Author: अनंत पांगारकर

महाराष्ट्र संवाद न्यूज शुक्रवारी संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समिती सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदान पार पडले. शांततेत आणि उत्साहात झालेल्या या निवडणुकीत 97.12 टक्के मतदान झाले. संगमनेरच्या जनता नगर मधील राजमाता जिजाऊ शाळेमध्ये शुक्रवारी सकाळी मतदानाला प्रारंभ झाला सायंकाळी चार वाजता मतदान संपले इतर शनिवारी सकाळी याच शाळेमध्ये मतमोजणी होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. एकूण 3614 मतदारांपैकी 3510 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समितीवर राज्याचे माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांचे वर्चस्व आहे. त्यांच्याच नेतृत्वाखाली महाविकास आघाडी पुरस्कृत शेतकरी विकास मंडळ आणि राज्याचे विद्यमान महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली जनसेवा मंडळामध्ये सरळ लढत झाली. कृषी उत्पन्न…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर शहरासह परिसरात शुक्रवारी (ता.२८) दुपारी अवकाळी पावसासह तुरळक गारा पडल्या. वादळी वाऱ्याने गुंजाळवाडीच्या आरगडेमळा येथील भाऊसाहेब सोमनाथ आरगडे यांच्या दोन खोल्यांचे पत्रे उडून मोठ्याप्रमाणात नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी छोटे वृक्ष छोटे वृक्ष उन्मळून पडले तर फ्लेक्स बोर्ड फाटले होते. साकुरमध्ये सकाळी मोठ्या प्रमाणात अवकाळी पाऊस झाला. संगमनेर तालुक्याच्या बहुतांशी भागात शुक्रवारी अवकाळी पावसाने हजेरी लावली. तुरळक गाराही पडल्या. त्यानंतर वादळी वाऱ्याला सुरूवात झाली आणि काही क्षणातच वाऱ्याचा वेग प्रचंड वाढल्याने अनेक ठिकाणी छोटे वृक्ष उन्मळून पडले. वादळामुळे फ्लेक्स देखील अस्ताव्यस्त होऊन फाटले होते. शहरालगतच्या गुंजाळवाडी येथे भाऊसाहेब आरगडे यांच्या दोन खोल्यांचे पत्रे थेट उडून हजार…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेरच्या पेटलेल्या वाळू तस्करीमुळे जर महसूल खाते बदनाम होणार असेल तर मला तुमच्यावर कारवाई करण्याशिवाय गत्यंतर राहणार नाही, अशा स्पष्ट शब्दात राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी संगमनेरमधील तलाठी, ग्रामसेवकांना इशारा दिला आहे. राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी महसूल मंत्रीपदाचा पदभार हाती घेतल्यानंतर संगमनेरच्या अवैध वाळू तस्करीकडे आपले लक्ष केंद्रित केले होते. त्यामुळे येथील वाळू तस्करीला काही अंशी लगाम बसला. तसेच राज्यभरातील वाळू तस्करी लक्षात घेत त्यांनी वाळू संदर्भात नवीन धोरण आणले आहे नव्या धोरणाची अंमलबजावणी येत्या महाराष्ट्र दिनापासून (१ मे) करण्यात येणार आहे. असे असले तरी संगमनेर शहर आणि तालुक्यात मोठ्या प्रमाणात वाळू…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज तालुक्‍यात मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर गुंठेवारी प्रकरणे केल्याच्या तक्रारी मोठ्या प्राप्‍त झाल्‍या आहेत. या सर्व प्रकरणांची विभागीय आयुक्‍तांमार्फत चौकशी करण्‍यात येणार असल्‍याची माहीती महसूल तथा पालकमंत्री राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी आढावा बैठकीत दिली. मंत्री विखे यांच्‍या उपस्थितीत संगमनेरमध्ये जिल्‍हा परिषद गटनिहाय बैठकांचे आयोजन करण्यात होते. बैठकीत घुलेवाडी, संगमनेर खुर्द या जिल्‍हा परिषद गटातील गावांमध्‍ये सुरु असलेल्‍या शासकीय योजनांच्‍या कामांचा आढावा घेण्‍यात आला. उपस्थित ग्रामस्‍थ आणि पदाधिका-यांनी केलेल्‍या विविध प्रश्‍नांबाबत गांभिर्याने दखल घेण्‍याच्या सुचना मंत्र्यांनी दिल्‍या. प्रांताधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे, गटविकास आधिकारी अनिल नागणे यांच्‍यासह सर्व शासकीय विभागाचे आधिकारी, वसंतराव देशमुख, गुलाबराव सांगळे, भाजपाचे तालुकाध्‍यक्ष सतिष कानवडे, शहराध्‍यक्ष श्रीराम…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज वर्दळीच्या नवीन नगर रोड परिसरात गेल्या चार-पाच दिवसांपासून एका दुकानात काम करणाऱ्या मुलीचा सलग दोन दिवस पाठलाग करत तिची छेड काढणाऱ्या तरुणाविरोधात संगमनेर शहर पोलीस ठाण्यामध्ये गुरुवारी रात्री पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अमान शब्बीर सय्यद (कब्रस्थान जवळ, नाईकवाडपुरा, संगमनेर) असे गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचे नाव आहे. सर्वत्र लव्ह जिहादचे प्रकार समोर येत असताना संगमनेरातील अशा वाढत्या घटनांनी भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याबाबत माहिती अशी, नुकतेच बारावीचे पेपर दिलेली साडे सतरा वर्षाची मुलगी गेल्या चार-पाच दिवसांपासून नवीन नगर रोड परिसरातील एका दुकानांमध्ये काम करत असून बुधवारी डोक्यात मुस्लिम समाजात घातली जाते तशी पांढरी टोपी…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज तब्बल तीन मंत्री, प्रमुख अधिकाऱ्यांशी झालेल्या सकारात्मक चर्चेनंतर महसूलमंत्र्यांच्या लोणीच्या दिशेने निघालेले लाल वादळ अखेर संगमनेरच्या सीमेवर थांबले आहे. सरकार आंदोलकासोबत असल्याचा विश्वास आंदोलकांना दाखविण्यात आला. मागण्यांबाबत सकारात्मक विचार करण्याचे आश्वासन आंदोलकांना देण्यात आले. संगमनेरच्या प्रांताधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीनंतर यासंबंधीची घोषणा तीनही मंत्र्यांनी आंदोलन स्थळी केली. शेतकरी, आदिवासी आणि कामगारांचे विविध प्रश्न घेत राज्याचे महसूल तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या लोणी येथील कार्यालयावर महा मुक्कामासाठी अकोल्याहून किसान सदस्य विविध संलग्न संस्थांनी बुधवारी पायी मोर्चा सुरू केला होता. शनिवारी मोर्चा धांदरफळमध्ये (संगमनेर) मुक्कामाला होता. मोर्चा अकोल्यातून सुरू होण्यापूर्वी महसूल तथा पालकमंत्री विखे पाटील यांनी मोर्चेकर्‍यांना सकारात्मक…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज राज्यातील सरकार बदललेले आहे याची जाणीव ठेवून तलाठी ग्रामसेवकांनी सामान्य माणसाच्या हिताचा विचार करावा. ठेकेदारांच्या चिंता करू नका. सरकारी योजनेत कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा आढळल्यास अधिकाऱ्यांना जबाबदार धरणार असल्याचे सूतोवाच राज्याचे महसूल तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले. तळेगाव दिघे येथे आयोजित आढावा बैठकीमध्ये ते बोलत होते. समस्यांचा आढावा घेत त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने कार्यवाहीच्या सूचना दिल्या. संगमनेर अकोल्याचे प्रांताधिकारी डॉ. शशिकांत मंगरूळे, गटविकास अधिकारी अनिल नागणे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. विखे म्हणाले, १ मे पासून ‘शासन आपल्‍या दारी’ या उपक्रमाचे आयोजन जिल्‍ह्यात करण्‍यात येणार आहे. यामध्‍ये वैयक्तिक लाभाच्‍या योजनांची प्रकरणं मार्गी लावण्‍यासाठी अधिकाऱ्यांनी…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज विविध मागण्यांसाठी रस्त्यावर उतरलेल्या लाल वादळाच्या शिष्टमंडळासमवेत राज्याचे आदिवासी मंत्री विजयकुमार गवित, कामगार कल्याण मंत्री सुरेश खाडे व महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत संगमनेरमध्ये बैठक सुरू आहे. बैठकीत काय निर्णय होतात हे लवकरच पुढे येणार आहे. नैसर्गिक आपत्ती व राज्यात सुरू असलेल्या नीतिभ्रष्ट राजकारणाचा परिणाम म्हणून शेतकरी, कामगार, शेतमजूर, कर्मचारी श्रमिकांचे मुलभूत प्रश्न अत्यंत तीव्र झाले आहेत. राज्यातील राजकीय अस्थिरतेमुळे सामान्य जनतेचे व विकासाचे प्रश्न संपूर्णपणे बाजूला फेकले गेले आहेत. पक्ष फोडण्याची राजकीय आमिषे व तुरुंगाची भीती दाखवून  सत्ता मिळविण्यात बहुतांश प्रस्थापित राजकीय नेते व पक्ष मशगुल झाले असल्याने, अखेर पुन्हा एकदा जनतेच्या मूलभूत प्रश्नांसाठी…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज देशातील औद्योगिक क्षेत्राकडून समाजाच्या हितासाठी राबविल्या जाणार्‍या सामाजिक उपक्रमांमध्ये संगमनेरच्या मालपाणी उद्योग समुहाचा ठसा उमटला आहे. सामाजिक उत्तरदायित्वाच्या माध्यमातून राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमांची दखल घेत मालपाणी उद्योग समुहाला यावर्षीच्या ‘सीएसआर हिरो’ पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले. राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते राजभवनात शानदार सोहळ्यात उद्योग समुहाचे संचालक आशीष मालपाणी यांनी हा पुरस्कार स्वीकारला. सामाजिक उत्तरदायित्वाच्या माध्यमातून (कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी – सीएसआर) विविध समाजोपयोगी उपक्रम यशस्वीरित्या आणि सातत्याने राबवून कर्तव्यपूर्ती केल्याबद्दल मालपाणी उद्योग समुहाला गौरवान्वित करण्यात आले. एका माध्यम समुहाने आयोजित केलेल्या या सोहळ्यावेळी विधानसभेचे सभापती राहुल नार्वेकर, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व नवभारत समुहाचे व्यवस्थापकीय संचालक निमिष माहेश्वरी आदींसह…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीमध्ये विरोधी गटातील जर कोणी उमेदवार शिवसेनेच्या नावाने मतं मागत असेल तर त्याला मतदान करू नका. शिवसेना अशा उमेदवारांचा लवकरच बंदोबस्त करेल. मतदारांनी महाविकास आघाडी पुरस्कृत शेतकरी विकास मंडळाच्या उमेदवारांना मतदान करण्याचे आवाहन शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे शिर्डी लोकसभा संपर्कप्रमुख बबन नाना घोलप यांनी केले आहे. शुक्रवारी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या 18 जागांसाठी शेतकरी विकास मंडळ आणि जनसेवा मंडळामध्ये लढत होत आहे. राज्यात शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांची महाविकास आघाडी अस्तित्वात असल्याने संगमनेरमध्ये देखील महाविकास आघाडी पुरस्कृत शेतकरी विकास मंडळाने आपले उमेदवार उभे केले आहेत. महाविकास आघाडी उमेदवारांचे चिन्ह कप…

Read More