा या राजाला…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – दंडकारण्य अभियानांतर्गत दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी संगमनेर तालुक्यात वटसावित्री पौर्णिमेनिमित्त 1100 वटवृक्षाचे रोपण करण्यात आले असून वटवृक्षासह सर्व देव वृक्ष हे सर्वाधिक ऑक्सिजन देणारे असल्याने या सर्व वृक्षांचे नागरिकांनी संवर्धन करावे, असे आवाहन माजी नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे यांनी केले आहे. दंडकारण्य अभियानांतर्गत तालुक्यातील विविध ठिकाणी वटवृक्षांचे रोपण व पूजन करण्यात आले. तसेच संगमनेर तालुक्यात सौ दुर्गाताई तांबे यांच्या उपस्थितीत खांडगाव, कर्‍हे, निमोण, पिंपळे, नान्नज दुमाला, पारेगांव बु, सोनोशी, पोखरी हवेली, मालदाड येथे वटपूजन व वृक्षारोपण करण्यात आले. तांबे म्हणाल्या, सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या संकल्पनेतून सुरु झालेल्या दंडकारण्य अभियानाचा तालुक्यात मोठा विस्तार झाला आहे. यामध्ये नागरिकांचाही मोठा…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – संगमनेर शहरातील जोर्वे नाका येथे घडलेल्या घटनेनंतर संगमनेर शहरात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. सतर्कता दाखवत पोलीस यंत्रणेने परिस्थितीवर नियंत्रण मिळविले असले तरी या घटनेचे पडसाद समाज माध्यमांवर उमटू लागले आहे. या पार्श्वभूमीवर सायबर पोलीस सतर्क झाले असून समाज माध्यमांवरील मेसेज मुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास ‘ॲडमिन’वर पोलीस कारवाई करण्याचा इशारा शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांनी दिला आहे. पोलीस निरीक्षक मथुरे यांनी या संदर्भात केलेले आवाहन देखील पोलीस खात्याकडून विविध व्हाट्सअप ग्रुप, समाज माध्यमावर प्रसारित करण्यात आले आहे. समाज माध्यमांवर विविध टीका टिप्पणी करणारे तसेच कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणारे…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज शिर्डी – शासकीय कामाच्या नावाखाली यापूर्वी मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर वाळू उपसा झाला. त्याची पुनरावृत्ती होवू नये म्हणून सर्व शासकीय कामांकरीता क्रश सॅण्ड वापरण्याचे धोरण शासन घेणार आहे, अशी माहिती महसूल, पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली. ‘शासन आपल्या दारी’ या उपक्रमाच्या पार्श्वभूमीवर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सर्व विभागातील अधिकाऱ्यांसह अस्तगाव परिसरातील गावांमधील नागरिकांच्या भेटी घेवून ग्रामस्थांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांची तातडीने सोडवणूक करण्याच्या सूचना दिल्या. शिर्डी प्रांताधिकारी माणिक आहेर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुधाकर बोराळे, तहसीलदार अमोल मोरे, गटविकास अधिकारी जालिंदर पठारे, उपविभागीय अधिकारी विलास गायकवाड, जलसंपदा विभागाचे महेश…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – राज्याचे माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी शहरातील जोर्वे नाका येथे घडलेल्या मारहाण प्रकरणी संगमनेर करांना शांततेचे आवाहन केले आहे. या संदर्भातील त्यांचे एक पत्र मोठ्या प्रमाणात समाज माध्यमांमध्ये व्हायरल होत आहे. संगमनेरमध्ये घडलेली घटना दुर्दैवी असल्याचे म्हटले असून यातील गुन्हेगारांना परत शिक्षा झाली पाहिजे प्रशासन देखील या संदर्भात काळजी घेत आहे मात्र या घटनेला जातीय धार्मिक किंवा सामाजिक रंग देण्याचा प्रयत्न केला जाऊ नये गुन्हेगाराला जात धर्म नसतो जो गुन्हेगार असेल त्याला कडक शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी थोरात यांनी या पत्राच्या माध्यमातून करताना संगमनेरकरांना शांतता आणि सुव्यवस्था राखण्याचे आवाहन केले आहे. थोरात यांनी…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – मंगळवारी (6 जून) काढण्यात येणाऱ्या सकल हिंदू समाज भगवा मोर्चाच्या पार्श्वभूमीवर प्रशासन सतर्क झाले असून ‘मोर्चा काढा मात्र सर्वतोपरी काळजी घ्या’, असे आवाहन करत मंगळवारच्या मोर्चाला प्रशासनाने काही अटींवर परवानगी दिली. तसेच स्वयंस्फूर्तीने शहर व तालुक्यातील बहुतांशी गावात बंद देखील पाळला जाणार आहे. महाराष्ट्रात हिंदूंच्या सणांवर होणारे हल्ले, दिल्लीत साक्षीची जिहादींकडून चाकूने अनेक वार करून केलेली हत्या व जोर्वे गावातील ८ हिंदू तरुणांवर तलवारीने झालेल्या जीवघेण्या हल्ल्याच्या निषेधार्थ ६ जुन रोजी होणाऱ्या सकल हिंदु समाज ‘भगवा मोर्चा व संगमनेर शहर तालुका बंद”च्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाने बोलवली बैठक होती. पोलीस उपाधीक्षक सोमनाथ वाघचौरे, तहसीलदार धीरज मांजरे,…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज मुंबई – शिंदे फडणवीस सरकारने आज अचानक सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश काढले आहे. सरकार गेल्या वर्षी जुलैमध्ये सत्तेत आल्यापासून राज्यात अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा सिलसिला सुरू आहे. आपल्या कामगिरीमुळे सातत्याने वलयांकित ठरलेल्या तुकाराम मुंडे यांची देखील पुन्हा बदली करण्यात आली आहे. या अधिकाऱ्यांच्या झाल्या बदल्या… यादी… 1. श्रीमती सुजाता सौनिक, IAS (1987) ACS (AR&OM), GAD, मंत्रालय, मुंबई यांना ACS (गृह), गृह विभाग, मंत्रालय, मुंबई म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. 2. श्री एस. व्ही. आर. श्रीनिवास, IAS (1991) MC, MMRDA, मुंबई यांना OSD, धारावी पुनर्विकास प्रकल्प, मुंबई म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. 3. श्री लोकेश चंद्र, IAS (1993) GM, BEST,…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज स्थापनेनंतर प्रथमत:च संगमनेर मर्चंट बँकेची निवडणूक बिनविरोध करण्यात सत्ताधारी गटाला यश आले. विशेष म्हणजे सत्ताधारी गटाकडून काही विरोधी उमेदवारांना देखील संधी दिली गेल्याने परंपरागत प्रमुख विरोधी उमेदवारांनी देखील निवडणूक बिनविरोध करण्याचा मोठेपणा दाखविला. अनुसूचित जाती जमाती मतदार संघातून राजेंद्र कारभारी वाकचौरे यांनी सुरुवातीलाच व्यापारी एकताच्या बिनविरोध निवडीची सलामी दिली होती. त्यानंतर उर्वरित 16 जागांसाठी 38 उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले होते. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या काही मिनिटांपर्यंत विमुक्त जाती भटक्या जमाती / विशेष मागास प्रवर्ग मतदार संघातील जागे संदर्भात चर्चा सुरू होती. शेवटी तीही जागा बिनविरोध करण्यात सत्ताधारी मंडळाला यश आले. बिनविरोध निवड झालेले उमेदवार खालीलप्रमाणे: सर्वसाधारण…

Read More