Author: अनंत पांगारकर
शिर्डी, मंगळवार दि.२३ एप्रिल शिर्डी लोकसभा मतदारसंघात सार्वत्रिक निवडणुकीची आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. या निवडणूक आदर्श आचारसंहिता काळात संबंधित मुद्रक, प्रिंटर्सनी प्रचार साहित्य तसेच इतर छपाई बाबत विशेष काळजी घेऊन आचारसंहितेचे पालन करावे. प्रचार साहित्यावर मुद्रक व प्रकाशकांचे नाव छापणे बंधनकारक असल्याचे आवाहन अपर जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी बाळासाहेब कोळेकर यांनी केले आहे. काय सांगतो कायदा… लोकप्रतिनिधीत्व अधिनियम १९५१ च्या ‘कलम १२७ अ’ द्वारे निवडणूक पत्रकांच्या छपाईवर आणि प्रसिद्धीवर निर्बंध घालण्यात आले आहेत. याकडे सर्व राजकीय पक्ष, निवडणूक लढविणारे उमेदवार आणि मुद्रणालयांच्या चालक व मालकांचे लक्ष वेधण्यात येत आहे. हाताने नक्कल काढण्याव्यतिरिक्त अन्य कोणत्याही प्रक्रियेने छापण्यात किंवा अनेक…
मंगळवार, दि.२३ एप्रिल नगर अर्बन बँक घोटाळा प्रकरणी संगमनेर मधील कर्जदार आरोपी उद्योजक अमित पंडित यांच्या न्यायालयीन कोठडीत सोमवारी ३ मेपर्यंत वाढ करण्यात आली आहे. तर पंडित याची पत्नी सपना, मुलगा सात्विक आणि भागीदार सत्येन्द्र कुमार रावत यांना मात्र तात्पुरता अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आला आहे. नगर अर्बन २९१ कोटी रुपयांच्या घोटाळ्यातील बडा ३३ कोटी रुपयांचा कर्जदार म्हणून आरोपी पंडित याच्यासह त्याच्या कुटुंबीयांचा समावेश आहे. पंडित गेल्या काही दिवसांपासून अटकेत असून न्यायालयीन कोठडीत आहे. तर पंडितची पत्नी सपना, मुलगा सात्विक आणि भागीदार रावत आर्थिक गुन्हे शाखेच्या रडारवर होते. मात्र आर्थिक गुन्हे शाखेने त्यांना अद्यापपर्यंत अटक केली नव्हती. दरम्यानच्या कालावधीत या…
सोमवार, दि.२२ एप्रिल अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदार संघात महायुतीचे सुजय विखे यांच्यासह चार उमेदवारांनी सोमवारी आपल्या उमेदवारी अर्ज दाखल केले. सुजय विखे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करतेवेळी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील उपस्थित होते. विखे यांनी तीन उमेदवारी अर्ज दाखल केले असून विखे यांच्यासह महाराष्ट्र विकास आघाडीच्या वतीने डॉ. कैलाश निवृत्ती जाधव, समता पार्टीच्या वतीने भागवत धोंडीबा गायकवाड यांनी तर ॲड. महंमद जमीर शेख यांनी आपला अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला असल्याची माहिती देण्यात आली. याशिवाय सोमवारी पाच इच्छुकांनी बारा नामनिर्देशन पत्र नेले आहेत. गुरुवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा अखेरचा दिवस आहे. शुक्रवारी…
सोमवार, दि.२२ एप्रिल राखीव शिर्डी लोकसभा मतदारसंघात सोमवारी महायुतीचे उमेदवार सदाशिव लोखंडे यांच्यासह दोघा अपक्षांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहे. यापूर्वीच महाविकास आघाडीचे उमेदवार भाऊसाहेब वाकचौरे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे. सदाशिव लोखंडे यांनी तीन उमेदवारी अर्ज दाखल केले असून त्यांच्या समवेत शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे, माजी मंत्री बबन घोलप, माजी आमदार वैभव पिचड आदींचा समावेश होता. लोखंडे यांनी शिवसेनेकडून तीन तर चंद्रकांत संभाजी दोंदे (अपक्ष) व अभिजित अशोकराव पोटे (अपक्ष) यांनी प्रत्येकी एकेक नामनिर्देशन पत्र दाखल केले आहे. त्यामुळे आतापर्यंत या मतदारसंघात चार उमेदवारी अर्ज दाखल झाले असून वंचितच्या उमेदवार उत्कर्षा रुपवते यांच्यासह आणखी काही अर्ज शेवटच्या…
सोमवार, दि.२२ एप्रिल उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी विशाल पाटील यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे न घेतल्याने सांगली लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीत अखेर बिघाडी झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून या जागेवरून महाविकास आघाडीमध्ये संघर्ष सुरू होता. त्यातच नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजित तांबे यांनी विशाल पाटील यांच्यावर अन्याय झाल्याचे सांगत त्यांना पाठिंबा दर्शविला होता. महाविकास आघाडीतील जागा वाटपापूर्वीच सांगलीच्या जागेवर शिवसेना ठाकरे गटाने महाराष्ट्र डबल केसरी चंद्रहार पाटील यांची उमेदवारी जाहीर केली होती. यामुळे काँग्रेसमध्ये संतापाचे वातावरण होते. शेवटच्या क्षणापर्यंत ही जागा काँग्रेसच्या वाट्याला यावी, यासाठी प्रयत्न करण्यात आले. मात्र यात काँग्रेस नेत्यांना अपयश आले. विशाल पाटील यांनी या…
सोमवार, दि.२२ एप्रिल मला दहा लाख रुपये दे, नाहीतर मी तुला या बांधकाम साइटवरील एकही फ्लॅट विकू देणार नाही, तुझे ही साईट बंद करून टाकेल. असा बिल्डरला दम दिल्याने बांधकाम व्यावसायिकांमध्ये खळबळ माजली आहे. याप्रकरणी खंडणी मागणाऱ्या विरुद्ध नाशिक रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक प्रमोद बाळकृष्ण गोरे (वय ५५ वर्ष, रा. प्रकाश नगर, शिखरेवाडी, नाशिक रोड, नासिक) यांनी यासंदर्भात नाशिक रोड पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, रविवारी (दि.२१ एप्रिल) दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास गोरे हे मालधक्का रोडवरील नुरी मज्जिद नाशिक रोड येथे सुरू असलेल्या इमारत बांधकामाच्या साइटवरील ऑफिसमध्ये बसलेले असताना त्यांच्या ओळखीच्या…
सोमवार, दि.२२ एप्रिल सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या ऊस गळीत हंगामाची सांगता आज होत आहे. या हंगामात कारखान्याने १० लाख ८५ हजार मेट्रिक टनाचे उच्चांकी ऊस गाळप केले असून यापुढील काळात ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी एकरी उत्पादन वाढविण्यावर भर देण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी केले. सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या २०२३-२०२४ च्या ऊस गळीत हंगामाची सांगता थोरात यांच्या उपस्थितीत झाली, यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी कारखान्याचे अध्यक्ष बाबा ओहोळ होते. समवेत व्यासपीठावर कांचनताई थोरात, कॅन्सरतज्ञ डॉ. जयश्रीताई थोरात, दूध संघाचे अध्यक्ष रणजीतसिंह देशमुख, शंकरराव खेमनर, हिरालाल पगडाल, इंद्रजीत थोरात, रामहरी कातोरे, गणेश…
सोमवार, दि.२२ एप्रिल पंतप्रधानांचे कार्यालय हे मानवतेचे कार्यालय राहिले नसून ते आत्ता वसुलीचे कार्यालय झाले आहे. मोदी सगळ्यात मोठे हप्ता बहादूर आहेत. मोदींनी ईडी लावली. सीबीआय लावली. आयबी मागे लावली. इन्कम टॅक्स विभाग मागे लावला. यंत्रणा येत होत्या. नोटीस दिल्या, रेड केल्या. पण एकाला आतमध्ये घातले का? असा प्रश्न वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकरांकडून उपस्थित करण्यात आला आहे. राज्यात महाविकास आघाडीसोबतची चर्चा फिस्कटल्यानंतर वंचित बहुजन आघाडीकडून २० पेक्षा अधिक ठिकाणी उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरविण्यात आले आहेत. वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर हे स्वतः अकोला लोकसभेतून निवडणूक लढवत असून यासाठी या मतदारसंघात त्यांनी प्रचारसभांचा धडाका लावला आहे. रविवारी (ता. २१ एप्रिल)…
रविवार, दि.२१ एप्रिल गेले ४० वर्षे राजकारणात सक्रिय असलेले माजी आमदार, महाराष्ट्र प्रदूषण महामंडळाचे माजी अध्यक्ष, माजी मुख्यमंत्री दिवंगत बॅरिस्टर ए. आर. अंतुले यांचे राजकीय वारसदार जावई मुश्ताक अंतुले सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) मध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दिली आहे. यामुळे कोकणात राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद वाढण्यास मदत होणार असून काँग्रेससाठी हा धक्का असेल. सोमवारी (दि.२२ एप्रिल) मुंबईत सकाळी ११ वाजता एमसीए लाउंज, वानखेडे स्टेडियम येथे हा प्रवेश सोहळा होणार आहे. तटकरे म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष व राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा नेतृत्वाखाली सर्वांना सोबत येत राज्य विकासाच्या वाटेवर नेले जात असल्याने अनेक नेते…
रविवार, दि.२१ एप्रिल कॅन्सरतज्ञ डॉ. जयश्रीताई थोरात यांच्या संकल्पनेतून एकविरा फाउंडेशनच्या माध्यमातून संगमनेर तालुक्यातील तरुण व तरुणींना स्पर्धा परीक्षेसाठी मोफत अद्यावत लायब्ररी सुरू करण्यात आली असून या लायब्ररीमुळे तालुक्यातील तरुणांना मोठी संधी उपलब्ध झाली असल्याचे प्रतिपादन माजी शिक्षणमंत्री, आमदार बाळासाहेब थोरात यांनी केले. थोरात यांच्या यशोधन जनसंपर्क कार्यालयात एकविरा फाउंडेशनच्यावतीने स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र लायब्ररीचा शुभारंभ आमदार थोरात यांच्या हस्ते करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी डॉ. जयश्रीताई थोरात, प्रा. डॉ. वृषाली साबळे, श्रीराम कुऱ्हे, सुरभी मोरे, सुरभी असोपा, प्रा. बाबा खरात, नामदेव कहांडळ, विजय वाकचौरे आदी उपस्थित होते. यशोधन कार्यालयात या लायब्ररीचा स्वतंत्र कक्ष असून सोमवार ते…
