Author: अनंत पांगारकर
राज्यघटनेच्या विरुद्ध विचार मांडत जातीभेद निर्माण करून राजकारण..! माजी मंत्री, आमदार बाळासाहेब थोरात
संगमनेर – महाराष्ट्र संवाद न्यूज विविध भाषा, वेशभूषांच्या या देशांमध्ये संविधानाने सर्वांना एकत्रित ठेवले आहे. संविधानाचे तत्व जपण्याचे प्रत्येकाची जबाबदारी असताना काहीजण मात्र या राज्यघटनेच्याच तत्त्वाच्या विरुद्ध विचार मांडत आहे. आपसात जातीभेद निर्माण करून राजकारण केले जात आहे. एका विशिष्ट समाजाचे राज्य निर्माण करण्यासंदर्भातील विधाने दुर्दैवी असून सर्वांचा विकास आणि समता असलेला राज्यघटनेचा विचार शाश्वत असल्याचे प्रतिपादन राज्याचे माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी केले. संगमनेरमध्ये महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी अध्यक्षस्थानी माजी आमदार डॉ. सुधीर तांबे होते. कॅन्सरतज्ञ डॉ. जयश्री थोरात, राज्य महिला आयोगाच्या सदस्य उत्कर्षा रूपवते, प्रतिष्ठानचे अध्यक्ष बी.…
अहमदनगर – महाराष्ट्र संवाद न्यूज दुबईहून आलेले तीन दहशतवादी मुंबईत घुसले आहे. त्यांचा संबंध पाकिस्तानशी आहे, अशी माहिती देत पोलिसांची दिशाभूल केल्याप्रकरणी अहमदनगरमधून एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. यासिन सय्यद (वय ४७) असे आरोपीचे नाव असून त्याला महाराष्ट्र एटीएसने अहमदनगर येथे कारवाई करत ताब्यात घेतले. व्यक्तिगत वैमनस्यातून आरोपीने मुंबई पोलिसांच्या कंट्रोल रूममध्ये ७ एप्रिलला फोन करुन खोटी माहिती दिल्याचे तपासात उघड झाले. आरोपी सय्यद याने मुंबई पोलिसांच्या कंट्रोल रूमला फोन करून मुंबईत दहशतवादी घुसल्या संदर्भात माहिती दिली होती. दुबईहून आलेले तिघे दहशतवादी शुक्रवारी सकाळी मुंबईत घुसले असून त्यांचा संबंध पाकिस्तानशी आहे. यावेळी त्याने एका दहशतवाद्याचे नाव मुजीब सय्यद असे…
मुंबई – महाराष्ट्र संवाद न्यूज काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आमच्या संपर्कात असून योग्य वेळ आल्यानंतर हे सर्व आमदार भाजपमध्ये प्रवेश करतील, असं विधान राज्याचे उपमुख्यमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते देवेंद्र फडणवीस यांनी केल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना पेव फुटले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार हे भाजपसोबत जाणार असल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहेत. या चर्चांवर राजकीय वातावरण तापलेल असतानाच फडणवीस यांनी केलेल्या या विधानामुळे राजकीय समीकरणे बदलण्याची चिन्हे निर्माण झाली आहे. फडणवीस मुंबईत एका कार्यक्रमात बोलत होते. फडणवीस म्हणाले, अनेक आमदार आमच्या संपर्कात असतात. आपल्या आत्मविश्वासामुळे अनेक जण संपर्कात आहेत. गेल्या पाच वर्षात अनेक जण आमच्याकडे भाजपात आले. संपर्काच्या नात्यांमध्ये…
महाराष्ट्र संवाद न्यूज | अनंत पांगारकर संगमनेर शहरातील चार मोठ्या बँकांना बनावट सोन्याच्या दागिन्यांच्या आधारे तब्बल सहा कोटी रुपयांना गंडा घालणाऱ्या गोल्ड व्हॅल्यूअर जगदीश शहाणे आणि कर्जदारांचे प्रकरण ताजे असतानाच आता मनोली येथील दोघा भावंडांनी शहरातील एका पतसंस्थेच्या नावाने बनावट कागदपत्राच्या आधारे ७/१२ उताऱ्यावरील कर्जाचा बोजा परस्पर कमी करून पतसंस्थेची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. पोलीस ठाण्यात या संदर्भात श्री. कुलस्वामीनी को-ऑप क्रेडिट सोसायटी लिमीटेड या पतसंस्थेच्या संगमनेर शाखेचे व्यवस्थापक संदीप तानाजी संते (रा. नारायणगाव, ता. जुन्नर, जि. पुणे) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सुनील भास्कर शिंदे व सहकर्जदार संदीप भास्कर शिंदे (दोघे रा. मनोली, ता. संगमनेर, जि. अहमदनगर) या दोघां…
मुंबई| महाराष्ट्र संवाद न्यूज गेल्या काही दिवसापासून रखडलेल्या युवा सेना पदाधिकाऱ्यांच्या नियुक्तीला अखेर मुहूर्त लाभला. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली युवासेना प्रमुख, शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी शिर्डी लोकसभेतील युवा सेना पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर केल्या असून जिल्हा युवा अधिकारीपदी अमित रामकिसन चव्हाण (संगमनेर, अकोले, राहाता) यांची फेरनिवड करण्यात आली. युवा सेनेच्या नव्या नियुक्त्या तात्पुरत्या स्वरूपातील असून, सहा महिन्यांनंतर पदाधिकार्यांचे काम बघून त्या कायम करण्यात येतील, असे सांगण्यात आले आहे. युवासेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस पाठविलेल्या पत्रकाद्वारे ही माहिती कळविण्यात आली असून पक्षाचे मुखपत्र असलेल्या ‘दैनिक सामना’मधून या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत. युवा सेनेचे नवे पदाधिकारी पुढीलप्रमाणे…
अनंत पांगारकर | महाराष्ट्र संवाद न्यूज वरदहस्त आणि आर्थिक हितसंबंधांमुळे सामान्य नागरिकांच्या जीवावर बेतलेल्या वाळू तस्करीचा विषय गंभीर बनल्याने ती थांबविण्यासाठी कोणतेही प्रयत्न होत नसताना मंगळवारी सकाळी प्रवरा नदी काठावर मॉर्निंग वॉक करणारे पर्यावरण प्रेमी अचानक आक्रमक झाल्याचे बघायला मिळाले. पर्यावरण प्रेमींनी आंदोलन करताना तस्करांच्या वाळूने भरलेल्या शेकडो गोण्या पुन्हा नदीपात्रात रिकाम्या केल्या. इतिहासात हा प्रकार प्रथमत:च घडल्याने राजरोसपणे नदीपात्रातून सुरू असलेली वाळू तस्करी रोखण्यासाठी या पर्यावरण प्रेमींनी केलेले आंदोलन चर्चेचा विषय ठरले आहे. प्रवरा, मुळा, म्हाळुंगी अशा नद्यांचा नदी काठ लाभलेल्या संगमनेर शहर आणि तालुक्यातून मोठ्या प्रमाणात वाळू तस्करी होत असते. सर्वच राजकीय पक्षांचे पदाधिकारी या वाळू तस्करीमध्ये गुंतल्याने…
महाराष्ट्र संवाद न्यूज | संगमनेर यापूर्वी संगमनेर तालुक्यात गारपीट आणि अतिवृष्टीने नूकसान झालेल्या शेतकऱ्यांना शासनाने ६ कोटी रुपयांची मदत उपलब्ध करून दिली आहे. नव्याने झालेल्या नूकसानीची भरपाई देण्यास शासन कुठेही कमी पडणार नाही. या संकटात सरकार तुमच्या सोबत असल्याची ग्वाही महसूल, पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली. महसूलमंत्री विखे पाटील यांनी मंगळवारी तालुक्यातील पश्चिम भागातील गावात अतिवृष्टी आणि गारपीटीने नूकसान झालेल्या गावात जावून शेतकऱ्यांच्या भेटी घेतल्या.अतिवृष्टीने प्रत्येक पीकाचे किती क्षेत्र बाधीत झाले याची आकडेवारी त्यांनी महसूल आणि कृषी विभागाकडून जाणून घेतली. तसेच पंचानाम्याचा आढावाही घेतला. मागील दोन दिवसांपासून तालुक्यातील पश्चिम भागात झालेल्या अतिवृष्टीने द्राक्ष डाळींब…
माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात, डॉ. जयश्री थोरात यांनी केली तालुक्यातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी
महाराष्ट्र संवाद न्यूज वाढलेली महागाई, शेतमालाचे पडलेले भाव अशा कठीण परिस्थितीतून मोठी गुंतवणूक करत फुलवलेल्या शेतीचे अवकाळी पाऊस व गारपिटीने मोठे नुकसान झाले आहे. सरकारने घोषणा न करता नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने जास्तीत जास्त मदत द्यावी, अशी आग्रही मागणी माजी कृषी व महसूलमंत्री, आमदार बाळासाहेब थोरात यांनी केली. आमदार थोरात व डॉ. जयश्री थोरात यांनी तालुक्यातील सावरचोळ, निमगाव खुर्द, निमगाव बुद्रुक, पेमगिरी, नांदुरी दुमाला, मेंगाळवाडी येथील गारपीट व अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीची पाहणी केली. यावेळी त्यांच्या समवेत प्रांताधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे, तहसीलदार अमोल निकम, गटविकास अधिकारी अनिल नागणे, कृषी अधिकारी प्रवीण गोसावी आदींसह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते. थोरात यांनी नुकसानग्रस्त…
शेत पीके व पडझड झालेल्या घरांची मुख्यमंत्र्यांनी केली पाहणी महाराष्ट्र संवाद न्यूज | अहमदनगर पारनेर तालुक्यातील वनकुटे गावात रविवारी (९ एप्रिल) वादळी वारा, गारपीटीसह झालेल्या ढगफुटीसदृश पावसाने झालेल्या नुकसानीची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज पाहणी केली. “एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही यासाठी युध्दपातळीवर पंचनामे करण्यात येऊन एका आठवड्यात शेतकऱ्यांचा खात्यात मदत वितरित करण्यात येईल.” अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी उपस्थित शेतकऱ्यांना दिली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी वनकुटे गावातील शेतकरी व ग्रामस्थांशी संवाद साधला. त्यांच्या अडचणी जाणून घेत पडझड झालेल्या घरांची तात्पुरत्या स्वरूपात आजच उभारणी करण्याचे आदेश दिले. वनकुटेमधील पडझळ झालेल्या २२ कुटुंबाना शबरी घरकुल योजनेमधून तात्काळ पक्के घरकुले उपलब्ध करून देण्याच्या सूचना…
महाराष्ट्र संवाद न्यूज लायन्स क्लब ऑफ संगमनेर सफायर, निमा संगमनेर आणि माधवबाग आयुर्वेद कार्डियाक क्लिनिक, संगमनेर संयुक्त विद्यमाने जागतिक आरोग्य दिनानिमित्त “विन डायबेटीस भव्य वाकेथॉन (चालण्याची स्पर्धा) स्पर्धेचे” आयोजन करण्यात आले होते. लहानग्यांपासून तर अगदी वयोवृद्धांपर्यंत सर्वांनीच या स्पर्धेत सहभाग घेऊन लायन्स क्लब राबवित असलेल्या विन डायबेटीज या मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. वैज्ञानिक शास्त्रानुसार दैनंदिन ३ किलोमीटर चालल्याने मधुमेह असलेले रूग्ण त्यांच्या रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करू शकतात. समाजामध्ये चालण्याच्या व्यायामविषयी जनजागृती निर्माण करण्यासाठी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत वय ३० वर्ष ते ९२ वर्ष वय असलेले स्पर्धेक सहभागी झाले होते. ५०० पेक्षा जास्त स्पर्धकांनी या…
