Author: अनंत पांगारकर

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क संगमनेर : महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेच्या वतीने घेण्यात आलेल्या माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत संगमनेर तालुक्यातील सुकेवाडी येथील शुक्लेश्वर विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी यश मिळविले आहे. पाचव्या इयत्तेमध्ये शिकणाऱ्या साहिल सातपुते याच्यासह इयत्ता आठवीमध्ये शिकणारे चार विद्यार्थी शिष्यवृत्ती पात्र ठरले आहेत, अशी माहिती शाळेच्यावतीने देण्यात आली. गुणवत्ता यादीत चमकलेल्या आकांक्षा सोमनाथ कुटे हिने अहमदनगर जिल्ह्यात १४३ वा, श्रेयस रमेश सातपुते यांने अहमदनगर जिल्ह्यात २३० वा, श्रावणी संजय गुंजाळ हिने भूमिहीन पालकांचे पाल्य या गटात तालुक्यात प्रथम क्रमांक मिळविला तर ज्ञानेश्वरी जालिंदर सातपुते हिने भूमिहीन पालकांचे पाल्य या गटात तालुक्यात द्वितीय क्रमांक मिळविला. या विद्यार्थ्यांना एकनाथ भांड यांचे मार्गदर्शन लाभले. यशस्वी…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क संगमनेर : संगमनेर तालुक्यातील चिखली येथील नूतन माध्यमिक विद्यालयात पार पडलेल्या तालुकास्तरीय गणित विज्ञान प्रदर्शनामध्ये देवगड विद्यालयातील नववी मध्ये शिकणाऱ्या अनुराधा शांताराम वर्पे या विद्यार्थ्यांनीच्या गणितीय शैक्षणिक खेळणी उपकरणाने प्रथम क्रमांक मिळविला. ५ व ६ जानेवारीला पार पडलेल्या या प्रदर्शनात अनुराधा वर्पे हिने गणितीय शैक्षणिक खेळणी यामध्ये संच म्हणजे काय, कोनांच्या जोड्या, घनफळ काढणे याची प्रतिकृती तयार केली होती .सदर उपकरणासाठी तिला तीस रुपये खर्च आला होता. तालुकास्तरीय विज्ञान-गणित प्रदर्शनापूर्वी देवगड विद्यालयात विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन आणि त्याला अनुसरून निर्माण होणाऱ्या कलाकृतींना सादरीकरणाची संधी मिळावी आणि यातून संशोधनाची आवड निर्माण व्हावी यासाठी, आंतरशालेय विज्ञान-गणित प्रदर्शन भरवण्यात आले…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क संगमनेर : शहरालगत खांडगाव फाटा येथे भरधाव पीकअप आणि रिक्षाच्या झालेल्या भीषण अपघातामध्ये दोघांचा मृत्यू झाला. तर चार जण गंभीर जखमी झाले. मृतात एका महिलेचा समावेश आहे. सोमवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास नाशिक-पुणे महामार्गावरील खांडगाव फाटा येथे हा अपघात झाला. आशाबाई बबनराव चोथे (वय ४५, रा. आंबाईमाता मंदिर, पुणे), राजेंद्र उत्तम शेळके (वय ४५ रा. आंबेगाव, पुणे) अशी मृतांची नावे असून दत्ता पांडुरंग वराडे, कैलास चोथे, आशा चोथे, राजू शेळके यांचा जखमींमध्ये समावेश आहे. एम.एच. १७ सीव्ही ००२६ या क्रमांकाची पिकअप नासिक-पुणे मार्गावरून पुण्याच्या दिशेने जात होती. यावेळी खांडगाव फाट्यावर समोरून संगमनेरच्या दिशेने येत असलेली रिक्षा…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क संगमनेर : दिवसेंदिवस गंभीर बनलेल्या अवैध वाळू उपसा आणि वाहतुकी विरोधात संगमनेरच्या महसूल विभागाने कारवाया सुरू केल्या आहेत. एकाच वेळी अवैध वाळूची वाहतूक करणारी तब्बल पाच वाहने महसूल विभागाच्या पथकाने पकडली आहेत. या सर्वांवर दंडात्मक कारवाई केली जाणार असल्याची माहिती तहसीलदार अमोल निकम यांनी ‘महाराष्ट्र संवाद न्यूजला’ दिली. महसूल विभागाच्या या कारवाईमुळे अवैध वाळू उपसा करणाऱ्या वाळू तस्करांमध्ये खळबळ उडाली आहे. महसूलच्या पथकाने शहर व परिसरातून ही वाहने पकडली आहेत. गेल्या काही दिवसापासून राज्य सरकारने गौण खनिजाबाबत कडक धोरण अवलंबिले आहे. याचा फटका वाळू तस्करांना बसला असून महसूल खात्याने अवैध वाळू तस्करी विरोधात कठोर पावले उचलण्यास…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क  संगमनेर : थोर स्वातंत्र्यसेनानी व अमृत उद्योग समूहाचे संस्थापक, सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी १२ जानेवारी हा प्रेरणा दिन म्हणून साजरा होत असून यावर्षीही गावोगावी मोठ्या उत्साहात प्रेरणा दिन होणार आहे. या निमित्ताने अमृत उद्योग समूहाच्यावतीने गुरुवारी (१२ जानेवारी) सकाळी ९ वाजता अमृतेश्वर मंदिरातील प्रांगणाजवळ प्रेरणास्थळ येथे अभिवादन करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. स्वातंत्र्यसेनानी सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांनी सहकारातून संगमनेर तालुक्यामध्ये समृद्धी निर्माण केली. आर्थिक शिस्त, काटकसर, पारदर्शकता ही त्रिसूत्री सहकारात राबवून संपूर्ण देशासाठी दिशादर्शक ठरणारे संगमनेर हे आदर्श सहकाराचे मॉडेल निर्माण केले आहे. दरवर्षी १२ जानेवारी हा दिवस संगमनेर तालुका व अहमदनगर…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क संगमनेर ; कोरोना काळात जिल्हा बंदी असताना नासिकहून पुणे जिल्ह्यात जाणाऱ्या वाहनाची तपासणी करताना नाकाबंदी दरम्यान दंड आणि कारवाई चुकविण्याचे उद्देशाने पळून जाण्याच्या प्रयत्नात पोलीस निरीक्षकांच्या पायावर कार घालून त्यांच्या पायाला दुखापत करणाऱ्या आरोपीची संगमनेरच्या अतिरिक्त सत्र न्यायाधीशांनी निर्दोष मुक्तता केली आहे. न्यायाधीश डी. आर. देशपांडे यांनी अवघ्या ११ महिन्यात हा खटला निकाली काढला. १५ मे २०२१ रोजी संगमनेर तालुक्यातील आंबी खालसा येथील आंबी फाट्यावर हा प्रकार घडला होता. कोरोना प्रादुर्भाव असल्याने नगरच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशावरून विना मास्क फिरणाऱ्या व्यक्तींकडे एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जाताना पास आहेत की नाही याची पोलीस निरीक्षक सुनील पाटील तपासणी करत होते.…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क संगमनेर : संगमनेर शहर आणि तालुक्यात मोटरसायकल चोरी दररोज सुरू आहे. या पार्श्वभूमीवर तालुका पोलिसांनी पकडलेल्या एका संशयित आरोपीकडून सहा मोटारसायकलीसह तीन मोबाईल हस्तगत केले आहे. या संशयिताच्या साथीदारांचा शोध लागल्यास आणखी मोटर सायकल मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पोलीस कर्मचारी अनिल जाधव यांना संगमनेर तालुक्यातील पारेगाव बुद्रुक येथील संशयित इसम लक्ष्मण जयराम गोरडे (वय ४२) हा चोरीच्या मोटरसायकल विकत असल्याची माहिती मिळाली होती. त्यांनी ही माहिती वरिष्ठांना दिली. जाधव यांनी संशयित इसम गोरडे याला ताब्यात घेतले. पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या व्यक्तीकडे अधिक चौकशी केली असता त्याने मोटार सायकली चोरल्या असल्याची कबुली दिली. पोलिसांनी त्याच्याकडून सुमारे दोन…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क संगमनेर : राजस्थान युवक मंडळ आणि मालपाणी परिवाराच्या पुढाकाराने व महाराष्ट्र प्रदेश माहेश्वरी सभा आणि संगमनेरमधील माहेश्वरी समाज यांच्या सहकार्याने आयोजित केले जाणारे विवाहयोग्य युवक-युवती परिचय संमेलन मागील दहा वर्षांपासून माहेश्वरी समाजाला वरदान ठरले आहे. हे संमेलन म्हणजे व्यवस्थापन कौशल्याचे सर्वोत्कृष्ट उदाहरण असल्याचे गौरवोद्गार प्रसिध्द व्यवस्थापन गुरु डॉ. वसंत बंग यांनी काढले. अखिल भारतीय माहेश्वरी विवाहयोग्य युवक-युवती परिचय संमेलनाचा उद्घाटनावेळी ते बोलत होते. राजस्थान मंडळाचे अध्यक्ष मनिष मालपाणी, स्वागताध्यक्ष राजेश मालपाणी, उद्योजक विजय आसावा, अजय लाहोटी, मंडळाचे कार्याध्यक्ष रोहित मणियार, प्रकल्प प्रमुख ओम इंदाणी, उपाध्यक्ष सम्राट भंडारी, संगमनेर तालुका माहेश्वरी सभेचे अध्यक्ष अतुल झंवर, कोषाध्यक्ष उमेश…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क संगमनेर : मानवी जीवनात विज्ञानाचे मोठे महत्त्व आहे. मानवाला अज्ञानाकडून ज्ञानाकडे नेण्याचे काम विज्ञान करत असते. त्यामुळे ज्ञानप्राप्तीसाठी विज्ञानाची कास धरणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन शिक्षक नेते हिरालाल पगडाल यांनी केले. ४७ वे संगमनेर तालुका विज्ञान गणित प्रदर्शन ५ ते ७ जानेवारी दरम्यान तालुक्यातील चिखली येथील नूतन माध्यमिक विद्यालयात पार पडले. प्रदर्शनाचे उद्घाटन पगडाल यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी पंचायत समितीचे गट विकास अधिकारी अनिल नागणे होते. गटशिक्षणाधिकारी सुवर्णा फटांगरे, जिल्हा परिषद सदस्य रामहरी कातोरे, ग्राम विकास संस्थेचे अध्यक्ष सोपान सहाने, उपाध्यक्ष बाळासाहेब देशमुख नंदकुमार हासे आदी उपस्थित होते. गटविकास अधिकारी नागणे म्हणाले,…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क पुणे : शिक्षण झाल्यानंतर आपल्याकडे मराठी माणूस नोकरीला प्राधान्य देतो. व्यवसाय करण्याचे धाडस तो दाखवत नाही. असं मत पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले आहे. पिंपरी चिंचवडमध्ये आयोजित १८ व्या जागतिक मराठी संमेलनामध्ये ते बोलत होते. यावेळी मंत्री सुधीर मुनगंटीवार, पी. डी. पाटील, संमेलनाध्यक्ष ज्ञानेश्वर मुळे आधी व्यासपीठावर उपस्थित होते. मराठी टक्का आणि मराठी माणसाविषयी चिंता व्यक्त करत पाटील म्हणाले, राजकारणात मराठी माणूस येण्याचे प्रमाण देखील कमी झाले आहे. निवडणुकांमध्ये उमेदवारी देऊ नका, असं मराठी माणूस म्हणू लागला आहे. विश्लेषकांमध्ये देखील मराठी नाव फारसे सापडत नाही. यात अमराठी व्यक्ती अधिक संख्येने आहेत. मराठी माणसाची ही…

Read More