Author: अनंत पांगारकर
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क मारुती कंपनीच्या रिट्स कारमधून संगमनेर पोलिसांनी गुरुवारी पहाटे गोमांस पकडले आहे. कारवाई दरम्यान कार चालक फरार झाला. या संदर्भात शहर पोलीस ठाण्यात अज्ञात वाहन चालका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संगमनेर शहर पोलीस ठाण्यात यासंदर्भात पोलीस उपाधीक्षक कार्यालयातील पोलीस कॉन्स्टेबल अमृत आढाव यांनी फिर्याद दिली आहे. नाशिक-पुणे महामार्गावर रायतेवाडी गावच्या शिवारात पोलीस पथक वाहनांची तपासणी करत असताना पोलिसांनी पकडलेल्या संशयित रिट्स कारमधून राज्यात गोवंश जनावराच्या कत्तलीस बंदी असताना देखील या आदेशाचे उल्लंघन करून गोमांस वाहतूक होत असल्याचे तपासणी दरम्यान आढळून आले. पोलिसांनी गोवंश जनावरांच्या गोमांस, कारसह साडेतीन लाख रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे. कारवाईदरम्यान अंधाराचा…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क अहमदनगरचे नवे जिल्हाधिकारी म्हणून सिद्धराम सालीमठ यांनी बुधवारी बदली झालेले जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांच्याकडून पदभार स्वीकारला. जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांच्यासह राज्यातील पाच आयएएस अधिकाऱ्यांच्या सरकारने मंगळवारी बदल्या केल्या होत्या. भोसले यांच्या जागेवर सरकारने सिद्धाराम सालीमठ यांचे नियुक्ती केली. बुधवारी सालीमठ यांनी लगेचच भोसले यांच्याकडून नव्या पदाचा पदभार स्वीकारला. डॉ. राजेंद्र भोसले यांची बदली मुंबईसह उपनगर जिल्हाधिकारी पदावर झाली. जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात हा पदभार समारंभ पार पडला. यावेळी महसूल विभागातील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल विभागातील अधिकाऱ्यांनी देखील डॉ. भोसले यांना पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या. उपजिल्हाधिकारी उर्मिला पाटील, उज्वला गाडेकर,…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क विरोधक काय बोलतात याकडे लक्ष न देता केंद्र आणि राज्य सरकारच्या योजनांचा लाभ नागरीकांपर्यंत पोहोचविण्यासाठी आम्ही काम करीत आहोत. सध्या राज्यात भविष्यकार खूप तयार असल्याने सरकारच्या भविष्याबाबत केली जाणारी वक्तव्य फक्त प्रसिध्दीचा स्टंट असल्याची टिका करीत राष्ट्रीय वयोश्रीच्या माध्यमातून जेष्ठ नागरीकांना आधार देण्याचे काम भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून सुरु आहे. केंद्र सरकारने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली समाजातील प्रत्येक घटकांसाठी सुरु केलेल्या योजनांचा लाभ नागरीकांना मिळवून देण्यात समाधान असल्याचेही महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी स्पष्ट केले. राष्ट्रीय वयोश्रीच्या माध्यमातून संगमनेर मधील 1635 जेष्ठ नागरीकांना मंजूर झालेल्या सहायक साधन साहित्याचे वितरण मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क संगमनेरचे सुपुत्र आणि सामाजिक बांधिलकी जपणारे सुप्रसिद्ध उद्योगपती, मालपाणी उद्योग समूहाचे चेअरमन राजेश मालपाणी यांच्या एकसष्टीनिमित्त दिनांक 17 ते 20 फेब्रुवारी असे चार दिवस संगमनेरमध्ये अभीष्टचिंतन समारोह साजरा होणार आहे. या समारोहामध्ये संगमनेरकर रसिकांना विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी मिळणार असल्याची महिती डॉ. संजय, मनिष, गिरीश व आशीष मालपाणी यांनी दिली. शुक्रवारी (दि. 17 फेब्रुवारी) सायंकाळी 6 वाजता जाणता राजा मैदानावर माजी महसूलमंत्री, आमदार बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते डॉ. संतोष खेडलेकर लिखित राजेश मालपाणी यांच्या कार्पोरेट आयुष्यावर आधारित ‘ओपन सिक्रेट’ या पुस्तकाचे प्रकाशन होणार आहे. यानंतर विश्वविख्यात गायक, संगीतकार कैलाश खेर आणि सहकारी भक्तीरसमय ‘कैलाशा’ हा कार्यक्रम…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क अहमदनगरचे जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांची मुंबई उपनगरचे जिल्हाधिकारी म्हणून सरकारने नियुक्ती केली आहे. तर त्यांच्या रिक्त जागी सिदराम सालीमठ यांची नवे जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती झाली आहे. आयएएस भोसले यांच्यासह राज्यातील अन्य काही जिल्हाधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या असून निधी चौधरी यांचाही समावेश आहे.राजेंद्र भोसले यांची मुंबई उपनगरचे जिल्हाधिकारी म्हणून त्यांच्या रिक्त जागी सिदराम सालीमठ यांची, सिडको ओरंगाबादच्या मुख्य कार्यकारी अधिकारी असलेल्या श्रीमती दीपा मुधोळ-मुंडे यांची बीडच्या जिल्हाधिकारीपदी तर त्यांच्या रिक्त झालेल्या जागेवर बीडचे जिल्हाधिकारी असलेल्या राधाबिनोद शर्मा यांची नियुक्ती करण्यात आली असून याशिवाय मुंबई उपनगरच्या जिल्हाधिकारी असलेल्या श्रीमती निधी चौधरी यांची मुंबईत सेल टॅक्सच्या ज्वाईन्ट कमिशनरपदी बदली…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क नाशिक पदवीधर मतदार संघाचे आमदार सत्यजीत तांबे यांनी मंगळवारी एक नवे ट्विट करत पुन्हा एकदा राजकीय चर्चांना सुरुवात केली आहे. एकीकडे आपण कॉग्रेस सोडली नसल्याचे सांगणाऱ्या सत्यजीत तांबे यांना या ट्विटमधून नेमके काय साध्य करायचे याची चर्चा पून्हा एकदा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे. तांबे मामांचा हात सोडणार की भाऊसाहेब थोरात यांच्या विचारावर वाटचाल करण्याचे सुचित करत मामांचा हात घट्ट पकडणार का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. तांबे या ट्विटने भाजपच्या गोटात पुन्हा एकदा आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. कॉग्रेसचे बंडखोर नेते आणि नाशिक पदवीधर मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार सत्यजीत तांबे यांनी निवडून आल्यानंतर आपण अपक्षच राहणार…
“काँग्रेसचा विचार हाच आपला विचार” सांगत पक्ष बदलाच्या चर्चेला पूर्णविराम महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क संगमनेर काँग्रेसचा विचार हाच सर्वसामान्य जनतेच्या विकासाचा व आपला विचार असून हा विचार पुढे न्यायचा आहे. असे म्हणत माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी माध्यमांनी निर्माण केलेल्या पक्ष बदलाच्या चर्चेला पूर्णविराम दिला. जिल्ह्यात विकास कामांना खीळ घालून जे दहशतीचे राजकारण शेजारच्या मंत्र्यांकडून सुरू आहे ते जिल्हा कधीही खपवून घेणार नाही, असा इशारा काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी मंत्री विखे यांचे नाव न घेता दिला. खांद्यावर झालेल्या शस्त्रक्रियेनंतर दीड महिन्याच्या कालावधीनंतर संगमनेरमध्ये आलेल्या काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते आमदार बाळासाहेब थोरात यांचे संगमनेरमधील कार्यकर्त्यांनी अभूतपूर्व स्वागत केले. त्यानंतर…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क खेळण्यासाठी मोबाईल देतो असे सांगत आठ वर्षाच्या चिमुरडीला स्वतःच्या घरी नेत तिच्यावर अत्याचार करणाऱ्या आरोपीला अतिरिक्त व विशेष जिल्हा व सत्र न्यायालयाने (पोक्सो न्यायालय) दोषी ठरवत वीस वर्ष सश्रम कारावासाची आणि दंडाची शिक्षा ठोठावली आहे. रशीद सरदार बेग (वय २० वर्ष, राहणार खोसपुरी, ता. जि. अहमदनगर) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव असून अहमदनगरच्या अतिरिक्त व विशेष (पोक्सो कोर्ट) जिल्हा व सत्र न्यायाधीश माधुरी एच. मोरे यांच्या न्यायालयासमोर या खटल्याची सुनावणी सुरू होती. या खटल्याची थोडक्यात पार्श्वभूमी अशी, तिसरं इयत्तेमध्ये शिकणारी आठ वर्षे वयाची चिमुरडी २४ नोव्हेंबर २०२० रोजी घरासमोरील ओट्यावर खेळत असताना तेथे आलेल्या आरोपीने चल…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क राष्ट्राच्या उभारणीत ज्ञानदान करणाऱ्या शिक्षकांचे मोठे योगदान आहे. म्हणूनच सामर्थ्य संपन्न राष्ट्र निर्मिती करणाऱ्या शिक्षकांना राष्ट्र बांधणीचे शिल्पकार पुरस्काराने सन्मानित करण्याचे इनरव्हीलचे कार्य कौतुकास्पद आहे, असे प्रतिपादन नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. बी. जी. शेखरपाटील यांनी केले. येथील इनरव्हील क्लब ऑफ संगमनेरतर्फे जिल्ह्यातील ४२ शिक्षकांना इनरव्हील राष्ट्रबांधणीचे शिल्पकार पुरस्काराने व पाच शाळांना पर्यावरण पूरक, उपक्रमशिल व आनंदी शाळा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्या प्रसंगी शेखर बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी इनरव्हील क्लबच्या प्रेसिडेंट वृषाली कडलग, प्रमुख अतिथी म्हणून माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, इनरव्हील जिल्हा ३१३ च्या प्रेसिडेंट रचना मालपाणी, ज्ञानेश्वर काजळे, गणेश काजळे, गटशिक्षणाधिकारी सुवर्णा…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क घारगाव : संगमनेर तालुक्यातील बोटा येथे महाशिवरात्रीनिमित्त कच नदीच्याकाठी श्री कचेश्वर मंदिरात दरवर्षीप्रमाणे यंदाही अखंड हरिनाम सप्ताहाचे भव्य दिव्य आयोजन करण्यात आले आहे. मात्र यंदा गावातील मुस्लीम बांधवांनी सामाजिक सलोखा जपत हरिनाम सप्ताहामध्ये उभारण्यात आलेल्या मंडप खर्चाची जबाबदारी घेतली आहे. त्यांच्या या उपक्रमामुळे गावात हिंदू-मुस्लिम ऐक्याची वीण घट्ट असल्याचे ग्रामस्थांनी दाखवून दिले. दरवर्षीप्रमाणे यंदाही बोटा येथे महाशिवरात्रीनिमित्त कच नदीच्याकाठी श्री कचेश्वर मंदिरात रविवार दि. १२ ते रविवार दि.१९ फेब्रुवारीपर्यंत अखंड हरिनाम सप्ताहाचे भव्य दिव्य आयोजन करण्यात आले आहे. अखंड हरिनाम सप्ताह काळात दररोज विविध धार्मिक कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात आले आहे. विशेष म्हणजे यंदा पहिल्यांदाच रोज सायंकाळी…
