Author: अनंत पांगारकर
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क संगमनेर: दारु पिऊन न्यायालयात साक्ष देणे साक्षीदाराला चांगलेच महागात पडले आहे. दारुच्या अंमलाखाली साक्ष देणाऱ्या साक्षीदाराविरोधात न्यायालयाच्या आदेशावरुन शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोमनाथ देमाजी चत्तर असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नांव आहे. ४ थे सह दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांच्यासमोर एका नियमीत फौजदारी खटल्याची सुनावणी सुरु होती. या खटल्यामध्ये सोमनाथ देमाजी चत्तर (वय ४९ वर्षे, रा. नान्नजदुमाला ता. संगमनेर) यांची साक्ष सुरु होती. साक्षीदरम्यान सोमनाथ चत्तर हे दारुच्या अंमलाखाली साक्ष देत असल्याचे आरोपीच्या वकीलांच्या लक्षात आल्याने त्यांनी साक्षीदारावर आक्षेप घेतला. त्यामुळे आरोपीच्या वकीलांच्या आक्षेपावरुन साक्षीदार सोमनाथ चत्तर याची…
महाराष्ट्र संवाद न्यूज आश्वी: प्रांत अधिकाऱ्यांच्या हद्दपारीच्या आदेशाचे उल्लंघन करत तालुक्यात फिरणाऱ्या रवींद्र उर्फ बंटी साहेबराव उर्फ आबासाहेब मदने (रा. आश्वी बुद्रुक ता. संगमनेर, जि. अहमदनगर याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याच्या विरोधात आश्वी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रवींद्र उर्फ बंटी साहेबराव उर्फ आबासाहेब मदने याला संगमनेरच्या प्रांताधिकार्यांनी तालुका क्षेत्रातून 7 डिसेंबर 2022 ते 6 जून 2023 या कालखंडासाठी हद्दपार केले होते. हद्दपार केलेला कालावधी संपण्यापूर्वीच मदने हा आश्वी बुद्रुक गावाच्या शिवारामध्ये असलेल्या हॉटेल साईदीप मध्ये फिरत असल्याची माहिती आश्वी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष भंडारे यांना मिळाली होती. पोलीस निरीक्षक भंडारे यांनी तातडीने पोलीस कर्मचारी निलेश…
मुंबई, शेतकऱ्यांच्या शेतीला दळणवळणासाठी रस्त्याच्या अडचणी निर्माण होत आहेत. त्यासाठी गावनकाशाप्रमाणे अतिक्रमित व बंद झालेले गाडीवाट, रस्ते, पाणंद, पांधण, शेतरस्ते, शिवार रस्ते, शेतावर जाण्या-येण्याचे रस्ते खुले करण्यासाठी मिशन मोडवर विशेष अभियान राबवण्यात येईल, असे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी विधानसभेत सांगितले. विधानसभा सदस्य अभिमन्यु पवार यांनी याबाबत लक्षवेधी सूचना विधानसभेत मांडली होती. मंत्री विखे-पाटील म्हणाले, राज्यातील शेत जमिनीची मोजणी, जमीन महसूलाची आकारणी व प्रथम जमाबंदीची कार्यवाही सन १८९२ ते १९३० दरम्यान पूर्ण करण्यात आलेली आहे. त्यामध्ये शेतजमीनीचे सर्व्हे निहाय गाव नकाशे तयार करण्यात आलेले आहेत. सदरचे सर्व्हे नंबरचे गाव नकाशावर मुळ जमाबंदीवेळचे विविध प्रकारचे रस्ते, गाडीवाट, पायवाट दर्शविलेले आहेत. मुळ जमाबंदीचे…
महाराष्ट्र संवाद न्यूज राज्याचे माजी मंत्री काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी सरकारकडे केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे संगमनेर तालुक्यातील रस्त्यांसाठी राज्य शासनाने तब्बल 38 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. या निधीतून तालुक्यातील विविध गावांमधील रस्त्यांचे मजबुतीकरण व डांबरीकरण केले जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. माजी मंत्री आमदार थोरात यांच्या नेतृत्वाखाली तालुक्यातील विकास कामांचा वेग कायम आहे. निळवंडेच्या डाव्या व उजव्या कालव्यांच्या कामासाठी आ. थोरात हेच सातत्याने पाठपुरावा करत असून तालुक्यातील विविध रस्ते व विकास कामे यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधी सुचवलेल्या व पाठपुरावा केलेल्या कामातून रस्ते मजबुतीकरण व डांबरीकरणासाठी अर्थसंकल्पातून नव्याने 38 कोटी रुपये निधी मिळवला आहे. या अंतर्गत राज्यमार्गांमधील…
महाराष्ट्र संवाद न्यूज छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करीत असताना केवळ भारत भूमीच नव्हे तर संपूर्ण राष्ट्र हिंदू राष्ट्र व्हावे यासाठी शपथ घ्यायला हवी. परकीयांनी आपल्या देशातील संपत्ती लुटली मात्र त्यांना आपल्या मनगटातील बळ लुटता आले नसल्याने या बाळाच्या बळावर आता आपण छत्रपतींच्या स्वप्नातील स्वराज्य निर्माण करण्याचे आवाहन कालीचरण महाराज यांनी केले. शिवजयंती युवक उत्सव समितीच्या वतीने शिवजयंतीचे औचित्य साधून कालीचरण महाराज यांच्या उपस्थितीत मोटार सायकल रॅलीचे आयोजन केले होते. रॅलीस प्रारंभ होण्यापूर्वी कालीचरण महाराज बोलत होते. उत्सव समितीचे पदाधिकारी कार्यकर्ते यावेळी हजारोच्या संख्येने उपस्थित होते. कालीचरण महाराज म्हणाले, साडेतीनशे वर्षांपूर्वी स्वराज्य स्थापन करत छत्रपती शिवाजी महाराजांनी परकीय आक्रमण थोपविले…
महाराष्ट्र संवाद न्यूज दरोडाच्या तयारीत असलेली टोळी पकडण्यात पोलीस उपाधीक्षक आणि शहर पोलिसांच्या पथकाला यश आले आहे. टोळीतील चौघांना पोलिसांनी घातक शस्त्रास्त्रासह पकडले तर त्यांचा एक साथीदार पळून जाण्यात यशस्वी झाला. गेल्या अनेक दिवसानंतर संगमनेर पोलिसांनी केलेली कामगिरी दिलासादायक ठरली आहे. त्यामुळे येथील कायदा व सुव्यवस्था सुरळीत करण्यासाठी पोलीस निरीक्षक भगवान मथुरे पाऊले टाकतील अशी आशा निर्माण झाली आहे. अधिक माहिती अशी, पोलीस उपाधीक्षक संजय सातव, पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांच्या आदेशावरून दोन दिवसांपूर्वीच्या एका गुन्ह्याच्या तपासासाठी प्रशिक्षणार्थी पोलीस उपनिरीक्षक फराहनाज पटेल, पोलीस उपाधीक्षकांच्या पथकातील पोलीस कर्मचारी प्रमोद गाडेकर, अण्णासाहेब दातीर शहर पोलीस ठाण्याचे वाहनचालक अजय आठरे, अमृत आढाव, सुभाष…
महाराष्ट्र संवाद न्यूज मुंबई : उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडलेल्या अर्थसंकल्पातील पंचामृत हे विकासाचे, सामाजिक हिताचे आणि राज्याला संमृध्दीच्या दिशेने नेण्यासाठी उपयुक्त ठरेल, असा विश्वास महसूल, पशुसंवर्धन आणि दूग्ध व्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केला. राज्यात प्रथमच गो-सेवा आयोगाची ऐतिहासिक घोषणा आणि नगर जिल्ह्यात नवीन पशुवैद्यकीय महाविद्यालय, महाराष्ट्र मेंढी व शेळी सहकार विकास महामंडळाचे मुख्यालय स्थापन करण्याच्या निर्णयाचे त्यांनी स्वागत केले आहे. अर्थसंकल्पावर प्रतिक्रीया व्यक्त करताना मंत्री विखे पाटील म्हणाले, या अर्थसंकल्पातून शेतकरी, महिला, आदिवासी, मागासवर्ग, ओबीसी समाज घटकांच्या न्याय हक्कांचे संरक्षण तसेच अनेक वर्षांपासुन प्रलंबित असलेल्या अंगणवाडी सेविकांच्या मानधनात समाधानकारक वाढ करण्यात आली. रोजगार…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क ● अनंत पांगारकर शहर पोलीस ठाण्यापासून हाकेचा अंतरावरील भाग, नेहमी पोलिसांची वर्दळ, एका वृध्द महिलेला मारहाण करुन घरातील लोकांनी घराबाहेर काढले, गेल्या काही दिवसांपासून ही महिला घराबाहेर राहते, स्वत:च्या मालकीच्या घरातून घराबाहेर काढल्याने संबधीतांवर कारवाई करावी यासाठी ही महिला एकदा नव्हे तर पोलिसांकडे आर्त विनवणी करते. मात्र पोलिसांवर याचा कोणताही परिणाम होत नाही. संबधीतांवर भादवि १५४ नुसार गुन्हा दाखल करण्याऐवजी दोन्ही वेळीस एनसी दाखल करुन वेळ मारुन नेतात. परिणामी कोणाचाही चौकशी होत नाही, आणि वृध्द महिलेला न्यायदेखील मिळत नाही. ही स्थिती आहे राज्यात सुसंस्कृत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या संगमनेर शहरातील. संगमनेर शहरात गेल्या काही दिवसांपासून कायदा व…
महाराष्ट्र संवाद न्यूज शिवजयंती उत्सवानिमित्त शिवसेना शाखा क्रमांक ११ मेनरोडच्या वतीने आगळावेगळा उपक्रम राबवत दीडशे शालेय विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप करण्यात आले. माजी नगराध्यक्ष काँग्रेस नेते दिलीप पुंड, शिवसेनेचे पदाधिकारी अॅड दिलीप साळगट, जनार्दन आहेर आदींच्या हस्ते मेन रोडवरील जुन्या राजस्थान चित्र मंदिराच्या आवारात हा वह्या वाटपाचा कार्यक्रम गुरुवारी घेण्यात आला. यावेळी शालेय विद्यार्थ्यांसह त्यांचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संयोजक आणि माजी नगरसेवक कैलास वाकचौरे यांनी शिवजयंती उत्सव आणि त्यानिमित्ताने राबविल्या जात असलेल्या या कार्यक्रमाची भूमिका विशद केली. दिलीप पुंड, दिलीप साळगट, जनार्दन आहेर आदींनी यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी बाळासाहेब डावखरे, भैया तांबोळी, अमित पवार, दत्ता कोळपकर, समीर…
महाराष्ट्र संवाद न्यूज शब्दांचे आणि आकड्यांचे फुलोरे अर्थसंकल्पात फुलविण्यात आले आहे. ज्या गोष्टी सत्यात उतरूच शकत नाही अशा अनेक घोषणा करण्यात आल्या. आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून मतांची बेगमी करण्याचा केविलवाणा प्रयत्न अर्थसंकल्पात केलेला दिसतोय. एकीकडे अवकाळी पाऊस आणि दुसरीकडे अर्थसंकल्पात घोषणांचा पाऊस, यामुळे महाराष्ट्रातील जनता हैराण असून पंचामृताचे नाव देऊन महाराष्ट्रातील जनतेसोबत आज धोका करण्यात आला असल्याची प्रतिक्रिया काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते आ. बाळासाहेब थोरात यांनी दिली आहे. निवडणुकीतील भाषणात करावयाचे अनेक मुद्दे अर्थसंकल्पात आलेले आहेत. सरकारचा मानस आहे, प्रस्तावित आहे, इच्छा आहे, भरीव तरतूद, आवश्यक निधी देण्यात येईल अशा गोष्टी अर्थसंकल्पाचा भाग होऊ शकत नाही. लोकप्रिय घोषणा करायच्या मात्र त्यासाठी…
