Author: अनंत पांगारकर

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क अहमदनगर : कुंभार समाजाला वीटभट्टी व्यवसाय सुलभरीत्या करता येईल, यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील असल्याचे आश्वासन अहमदनगरचे पालकमंत्री व राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी वीटभट्टी व्यावसायिकांच्या शिष्टमंडळाला दिले. शिष्टमंडळाच्या वतीने यावेळी पालकमंत्री विखे पाटील यांचा सत्कार करण्यात आला. शासनाने लाभलेल्या विविध जाचक अटी आणि वीट भट्टी चालकांच्या प्रश्नासंदर्भात पालकमंत्री विखे यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक पार पडली. यावेळी जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले, अप्पर जिल्हाधिकारी सुहास मापारी यांच्यासह वीटभट्टी चालक उपस्थित होते. वीट भट्टी व्यवसाय संदर्भात येणाऱ्या अनेक अडचणी, माती वाहतूक, बिगर शेती अट, कामगारांचे प्रश्न यावेळी मंत्री महोदयांसमोर शिष्टमंडळाने उपस्थित केले. यातून मार्ग काढून हा व्यवसाय…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क ‘बेशरम रंग’ या गाण्यामुळे वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या पठाण चित्रपटाबद्दल मोठी माहिती समोर येत आहे. चित्रपटावर सर्वत्र टीका जरी होत असली तरी या चित्रपटाचे ओटीटी हक्क खूपच मोठ्या म्हणजेच तब्बल दोनशे कोटी किमतीला विकले गेले आहेत. वादाच्या भोवऱ्यात अडकूनही एवढ्या मोठ्या किमतीला ‘पठाण’चे ओटीटी अधिकार विकले गेल्याने अनेक जण थक्क झाले आहेत. शाहरुख खान आणि दीपिका पदुकोण यांचा पठाण हा चित्रपट यामुळे पुन्हा एकदा चांगलाच चर्चेत आला आहे. हा चित्रपट नव्या वर्षात २५ जानेवारी रोजी चित्रपट गृहात प्रदर्शित होणार आहे. चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच त्यातील गाण्यामुळे वादात अडकला. त्यामुळे बायकॉट पठाणचे नारे सुरू असताना त्याचे ओटीपी हक्क मात्र…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क  संगमनेर : भारतीय क्रिकेट नियामक मंडळांतर्गत मुलींच्या पंधरा वर्षाखालील महाराष्ट्र क्रिकेट संघात मूळची देवकौठेची असलेली सुहानी भारत कहांडळ हिची उपकर्णधारपदी निवड झाली असून रांची व जयपूर येथे खेळल्या जाणाऱ्या नॅशनल लिगमध्ये ती महाराष्ट्र संघाचे प्रतिनिधित्व करणार आहे. भारत नवनाथ कहांडळ हे पुणे येथे आयटी कंपनीमध्ये नोकरी करत आहेत. त्यांची सुहानी कन्या आहे. लहानपणापासून सुहानीला क्रिकेटची आवड होती. तिच्यातील कलागुण हेरून भारत कहांडळ व चुलते माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांचे जनसंपर्क अधिकारी नामदेव कहांडळ यांनी तिला क्रिकेटसाठी प्रोत्साहित केले. इयत्ता नववीमध्ये शिकणारी सुहानी ही सलामीची आक्रमक फलंदाज असून उजव्या हाताने ऑफ स्पिन गोलंदाजी करते. सुहानी सध्या…

Read More

रविवार विशेष | प्रवीण पुरो मराठी शब्दकोषात निर्लज्जपणा या शब्दाचा अर्थ निलाजरेपणा असा निघतो. लायक नसलेला म्हणजे नालायक. पण त्याला नालायक म्हणू नये. निलाजरेपणा चालेल पण निर्लज्ज म्हणू नये. निलाजरेपणा हा त्यातल्या त्यात सौम्यता दर्शवतो. दोन्हींचा अर्थ सारखाच. पण तो उच्चारण्याची पध्दत त्याची तीव्रता दर्शवत असते. वेळ आणि काळानुसार त्या शब्दांची तीव्रता नोंदली जाते. गरजेप्रमाणे असे शब्द वापरले जावेत. मुळात असंसदीय असलेले असे शब्द संसदीय की असंसदीय हे त्या त्या परिस्थितीनुसार ठरतात. राज्य विधानमंडळात असंसदीय असूनही अशा शब्दांचा वापर सर्रास केला जातो. जयंत पाटलांचं निलंबन करण्याची मागणी करणार्‍या प्रत्येकाच्या तोंडी याहून कठोर असंसदीय शब्द उच्चारले गेलेत. मुंबईला सोन्याची अंडी देणारी…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क संगमनेर : युवा सेना प्रमुख आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी शिवसेनेतील मुस्लिम मावळा म्हणून गौरविलेल्या संगमनेरमधील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या शाखाप्रमुखाला अज्ञात व्यक्तीने दिलेल्या एका पत्राद्वारे जीवे मारण्याची धमकी दिली आहे. शहर पोलीस ठाण्यात या संदर्भात भारतीय दंड संहितेच्या कलम 507 नुसार नुसार अज्ञात व्यक्ती विरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिवसेना शाखाप्रमुख अजित याकूब मोमीन यांनी संगमनेर शहर पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, एका अज्ञात इसमाने मोमीनपुरा येथील घरी एक पत्र आणून दिले असल्याची माहिती मोमीन यांच्या मोठ्या भावाने त्यांना मोबाईलवर दिली. फिर्यादी मोमीन यांनी सदरचे पत्र बघितले असता त्याचे पाकीट…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क अहमदनगर : २०२२-२३ या वर्षासाठी जिल्ह्यात विविध कामांकरिता ७५३.५२ कोटी रुपयांचा नियतव्यय मंजूर करण्यात आला आहे. यातून जिल्ह्यात विविध विकासाची कामे दर्जेदार आणि गुणवत्ता पूर्ण करा तसेच संपूर्ण निधी खर्च होईल, यादृष्टीने नियोजन करण्याच्या सूचना देत पदवीधर मतदार संघाची आचारसंहिता लागू होण्याची शक्यता लक्षात घेता प्रत्येक विभागाने प्रशासकीय मान्यतेचे प्रस्ताव येत्या तीन दिवसात सादर करण्याचे निर्देश महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी यंत्रणांना दिले आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत मंत्री विखे पाटील यांच्या उपस्थितीत आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. खासदार सदाशिव लोखंडे, खासदार सुजय विखे पाटील, आमदार प्रा. राम…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क संगमनेर : सुसंस्कृत राजकारण आणि सातत्याने होत असलेला येथील विकास काही लोकांना बघवत नाही, त्यामुळे त्यांचे त्रास देण्याचे काम सुरू आहे. सत्ता येते आणि जातेही, सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर पुन्हा एकदा एका दिवसात चित्र बदलेल असा विश्वास माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केला. सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या अतिथी गृहावर संगमनेर तालुक्यातील नवनिर्वाचित २९ सरपंच व ३७ ग्रामपंचायत निवडून आलेल्या सदस्यांचा थोरात यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी आमदार डॉ. सुधीर तांबे होते. इंद्रजीत थोरात, रणजीतसिंह देशमुख, शंकर खेमनर, डॉ. जयश्री थोरात, रामहरी कातोरे, सुरेश थोरात, सोमेश्वर दिवटे आदी…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क पंढरपूर : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे हिंदुत्ववादी नाहीत, असं धक्कादायक विधान करत शिंदे-फडणवीस सरकार हे अनैतिक असल्याचे भाजपचे माजी खासदार डॉ. सुब्रह्मण्यम स्वामी यांनी म्हटलं आहे. राजकीय वर्तुळात डॉ. स्वामी यांच्या या विधानाची चर्चा रंगली आहे. स्वामी यांनी असं विधान करत देशातील व राज्यातील आपल्याच सरकारला घरचाच आहेर दिला असल्याचे म्हटले जात आहे. पंढरपूरमधील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर सरकार मुक्त करण्याबाबत चर्चा करण्यासाठी सुब्रह्मण्यम स्वामी शनिवारी (२४ डिसेंबर) पंढरपूरला आले होते. यावेळी त्यांनी ही धक्कादायक विधानं करत भाजपला घरचा आहेर दिला आहे. सुब्रह्मण्यम स्वामी म्हणाले, पंतप्रधान मोदींनी कोणते चर्च सरकारीकरण केले का? १९४७ नंतर चर्च…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क संगमनेर : खरेदीवेळी ग्राहकांनी आपल्या हक्कासाठी जागरूक असणे आवश्यक आहे. ग्राहकांच्या संरक्षणासाठी सरकारने काही कायदे बनविले आहे. त्यामुळे ग्राहकांनी आपली फसवणूक होणार नाही यासाठी सतर्क राहण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन संगमनेरचे नायब तहसीलदार उमाकांत कडनोर यांनी केले. राष्ट्रीय ग्राहक दिनी शनिवारी संगमनेरच्या तहसील कार्यालयामध्ये ग्राहक दिन साजरा करण्यात आला. यावेळी उपस्थित त्यांना विविध मान्यवरांनी त्यांच्या हक्काबद्दल माहिती दिली. जिल्हा पुरवठा अधिकारी जयश्री माळी, सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी किशोर कदम, संगमनेरचे तहसीलदार अमोल निकम यांच्या मार्गदर्शनाखाली पुरवठा विभागाच्या माध्यमातून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नायब तहसीलदार उमाकांत कडनोर होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून ग्राहक पंचायतीचे…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज प्राधान्य व अंत्योदय कुटूंब लाभार्थी योजनेच्या शिधापत्रिकाधारकांनी आपले आधारकार्ड ३१ डिसेंबर पर्यंत स्वस्तधान्य दुकानदारांकडे जमा करावेत. अन्यथा अशा शिधापत्रिका धारकांना अन्न सुरक्षा योजनेतून वगळण्यात येईल. असे आवाहन संगमनेरचे तहसीलदार अमोल निकम यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे. संगमनेर तालुक्यातील प्राधान्य व अंत्योदय कुटूंब लाभार्थी योजनेच्या शिधा पत्रिकाधारक कुटूंब प्रमुखाचे आधार कार्ड ऑनलाईन प्रणालीमध्ये जोडण्यात आलेले नाही. अशा कुटूंबाच्या याद्या स्वस्तधान्य दुकानादार, तलाठी, ग्रामसेवक यांच्याकडे प्रसिध्द करण्यात आलेल्या आहेत. तसेच गावातील व्हाट्सअप ग्रुप वर उपलब्ध करून देण्यात आले आहेत. कुटूंब प्रमुख म्हणून घोषीत झालेल्या सदस्याचे आधारकार्ड ऑनलाईन प्रमाणालीमध्ये समाविष्ट झालेले नाही. अशा कुटूंबातील सर्व सदस्यांचे आधार कार्ड आपले नांव असलेल्या…

Read More