Author: अनंत पांगारकर

महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर : भारत सरकारच्या विद्युत मंत्रालय आणि उर्जा दक्षता आयोगाच्या वतीने दिला जाणारा सन २०२२ चा राष्ट्रीय उर्जा संवर्धन पुरस्कार संगमनेरच्या लोकपंचायत ग्रामीण तंत्रशिक्षण संस्थेला मिळाला आहे. १४ डिसेंबर २०२२ रोजी राष्ट्रीय उर्जा संरक्षण दिनाचे औचित्य साधून भारताच्या राष्ट्रपती महामहीम श्रीमती द्रोपदी मुर्म व केंद्रिय उर्जामंत्री आर. के. सिंघ, केंद्रीय राज्यमंत्री श्रीकिशन पाल, उर्जा विभागाचे सचिव आलोक कुमार यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पुरस्कार दिल्लीच्या विज्ञान भवनात प्रदान करण्यात आला. कॉलेज व युनिव्हर्सिटी या विभागातून या पुरस्काराची निवड झाली आहे. लोकपंचायत संस्थेचे अध्यक्ष विजय थोरात यांच्यावतीने कार्यकारी विश्वस्त सारंगधर पांडे, प्राचार्य प्रशांत सहाणे व नोडल ऑफिसर बाळू हासे यांनी…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नागपूर : भंडारदरा लाभक्षेत्रात रब्बी आणि उन्हाळी हंगामासह एकूण पाच आवर्तनाचे नियोजन करण्याच्या सुचना महसुल तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिल्या आहेत. रब्बी हंगामातील पहिले आवर्तन बुधवारी २१ डिसेंबर पासूनच सुरु करण्याचे निर्देश त्यांनी जलसंपदा विभागाला दिले. बुधवारी कालवा सल्लागार समितीची बैठक नागपूर येथे विधानभवनात मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या बैठकीस माजी महसुल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात, आमदार लहू कानडे, आमदार डॉ. किरण लहामटे, अतिरिक्त जिल्हाधिकारी सुहास मापारी, कृषी विभागाचे अधिकारी जगताप, जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता जी. बी. नान्नोर यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते. प्रारंभी अभियंता नान्नोर यांनी धरणातील पाणीसाठ्याबाबत सादरीकरण करुन बैठकीमध्ये…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज अहमदनगर : व्यवसायासाठी काढण्यात आलेला जीएसटी नंबर फाईल न केल्यामुळे रद्द करण्यात आला होता. तो पुन्हा कार्यान्वित करण्यासाठी तक्रारदाराकडे चार हजार रुपयांच्या लाचेची मागणी करणाऱ्या महिला राज्यकर अधिकाऱ्याविरोधात अँटी करप्शन विभागाने नगरच्या भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. सारिका जयवंत निकम (वय 39 वर्ष) असे लाचेची मागणी करणाऱ्या जीएसटी (वस्तू व सेवा कर) विभागाच्या आरोपी महिला राज्य कर अधिकाऱ्याचे नाव आहे. निकम यांनी मोहरी तालुका पाथर्डी येथील तक्रारदाराच्या जुलै 2022 मध्ये जीएसटी नंबर रिटर्न फाईल न केल्यामुळे रद्द केला होता. व्यवसायासाठी असलेला जीएसटी नंबर पुन्हा कार्यान्वित करण्यासाठी निकम यांनी 17 ऑक्टोबरला तक्रारदाराकडे पाच हजार रुपयांच्या…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज निवडणूक निकालाची परिणती दोन गटाच्या हाणामारीमध्ये झाल्याने परस्पर विरोधी तक्रारीवरून संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात अंभोरे येथील तब्बल 30 जणांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहे. निवडणूक निकालानंतर झालेल्या हाणामारीत शेतकरी विकास मंडळाचे (थोरात गट) विजयी उमेदवार नारायण सहादु खेमनर यांना गंभीर दुखापत झाल्याने त्यांना संगमनेरातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मंगळवारी संगमनेर तालुक्यातील 37 ग्रामपंचायतीचे निवडणूक निकाल जाहीर झाले. यात राजकीय दृष्ट्या महत्त्वपूर्ण असलेल्या अंभोरे गावच्या ग्रामपंचायतीचाही समावेश होता. निवडणूक निकालानंतर अंभोऱ्यात मात्र शांततेऐवजी हाणामारीची किनार लाभली आहे. राजकीय प्रतिष्ठेचा प्रश्न निर्माण झाल्याने दोन्ही गटांकडून तालुका पोलीस ठाण्यात परस्परविरोधी तक्रारी दाखल करण्यात आल्या. जनसेवा मंडळाच्या (विखे गट) वतीने…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नगर जिल्ह्यातील 203 ग्रामपंचायतचे निवडणूक निकाल जाहीर झाले आहेत. यात सर्वाधिक 127 ग्रामपंचायतीची सरपंचपदे महाविकास आघाडीला मिळाली आहेत. उर्वरित 76 पैकी 59 सरपंचपदे भारतीय जनता पक्षाच्या वाट्याला आली. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस जिल्ह्यातील सर्वाधिक 83 जागा मिळविणारा मोठा पक्ष ठरला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पाठोपाठ भाजप दुसऱ्या स्थानावर आहे. तिसऱ्या स्थानी 28 जागांवर काँग्रेस असून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला 16 जागांवर यश मिळाले आहे. विशेष म्हणजे वंचित बहुजन आघाडी, प्रहार जनशक्ती व बाळासाहेबांची शिवसेना म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे समर्थकांनी प्रत्येकी एकेका ग्रामपंचायत सरपंचपद मिळवीत ग्रामीण राजकारणात खाते उघडले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाळासाहेबांची शिवसेना पक्षाला पारनेर तालुक्यात…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज रविवारी झालेल्या संगमनेर तालुक्यातील 37 ग्रामपंचायतीचे निवडणूक निकाल हाती आले असून ग्रामपंचायत निहाय निवडून आलेले सरपंच आणि उमेदवारांची नावे खाली देत आहोत. निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार अमोल निकम यांच्या नेतृत्वाखाली सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात क्रीडा संकुलात मतमोजणी पार पडली. असे आहेत 37 ग्रामपंचायतीचे निवडणूक निकाल पिंपरणे : नारायण सिताराम मरभळ (सरपंच), धनंजय सदाशिव वाकचौरे उत्तम विश्वनाथ राहिंज, कोमल नवनाथ मरभळ, मिनीनाथ बबन जोर्वेकर, अर्चना सुधीर रोहम, रंजना निलेश पवार, श्रीकांत गौतम बागुल, विद्या गोकुळ काळे, बाळासाहेब गंगा निकम, शैला मंजाबापू साळवे व पल्लवी प्रशांत देशमुख (सदस्य) ग्रामपंचायत ओझर खुर्द : गिरीजा अण्णासाहेब साबळे (सरपंच), सुंदरनाथ चंद्रभान…

Read More

३७ पैकी थोरात गटाचे २६, विखे गटाचे ९ तर २ ठिकाणी अपक्ष सरपंच महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर तालुक्यामध्ये रविवारी ३७ ग्रामपंचायतीसाठी निवडणूक झाली. मंगळवारी झालेल्या मतमोजणीनंतर तालुक्याचे गाव कारभारी स्पष्ट झाले. तालुक्यातील बहुसंख्य ग्रामपंचायतीवर राज्याचे माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या गटाने आपले वर्चस्व कायम राखले आहे. मात्र महसूल मंत्री राधाकृष्ण विखे यांनीही संगमनेरची निवडणूक प्रतिष्ठेची केल्याने नऊ ग्रामपंचायतीमध्ये सरपंच पदी त्यांच्या गटाच्या उमेदवारांना यश मिळाले आहे. मतमोजणीनंतर मिळालेल्या माहितीनुसार 37 पैकी 26 ग्रामपंचायतीमध्ये राज्याचे माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखालील शेतकरी विकास मंडळाचे, तर नऊ ग्रामपंचायतीमध्ये महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वाखालील आणि दोन ग्रामपंचायतीमध्ये अपक्ष सरपंचांनी…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज राष्ट्रीय पातळीवरील योगासन स्पर्धेच्या तिसऱ्या राष्ट्रीय स्पर्धेचे यजमानपद भूषविण्याची संधी संगमनेरला मिळाली आहे. २६ ते ३० डिसेंबर दरम्यान होणाऱ्या या स्पर्धेत देशातील तीस राज्यांमधून एक हजारावर अधिक स्पर्धक, त्यांचे प्रशिक्षक व राष्ट्रीय योगासन स्पोर्टस फेडरेशनचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. संगमनेरला पहिल्यांदाच राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेच्या आयोजनाचा मान मिळाला असून या माध्यमातून संगमनेरच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला जाणार असल्याची माहिती राष्ट्रीय योगासन स्पोर्टस फेडरेशनचे उपाध्यक्ष डॉक्टर संजय मालपाणी यांनी दिली. मालपाणी म्हणाले, जिल्हा व राज्य पातळीवरील योगासन स्पर्धेच्या यशस्वी आयोजनानंतर आता संगमनेरमध्ये राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धा ध्रुव ग्लोबल स्कूलच्या क्रीडा संकुलात पार पडत आहेत. या राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेमुळे योगासन स्पर्धेचे…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज महसूल खात्यातून सेवानिवृत्त झालेल्या अधिकाऱ्यांच्या ‘रिटायर्ड रेव्हून्यू ऑफिसर’ या व्हाट्सअप ग्रुपवरील सदस्यांचा स्नेह मेळावा (गेट-टुगेदर) नुकताच अहमदनगरमध्ये पार पडला. सेवानिवृत्त झालेल्या जवळपास 90 अधिकाऱ्यांनी या स्नेह मेळाव्याला हजेरी लावली होती. सेवानिवृत्त नायब तहसीलदार शशिकांत मरकड यांनी ‘रिटायर्ड रेव्हून्यू ऑफिसर’ या नावाने महसूल खात्यातून सेवानिवृत्त झालेल्या अधिकाऱ्यांचा एक व्हाट्सअप ग्रुप केला आहे. या ग्रुपवर अधिकाऱ्यांच्या विचारांची देवाण-घेवाण सुरू असते. यातूनच शालेय विद्यार्थ्यांच्या आणि नंतर नोकरी व्यवसायानिमित्त इतरत्र गेलेले लोक व्हाट्सअपच्या माध्यमातून एकमेकांशी जोडले गेले. त्यांचे स्नेह मेळावे सुरू झाले. याच पार्श्वभूमीवर सेवानिवृत्तीनंतर एकमेकांच्या संपर्कात असलेल्या या ग्रुपच्या माध्यमातून स्नेहमेळावा घेण्याची कल्पना पुढे आली. लगेचच स्नेह मेळाव्याची तारीख आणि…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर तालुक्यातील ३७ गावांचे गाव कारभारी ठरविण्यासाठी या गावांमध्ये रविवारी ग्रामपंचायतींच्या निवडणुका होत राजकीय दृष्ट्या महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या या निवडणुकांकडे लक्ष लागले आहे. राजकीय दृष्ट्या महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या घुलेवाडी, साकुर, जोर्वे या तुलनेने मोठ्या आणि संवेदनशील ग्रामपंचायतींचा समावेश आहे.  प्रशासनाने निवडणुकीची संपूर्ण तयारी केली असून शनिवारी रात्रीच निवडणूक कर्मचारी आपापल्या नेमून दिलेल्या केंद्रावर रवाना झाले. रविवारी सकाळीच मतदानास सुरुवात झाली असून मतदान प्रक्रिया शांततेत पार पाडण्याचे आवाहन संगमनेरचे तहसीलदार अमोल निकम यांनी केले आहे. रविवारी सकाळीच राज्याचे माजी महसूल मंत्री काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी आपल्या कुटुंबीयांसह जोर्वे येथे मतदान केले. निवडणुकीमुळे मतदान होत असलेल्या आणि त्या…

Read More