Author: अनंत पांगारकर

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन, संगमनेर:  राज्यातील शालेय शिक्षण विभागात सध्या सुरू असलेला प्रशासकीय गोंधळ आणि उत्तर महाराष्ट्रातील विस्कळीत झालेली शिक्षण व्यवस्था यावरून नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजीत तांबे यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. शिक्षण विभागाच्या ढिसाळ कारभाराचा पाढा वाचत त्यांनी थेट राज्याच्या शिक्षण आयुक्तांना पत्र धाडले असून, प्रलंबित प्रश्नांवर तात्काळ तोडगा न निघाल्यास २५ मे २०२६ पासून पुणे येथील शिक्षण आयुक्त कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. आमदार तांबे यांनी पत्रात नमूद केल्यानुसार, नाशिक, अहिल्यानगर, जळगाव, धुळे आणि नंदुरबार या पाचही जिल्ह्यांमध्ये शिक्षण क्षेत्राची अवस्था दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. प्रशासकीय दिरंगाईमुळे शिक्षक, विद्यार्थी, पालक आणि संस्थाचालक यांच्यात…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन, संगमनेर: पुणे-नाशिक महामार्गावरील डोळासणे शिवारात दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या एका सराईत टोळीला घारगाव पोलिसांनी पकडले. पोलिसांनी या कारवाईत चार आरोपींना अटक केली असून, त्यांच्याकडून कारसह दरोड्याचे साहित्य आणि मोबाईल असा एकूण ४ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. दरम्यान, पोलीस कोठडीत असताना केलेल्या चौकशीत या आरोपींनी घारगाव हद्दीत ट्रकमधून डिझेल चोरी केल्याचे दोन गुन्हे कबूल केले आहेत. याबाबत अधिक माहिती अशी की, दि. १४ एप्रिल रोजी पहाटे ३:३० वाजेच्या सुमारास पोलीस ठाण्याचे पोलीस पथक पुणे-नाशिक हायवेवर रात्रगस्त घालत होते. यावेळी डोळासणे गावच्या बोगद्याजवळ अंधारात एक पांढऱ्या रंगाची स्विफ्ट कार संशयास्पदरित्या उभी असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. पथकाने…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन, संगमनेर: संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम महाराजांपासून सुरू झालेल्या वारकरी संप्रदायाचा उदात्त विचार घेऊन काँग्रेसने देश उभारणीचे महान कार्य केले आहे. सद्यस्थितीत देशामध्ये काही जातीय शक्ती समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचे काम करत असून, अशा धर्मांध शक्तींच्या विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा सुरू असल्याचे प्रतिपादन संत साहित्याचे गाढे अभ्यासक व माजी आमदार उल्हासदादा पवार यांनी केले आहे. सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखाना येथे संगमनेर तालुका युवक काँग्रेसच्यावतीने आयोजित ‘युवा संगम’ कार्यक्रमात ते प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते. या प्रसंगी व्यासपीठावर माजी महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात, युवक काँग्रेसच्या नेत्या डॉ. जयश्री थोरात, ठाणे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह पवार,…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन, संगमनेर: सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांनी तालुक्याच्या विकासाचा पाया रचला, तर लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी शेती, शिक्षण, सहकार आणि आर्थिक समृद्धीच्या माध्यमातून या तालुक्याला प्रगतीपथावर नेले आहे. युवक काँग्रेसने आयोजित केलेला हा ‘युवा संगम’ कार्यक्रम इतिहासाचे मार्गदर्शन घेऊन भविष्याची दिशा ठरवणारा ठरेल, असे गौरवउद्गार विधिमंडळ पक्षाचे गटनेते व माजी मंत्री आमदार सतेज पाटील यांनी काढले.  संगमनेर तालुका युवक काँग्रेस व एनएसयूआयच्या वतीने आयोजित कार्यकर्ता प्रशिक्षण आणि संवाद कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी काँग्रेस राष्ट्रीय वर्किंग कमिटीचे सदस्य माजी मंत्री बाळासाहेब थोरात होते.  यावेळी व्यासपीठावर माजी नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे, माजी आमदार उल्हासदादा पवार,…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन, अहिल्यानगर:  जिल्ह्यात वाढत्या तापमानाचा पारा आणि भारतीय हवामान खात्याने दिलेला उष्णतेच्या लाटेचा ‘यलो अलर्ट’ लक्षात घेता, जिल्हा प्रशासनाने विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी मोठा निर्णय घेतला आहे. जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ. पंकज आशिया यांनी १८ एप्रिल २०२६ पासून जिल्ह्यातील सर्व माध्यमांच्या शाळांच्या वेळेत बदल करण्याचे आदेश जारी केले आहेत. या नव्या निर्णयानुसार, आता जिल्ह्यातील शाळा उन्हाळी सुट्टी लागेपर्यंत सकाळी ७ ते ११ या वेळेतच भरवल्या जाणार आहेत. जिल्ह्यात सध्या उन्हाची तीव्रता मोठ्या प्रमाणावर वाढली असून, उष्माघाताचा धोका निर्माण झाला आहे. विशेषतः दुपारी शाळा सुटल्यानंतर घरी परतणाऱ्या विद्यार्थ्यांना या उष्णतेचा त्रास होऊ नये, यासाठी प्रतिबंधात्मक उपाय…

Read More

आश्वी, प्रतिनिधी संगमनेर तालुक्यातील आश्वी बुद्रुक परिसरात बिबट्याने पुन्हा एकदा आपल्या दहशतीचा प्रत्यय दिला असून, आज सकाळी शेतात काम करणाऱ्या एका ५५ वर्षीय महिलेवर बिबट्याने प्राणघातक हल्ला केला. या घटनेत महिला गंभीर जखमी झाली असून, एकाच वस्तीवर बिबट्याने हल्ला करण्याची ही चौथी वेळ असल्याने वनविभागाच्या भूमिकेबद्दल ग्रामस्थांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आश्वी बुद्रुक येथील खेमनर वस्तीवरील गट नंबर २३१ मध्ये सुमनबाई बाळासाहेब खेमनर या आज शुक्रवारी सकाळी ८ वाजेच्या सुमारास जनावरांसाठी घास कापण्याचे काम करत होत्या. याच दरम्यान दबा धरून बसलेल्या बिबट्याने त्यांच्यावर अचानक झडप घातली. बिबट्याने सुमनबाई यांच्या मानेवर आणि हातावर खोलवर जखमा केल्या. संकटाच्या…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन, नाशिक: लग्नाचे खोटे आमिष दाखवून दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोन तरुणींवर लैंगिक अत्याचार झाल्याचे धक्कादायक प्रकार उघडकीस आले आहेत. याप्रकरणी नाशिकच्या सिडको आणि सातपूर पोलीस ठाण्यात एकूण सहा जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पहिल्या घटनेत सिडको परिसरातील एका तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून संशयित आरोपी अर्शील साबीर मन्सूरी याने लग्नाचे आमिष दाखवले. त्यानंतर हॉटेल डेमॉक्रसी येथे नेऊन तिच्यावर वारंवार अत्याचार केले. इतकेच नव्हे तर आरोपीने पीडितेचे अश्लील व्हिडिओ रेकॉर्ड करून तिला धमकावले आणि तिच्याकडील सोन्याची चैन व कानातील दागिने जबरदस्तीने काढून घेतले. या गुन्ह्यात अर्शील मन्सूरीला मदत करणाऱ्या दीपक, हिमांशू, नितेश आणि प्रथमेश या त्याच्या साथीदारांविरुद्धही एमआयडीसी…

Read More

मुंबई, विशेष प्रतिनिधी राज्यात बोगस कॉल सेंटरच्या माध्यमातून नागरिकांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक होत असून या रॅकेटमध्ये वरिष्ठ आयपीएस अधिकारी दत्ता कराळे, पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील आणि सोमनाथ घार्गे यांचा थेट सहभाग असल्याचा गंभीर आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे. मुंबईतील गांधी भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी या प्रकरणाचे धागेदोरे मंत्रालयापर्यंत पोहोचले असल्याचा दावा करत खळबळ उडवून दिली आहे. हर्षवर्धन सपकाळ यांनी पुराव्यांसह मांडलेल्या माहितीनुसार, आयपीएस अधिकारी दत्ता कराळे, पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील आणि सोमनाथ घार्गे यांचा या ऑनलाइन फसवणूक रॅकेटमध्ये सहभाग आहे. मंत्रालयातील उच्चपदस्थांच्या आशीर्वादाशिवाय एवढ्या मोठ्या प्रमाणावर पैशांची हेराफेरी होणे शक्य नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन, संगमनेर: संगमनेर तालुक्यातील घारगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका १३ वर्षीय अल्पवयीन मुलीचा बालविवाह लावून देत तिच्यावर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी घारगाव पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत मुख्य आरोपी पतीसह चार जणांना बेड्या ठोकल्या आहेत. या सर्व आरोपींना न्यायालयाने उद्यापर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. तर तिघे अद्याप फरार आहेत. या घटनेबाबत अधिक माहिती अशी की, पीडित मुलगी केवळ १३ वर्षे ४ महिन्यांची असताना आरोपींनी संगनमत करून तिचा विवाह लावून दिला होता. पीडितेचे वय कमी असल्याचे माहित असतानाही तिच्या संमतीविना हा विवाह पार पडला आणि त्यानंतर तिच्यावर वारंवार शारीरिक अत्याचार करण्यात आले. या…

Read More

मुंबई, विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र विधान परिषदेच्या रिक्त होणाऱ्या ९ जागांसाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रम जाहीर केला असून, राज्याच्या राजकीय वर्तुळात आता खऱ्या अर्थाने हालचालींना वेग आला आहे. पुढील महिन्यात म्हणजेच मे २०२६ मध्ये या जागा रिक्त होत असून, त्यासाठी आयोगाने १२ मे २०२६ ही मतदानाची तारीख निश्चित केली आहे. विशेष म्हणजे, याच दिवशी सकाळी मतदान पार पडल्यानंतर सायंकाळी ५ वाजता निकालही जाहीर केला जाणार असल्याने संपूर्ण राज्याचे लक्ष या एकाच दिवसाकडे लागले आहे. येत्या १३ मे रोजी विधान परिषदेतील ९ सदस्यांचा कार्यकाळ संपत आहे. यामध्ये माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्यासह अमोल मिटकरी, शशिकांत…

Read More