Author: अनंत पांगारकर

शुक्रवार, दि. 19 एप्रिल मुंबई : महाराष्ट्रातील पाच जागांसह देशभरातील 102 जागांसाठी आज पहिल्या टप्प्यात कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत सकाळी 7 ते संध्याकाळी 6 या वेळेत मतदान पार पडले. देशात पहिल्या टप्प्यात 60 टक्क्यांहून अधिक मतदान झाले, महाराष्ट्रात 55.29 टक्के मतदान झाले. महाराष्ट्रात पहिल्या टप्प्यात 55.29 टक्के मतदान भंडारा-गोंदियात 56.87 टक्के गडचिरोली-चिमूरमध्ये 65.97 टक्के रामटेकमध्ये 52.38 टक्के नागपूरमध्ये 49.07 टक्के चंद्रपूरमध्ये 55.11 टक्के

Read More

शुक्रवार, दि.१९ एप्रिल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे तिसऱ्यांदा देशात सरकार आल्यास तीनशे युनिट पर्यंत मोफत वीज मिळणार असल्याचे मोठे वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी धाराशिवमध्ये प्रचार सभेत केले आहे. पवार म्हणाले, पाठीमागच्या काळामध्ये आम्ही सरकारमध्ये असताना गरिबांना वीजबिल माफी केली होती. सुशीलकुमार शिंदे त्यावेळी मुख्यमंत्री होते. त्या मुद्द्यावर निवडणूक जिंकली आणि पहिले वीज बिल शून्याचे दिले. मात्र नंतर पुन्हा आधीसारखे बिल देण्यास सुरुवात झाली. असे करणे परवडत नाही. मात्र मोदी हे कोणतेही काम मागील पुढील विचार करून करतात. ”राज्यात कार्यक्रमासाठी जेव्हा मोदी येतात, त्यावेळी राज्याचे प्रतिनिधी म्हणून त्यांच्याशी संवाद साधण्याची आम्हाला संधी मिळते. आम्ही त्यांच्याशी चर्चा करतो. आता ३००…

Read More

शुक्रवार, दि. १९ एप्रिल भारतीय जनता पक्षाचा २०१४ चाच जुमला आता २०२४ मध्ये मोदी गॅरंटी नावाने समोर आणला जात आहे. ज्यांनी दहा वर्षाचा कार्यकाळात केवळ खोटे बोलून जनतेला फसविले तेच मंडळी आता या निवडणुकीत मोदी गॅरंटीचा ढोल वाजवत आहे. मात्र महाराष्ट्रात केवळ महाविकास आघाडी सरकारच्या काळातील फक्त “ठाकरे गॅरंटी” चालते, असे प्रतिपादन शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) युवा नेते आमदार आदित्य ठाकरे यांनी केले. शिर्डी लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा उमेदवारी अर्ज आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत दाखल करण्यात आला. यावेळी झालेल्या सभेवेळी महाविकास आघाडीचे ज्येष्ठ नेते आमदार बाळासाहेब थोरात, माजी मंत्री शंकरराव गडाख, आमदार लहू कानडे, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे…

Read More

शुक्रवार, दि.१९ एप्रिल पोलिसांच्या ११२ क्रमांकावर कॉल आला. कॉल करणाऱ्या व्यक्तीने हद्दपार करण्यात आलेला इसम हा शहरातील इंदिरानगर भागात फिरत असल्याची माहिती दिली. त्यामुळे तातडीने मिळालेल्या माहितीची खातर जमा करण्यासाठी पोहोचलेल्या पोलीस पथकाला धीरज राजेंद्र पावडे हद्दपारीच्या आदेशाचे उल्लंघन करून गावात फिरताना आढळून आल्याने त्याला पकडण्यात आले. धीरज राजेंद्र पावडे याला संगमनेरच्या प्रांत अधिकाऱ्यांनी संगमनेर तालुक्याच्या महसूल स्थळ सीमेतून २४ एप्रिल पर्यंत हद्दपार करण्याचे आदेश काढले होते. प्रांत अधिकाऱ्यांच्या आदेशाचे पालन करत पावडे याला हे आदेश पोलिसांनी बजावले होते. मात्र या आदेशाचे उल्लंघन करून तो शहरात फिरत होता. त्यामुळे अज्ञात व्यक्तीने यासंदर्भात पोलिसांच्या ११२ क्रमांकावर फोन करत यासंदर्भात माहिती दिली…

Read More

शुक्रवार, दि.१९ एप्रिल गोवंश जनावरांच्या हत्येसाठी प्रसिद्ध असलेल्या संगमनेरमधील कत्तलखान्यावर शुक्रवारी पहाटे नगरच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकून २९०० किलो गोवंश मांसासह २१ लाख रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला. या कारवाईत तीन जणांना पोलिसांनी अटक केली आहे. एलसीबीच्या कारवाईनंतर संगमनेरमधील कत्तलखाने केवळ कागदावर बंद असल्याचे समोर आले आहे. स्थानिक पोलिसांना हे कत्तलखाने बंद करण्यात पूर्णतः अपयश आले आहे. नगरच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला संगमनेर मधील जमजम कॉलनीत सुरू असलेल्या कत्तलखान्यात गोवंश जनावरांची कत्तल सुरू असल्याची माहिती मिळाली होती. त्यामुळे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक तुषार धाकराव, पोलीस अंमलदार सचिन अडबल, बापूसाहेब फोलाने, गणेश भिंगारदे, सचिन लोंढे, अतुल लोटके, संतोष खैरे,…

Read More

शुक्रवार, दि.१९ एप्रिल बुधवारी श्रीराम नवमीच्या दिवशी संगमनेर तालुक्यातील हिवरगाव पावसा येथे दुर्दैवी घटना घडली. पावसे परिवारातील दोन सख्या लहान भावंडांचा शेततळ्यात घडून दुर्दैवी मृत्यू झाला. संगमनेर तालुका एक परिवार समजून कुटुंबप्रमुख असलेले काँग्रेस नेते, आमदार बाळासाहेब थोरात यांनी शुक्रवारी सकाळी या शोकाकुल कुटुंबीयांची भेट घेत त्यांचे सांत्वन केले. श्रीराम नवमीच्या दिवशी सायंकाळी खेळता खेळता शेत तळ्यात बुडून पाचव्या इयत्तेत शिकणाऱ्या रितेश सारंगधर पावसे (वय १२ वर्षे) व तिसरा इफेक्ट शिकणाऱ्या प्रणव सारंगधर पावसे (वय ८ वर्ष) या दोघा भावंडांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे संगमनेर तालुक्यात दुःखद वातावरण तयार झाले. वर्षभरापूर्वीच घरातील कर्त्या व्यक्तीचे निधन झाल्याने या कुटुंबावरील छत्र हरपले…

Read More

गुरुवार, दि. १८ एप्रिल  राज्य महिला आयोगाच्या सदस्य असलेल्या उत्कर्षा रूपवते यांनी काँग्रेसचा राजीनामा देत वंचित बहुजन आघाडी प्रवेश करतात गुरुवारी वंचित कडून शिर्डी लोकसभा मतदारसंघासाठी त्यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली. यामुळे आता शिर्डीत महाविकास आघाडी विरुद्ध महायुती विरुद्ध वंचित बहुजन आघाडी अशी तिरंगी लढत रंगणार आहे. शिर्डीत वंचितच्या उमेदवारामुळे राजकीय गणिते बदलण्यास सुरुवात झाली आहे. रुपवते यांच्या उमेदवारीचा फटका महाविकास आघाडीचे उमेदवार भाऊसाहेब वाकचौरे यांना सर्वाधिक बसण्याची चिन्हे वर्तवली जात आहे. तर दुसरीकडे गेल्या दहा वर्षापासून मतदार संघात फारसे न फिरकणाऱ्या खासदार सदाशिव लोखंडे यांच्या विषयी मतदारसंघात नाराजीचे वातावरण आहे. अशा स्थितीत रूपवते यांची उमेदवारी या मतदारसंघात काय परिणाम…

Read More

शिर्डी, गुरुवार दि. १८ एप्रिल  लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ अंतर्गत ३८ शिर्डी (अनुसूचित जाती) लोकसभा मतदारसंघात चौथ्या टप्प्यात सोमवारी (दि. १३ मे) मतदान होणार आहे. यासाठी उमेदवाराकडून नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची प्रक्रिया आजपासून (दि. १८ एप्रिल) सुरूवात झाली आहे. पहिल्या दिवशी एकाही उमेदवाराने नामनिर्देशन पत्र अर्ज दाखल केला नाही. मात्र पहिल्या दिवशी १८ उमेदवारांनी ३१ अर्ज घेतले. गुरूवारी निवडणुकीची अधिसूचना प्रसिद्ध झाली. तसेच याच दिवसापासून २५ एप्रिल २०२४ पर्यंत ११ ते ३ वाजेपर्यंत निवडणूक निर्णय अधिकारी, ३८ शिर्डी (अ.जा.) लोकसभा मतदारसंघ यांचे कार्यालय, १ ला मजला, राहाता तालुका प्रशासकीय इमारत, राहाता येथे नामनिर्देशन पत्र नाममात्र शुल्कात दिले जात आहेत. नामनिर्देशन…

Read More

गुरुवार, दि.१८ एप्रिल एकादशीच्या दिवशी पांडुरंगाच्या दर्शनाला जायचे असे सांगून अल्पवयीन पुतणीला दुचाकीवर जुन्नर तालुक्यात असलेल्या खंडोबा मंदिरात नेत तेथे तिच्यावर बलात्कार करणाऱ्या चुलत्याला संगमनेरच्या जिल्हा व सत्र न्यायालयाने विविध कलमांतर्गत दोषी ठरवत दहा वर्ष सक्तमजुरी आणि तीस हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. पांडुरंग यशवंत शेंगाळ, रा. शेंगाळवाडी, हिवरगाव पठार ता. संगमनेर असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. घटनेच्या दिवसापासून तब्बल सात वर्ष फरार होता. कोरोना महामारीच्या काळात आरोपी आपल्या घरी आला होता. नेमकं याच दरम्यान आरोपीला पकडण्यासाठी न्यायालयाने अटक वॉरंट काढले होते. न्यायालयाने काढलेल्या वॉरंटमुळे फरार असलेला आरोपीला पोलिसांना पकडता आले. त्यानंतर आरोपी तुरुंगात होता. १९ जुलै २०१३…

Read More

गुरुवार, दि.१८ एप्रिल  राज्य महिला आयोगाच्या सदस्य, काँग्रेसच्या महासचिव पदासह सर्व पदांचा राजीनामा देणाऱ्या उत्कर्षा रुपवते यांनी अखेर वंचित बहुजन आघाडीत प्रवेश केला आहे. शिर्डी लोकसभा मतदारसंघातून वंचित कडून त्यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. रुपवते वंचितच्या उमेदवार असल्यास या मतदारसंघातील राजकीय गणित बदलणार असून त्याचा सर्वाधिक फटका महाविकास आघाडीला बसण्याची चिन्ह आहेत. बुधवारी रुपवते यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना आपल्या सर्व पदांचा राजीनामा पाठवल्यानंतर पाठोपाठ त्यांनी अकोल्यात वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतली. या भेटीत त्यांनी आंबेडकरांच्या यशवंत भवन निवासस्थानी वंचित मध्ये प्रवेश केला असून आंबेडकर यांनी त्यांचे स्वागत केले आहे. यावेळी वंचितचे राज्य…

Read More