Author: अनंत पांगारकर

आश्वी (महाराष्ट्र संवाद न्यूज) संगमनेर तालुक्यातील आश्वी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून कोल्हार-घोटी महामार्गावरील लगतच्या दोन गावांमधून दोन अल्पवयीन मुलींना अज्ञातांनी पळून नेल्याचा प्रकार घडला. या संदर्भात दोन्ही मुलींच्या पालकांनी आश्वी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात व्यक्तीविरोधात दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहे. पहिल्या घटनेत 16 मे रोजी 14 वर्षे 10 महिने वयाची अल्पवयीन मुलगी गावातील दुकानामध्ये मॅगी आणण्यासाठी गेली होती. बराच वेळ झाला तरी ती घरी परतली नाही. त्यामुळे घरातील व्यक्तींनी दुकानदाराकडे जाऊन चौकशी केली असता संबंधित मुलगी दुकानात मॅगी घेण्यासाठी आली नसल्याची माहिती त्यांना मिळाली. आजूबाजूला तिचा शोध घेतला असता ती मिळून आली नाही, त्यामुळे तिच्या घरच्या व्यक्तींनी दिलेल्या…

Read More

संगमनेर (महाराष्ट्र संवाद न्यूज) रात्रीच्या वेळी मोबाईल टॉवरवर आराम करण्यासाठी बसलेल्या विविध प्रकारच्या पक्षांना पकडण्यासाठी मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास तो मोबाईल टॉवरवर चढला. मध्यरात्रीच्यावेळी टॉवरवर चढलेल्या या युवकाला टॉवरच्या उंचीचा अंदाज आला नाही. पक्षी पकडण्याच्या नादात टॉवरवरून तोल जाऊन खाली पडताना तो जीव गमावून बसला. संगमनेर तालुक्यातील अंभोरे या गावी रविवारी मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. गणेश भास्कर गवळी (वय अंदाजे 27 वर्ष) असे या मृत झालेल्या दुर्दैवी तरुणाचे नाव आहे. गवळी हा लहानपणापासून आणि लग्नानंतरदेखील पत्नी आणि दोन मुलींसह आपला मेव्हणा काळू बर्डे यांच्याकडे राहावयास होता. रविवारी गावात कार्यक्रम असल्याने गणेश गवळी याने मद्य प्राशन केल्याची माहिती…

Read More

संगमनेर (महाराष्ट्र संवाद न्यूज) – रविवारी झालेल्या आशीर्वाद नागरी सहकारी पतसंस्थेच्या निवडणुकीत सत्ताधारी आशीर्वाद विकास पॅनलचे सर्वच्या सर्व उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी झाले आहे. सभासदांनी पुन्हा एकदा सत्ताधाऱ्यांवर विश्वास दर्शवित विरोधी पॅनलचा मोठ्या मताधिक्याने पराभव केला. अनुसूचित जाती-जमाती राखीव प्रतिनिधी मतदारसंघातून सुनील पुनाजी दाभाडे तर विशेष मागास प्रवर्ग राखीव मतदार संघातून बाळासाहेब जगन्नाथ दासरी या सत्ताधारी गटाच्या दोन्ही उमेदवारांची निवड सुरुवातीलाच बिनविरोध झाली होती. विरोधी गटाने बहुतेक जागांवर उमेदवार उभे केल्याने उर्वरित तेरा जागांसाठी रविवारी मतदान झाले. या संस्थेच्या निवडणुकीकडे सभासदांचे लक्ष लागले होते. मतदानानंतर लगेचच मतमोजणी करण्यात आली. मतमोजणीनंतर विरोधी गटाच्या उमेदवारांचा मोठ्या मताधिक्याने पराभव झाल्याचे दिसून आले. एकाही…

Read More

संगमनेर (महाराष्ट्र संवाद न्यूज) अज्ञात व्यक्तीने संगमनेरच्या बालगृहातून नऊ वर्षीय वयाच्या बालकाला पळवून नेल्याची घटना समोर आली आहे. संगमनेर शहर पोलीस ठाण्यात या संदर्भात अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस आरोपीचा शोध घेत आहे. संगमनेर शहरामध्ये बीएड कॉलेज जवळ बालगृह असून या बालगृहात असलेल्या नववर्षीय मुलाला काहीतरी फुस लावून कोणीतरी अज्ञात व्यक्तीने तक्रारदाराच्या रखवालीतून पळवून नेण्याचा प्रकार शनिवारी सायंकाळी पाच ते सात वाजण्याच्या दरम्यान घडला. या संदर्भात बालगृहाचे कर्मचारी बाळकृष्ण दिगंबर आंबरे यांनी रविवारी दुपारी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्ती विरोधात दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस…

Read More

नाशिक (महाराष्ट्र संवाद न्यूज) नाशिकच्या यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या कुलगुरूपदी डॉ. संजीव सोनवणे यांची राज्यपाल रमेश बैस यांनी नियुक्ती केली आहे. सोनवणे यांच्याकडे पुण्याच्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा प्र कुलगुरूपदाचा पदभार होता. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. ई वायुनंदन यांचा कार्यकाळ मार्च २०२२ मध्ये संपला. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू असलेले डॉ. सोनवणे हे यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे नववे कुलगुरू आहेत. कुलगुरूपदासाठी राज्यभरातील इच्छुकांच्या मुलाखतींची प्रक्रिया पार पडल्यानंतर राज्यपाल कार्यालयाकडून डॉ. सोनवणे यांची कुलगुरूपदी निवड करण्यात आली. डॉ. सोनवणे यांनी आतापर्यंत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या शिक्षणशास्त्र विभागाचे प्रमुख, मुक्त अध्ययन प्रशाळेचे प्रमुख आदी जबाबदार्‍या पार…

Read More

रविवार विशेष लेख विद्यमान राज्य सरकारच्या काळात सभ्य चेहर्‍याच्या खंडणीखोरांची चलती आहे. या खंडणीखोरांनी विरोधी पक्षांच्या नेत्यांना त्रास दिला असेल, त्यांना आत टाकण्यासाठी मदत केली असेल, त्यांच्या सरकारला बदनाम केलं असेल तर अशा बदमाशांचं पुनर्वसन करण्याची या सरकारची तयारी दिसते आहे. सत्तेच्या विकृतीचा हा परिपाक होय. अशाच चेहर्‍यातील समीर वानखेडे यांचा उपद्व्याप आपण पाहातोच आहोत. या वानखेडेंविषयी आपण पुढे लिहिणारच आहोत. अशा सभ्य चेहर्‍यामागचा आणखी एक खंडणीखोर या राज्यात उजळ माथ्याने वावरत होता. परमवीर सिंग असं त्याचं नाव. असंख्य प्रकरणांमागचा मास्टरमाईंड असलेला आणि विविध गुन्ह्यांचा पाठिराखा म्हणून ओळखला जाणारा म्हणून परमवीर राज्याच्या पोलीस खात्यात कार्यरत होता, हेच या राज्याचं दुर्देवं…

Read More

संगमनेर (महाराष्ट्र संवाद न्यूज) संगमनेरात आता बिबट्यांच्या अवयवाच्या तस्करीचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. बिबट्याच्या अवयवांची तस्करी करणाऱ्या दोघा तस्करांना पकडण्यात संगमनेरच्या वनविभागाला यश आले आहे. तर त्यांचा तिसरा साथीदार पळून जाण्यात यशस्वी ठरला. संगमनेरचे वनपरिक्षेत्र अधिकारी सचिन एच. लोंढे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे ही माहिती दिली. शनिवारी (ता. १९ मे) नासिक-पुणे महामार्गावरील हिवरगाव पावसा टोल नाक्याजवळ दुचाकीवरून येणारे काही लोक बिबट्याच्या दात सुळे नखे आणि मिशांची विक्री करणार असल्याची माहिती वनविभागाच्या अधिकाऱ्यांना समजली होती. या माहितीच्या आधारे वनक्षेत्र अधिकारी सचिन लोंढे यांनी या परिसरात आरोपींना पकडण्यासाठी सापळा रचला. संशयित व्यक्ती या ठिकाणी आल्यानंतर वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी बनावट ग्राहक बनून संशयतांसोबत बोलणी…

Read More

नाशिक (महाराष्ट्र संवाद न्यूज) आज शनिवारी नाशिक दौऱ्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी पत्रकारांशी संवाद साधला, त्यातील महत्वाचे मुद्दे : ✓ नोटबंदीतला धरसोडपणा परवडण्यासारखा नाही हे मी पहिल्याच नोटबंदीच्या वेळेस म्हणालो होतो. तज्ज्ञांना विचारून नोटबंदी झाली असती तर हि वेळ आली नसती. ✓ २ हजार रु. च्या नोटा आणल्या तेव्हा त्या ATM मध्ये भरल्या पण जात नव्हत्या, म्हणजे साधी तपासणीही केली नव्हती. म्हणजे कोणताही पूर्वनियोजन नव्हतं. असं काय सरकार चालतं का? ✓ त्र्यंबकेश्वर मंदिराच्या आवारात वर्षानुवर्षे जी परंपरा सुरु आहे ती थांबविण्यात काही अर्थ नाही. महाराष्ट्रात अशी अनेक मंदिरं-मशिदी आहेत कि जिथे वर्षानुवर्षे हिंदू-मुसलमान एकोपा आढळून येतो. ✓…

Read More

कोपरगाव (महाराष्ट्र संवाद न्यूज) वाळू वाहतूक करणाऱ्या तक्रारदाराच्या वाहनावर महसूल विभागाने कोणतीही कारवाई करू नये यासाठी, कोपरगावचे तहसीलदार विजय बोरुडे यांच्या सांगण्यावरून २० हजार रुपयांच्या लाचेची रक्कम स्वीकारणाऱ्या खासगी इसम गुरमीत सिंग दडियाल (वय ४० वर्ष, रा. कोपरगाव) याला नासिक एसीबीने रंगेहात पकडले. दडियाल आणि तहसीलदार विजय बोरुडे यांच्या विरोधात कोपरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. कोपरगावमध्ये थेट तहसीलदारांवरच एसीबीचा ट्रॅप झाल्याने जिल्ह्यातील ही मोठी कारवाई मानली जात आहे. कोपरगाव येथील तक्रारदार यांच्या वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनावर महसूल विभागाने कोणत्याही प्रकारची कारवाई करू नये याकरीता, कोपरगावचे तहसीलदार विजय बोरुडे (वय ४४ वर्षे, रा. कोपरगाव) यांनी वीस हजार रुपये लाचेची…

Read More

संगमनेर (महाराष्ट्र संवाद न्यूज) संगमनेरच्या अर्थकारणातील महत्त्वाची संस्था म्हणून परिचित असलेल्या विजय नागरी सहकारी पतसंस्थेच्या निवडणुकीत सुरुवातीलाच राखीव जागांवरील सहा उमेदवार बिनविरोध झाल्यानंतर सर्वसाधारण गटातील उर्वरित अकरा जागांसाठी झालेल्या निवडणुकीत संत श्री ज्ञानेश्वर महाराज पॅनलचे सर्वच्या सर्व उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी झाले. सुमारे 105 कोटी रुपयांच्या ठेवी असलेली ही संस्था वर्षभरात कोणतीही सुट्टी न घेता सलग सातही दिवस सुरू असते. महिला बचत गट आणि सामान्य नागरिकांना कर्ज पुरवठा करणारी संस्था म्हणून संस्थेचा नावलौकिक राहिला आहे. बँकिंग क्षेत्रातील अनेक सामाजिक आणि शासकीय पुरस्कार प्राप्त संस्थेचा आर्थिक कारभार अन्य संस्थांसाठी दिशादर्शक राहिला आहे. संस्थेच्या संचालक मंडळासाठी पंचवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर सुरुवातीलाच…

Read More