Author: अनंत पांगारकर

महाराष्ट्र संवाद न्यूज शहरातील अनेक बँकांमध्ये सोन्याच्या दागिन्यांची शुद्धता तपासणाऱ्या आणि त्या माध्यमातून सोनेतारण करणाऱ्या कर्जदारांना कर्ज उपलब्ध करून देणाऱ्या गोल्ड व्हॅल्यूअर जगदीश शहाणे याच्या माध्यमातून आणखी एका बँकेचे तब्बल 83 लाख रुपयांची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. यामुळे येत्या काही दिवसात आणखी काही बँकांमधील घोटाळे समोर येण्याची शक्यता बळावली आहे. या घोटाळ्यांमुळे या बँकांची विश्वासार्हतादेखील धोक्यात आली आहे. मुंबई येथील प्रतिष्ठित असलेल्या जी. एस. महानगर को-ऑपरेटिव्ह बँकेची संगमनेरमध्ये शाखा आहे. या बँकेत खोट्या सोन्याचा माध्यमातून २३ कर्जदारांनी बँकेची ८२ लाख ५७ हजार ८३४ रुपयांची फसवणूक केल्याची तक्रार बँकेचे व्यवस्थापक प्रदीप शिंदे यांनी शहर पोलीस ठाण्यात केली. याप्रकरणी गोल्ड व्हॅल्यूअर…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर : सहकारासाठी दीपस्तंभ ठरलेल्या सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या सन 2022 – 23 या गळीत हंगामाचा सांगता समारंभ व सेवानिवृत्त सेवकांचा स्नेहमेळावा गुरुवारी (30 मार्च) सकाळी 9 वाजता काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते आमदार बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, कांचनताई थोरात यांच्या उपस्थितीत व चेअरमन बाबा ओहोळ यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. माजीमंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली मागील वर्षी कारखान्याने 15 लाख 53 हजार मेट्रिक टनाचे उच्चांकची गाळप केले होते. तर या हंगामात 10 लाख मेट्रिक टनाच्यावर गाळप झाले आहे. सभासद, शेतकरी, कामगार ऊस उत्पादक या सर्वांच्या हिताचे निर्णय घेत…

Read More

रविवार विशेष ◇ प्रवीण पुरो सत्ताधारी भारतीय जनता पक्षाचा देशभर सुरू असलेला राज्यकारभार लक्षात घेता हा पक्ष आता कोणत्याही थराला जाऊ शकतो, याची खात्री पटू लागली आहे. देशात भाजप सत्तापर्व सुरू झाल्यापासून गौतम आदानी आणि मुकेश अंबानी यांच्या उद्योगांसाठी ज्या प्रकारे ग्रीन कार्पेट आंथरण्यात आले ते पाहाता त्या पक्षाला आणि केंद्रातल्या सत्तेला देशाहून या उद्योगपतींची चिंता आहे, हे स्पष्ट झालं. खोटेपणाचे असंख्य इमले उभे केलेल्या अदानी समुहाने जागतिक स्तरावर निर्माण केलेला बोलबाला केवळ आणि केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या प्रेमाचं प्रतिक होय. सामान्य भारतीयांचे हजारो कोटी रुपये ज्या जीवनविमा आणि स्टेट बँकेतून अदानींसाठी खुले करून देण्यात आले त्या सामान्यांनी करायचं काय,…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज विधानभवन परिसरात राहुल गांधी यांच्या बॅनरवरील फोटोला चपला, जोड्यांनी मारहाण करण्याचा प्रकार दोन दिवसापूर्वी घडला. अशा प्रकराचे विकृत प्रकार होणे पुर्णपणे चुकीचे, निंदनीय व लोकशाहीस मारक आहे. अशा प्रकारचे गैरवर्तन आपल्या कार्यकाळात झाले असून विधानसभा अध्यक्षांसाठीही हे योग्य नाही. या घटनेबाबत दोषींवर कडक कारवाई केली पाहिजे, अशी आग्रही मागणी काँग्रेस विधीमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात यांनी केली आहे. बाळासाहेब थोरात म्हणाले, विधानसभेच्या परिसरात राहुल गांधींच्या बॅनरबाबत जी विकृत घटना घडली ती विधानसभेच्या इतिहासातील एक निंदनीय व दुर्दैवी घटना आहे. काँग्रेस पक्षाचे नेते राहुल गांधी यांच्याबाबत हा प्रकार घडला आहे. मात्र हे लक्षात ठेवावे की, आज आमच्या वरीष्ठ नेत्यांबाबत…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज शिर्डी: आपली संस्कृती पुढे नेताना रुबिक क्यूब सारख्या साहित्याच्या माध्यमातून तयार केलेली देशातील सर्वात भव्य साई प्रतिमा शिर्डीत येणाऱ्या साई भक्तांच्या आकर्षणाचे केंद्र बनेल. साईतीर्थ हे संस्कारांची शिकवण देणारे आधुनिक तीर्थक्षेत्र असल्याचे प्रतिपादन सराला बेटाचे महंत रामगिरी महाराज यांनी केले. साई तीर्थ थीम पार्कमध्ये चिन्मय प्रभू या तरुणाने तयार केलेल्या देशातील सर्वात मोठ्या रुबिक क्यूब साई प्रतिमेच्या उद्घाटन सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी मालपाणी उद्योग समूहाचे संचालक डॉ. संजय मालपाणी उपस्थित होते. रामगिरी महाराज म्हणाले, आजची तरुण पिढी भारतीय संस्कृती आणि परंपरांपासून दूर चालली आहे, अशा पिढीला आधुनिक तंत्रज्ञांचा वापर करून भारतीय संस्कृती आणि आपल्या समृद्ध वारशाची…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज आश्वी: संगमनेर तालुक्यातील आश्वी बुद्रुक येथील रहिवासी व सध्या कामानिमित्त पुणे येथे वास्तव्यास असलेल्या प्रतिक राजेंद्र रातडीया याची जगप्रसिद्ध अमेरीकेतील नासा या संस्थेत संशोधक म्हणून निवड झाली आहे. जगप्रसिद्ध अमेरिकन अंतराळ संशोधन संस्था असलेल्या नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये (NASA) संशोधक म्हणून नुकतीचं प्रतिक रातडीया यांची निवड झाली असल्याची माहिती मिळाल्याने सुखद धक्का बसल्याची प्रतिक्रिया नातेवाईक, मित्रपरिवार व ग्रामस्थानी दिली आहे. प्रतिक रातडीया पुढील तीन महिन्यांसाठी कृत्रिम बुद्धिमतेचा (artificial intelligence) वापर करून नासाच्या मंगळ ग्रहावर गेलेल्या यानांमध्ये विसंगती शोधण्याच्या पद्धती विकसित करण्यावर संशोधन करणार आहे. या प्रकल्पासाठी प्रतिकची अमेरिकेतील कॅलिफोर्निया राज्यामध्ये नासाच्या जेट प्रोपल्शन लॅबमध्ये विद्यार्थी संशोधक…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज शिर्डी: संगमनेरच्‍या ध्रुव अॅकॅडमी संस्‍थेतील विद्यार्थ्‍यांनी सादर केलेले ‘रामायण’ महानाट्य शिर्डीच्‍या महापशुधन एक्सपोमध्‍ये सर्वांचीच दाद मिळवून गेले. रामायणातील प्रत्‍येक प्रसंगाला उपस्थितांच्‍या ‘जय श्रीराम’ या घोषणेच्‍या मिळालेल्‍या प्रतिसादामुळे सांस्‍कृतीक कार्यक्रमाचे वातावरण पुर्णपणे राममय होऊन गेले. मंत्री राधाकृष्‍ण विखे पाटील यांच्‍या पुढाकाराने पशुसवंर्धन विभागाच्‍यावतीने ३ दिवसांचे भव्‍य महाप्रदर्शन शिर्डीमध्ये आयोजित करण्‍यात आले आहे. देशासह राज्‍यातील शेतकरी, पशुपालक आणि शेतीपुरक व्‍यवसाय करणारे तरुण शेतकरी या महाप्रदर्शनात सहभागी झाले आहेत. राज्‍यातील विविध भागातून शेतकरी हे प्रदर्शन पाहण्‍यासाठी येत आहेत. येणाऱ्या प्रत्‍येकासाठी श्रीक्षेत्र शिर्डी हे साईबाबांचे समाधी स्‍थळ मुख्‍य आकर्षण आहेच परंतू या प्रदर्शनातही सांस्‍कृतीक कार्यक्रमांची पर्वणी सहभागी शेतकऱ्यांना मिळावी म्‍हणून खासदार…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर: मद्यधुंद अवस्थेत ग्रामपंचायत कार्यालयात आलेल्या व्यक्तीने ग्रामविकास अधिकाऱ्यास शिवीगाळ धक्काबुक्की करत कार्यालयात कोंडून घेतले नंतर पुन्हा येत ग्राम विकास अधिकाऱ्यांच्या केबिनचे नुकसान करत शासकीय कामात अडथळा आणल्याची घटना संगमनेर तालुक्यातील अंभोरे येथे घडली आहे. या संदर्भात ग्रामविकास अधिकारी अरुण गोविंद जेजुरकर (वय ५० वर्षे, रा. गुंजाळवाडी, ता. संगमनेर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून विशाल संजय गायकवाड याच्या विरोधात संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या संदर्भात अधिक माहिती अशी, आरोपी विशाल गायकवाड हा शुक्रवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास अंभोरे ग्रामपंचायत कार्यालयात मद्यधुंद अवस्थेत आला होता. त्याने गाय गोठा यादी दाखविण्याची मागणी ग्रामविकास अधिकारी जेजुरकर यांच्याकडे…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज काँग्रेस नेते राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्याचा निर्णय अत्यंत दुर्दैवी आहे. कर्नाटकमधील २०१९ च्या एका सभेतील विधानाचा संदर्भ घेऊन खोटी तक्रार दाखल करत हा निर्णय घेतलेला आहे. राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्याचा प्रयत्न भाजपा मागील काही दिवसांपासून करत होते. हे सर्व जाणीवपूर्वक व ठरवून केलेले असून खासदारकी रद्द करण्याचा भारतीय जनता पक्षाच्या सरकारचा निर्णय हा लोकशाहीचा खून आहे. स्वर्गीय इंदिरा गांधी प्रमाणे राहुल गांधी सुद्धा भाजपचा पराभव करून पंतप्रधान होतील, असे प्रतिपादन काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी केले. राहुल गांधी यांची खासदारकी रद्द केल्याचे समजताच त्याचे पडसाद विधिमंडळात उमटले. महाविकास आघाडीने या घटनेचा…

Read More

शिर्डी: शेतकरी पशुधनाच्या बाबतीत राज्य सरकार अतिशय संवेदनशीलपणे निर्णय घेत आहे. गो आयोग स्‍थापन करण्‍यात आल्‍याने गोसंवर्धना बरोबरच दूग्‍ध व्‍यवसायाला संरक्षण आणि रोजगार निर्मितीसाठी राज्‍य सरकारने आणखी एक पाऊल पुढे टाकले आहे. शेतीपुरक व्‍यवसायातून ग्रामीण भागात रोजगार निर्मिती करण्‍याचे सरकारचे उदिष्‍ठ असून, लम्पि संकटातही पशुधन वाचविण्‍यासाठी देशात पशुपालकांना मदत करणारे महाराष्‍ट्र हे एकमेव राज्य असल्याचे प्रतिपादन महसूल, पशुसंवर्धन, दूग्ध व्यवसाय विकासमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी आज येथे व्यक्त केले. राज्यशासनाच्या पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विकास विभागाच्यावतीने शिर्डी येथे आयोजित तीन दिवसीय ‘महापशुधन एक्सपो २०२३’ चे पशुसंवर्धन मंत्री विखे-पाटील यांच्या हस्ते उद्घाटन झाले. त्यावेळी ते बोलत होते.‌ कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कृषीमंत्री…

Read More