Author: अनंत पांगारकर

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क महाविकास आघाडीचे सरकारकडून मी बदला घेतला. अशी कबुली फडणवीस यांनी दिली आहे. ‘कटकारस्थानाचे महामेरू’ अशी पदवी उत्तम शोभू शकते त्यांना! अशा शब्दात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे. शिवसेनेने आमच्या सोबत जी बेईमानी केली, त्या बेइमानाना त्यांची जागा दाखविण्यात आली. गृहमंत्री अमित शहा यांच्या मार्गदर्शनामुळेच आज महाराष्ट्रात भाजपा आणि बाळासाहेबांची शिवसेनेचे (शिंदे गट) सरकार सत्तेवर आले आहे. अशी स्पष्टोक्ती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्यानंतर सरकार पाडण्यामागे फडणवीसच असल्याची टीका सुरू झाले असतानाच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी ट्विटद्वारे त्यांच्यावर टीका केली आहे. आपल्या ट्विटमध्ये पटोले म्हणाले, मविआ सरकारकडून मी बदला…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली कन्याकुमारी ते काश्मीर या भारत जोडो पदयात्रेला महाराष्ट्रामध्ये देखील अभूतपूर्व प्रतिसाद मिळत आहे. भारत जोडो यात्रेतील महाराष्ट्रामधील शेवटची सभा शेगावमध्ये होत आहे. पदयात्रेमध्ये अहमदनगर मधील पाच हजारावर कार्यकर्त्यांचा सहभाग राहणार असून शेगाव येथील शेवटच्या सभेसाठी हे कार्यकर्ते उपस्थित राहणार असल्याची माहिती काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब साळुंखे आणि समन्वयक ज्ञानदेव वाफारे यांनी दिली. कन्याकुमारी येथून निघालेली भारत जोडो यात्रा सात नोव्हेंबरला महाराष्ट्रामध्ये आली आहे. नांदेड हिंगोली वाशिम या जिल्ह्यांमध्ये जनतेने यात्रेचे अभूतपूर्व स्वागत केले आहे. अकोला आणि बुलढाणा जिल्ह्यातून यात्रेचा शेवटचा प्रवास होणार असून त्यानंतर यात्रा दुसऱ्या राज्यात प्रवेश करणार आहे. यादरम्यान महाराष्ट्रातील…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क शिवसंग्रामचे अध्यक्ष विनायक मेटे यांच्या अपघात प्रकरणी वाहन चालकाची सखोल चौकशी केल्यानंतर चालकाच्या चुकीमुळे अपघात झाल्याचा निष्कर्ष सीआयडीने काढला आहे. याप्रकरणी मेटे यांच्या चालका विरोधात रसायनी पोलीस ठाण्यामध्ये सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 14 ऑगस्टला मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर शिवसंग्राम संघटनेचे प्रमुख विनायक मेटे (52) यांचा अपघाती मृत्यू झाला होता. मराठा समाजाच्या सरकारी नोकऱ्या आणि शिक्षणात आरक्षणाचे कट्टर समर्थक असलेले माजी विधान परिषद सदस्य विनायक मेटे हे मराठ्यांच्या नोकरीतील टक्क्याच्या मुद्द्यावरच्या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी मुंबईला जात होते. यादरम्यान त्यांचा रस्ते अपघातात मृत्यू झाला. पाच वेळा विधान परिषदेचे सदस्य राहिलेले मेटे हे शिवसंग्राम पक्षाचे अध्यक्ष होते.…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क संगणकाच्या माध्यमातून शैक्षणिक क्षेत्रात मोठे योगदान देणाऱ्या रोटरी क्लबने संगमनेर-अकोले तालुक्यातील वाड्या वस्त्यांवर, दुर्गम भागात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक संधी उपलब्ध व्हाव्या यासाठी, ३७ शाळांमध्ये शिकणाऱ्या दोन हजार विद्यार्थ्यांसाठी ६६५ शैक्षणिक टॅब वितरित केले. रोटरी क्लब तैवान आणि रोटरी क्लब पुणे यांच्या माध्यमातून हा प्रकल्प राबविला गेला आहे. टॅब वितरण व शिक्षकांसाठी प्रशिक्षण कार्यक्रम नुकताच मालपाणी लॉन्स येथे झाला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून पुणे नॉर्थ क्लबचे अध्यक्ष गिरीश कोणकर, केतन जोशी, पीडीजी ओमप्रकाश मोतीपवळे, एजी गौरव भुजबळ यांच्यासह संगमनेर रोटरीचे अध्यक्ष ऋषिकेश मोंढे, सचिव आनंद हासे, रोटरी क्लब अकोलेचे अध्यक्ष डॉ. रविंद्र डावरे, प्रकल्प प्रमुख दिलीप मालपाणी,…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क दुर्दम्‍य इच्‍छाशक्‍ती… अंगभूत असलेला कष्टाळूपणा अन्‌ ठरवले ते करणारच या ध्येयाने झपाटलेली एक सामान्य शेतकरी कुटुंबातील मुलगी. ती आपले बीएचे शिक्षण इंग्लिश विषयातून पुर्ण करते… समोर असे निश्चीत ध्येय नव्हतेच… मात्र काहीतरी वेगळेच करण्याचे तिचे स्वप्न होते… गरिबीचे चटके सोसत काबाडकष्ट करत, प्रचंड अभ्यास करून हे स्वप्न तिने सत्यात उतरवलेच! … अन्‌ आशा पंढरीनाथ बागुल ही गावातील पहिली महिला वकील झाली. प्रत्‍येक तरुणीसाठी आदर्शदायी ठरावा असा आशाचा प्रवास थक्‍क करणारा आहे. संगमनेर तालुक्यातील पिंपरणे येथील पंढरीनाथ बागुल यांच्या कुटूंबातही अनेक कुटूंबाप्रमाणेच गरीबी वाट्याला आलेली. मात्र या परिस्थितीत वडील आणि भावाच्या खांद्याला खांदा लावून तीदेखिल शेतीची मेहनतीची…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क आदिवासी समाजाच्या न्याय, हक्कासाठी भगवान बिरसा मुंडा ब्रिटिश सरकारच्या विरोधात लढले व वयाच्या २४ वर्षी शहिद झाले. ब्रिटिशांच्या बलाढ्य सत्तेसमोर ते झुकले नाहीत. हजारो वर्षापूर्वी देशात जंगल मोठ्या प्रमाणात होते आज ते नष्ट होत आहे पण जंगलाचे रक्षण आदिवासी बांधवांनीच केले. आदिवासी बांधवच या देशाचे मुळ निवासी व मालक आहेत, असे खा. राहुल गांधी यांनी म्हटले आहे. भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त वाशिम जिल्ह्यातील आदिवासींच्या कार्यक्रमात ते बोलत होते. राहुल गांधी म्हणाले की, देशाच्या जमिनीवर पहिला हक्क आदिवासी बांधवांचा आहे. ही जमीन तुमची आहे पण राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व भाजपा तुम्हाला आदिवासी मानत नाही वनवासी म्हणते,…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क शिर्डीच्या साई आश्रया परिवारमध्ये बाल दिनी मुलांना भारतीय जनता पार्टी महिला आघाडीच्या वतीने पुस्तकांचे वाटप करत बालदिन साजरा करण्यात आला. यावेळी बोलताना शिर्डीच्या नगरसेविका तथा भारतीय जनता पार्टीच्या महिला आघाडी जिल्हा सरचिटणीस वंदना गोंदकर यांनी प्रत्येक कुटुंबातील व्यक्तीने आपल्या मुलांची शिक्षणाची पुस्तके बाहेर कुठेही न देता साईआश्रया परिवार येथे द्यावी असे आवाहन केले आहे. “ह्रदयाची कोमलता, मनाची निरागसता, ज्ञानाची उत्सुकता, भविष्याची ओढ असणाऱ्या आणि उद्याचा देश घडवणाऱ्या बालकांना बालदिनाच्या यावेळी शुभेच्छा देण्यात आल्या. बालदिनानिमित्त साईआश्रया वाचनालय व मुलांना राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ मांसाहेब, स्वातंत्र्यविर सावरकर, प.पु. गोवळकार गुरूजी, प.पु.डॅा. हेडगेवार, पंडित दिनदयाल उपाध्याय, डॅा.बाबासाहेब आंबेडकर या राष्ट्रीय…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क ११ विज्ञान व १२ विज्ञान शाखेमधील प्रवेशीत सर्व मागासवर्गीय विद्यार्थ्यांना ‘जात प्रमाणपत्रा’अभावी ‘जात वैधता प्रमाणपत्र’ मिळण्यात अडचणी येतात. तेव्हा ’मंडणगड पॅटर्न‘ च्या धर्तीवर अहमदनगर जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती विद्यार्थ्यांना ‘जात प्रमाणपत्र’ मिळवून देण्यासाठी सहाय्य करणार आहे. यामुळे विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी ऐनवेळी विद्यार्थ्याची होणारी धावपळ वाचणार आहे. अशी माहिती अहमदनगर जिल्हा जाती प्रमाणपत्र पडताळणी समितीचे अध्यक्ष तथा अपर जिल्हाधिकारी (निवड श्रेणी) विकास मारूती पानसरे यांनी आज येथे दिली. ‘मंडणगड पॅटर्न’ च्या धर्तीवर महाविद्यालयातच ”जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र” देण्याचा उपक्रमास अहमदनगर जिल्ह्यात सुरूवात करण्यात येणार आहे. यासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य, प्राध्यापक व संबंधित काम पाहणारे…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क वाहतुकीच्या दृष्टीने नगर जिल्ह्यातील सर्वाधिक महत्त्वाचा असलेल्या अहमदनगर- मनमाड या महामार्गाच्या दुरुस्तीच्या कामामुळे अवजड वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात आली होती. मात्र रस्ता दुरूस्तीचे काम अद्याप पूर्ण न झाल्यामुळे पुन्हा १९ नोव्हेंबर २०२२ पर्यंत अहमदनगर-मनमाड महामार्गाची वाहतूक पर्यायी मार्गानेच सुरू राहणार आहे, अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.  अहमदनगर – मनमाड या महामार्गावरील अवजड वाहतूकीस विळद घाट व पुणतांबा फाटा येथून खालील पर्यायी मार्गाने वळविण्यात येणार आहे. अहमदनगर-पुणे-सोलापूरकडून मनमाडकडे जाणारी वाहतूक कल्याण बायपास चौक -अहमदनगर कल्याण महामार्गावरून आळेफाटा- संगमनेर मार्गे नाशिककडे किंवा विळद घाट – दूध डेअरी चौक- शेंडी बायपास, अहमदनगर…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क पक्ष चिन्ह गोठविण्याच्या केंद्रीय निवडणूक आयोगाच्या विरोधात शिवसेना उद्धव ठाकरे गटाने दाखल केलेली याचिका दिल्ली हायकोर्टाने फेटाळून लावली आहे. याशिवाय पक्ष चिन्हाचा निर्णय तातडीने घेण्याचे आदेश निवडणूक आयोगाला देण्यात आले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेतून बंड केलेल्या आमदारांनी शिंदे यांचे नेतृत्वाखाली आपला गट स्थापन करत आमचीच खरी शिवसेना असल्याचा दावा केला होता. यावरून ठाकरे आणि शिंदे गटांमध्ये रंगलेले युद्ध थेट न्यायालयापर्यंत जाऊन पोहोचले. अंधेरी पोट निवडणुकीपूर्वी निवडणूक आयोगाने शिवसेना हे पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह गोठविले. आणि उद्धव ठाकरे यांच्या गटाला शिवसेना – उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नाव आणि ‘मशाल’ निवडणूक चिन्ह दिले तर,…

Read More